घे भरारी ... भाग 3

Mises disuja gunvanch kautuk kel tyala premani kurvalal

घे भरारी... भाग 3


आधीच्या भागात आपण पाहिले की ,

गुणवानच्या आयुष्यात नवीन वादळ आलेलं पण त्यातूनही तो सुखरूप बाहेर पडला..काळ सरकत गेला, गुणवानला पैंटिंगची आवड होती, एकदा तिनी स्पर्धेत भाग घेतला आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला...आणि त्याच पैंटिंग एक्सहिबिशन मध्ये सुद्धा ठेवण्यात आलं होतं,सर्वांनी गुणवानच खूप कौतुक केलं, एका व्यक्तीनी ti पैंटिंग विकत घेतली आणि गुणवानला भेटायला आली...


आता पुढे,


मिसेस डिसुझानी गुणवानच कौतुक केलं , त्याला प्रेमानी कुरवाळल..


आणि केशवला सांगितलं,

“तुमच्या मुलाने जी पेंटिंग केली होती ना ज्याच्यात त्याला पहिला क्रमांक मिळाला, ती पैंटिंग एक्झिबिशन मध्ये ठेवण्यात आली होती.. ती पैंटिंग माझ्या मनाला खूप भावली... माझ्या हृदयाला भिडली... तीच पैंटिंग मी विकत घेतली आणि आज त्याचे पैसे द्यायला मी इथे आलेली आहे, मला ते पैसे फक्त गुणवानच्या हातात द्यायचे होते, म्हणून मी आले...
 त्यांनी पर्समधून पैशाच पॅकेट काढल आणि गुणवानच्या हातावर ठेवत म्हणाल्या,


“ हे बघ बाळा तुझे पैसे... तुझ्या गुणाचे पैसे.. तुझ्या कष्टाचे पैसे.. पाच हजार रुपये म्हणजे किती गुणवानला  तेवढं काही कळलं नाही त्यामुळे तो आनंद व्यक्त करू शकला नाही, पण गुणवानचे आई-बाबांना म्हणजेच केशव आणि स्मिताला खूप आनंद झाला...


 त्यांना गुणवानचा अभिमान वाटायला लागला, गुणवान काहीतरी करू शकेल याची त्यांना खात्री यायला लागली आणि खूप आनंद झाला....


शाळेतही गुणवानच खूप कौतुक झालं....मिसेस डिसुझानी ही बातमी न्युजवर यावी,  गुणवान आणि गुणवान सारख्या अनेक मुलांना प्रोत्साहन मिळाव म्हणून खूप प्रयत्न केले...न्युज वर बातमी झळकली... सगळीकडे, गुणवानची चर्चा व्हायला लागली.... त्याच कौतुक व्हायला लागलं...


टीव्ही वरची बातमी केशवच्या आईच्या नजरेतून सुटली नाही, बातमी बघताच शहरात धाव घेतली... आणि केशवच्या घरी आली , स्मितानी दार उघडला...


“आई तुम्ही?..इथे?...


“हो ,सुनबाई..मी माझ्या नातवाला भेटायला आले...कुठे आहे माझा नातू?..


“या ना, आत या...बसा..झोपलाय तो..आताच शाळेतून आला ना...
“आणि केशव..तो कुठे आहे?...


“कुठे असणार?..ऑफिस मध्ये गेले...
“बसा..मी पाणी आणि काही खायला आणते....
“नको सुनबाई...काहीच करू नकोस...बसना इथे जरा..मला बोलायचं आहे तुझ्याशी...


“बोला ना आई....


“मला माफ कर सुनबाई...मी चुकले, मी माझ्या नातू सोबत जे काही केलं त्याला क्षमा नाही तरी मला माफ कर...  केशवची आई हात जोडून माफी मागत होती...


“आई तुम्ही असे हात नका जोडू...


तुम्हाला कळलं यातच सगळं आलं...जे काही घडलं ते आम्ही विसरलो, तुम्हीही विसरा...तुम्ही एकटेच आलात बाबा नाही आले..


“नाही, ते अजून त्यातून बाहेर पडले नाही आहेत, त्यांना सावरायला थोडा वेळ लागेल...


“पण आई तुम्ही अश्या अवस्थेत त्यांना एकट्याना टाकून यायला नको होतं...
“जाणार आहे ग मी परत, नातवाला आणि मुलाला भेटले की निघेल....
“अहो आई आलात तर रहा की काही दिवस, आपण बाबांना समजावून बोलवून घेऊ, नाही तर मी केशवला सांगते तो जाऊन घेऊन येईल....


त्यांचं बोलणं सुरू असताना आतून आवाज आला...


आया...आया...


गुणवानच्या तोंडुन स्पष्ट शब्द निघत नसल्यामुळे  तो आया च म्हणायचा...
त्याचा आवाज ऐकताच स्मिता आता गेली..
“अरे उठला माझा बाला....सोन्या बघ कुणीतरी आलय तुला भेटायला...चल चल
स्मिता त्याला घेऊन हॉल मध्ये आली..


“बघ, आजी आलीय तुला भेटायला...
आजीला बघताच गुणवानचे पाय आपोआप मागे गेले..आणि तो आईच्या मागे लपला...
स्मिता पलटली..


“बाळा काय झालं...असा का मागे का आलास..आजी आहे ना ती...
“गुणवाननी काहीही न बोलता फक्त   नकारार्थी मान हलवली...आणि पळतच खोलीत गेला...


“आई तुम्ही बसा ह...मी बघते त्याला...


अस म्हणत स्मिता आत गेली...


त्याला समजावलं पण गुणवान रूम मधून बाहेर यायला तयार नव्हता.. ती त्याला आत बसवून बाहेर आली..आणि केशवला फोन करून आई आल्याचं कळवलं.. थोड्या वेळाने केशव घरी आला..केशवच्या मनात आईबद्दल थोडी अळी होती....त्याने चेहऱ्यावर तस दाखवलं नाही तो आईशी चांगलाच बोलला पण आईला सगळं कळलं, त्याच्या मनात आपल्याबद्दल अळी आहे हे तिला त्याचा चेहरा बघून कळलं....


रात्री सगळे जेवून झोपले...दुसऱ्या दिवशी सकाळी आई जायला निघाली...


तेव्हा केशव बाहेर आला आणि आईचा हात पकडून...
“आई न सांगताच जाणार होतीस... 


 “काय करू पोरा..मी चुकले त्याची शिक्षा तर मला मिळायलाच हवी ना...


“आई तू थांब ग..मी उगाच तुझ्याशी असा वागलो, पण यापुढे अस नाही होणार....तू आता जाऊ नकोस, इथेच रहा , मी उद्या गावाला जाऊन बाबांना घेऊन येतो....”

 केशवची आई थांबली, दोघेही आपापल्या कामाला लागले , केशवची आई गुणवानच्या खोलीत गेली..


आजीला बघून गुणवान धास्तावला...आजीनी त्याच्यासोबत जे काही केलं ते त्याला आठवत असावं बहुतेक...


माणसाची बुद्धी कमी असो किंवा जास्त असो काही गोष्टी  आतपर्यंत रुजल्या जातात..गुणवानच्या बाबतीतही तेच झालं असावं...तो मतिमंद असला तरी त्यालाही भावना आहेत, तो व्यक्त करू शकला नसला तरी काही घटना त्याच्या मनात घर करून गेल्यात....


आजी त्याच्याजवळ गेली, आजीनी त्याचा हात हातात घेतला...
तसाच त्यानी हात झटकला... 


“मला तू नकोय,तू छान नाही आहेस...तू घाण आहेस... गुणवान त्याच्या बोबळ्या बोलने  बोलला...


“बाळा मला माहिती आहे, मी चुकीची वागली, पण मी छान नाही आहे, अस नाही आहे...परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते, तुला नाही कळणार बाळा ,तू लहान आहेस अजून...


आजी स्वतःशीच पुटपुटल्या...


तो खूप मोठा हो, मोठ नाव कर मला अजून काय हवंय..तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे... माझं काय आज आहे उद्या नाही...पण मला पोरकं करू नका रे...तुमच्याशिवाय कोण आहे माझं....  आजी भावुक झाल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं...डोळे पुसत त्या खोलीतून निघून गेल्या..


केशव त्याच्या बाबांना पण घेऊन आला,  आता सगळे आनंदाने एकत्र  राहू लागले....


हळूहळू गुणवानच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवत होता, आधीपेक्षा बरीच प्रगती त्याच्यात दिसत होती....


त्याला वाचता यावं, व्यवस्थित बोलता यावं म्हणून त्याचे बाबा त्याला छोटे छोटे पॅराग्राफ लिहून वाचायला द्यायचे...


अशीच केशवनी एकदा कविता लिहिली आणि ती गुणवानला वाचायला दिली...

यश आपल्याच हातात असत...


विचार काय करतोस
काहीतरी करून दाखव
वेळ निघून जाईल
स्वतःला सावरून दाखव...


आयुष्यात कित्येक येतील, जातील
थोडा विश्वास ठेवून दाखव
खोटारडेपणा खूप या जगात
सत्याची कास धरून तर दाखव...


आलास या जगात तर
 काहीतरी करून दाखव
नाहीतर तुझ्या जगण्याला 
अर्थ उरणार नाही
आलास काय नी
गेलास काय
कुणी तुला विचारणारही नाही...


जग तर असा जग
प्रत्येक माणूस तुझा असेल
तू गेल्यानंतर
प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असेल...

कविता गुणवाननी खुप छान वाचली आणि ती वाचत असताना केशवनी विडिओ तयार केला...आणि तो त्याच्या मित्रांमध्ये शेअर केला...


त्यातल्या एका मित्राचा लगेच फोन आला...
केशवनी फोन उचलला..
“हॅलो.
“हॅलो केशव..रमेश बोलतोय.


“हा रमेश बोल, कसा काय फोन केला, आज माझी आठवण कशी आली....


“तुझ्या मुलाची कविता ऐकली रे.. काळजात भिडली...
त्याच्या तो निरागस चेहरा आणि ते बोबडे बोल.. कवितेचे बोल मनात साठले ....


खरच केशव तुझा मुलगा  गुणी आहे रे.. तो मोठा होईल..
रमेशच बोलणं ऐकून केशव भावुक झाला, डोळ्यातून पाणी तरळलं...


“केशव...ऐकतोस ना रे...
“हो.हो..आहे मी..
“गप्प का?..
“तुझ्या कौतुकाने भारावलो रे....


ज्या मुलाला घरच्यांनी नाकारल होत, आज त्याच कौतुक होताना बघून मला काय वाटतं, हे मी शब्दात व्यक्त  करू शकत नाही....


“एका बापाची अवस्था मी समजू शकतो...


बघशील तू....तुझा मुलगा मोठा होऊन खूप काहीतरी छान करेल...आणि तुला त्याचा  अभिमान वाटेल....


क्रमशः...


गुणवानच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल..की आणखी काहीतरी विपरीत घडणार , बघूया पुढील भागात..


ही कथा फ्री आहे, सबस्क्रीप्शन लागणार नाही

🎭 Series Post

View all