घटस्फोट होता होता...

कथा आवडल्यास आपला अभिप्राय कळवायला विसरू नका.

सुमित आणि स्नेहामध्ये अलिकडे रोजच खटके उडत होते... दोघेही working त्यामुळे दोघांचेही ego clash होत होते. काल तर सुमितने कहरच केला सरळ कपड्यांची बॅग भरली आणि त्याचा मित्र नितीनकडे रहायला निघून गेला. 

      नितीन already divorcee होता. सुमित आणि स्नेहा दोघेही career oriented होते. दोघांकडेही मेहनत करण्याची क्षमता आणि कमालीची जिद्द होती. गेले पंधरा दिवस झाले सुमित घरी परत आलाच नाही. अलिकडे व्यसन जरा जास्तच झालं होत. त्यामुळे फोनवरुन शाब्दिक वाद सुरू होते आणि ते पार divorce पर्यंत जाऊन पोहोचले होते.

     परवा स्वराज (सुमित आणि स्नेहाचा एकुलता एक मुलगा) मित्रांसोबत क्रिकेट खेळताना अचानक बेशुद्ध झाला. बरेच प्रयत्न करुनही तो शुद्धीवर आला नाही. शेजारी राहणाऱ्या अब्दुल चाचांनी सर्व प्रकार पाहिला आणि तातडीने त्याला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. स्नेहाला आॅफिसमधून निघायला आणि ट्रॅफिकमधून मार्ग काढण्यामध्ये हॉस्पिटलला पोहोचायला वेळ लागतो. तोवर दोन तीन वेळा डॉक्टर डिसोझा सिस्टरना स्वराजच्या पालकांच्याबाबत विचारतात. डॉक्टरांनाही स्वराजचे पालक किती निष्काळजी आणि बेजबाबदार आहेत याची जाणीव होते. अब्दुल चाचा टेस्टसाठी स्वराजच्या stretcher मागे फिरत होते. 

      बराच वेळाने स्नेहा हॉस्पिटलला पोहोचते.... अब्दुल चाचा काय झालं स्वराजला... कुठे आहे तो? डिसोझा सिस्टर स्नेहाला डॉक्टरांकडे घेऊन जातात. डॉक्टर या पेशन्टची आई....sorry doctor मला यायला उशीर झाला. Its ok  पण तुम्ही एकट्याच मला स्वराजबद्दल त्याच्या आईवडील दोघांशी बोलायचं आहे... sorry doctor पण आम्ही दोघं सध्या एकत्र राहात नाही. हे बघामॅडम... तुम्हाला तुमच्या मुलाच्या जीवापेक्षा तुमचा अहंकार महत्त्वाचा वाटतो का?.... पेशन्टच्या कंडिशनविषयी मला दोघांसोबत बोलायच आहे. तुम्ही त्यांना तातडीने बोलवून घ्या. स्नेहा सुमितला फोनवरुन घडल्या प्रकाराविषयी सांगते आणि असशील तसा तातडीने निघून ये म्हणते. 

      सुमितही स्वराजसाठी हातचं काम टाकून हॉस्पीटलमध्ये पोहोचतो. काय झाल डॉक्टर स्वराजला.... मी सुमित देशमुख हे पहा... मि. देशमुख मी स्वराजचे सर्व टेस्ट, एक्स रे रिपोर्टस् चेक केले आणि हे रिपोर्टस् मी सिनिअर मेंदू तज्ज्ञ डॉ.साठे सरांना पण पाठवले. आमच्या हेच निदर्शनास आले की स्वराजला ब्रेनट्यूमर आहे आणि हे serious आहे.... डॉक्टर मग यावर काही उपाय.... हो मॅडम आपल्याला स्वराजचे ऑपरेशन करावे लागेल... यात त्याच्या जीवाला धोका पण असू शकतो... आणखी एक डॉ.साठे दोन दिवसांनी येतील. सध्या ते इथे नाहीत, तोपर्यंत स्वराजला आपण हिच treatment continue करु आणि या कालावधीमध्ये पेशन्टला इथेच under observation ठेवू. सुमित डॉक्टरांची गयावया करतो.डॉक्टर तुम्ही कसेही स्वराजला वाचवा प्लीज.... मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. मि. देशमुख relax आपण प्रयत्न करु.

      आता मात्र सुमित आणि स्नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. स्वराज त्यांना दोघांना एकत्र बांधून ठेवणारा एकमेव धागा होता. दोघांच्या अभिमान आणि अहंकारामुळे स्वराजकडे त्यांचे दुर्लक्ष होत गेले हे लक्षात येण्यास फार उशीर झाला होता. सुमित आणि स्नेहा एकत्र रहात नव्हते पण त्या दोघांना जोडून ठेवणारा स्वराज आज मृत्यूशी झुंज देत होता. दोघांनाही समजेनासे झाले की पाय कोणत्या देवाचे धरायचे आणि कोणत्या देवापुढे डोके टेकवायचे. 

     दोन दिवसांनी डॉ.साठे परतल्यावर स्वराजच्या ऑपरेशनची वेळ निश्चित होते. 

       ऑपरेशनच्या अगोदरच्या दिवशीडिसोजा सिस्टर राऊंडवर येतात hello ....Swaraj baba how r you या दोन दिवसात डिसोजा सिस्टरांनी स्वराजचे मन जिंकले होते. स्वराजही सिस्टरना हसून सांगतो perfectly fine sister thank you... I am happy to say boy कल तुम्हारा ऑपरेशन होगा...."shortly u will b free from ur trouble boy. "God bless u my child. 

      एव्हाना हिंम्मत असलेला स्वराज यावेळी जरा nervous होतो. तो सिस्टरना म्हणतो सिस्टर या ऑपरेशननंतर मी वाचेल की नाही मला माहित नाही.... O Swaraj boy ऐसा नही बोलनेका dont worry मै आज चर्च जायेगा तुम्हारे लिए चर्चमे pray करेगा promise.... त्यांचे हे बोलणे सुरू असते तेंव्हाच तिथे अब्दुल चाचा स्वराजला  भेटायला येतात. 

      ते स्वराजचे आणि सिस्टरचे बोलणे ऐकतात. अरे... मी पणअल्लाहकडे दुआ मागणार बेटा काळजी करु नकोस... सिस्टर, अब्दुल चाचा.... pray आणि दुआ माझ्या मम्मा डॅडसाठी करा. मला ते आवडतात. मी खूप प्रेम करतो त्यांच्यावर पण मम्मा डॅड सतत भांडत असतात. मला ते एकत्र हवे आहेत. मी या ऑपरेशननंतर वाचेल की नाही माहित नाही पण माझी ही एकच इच्छा आहे की मम्मा डॅडने divorce नाही घेतला पाहिजे. प्लिज अब्दुल चाचा तुम्ही समजवा ना त्यांना.

     डॉ.साठे स्वराजच्या सर्व तपासणी करुन त्याला ऑपरेशनला घेतात आणि ऑपरेशन सुरू होते. operation theatre च्या बाहेर सुमित आणि स्नेहा चिंताग्रस्त मनस्थितीत पण वेगवेगळे बसलेले असतात. शेवटी अब्दुल चाचाच पुढाकार घेऊन स्नेहा, सुमितला स्वराजची इच्छा सांगतात. 

      सुमित भाई इतका पैसा हेऐश्वर्य सर्व तुमचचं कमावलेल आहे. पण तुमच्या दोघांच्या वादात स्वराजची फरफट होत आहे. तुमचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून तुम्हीच वाचवू शकता. निदान एक वेळा स्वराज बाबाचा विचार करा.... सुमित भाई जास्त ताणू नका नाहीतर ही नाती तुटतील. स्नेहा वहिनी तुम्ही पण सुमित दादांना समजून घ्या. स्वराज बाबाला तुम्ही दोघेही एकत्र हवे आहात. divorce चा विचार मनातून काढून टाका आणि सुखाने संसार करा. सुमित भाई अपनी शादी को बचा लो...

       डॉ. साठे ऑपरेशन आटपून बाहेर येऊन बोलतात Mr.Deshmukh operation is successful dont worry. पेशंट शुद्धीवर आल्यावर आपण त्याला भेटू शकता. बराच वेळ दोघांच्या शाब्दिक चकमकी नंतर दोघांचे राग निवळले होते. दोघांनाही अपराधी वाटत होते. 

    स्वराज शुद्धीवर आल्यावर सुमित आणि स्नेहा स्वराजला सोबत जाऊनभेटतात. स्नेहा स्वराजच्या केसांवरुन हात फिरवत त्याला माथ्यावर kiss करते. सुमितही त्याच्याजवळ बसून स्वराज लवकर बरा हो... आपण खूप धमाल करू. मला तू हवा आहेस. दोघेही एकदमच sorry.... बोलतात.

सुमित प्रफुल्लित होऊन स्नेहाला म्हणतो.... उद्याच आॅफिसमध्ये सुट्टीचा अर्ज टाकू आणि स्वराज बरा झाला की मस्तपैकी गोवा फिरायला जाऊ.

धन्यवाद

don't copy without permission.

©® Sujata Tambade