Login

घारु-4

The Story About A Whispering Sound.
घारूऽ- 4
@राधिका कुलकर्णी.


दुपारची वामकुक्षी उरकून दोघेही गावच्या फेरफटक्याला बाहेर पडले. गावात गेल्या आठ दहा वर्षांत बरेच बदल झाले होते. गाव काही ठिकाणी बरेच बदलले असले तरी जूना मारूतीपार, मंदिर, त्यामागे वाहणारी नदी आणि परीसर आजही तसाच होता शांत, संथ. जणू जगाच्या धावपळीशी ह्यांच्या तीळमात्र संबंध नसावा. त्या संथ पाण्यात दोघेही जरावेळ पाय सोडून बसले. लोकांना बसायला तिथे दगडी पार बांधले होते. दोघेही त्यावर जाऊन बसले. कोणीच कुणाशी काही बोलत नव्हते. राघवला हीच जागा बोलण्यासाठी योग्य वाटत होती पण सुरवात कशी करावी हे त्याला समजत नव्हतं. तो आपल्याच विचारात गढलेला पाहून अब्दूलने पुन्हा विचारले,

“क्या बात है रघ्या, कुछ बोलता क्यू नहीं?”

राघवने अब्दूलच्या डोळ्यात रोखून बघितले आणि पुन्हा नजर खाली वळवली. तो शब्दांची जुळवाजुळव करत होता पण नेमकं काय सांगावं? हाच प्रश्न होता. अखेरीस मौन तोडत तो बोलला,

“अब्दूल, ये भूत,प्रेत,आत्मा,साया जैसी बातों पर तुम यकीन रखते हो?”

“क्यू? क्या हुंआ? आज अचानक ये कैसी बात निकाली?”

“बता तो सही, तुम विश्वास करते हो या नहीं?”

“अब सुनी सुनाई बातों पर तो यकीन नही होता लेकिन ऐसी बाते होती है ये मै मानता हुं। मेरे अब्बू बहोत मानते ऐसी बाते। लेकीन हुआ क्या है?”

“कुछ नहीं, पिछले कुछ दिनों से मेरे साथ अजिबोगरीब घटनांए घट रही है। लेकीन यकीन नही कर पा रहा हुं की ये सही मे हो रहा है या नही।”

“क्या मतलब? क्या हो रहा है तेरे साथ?”

“कुछ नहीं यार, कुछ दिनोंसे मुझे मेरे कान मे कोई आवाज दे रहा है। आवाज तो ऐसे लगती है जैसे दादी ही बुला रही है। फिर सोचता हुं वो तो कब की भगवान को प्यारी हो गयी, वो अचानक मुझे क्यू पुकारेगी? शायद मेरा सपना होगा सोचकर अनसुना किया लेकीन ये बार बार हो रहा है। मुझे कुछ समझ नही आ रहा की मै किसको पुंछु। ”

त्याच्या बोलण्यावर तिथे अचानक शांतता पसरली. अब्दूल हसून मस्करीत विषय बदलेल असे अपेक्षित होते राघवला पण त्याविपरीत अब्दूल खूप गंभीर झाला. त्याची ही शांतता राघवला अस्वस्थ करत होती.

“अब्दूल, क्या हुंआ? कुछ बोल ना?”

राघवने विचारले.

एक दीर्घ श्वास घेऊन अब्दूल बोलू लागला.

“रघ्या, अब मै जो बोल रहा हुं वो ध्यान से सुन। गांव मे बहोत लोग बोलते है की तुम्हारे घर मे कुछ है। कुछ डरावनी आवाजें भी सुनाई देती है ऐसा लोग कहते हैं। लोग बोलते है की इस घर पर कोई साया मंडराता है। पता नहीं इसमे कितनी सच्चाई है, लेकीन अब तु ये सब बोल रहा है तो मुझे लगा तुम्हे ये बात बतानी चाहिए।”

राघवला हे ऐकून धक्काच बसला. आपल्या घराविषयी गावात इतक्या चर्चा होत होत्या आणि आपल्याला पत्ताच नाही. तो खूप अस्वस्थ झाला.

“इतना सब हो रहा था तो तुमने मुझे बताया क्यू नही यार?”

“ अब मै क्या बताता? जिस बात का कोई प्रमाण नही, सबूत नहीं, वो बताकर तुम्हे क्यू परेशान करू? और वैसे भी बताता तो भी तु क्या कर लेता?”

हवालदील होत राघवनेही मान डोलावली.

“तेरी बात भी सही है, लेकीन अब जो मेरे साथ हो रहा है उसका क्या? वो तो मै खुद अनुभव कर रहा हुं। इसे हवा मे बात कहकर नकारा भी नहीं जा सकता नाऽ?”

अब्दूल एकदम झटक्याने उठला.

“तु चल मेरे साथ।”

“लेकीन कहाॅं?”

“अब कुछ मत पुछ। बस चल मेरे साथ।”

अब्दूलने एका किकमध्ये गाडी स्टार्ट केली आणि धुराळा उडवत दोघेही एका दर्ग्याजवळ पोहोचले. त्या दर्ग्याजवळ एक मशीद होती जिथे अब्दूल रोज नमाज पढायला यायचा. लहानपणी तो नमाज अदा करायला आत गेला की राघव इथेच बाहेर बसून त्याची वाट पहायचा. आजही तेच झाले. पण आज मात्र अब्दूल त्याला घेऊन आत गेला. पीरबाबा आत देवडीत बसून माळ ओढत होते.

अब्दूल त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला,

“बाबाजी, ये मेरा दोस्त है इसको एक परेशानी है। क्या आप इसकी परेशानी का हल निकाल सकते है?
कृपा करके इसकी मदत करे।”

अब्दूलच्या विनंतीवर त्यांनी राघवला खुणेनेच जवळ बोलावले. खाली अंथरलेल्या चादरीवर दोघेही बसले. पीरबाबा थोड्यावेळ उठून आत गेले. त्यांच्या गळ्यातील माळ कबरीवर टेकवून तोंडाने काहीतरी पुटपुटत ते पुन्हा दोघांच्यासमोर ध्यानस्थ मुद्रेत येऊन बसले आणि विचारते झाले,

“बोल बच्चा, क्या समस्या है तेरी?”

राघवला दोन क्षण समजेना काय सांगावे. अब्दूलने इशाऱ्यात त्याला धीर दिला तसा राघवने मागच्या काही दिवसांत जे जे घडले अगदी नोकरी जाण्यापासून ते आत्ता काल घरावर पडलेल्या झाडापर्यंत सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला.

“बाबा मुझे समझ नही आ रहा, ये सब मेरे साथ अभी अचानक से क्यू हो रहा है?”

बाबांनी पुन्हा डोळे मिटले. आपली हातातली माळ राघवच्या मस्तकावर टेकवून त्यांनी ध्यान लावले. काही क्षण गेले आणि मग ते बोलू लागले.

“बेटा सुन, मुझे जो ज्ञात हो रहा है उससे अभी इतनाही समझ में आ रहा है की कोई है जो चाहता है की तू गाव के इस घर मे आ के बसे। ये घर फिरसे हरा-भरा हो। इससे जादा मै और कुछ बता नही पाऊंगा। हो सके तो यहाँ आके रहो। हो सकता है तुम्हारी सारी परेशानियाॅं दूर हो।”

“ठीक है बाबा, सोचता हुं। बहोत बहोत शुकरीयां।”

राघवने त्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि दोघेही तिथून बाहेर पडले.

“लेकीन यार ये कैसे मुमकीन है तु ही सोच? इतने सालों से शहर मे रह रहा हुं। अब अचानक से सब छोडछाडकर आना क्या इतना सरल है?”

राघव आपल्या मनातली व्यथा अब्दूलपुढे व्यक्त होत होता.

“हां, सही तो है। चल जाने दे,अब जादा मत सोच। देखेंगे कोई ना कोई रास्ता निकल आयेगा। भरोसा रख।”

हताश मनाने राघव पुन्हा अब्दूलच्या घरी आला. अब्दूलचे वडील समोरच्या पडवीत बसले होते. राघवने जाऊन त्यांना नमस्कार केला. त्याच्या बाबतीत काय घडतंय ते अब्दूलने थोडक्यात आपल्या वडीलांना सांगितले त्यावर राघवनेही एक प्रश्न विचारला त्यांना.

“चाचा, तुम्ही दोघे तर एकमेकांचे चांगले मित्र होतात ना?
तुम्हाला त्यांनी कधी काही सांगितले का हो आमच्या घरगुती गोष्टींबाबत,आज्जीबाबत? ती कुठे गेली, कधी गेली, कशी वारली?”

अब्दूलचे वडील पण आता थोडे गंभीर झाले.

“तुम लोग खाना खा लो। बाद में आराम से बात करेंगे, जाओ बेटा।”

“नहीं चाचा, अब बात निकली है तो पुरी करकेही जायेंगे। आप बताईये।”

राघवच्या आग्रहाला बळी पडून अब्दूलच्या वडिलांनी जी गोष्ट सांगितली ती फारच धक्कादायक होती.
ऐकून राघवच्या पायाखालची जमीनच सरकली.

—-------------------------------------------------------------
घारू.
क्रमशः -4
@राधिका कुलकर्णी.

अशी काय गोष्ट कळलीय राघवला?
ह्या घटनेचा राघवच्या आयुष्यावर काय परिणाम होणार?
हे जाणून घ्यायला अंतिम भाग नक्की वाचा.
धन्यवाद.


🎭 Series Post

View all