घरोघरी मातीच्या चुली...

सुरेखा....... सुरेखा आधी इकडे ये, ओटा गॅस तू नीट पुसत नाहीस, तो आधी पुसून घे बरं, आणि कालची भाजी खारट झाली होती, कसली धावपळ असते ग तुला, साधा स्वैपाक नीट बनवत नाहीस, आता ही नुसती बसून आहेस सकाळच्या वेळी, त्यापेक्षा जरा काम आवरून जायच

सुरेखा प्रदीप एक छान जोडपं, दोघ नौकरी करायचे, एक मुलगी होती त्यांना नेहा, घरी प्रदीप चे आई बाबा असायचे, नेहा 5 वीत होती, शाळेतून आल्यावर आई बाबा घरी असायचे, ते एक बर होत, नेहा च्या सांभाळण्याचा प्रश्न सुटला होता, एक जनरेशन गॅप होता घरा मध्ये, सासुबाई अजून घरात खूप लक्ष द्यायच्या हे झालं नाही ते झाल नाही अस सतत सुरू असायच त्यांच, अताशा सुरेखा ला हे सहन होत नव्हत, पूर्वी वाटायचं तिला होईल थोडे दिवसांनी हे सगळ बंद, उलट परिस्थिती अजून बिकट होत चालली होती, ऑफिस चे टार्गेट वाढत होते घरात शांती नाही, प्रदीप चांगला होता खुप तीच एक काय जमेची बाजू होती

सुरेखाच आज जरा लवकर आवरलं होतं, नेहाची सकाळची शाळा, नेहा शाळेत गेली, आता चहा घेवून निघू ऑफिसला म्हणुन ती आरामात बसून पेपर वाचत चहा घेत होती, नवरा प्रदीप हि त्याचा चहाचा कप घेऊन तिला जॉईन झाला,

"अरे वा आज लवकर आवरलेल् दिसते मॅडम",..... प्रदीप

"हो चहा घेतला की निघते मी ऑफिसला, तुझा काय प्रोग्राम आहे दिवसभर",...... सुरेखा

" मीही माझा आवरून निघतोच",..... प्रदीप

" संध्याकाळी येशील का माझ्या ऑफिसला, मला थोडी खरेदी करायची आहे, मग सोबत येऊ घरी",...... सुरेखा

" हो चालेल, तसं तू मला चार वाजता रिमाइंडर दे",..... प्रदीप

दोघं नवरा-बायको आरामशीर गप्पा मारत आहेत, हेच खटकलं सासूबाईंना, दोघांच्या समोरून त्या किचनमध्ये गेल्या तरी त्या दोघांचं लक्ष नव्हतं, मस्त गप्पांमध्ये गुंग होते ते,......

"सुरेखा....... सुरेखा आधी इकडे ये, ओटा गॅस तू नीट पुसत नाहीस, तो आधी पुसून घे बरं, आणि कालची भाजी खारट झाली होती, कसली धावपळ असते ग तुला, साधा स्वैपाक नीट बनवत नाहीस, आता ही नुसती बसून आहेस सकाळच्या वेळी, त्यापेक्षा जरा काम आवरून जायच, माझी किती धावपळ होते दिवसभर",...... सासुबाई नेहमीच अशी चीड चीड करायच्या

" आई माझ आवरलं आहे आता, मी जाते आहे ऑफिसला, आणि हा गॅस मी नाही पुसला, तो आपल्या मदतनीस आशाने पुसला आहे, आणि भाजीच म्हणाल तर ऑफिसमध्ये सगळ्यांना खूप आवडली माझी भाजी",...... सुरेखा कंटाळली होती आता रोजच्याच कट कटीला, किती वर्ष तेच तेच......

सासूबाईंना खूप राग आला,..., " एवढंच काय ते सकाळी लुटूपुटू आवरायचं, आणि पळायचं ऑफिसला, नंतर आहेच दिवसभर आम्ही सगळे काम उपसायला",

" आई तुम्ही असं का बोलत आहात आणि प्लीज तुम्ही सकाळी सकाळी हा सूर लावत नका जाऊ, दिवसभर मला खूप काम असतं, सकाळीच मुड जातो हे सगळं ऐकलं की, किती शुल्लक गोष्टी आहेत या, कोणीही करू शकत हे काम नाही का? पण तुम्हाला ना मला सगळं बोलायचं असतं, इतकी वर्षे झाली तरी स्वैपाक येत नाही का मला, नसेल पटत तर तुम्ही करून घ्या तुमच तुमच, पण या पुढे डोक्याला ताप नको आहे मला ",...... सुरेखा आपली पर्स घेऊन डबा न घेताच ऑफिसला जायला निघाली,

" सुरेखा अग डब्बा तर घे", ..... प्रदीप

" काही नको डब्बा मला, फक्त शांती हवी, मिळेल का या घरात",.... सुरेखा रागाने ऑफिसला निघून गेली

प्रदीप किचन मध्ये आला,.... "काय झाला आई, तुझं काय सुरू असतं ग रोज सकाळी, आवरलं तिने सगळं, आणि कुणीही कितीही जरी काम केलं तरी थोड फार बाकी राहतच, तुला असं वाटतं की तू परफेक्ट आहेस, सकाळी सकाळी नको भांडत जाऊ ",....... प्रदीप आवरायला रूम मध्ये निघून गेला,

सासुबाई चिडचिड करत रूम मध्ये आल्या,...." कोणाला काही बोलायची सोय राहिली नाही या घरात",

" काय झालं",..... सासरेबुवा विचारत होते

" थोडं जरी कामावरून काही बोललं ना तर आज कालच्या मुलींना खूप राग येतो",..... सासुबाई

" मग कशाला बोलतेस तू एवढ ",...... बाबा

" तुम्ही पण तीची बाजू घेत आहात का" ,...... सासुबाई

"नाही मी कोणाचीही बाजू घेत नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत टोकत नको जाऊस मुलांना , प्रत्येक गोष्टीत बोलून तू तुझच महत्त्व कमी करून घेते आहेस, कशाला चिडचिड करतेस येवढी आणि सुनबाई सगळं काम करून जातात ऑफिसला, आपल्याला काय दुपारी फक्त जेवण गरम करूनच खायचं असत, एखाद्या वेळी कुकर लावावा लागतो, प्रदीप च्या लेकी कडे नेहा कडे लक्ष द्यावं लागतं, नेहा ही मोठी आहे आता, तिचा काही त्रास नाही , आपल्याला फक्त घर सांभाळायचं असतं, बरीच वर्ष झाले आहेत आता प्रदीप च्या लग्नाला, पुरे झालं तुझा आता हा सासुरवास, जरा शांत राहायचं ",...... बाबा समजावत होते

सुरुवातीला सासूबाईंना राग आला, पण नंतर त्यांनी शांतपणे विचार केला, बर्‍याच दिवसापासुन त्यांना वाटत होतं की चीड चीड केली की त्रास होतो, स्वतःला आणि दुसर्‍यालाही, हो आपण न बोलणं योग्य राहील यापुढे, पण पूर्ण आवरत नाही सुरेखा, जाऊ दे, लगेच जमणार नाही आपल्याला गप्प बसायला , पण शक्य तितका कमी बोलू, माझ खरच चुकतंय का .....

सुरेखा ऑफिसला आली, आज दिवसभर तीच डोक दुखत होत, काहीही काम नीट झाल नाही....

संध्याकाळी सुरेखा आणि प्रदीप ऑफीसच्या खाली भेटले

" चल तुला काय शॉपिंग करायची आहे ना",...... प्रदीप

" माझा तर मुडच नाही" ,..... सुरेखा

प्रदीप,...... "का काय झालं, तू काही खाल्लं का दिवसभर, चल कॉफी घेवू",... दोघ कॉफी शॉप ला गेले

"अरे आई खुपच सध्या त्रास देतात, काहीही केलं तरी त्यांना पटत नाही, सकाळची सुरुवातच अशी होऊन जाते ना, दिवसभर तोच विचार मनात असतो, ऑफिस मध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत मी, काय करू",.... सुरेखा वैतागली होती

" तू लक्ष देऊ नको आईकडे",...... काही सुचत नव्हत म्हणून प्रदीप बोलला,

" अरे हेच चालला आहे वर्षानुवर्ष आपल्या घरी, मला आता सहन होत नाही, माझी आता बऱ्यापैकी चिडचिड होते, आपल्याला घरी शांत रिलॅक्स वाटायला पाहिजे, पण मला घरी जावसं वाटत नाही, गेल्या गेल्या त्यांच सुरू होत सकाळी हे झाल नाही ते केल नाही, अरे मी काय मशीन आहे का, दिवसभर काम करायला, आणि परत दोन प्रेमाचे शब्द नाही कधी आपल्यासाठी " ,...... सुरेखा रडायला लागली

आई ही ना का करते अस काय माहिती, मलाच काहीतरी कराव लागेल, अश्या वातावरणात सुरेखा कशी राहील.....

" आपण एक काम करूया का आपल्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक भाडेकरू आहे, त्याला काढून टाकू तिकडे आई बाबांना शिफ्ट करू, त्यांचं जेवण खावन सगळ आपल्या घरी राहील, ते तिकडे राहिले म्हणजे थोडी तरी शांतता मिळेल ",..... प्रदीपने सुचवून बघितल

"नको रे कसं वाटतं हे असं, त्यापेक्षा मीच थोडे दिवस नेहाला घेऊन आईकडे जाते, आठ पंधरा दिवस राहते आणि येईल मी ",..... सुरेखा

" पण तू माहेरी जाण्याने प्रॉब्लेम सुटणार नाही, तू आल्यावर आई परत तसच वागणार , प्लीज नको जाऊ, मला नाही करमणार तुमच्याशिवाय",..... प्रदीप

" हो मला माहिती आहे, कधी जाच कमी होईल त्यांच्या काय माहिती, या वेळी मी जाणार आई कडे मला समजावू नको प्रदीप, मला वेळ दे थोडा, मी उद्या सकाळी जाते आहे माझ्या आई कडे, तिकडून आल्या नंतर बोलून बघू बाबांशी, ते काढतील काही तरी मार्ग ",.... सुरेखाने निर्णय घेतला होता

प्रदीप नाराज झाला होता, ते सुरेखाला समजल

" तू पण चल मग, तुला ही थोडा बदल होईल ",..... सुरेखा

चालेल......

सुरेखाचं माहेर त्याच गावात होतं, तिथून ऑफिसला शाळेत जाणं ही काही अवघड नव्हतं, दोघं घरी आले नेहमीप्रमाणे आवरायला आपल्या रूम मध्ये निघून गेले, नेहा हि गेली त्यांच्यासोबत रूम मध्ये , जेवणाची वेळ झाली तरी ते दोघ बाहेर आले नाहीत,

सासुबाई आल्या,..... "सुरेखा अगं ताट नाही घ्यायचे का आज",..

" तुम्ही जेवून घ्या आई आम्ही नंतर बसू",...... सुरेखा

"का काय झालं आहे",.... सासुबाई

"काही झालं नाहीये, आम्हाला शांततेत जेवायच आहे, तुम्ही जेवून घ्या",..... सुरेखा

मी शांतता भंग करते का मग, मी विलन आहे का या घरची...... सासुबाई बोलणार होत्या पण त्या गप्प राहिल्या

सासुबाई सासरे जेवायला बसले, ..... "आज आपण दोघ, बाकीचे कुठे आहेत" ,

"ते मागून बसणार आहे, सुरेखा अजून रागावली आहे माझ्या वर ",..... सासुबाई

"तू काही बोलली नाही ना तीला परत ",.... बाबा

नाही......

"पहिली पायरी योग्य तुझी, अशी गप्प रहात जा",..... बाबा

नंतर नेहा प्रदीप आणि सुरेखा यांनी जेवायला घेतल,....

"किती छान वाटत आहे ना मम्मी आज जेवायला",..... छोटीशी नेहा बोलली

डोक्याला शांत वाटत आहे, नाहीतर जेवतानाही सासुबाई मला पन्नास वेळा उठवतात, आणि जेवणाला लाही नाव ठेवतात...

जेवण झाल्यावर प्रदीप आई-बाबांच्या रूम मध्ये गेला,..... "आई मी सुरेखा आणि नेहा आठ पंधरा दिवसांसाठी तिच्या आईकडे जात आहोत, तुला हवं तसं रहा आता या घरात, हवी तेवढी स्वच्छता ठेव, तुझ्या मनाप्रमाणे रहा",..... ,

" का रे असं बोलतोस तू मला, मी तुझी आई आहे, टोमणे का मारतोस ,"......सासुबाई . ,

"तू हे सगळं वर्षानुवर्ष सुरेखाला बोलते आहेस, तिला कसं वाटत असेल, तुला एकदा बोलल की राग आला, वाईट वाटल लगेच, तुझ्याशी असच बोलणार मी, चांगल बोलण ऐकायची आम्हाला सवय नाही, दुसऱ्याचं जीवन मुश्कील करून टाकतेस ना तू , त्यांना कस वाटत असेल या सतत च्या कुजकट बोलण्याने, आता समजल ",....... प्रदीप

सासुबाई रडायला लागल्या प्रदीप रूमच्या बाहेर निघून गेला.....

" बघितलं का हो कसा बोलला तो मला",..... सासुबाई

" मी आधीही काही बोलत नव्हतो आणि आता ही काही बोलत नाही, तू सुनबाईला रोज बोलत असतेस, तेव्हा मी बोललो नाही, आता आपला मुलगा तुला बोलतो तेव्हाही मी काहीही बोलणार नाही, तूच यातून काय शिकायचं ते बघ",..... बाबा

" अहो त्यांना थांबवा ना",..... सासुबाई

"नाही त्याचा उपयोग नाही तू, आता त्यांना काही जरी सांगितलं तू की मी चांगली झाली आहे, मी काही बोलणार नाही, तरी ते ऐकणार नाहीत, हे सगळ तुला तुझ्या कृतीतून दाखवावे लागेल, जाऊदे त्यांना जात असतील बाहेर तर, तिच्या आईकडे राहतील आठ पंधरा दिवसात येतील, मात्र त्यानंतर तू तुझ्या कृतीतुन व्यवस्थित वाग, जास्त मधेमधे करू नको, त्यांचा संसार आहे, सगळ तुला येत असं करू नकोस, जरा संसारातून लक्ष बाजूला काढ, त्या पेक्षा रोज सकाळी माझ्या बरोबर बागेत फिरायला येत जा, आपण सांगू त्यांना की चावी बाजूला ठेवत जा ",..... बाबा

" यापुढे तुम्ही जे म्हणाल ते मी करेन ",....... सासुबाई

प्रदीप सुरेखा नेहा थोडे दिवस आईकडे जाऊन आले, खूप आनंदी आणि फ्रेश दिसत होती ते,

नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली, आई बाबांचा तिचा चहा केला, रोज प्रमाणे सासुबाई किचन मध्ये आल्या नाहीत,

"सुरेखा आमचा चहा पुढे टेबलवर ठेवत चल, तिथेच घेत जाऊ आम्ही दोघं चहा",..... सासुबाई

सुरेखाने सगळ आवरलं आणि डबा घेऊन ऑफिसला निघून गेली, संध्याकाळी आल्यानंतर सासुबाई सासऱे सोबत फिरायला निघून गेले , सुरेखा ने आधी नेहा चा अभ्यास घेतला, मग आरामशीर स्वयंपाक केला, जेवतानाही सासूबाई मुकाट जेवत होत्या, त्यांना जे हवं ते स्वतः जाऊन घेऊन आल्या, प्रदीप सुरेखा एकमेकांकडे बघत होते, झालेला बदल खूपच सुखकारक होता, मानसिक रित्या खूप हवाहवासा वाटत होता,.....

असंच काय वातावरण सगळ्यांच्या घरात असलं तर किती छान होईल ना, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या झाल्या काय किंवा न झाल्यास काय काहीही फरक पडत नसतो, जसं किचन मधली छोटी छोटी काम, साफसफाई, लादी पुसणे भांडे घासणे यासाठी एकमेकाला एवढं बोलून मन दुखवू नये, ते काम तर कोणीही करू शकत, पण उगाच गैरसमज वाढून नात तुटू शकत आणि एक ठराविक अंतर हवाच नात्यांमध्ये , दुसऱ्याच्या संसारात अति लुडबूड करू नये, आपलंच खरं, मीच हुशार हे जरा बाजूला ठेवावा,

शांत रहाव, एका वयानंतर मौन गरजेच आहे,....... आपण ही आनंदी रहाव दुसर्‍याला ही आनंदी ठेवाव,......