घरोघरी मातीच्या चुली..भाग 3 रीपोस्ट अंतिम

सुरेखाने सगळ आवरलं आणि डबा घेऊन ऑफिसला निघून गेली, संध्याकाळी आल्यानंतर सासुबाई सासऱे सोबत फिरायला निघून गेले


घरोघरी मातीच्या चुली..भाग 3 रीपोस्ट अंतिम

©️®️शिल्पा सुतार
.........

सुरेखाचं माहेर त्याच गावात होतं, तिथून ऑफिसला शाळेत जाणं ही काही अवघड नव्हतं, दोघं घरी आले नेहमीप्रमाणे आवरायला आपल्या रूम मध्ये निघून गेले, नेहा हि गेली त्यांच्यासोबत रूम मध्ये , जेवणाची वेळ झाली तरी ते दोघ बाहेर आले नाहीत,

सासुबाई आल्या,. "सुरेखा अगं ताट नाही करायचे का आज? ",..

" तुम्ही जेवून घ्या आई आम्ही नंतर बसू",.. सुरेखा

"का काय झालं आहे",.सासुबाई

"काही झालं नाहीये, आम्हाला शांततेत जेवायच आहे, तुम्ही जेवून घ्या", सुरेखा

मी शांतता भंग करते का मग, मी विलन आहे का या घरची.. सासुबाई बोलणार होत्या पण त्या गप्प राहिल्या

सासुबाई सासरे जेवायला बसले, ."आज आपण दोघ, बाकीचे कुठे आहेत" ,

"ते मागून बसणार आहे, सुरेखा अजून रागावली आहे माझ्या वर ",.. सासुबाई

"तू काही बोलली नाही ना तीला परत ",. बाबा

नाही.

"पहिली पायरी योग्य तुझी, अशी गप्प रहात जा",. बाबा

नंतर नेहा प्रदीप आणि सुरेखा यांनी जेवायला घेतल,

"किती छान वाटत आहे ना मम्मी आज जेवायला",. छोटीशी नेहा बोलली

डोक्याला शांत वाटत आहे, नाहीतर जेवतानाही सासुबाई मला पन्नास वेळा उठवतात, आणि जेवणाला लाही नाव ठेवतात...

जेवण झाल्यावर प्रदीप आई-बाबांच्या रूम मध्ये गेला,.. "आई मी सुरेखा आणि नेहा आठ पंधरा दिवसांसाठी तिच्या आईकडे जात आहोत, तुला हवं तसं रहा आता या घरात, हवी तेवढी स्वच्छता ठेव, तुझ्या मनाप्रमाणे रहा",

" का रे असं बोलतोस तू मला, मी तुझी आई आहे, टोमणे का मारतोस ,"..सासुबाई . ,

"तू हे सगळं वर्षानुवर्ष सुरेखाला बोलते आहेस, तिला कसं वाटत असेल, तुला एकदा बोलल की राग आला, वाईट वाटल लगेच, तुझ्याशी असच बोलणार मी, चांगल बोलण ऐकायची आम्हाला सवय नाही, दुसऱ्याचं जीवन मुश्कील करून टाकतेस ना तू , त्यांना कस वाटत असेल या सतत च्या कुजकट बोलण्याने, आता समजल ",. प्रदीप

सासुबाई रडायला लागल्या प्रदीप रूमच्या बाहेर निघून गेला.

" बघितलं का हो कसा बोलला तो मला",. सासुबाई

" मी आधीही काही बोलत नव्हतो आणि आता ही काही बोलत नाही, तू सुनबाईला रोज बोलत असतेस, तेव्हा मी बोललो नाही, आता आपला मुलगा तुला बोलतो तेव्हाही मी काहीही बोलणार नाही, तूच यातून काय शिकायचं ते बघ",. बाबा

" अहो त्यांना थांबवा ना",.. सासुबाई

"नाही त्याचा उपयोग नाही तू, आता त्यांना काही जरी सांगितलं तू की मी चांगली झाली आहे, मी काही बोलणार नाही, तरी ते ऐकणार नाहीत, हे सगळ तुला तुझ्या कृतीतून दाखवावे लागेल, जाऊदे त्यांना जात असतील बाहेर तर, तिच्या आईकडे राहतील आठ पंधरा दिवसात येतील, मात्र त्यानंतर तू तुझ्या कृतीतुन व्यवस्थित वाग, जास्त मधेमधे करू नको, त्यांचा संसार आहे, सगळ तुला येत असं करू नकोस, जरा संसारातून लक्ष बाजूला काढ, त्या पेक्षा रोज सकाळी माझ्या बरोबर बागेत फिरायला येत जा, आपण सांगू त्यांना की चावी बाजूला ठेवत जा ",. बाबा

" यापुढे तुम्ही जे म्हणाल ते मी करेन ",.. सासुबाई

प्रदीप सुरेखा नेहा थोडे दिवस आईकडे जाऊन आले, खूप आनंदी आणि फ्रेश दिसत होती ते,

नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठली, आई बाबांचा तिचा चहा केला, रोज प्रमाणे सासुबाई किचन मध्ये आल्या नाहीत,

"सुरेखा आमचा चहा पुढे टेबलवर ठेवत चल, तिथेच घेत जाऊ आम्ही दोघं चहा",. सासुबाई

सुरेखाने सगळ आवरलं आणि डबा घेऊन ऑफिसला निघून गेली, संध्याकाळी आल्यानंतर सासुबाई सासऱे सोबत फिरायला निघून गेले , सुरेखाने आधी नेहाचा अभ्यास घेतला, मग आरामशीर स्वयंपाक केला, जेवतानाही सासूबाई मुकाट जेवत होत्या, त्यांना जे हवं ते स्वतः जाऊन घेऊन आल्या, प्रदीप सुरेखा एकमेकांकडे बघत होते, झालेला बदल खूपच सुखकारक होता, मानसिक रित्या खूप हवाहवासा वाटत होता,

असं वातावरण सगळ्यांच्या घरात असलं तर किती छान होईल ना, छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या झाल्या काय किंवा न झाल्यास काय काहीही फरक पडत नसतो, जसं किचन मधली छोटी छोटी काम, साफसफाई, लादी पुसणे भांडे घासणे यासाठी एकमेकाला एवढं बोलून मन दुखवू नये, ते काम तर कोणीही करू शकत, पण उगाच गैरसमज वाढून नात तुटू शकत आणि एक ठराविक अंतर हवच नात्यांमध्ये , दुसऱ्याच्या संसारात अति लुडबूड करू नये, आपलंच खरं, मीच हुशार हे जरा बाजूला ठेवावा,

शांत रहाव, एका वयानंतर मौन गरजेच आहे, आपण ही आनंदी रहाव दुसर्‍याला ही आनंदी ठेवाव,

🎭 Series Post

View all