घरोघरी मातीच्या चुली..भाग 2 रीपोस्ट

पण तू माहेरी जाण्याने प्रॉब्लेम सुटणार नाही, तू आल्यावर आई परत तसच वागणार , प्लीज नको जाऊ, मला नाही करमणार तुमच्याशिवाय


घरोघरी मातीच्या चुली..भाग 2 रीपोस्ट

©️®️शिल्पा सुतार
.........

प्रदीप किचन मध्ये आला,.... "काय झाला आई, तुझं काय सुरू असतं ग रोज सकाळी, आवरलं तिने सगळं, आणि कुणी कितीही जरी काम केलं तरी थोड फार बाकी राहतच, तुला असं वाटतं की तू परफेक्ट आहेस, सकाळी सकाळी नको भांडत जाऊ ",. प्रदीप आवरायला रूम मध्ये निघून गेला,

सासुबाई चिडचिड करत रूम मध्ये आल्या,." कोणाला काही बोलायची सोय राहिली नाही या घरात",

" काय झालं",.बाबा विचारत होते

" थोडं जरी कामावरून काही बोललं ना तर आज कालच्या मुलींना खूप राग येतो",. सासुबाई

" मग कशाला बोलतेस तू एवढ ", बाबा

" तुम्ही पण तीची बाजू घेत आहात का? " ,... सासुबाई

"नाही मी कोणाचीही बाजू घेत नाही, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीत टोकत नको जाऊस मुलांना , प्रत्येक गोष्टीत बोलून तू तुझच महत्त्व कमी करून घेते आहेस, कशाला चिडचिड करतेस येवढी आणि सुनबाई सगळं काम करून जातात ऑफिसला, आपल्याला काय दुपारी फक्त जेवण गरम करूनच खायचं असत, एखाद्या वेळी कुकर लावावा लागतो, प्रदीपच्या लेकीकडे नेहा कडे लक्ष द्यावं लागतं, नेहा ही मोठी आहे आता, तिचा काही त्रास नाही , आपल्याला फक्त घर सांभाळायचं असतं, बरीच वर्ष झाले आहेत आता प्रदीप च्या लग्नाला, पुरे झालं तुझा आता हा सासुरवास, जरा शांत राहायचं ",. बाबा समजावत होते

सुरुवातीला सासूबाईंना राग आला, पण नंतर त्यांनी शांतपणे विचार केला, बर्‍याच दिवसापासुन त्यांना वाटत होतं की चीड चीड केली की त्रास होतो, स्वतःला आणि दुसर्‍यालाही, हो आपण न बोलणं योग्य राहील यापुढे, पण पूर्ण आवरत नाही सुरेखा, जाऊ दे, लगेच जमणार नाही आपल्याला गप्प बसायला , पण शक्य तितका कमी बोलू, माझ खरच चुकतंय का?

सुरेखा ऑफिसला आली, आज दिवसभर तीच डोक दुखत होत, काहीही काम नीट झाल नाही.

संध्याकाळी सुरेखा आणि प्रदीप ऑफीसच्या खाली भेटले

" चल तुला काय शॉपिंग करायची आहे ना",. प्रदीप

" माझा तर मुडच नाही" ,. सुरेखा

प्रदीप,.."का काय झालं, तू काही खाल्लं का दिवसभर, चल कॉफी घेवू",... दोघ कॉफी शॉपला गेले

"अरे आई खुपच सध्या त्रास देतात, काहीही केलं तरी त्यांना पटत नाही, सकाळची सुरुवातच अशी होऊन जाते ना, दिवसभर तोच विचार मनात असतो, ऑफिस मध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत मी, काय करू", सुरेखा वैतागली होती

" तू लक्ष देऊ नको आईकडे",.. काही सुचत नव्हत म्हणून प्रदीप बोलला,

" अरे हेच चालला आहे वर्षानुवर्ष आपल्या घरी, मला आता सहन होत नाही, माझी आता बऱ्यापैकी चिडचिड होते, आपल्याला घरी शांत रिलॅक्स वाटायला पाहिजे, पण मला घरी जावसं वाटत नाही, गेल्या गेल्या त्यांच सुरू होत सकाळी हे झाल नाही ते केल नाही, अरे मी काय मशीन आहे का, दिवसभर काम करायला, आणि परत दोन प्रेमाचे शब्द नाही कधी आपल्यासाठी " ,.. सुरेखा रडायला लागली

आई ही ना का करते अस काय माहिती, मलाच काहीतरी कराव लागेल, अश्या वातावरणात सुरेखा कशी राहील.

" आपण एक काम करूया का आपल्या बंगल्याच्या मागच्या बाजूला एक भाडेकरू आहे, त्याला काढून टाकू तिकडे आई बाबांना शिफ्ट करू, त्यांचं जेवण खावन सगळ आपल्या घरी राहील, ते तिकडे राहिले म्हणजे थोडी तरी शांतता मिळेल ",. प्रदीपने सुचवून बघितल

"नको रे कसं वाटतं हे असं, त्यापेक्षा मीच थोडे दिवस नेहाला घेऊन आईकडे जाते, आठ पंधरा दिवस राहते आणि येईल मी ",. सुरेखा

" पण तू माहेरी जाण्याने प्रॉब्लेम सुटणार नाही, तू आल्यावर आई परत तसच वागणार , प्लीज नको जाऊ, मला नाही करमणार तुमच्याशिवाय",.. प्रदीप

" हो मला माहिती आहे, कधी जाच कमी होईल त्यांच्या काय माहिती, या वेळी मी जाणार आई कडे मला समजावू नको प्रदीप, मला वेळ दे थोडा, मी उद्या सकाळी जाते आहे माझ्या आई कडे, तिकडून आल्या नंतर बोलून बघू बाबांशी, ते काढतील काही तरी मार्ग ",. सुरेखाने निर्णय घेतला होता

प्रदीप नाराज झाला होता, ते सुरेखाला समजल

" तू पण चल मग, तुला ही थोडा बदल होईल ",..... सुरेखा

चालेल......

🎭 Series Post

View all