A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/home/irablogging/public_html/system/cache/irablog_session2671fb97b44cfbacb4f6cc670c0debed1cd836aa8a389ec9579700f7e99e5679d78e7d62): failed to open stream: No space left on device

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 176

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /home/irablogging/public_html/system/cache)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /home/irablogging/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct

File: /home/irablogging/public_html/index.php
Line: 315
Function: require_once

Gharkon last episode 60
Oct 26, 2020
कथामालिका

घरकोन अंतिम भाग 60

Read Later
घरकोन अंतिम भाग 60

घरकोन -60
©राधिका कुलकर्णी.

सगळ्यांची जेवणे उरकली.
काका-काकुही आपापल्या खोलीत निजायला गेली.दहा वाजायला आले तरी सुशचा अजुन पत्ता नव्हता.

क्वचितच त्याला इतका उशीर व्हायचा आणि तसे तो अगोदर कळवायचा पण आज काहीच न कळवता तो घरी आलेला नव्हता.रेवाला काळजी वाटायला लागली.ऑफीसमधे फोन करून बघावे का असा विचार करतच होती इतक्यात फोन वाजला.

रेवाने घाईघाईने फोन उचलला.सुशचाच फोन होता.
"मला यायला उशीर होईल.माझी वाट पाहु नकोस.जेवुन घे आणि झोप.मी लॅचकीने दार अघडुन येइल."
"अरे पणऽऽ......."
पुढे बोलेपर्यंत फोन कट झाला होता.

कधी पर्यंत येशील असे विचारायच्या आतच सुशांतने फोन कट केला होता.
निराश मनाने पुन्हा डोळ्यातील पाणी पुसत रेवाने पान वाढुन घेतले.कसेबसे चार घास पोटात ढकलुन ती झोपायला गेली.बराचवेळ विचारांमुळे झोप लागत नव्हती पण केव्हातरी डोळा लागला.

बाजुला झालेल्या हालचालीच्या चाहुलीने रेवाची झोप चाळवली.सुश नुकताच आलेला वाटत होता.डोळे किलकिले करून तिने घड्याळात बघितले. रात्रीचे साडेअकरा झालेले.

सुश पटकन रूम बाहेर गेला.टेबलावर जेवणाच्या वस्तुंचा हलकासा आवाज जाणवत होता.बहुतेक सुश एकटाच जेवत होता.
रेवाला उगीचच किव आली त्याची.त्याला एकट्याने जेवायची मुळीच सवय नव्हती पण मधल्या काळात रेवा नगरला गेल्यानंतर सुशने स्वत:ला किती बदलुन घेतले होते.हा विचार चमकुन गेला तिच्या मनात.

अजुन अर्ध्या तासाने आपल्या लग्नाची तारीख उगवणार.निदान त्याला ग्रीट तरी करून झोपु असा विचार करून रेवा उठुन हॉलमधे आली.
दिवसभर पेपर वाचायला मिळत नसल्याने  पेपर वाचतच सुश जेवण करत होता.ताटातली भाजी संपलीय हे ही त्याला वाचण्याच्या नादात कळले नाही.पेपर वाचता वाचता पोळीच्या तुकड्याने भाजीला चाचपडत होता.

त्याची ती गंम्मत बघत रेवा पुढे होवुन ताटात भाजी वाढायला गेली.त्याबरोबर त्याने नजर पेपर मधुन काढुन रेवाकडे बघितले.रेवा भाजी वाढताना पाहुन तो लगेच बोलला.,"नकोय मला भाजी.न विचारता का वाढलीस.?"
अरे पानात भाजी संपली होती आणि तु पोळीच्या तुकड्याने पानात भाजी शोधत होतास म्हणुन वाढायला आले."
"नकोय मला.माझे जेवण झालेय.तु कशाला उठलीस.माझे मी जेवत होतो ना."
काहिशा त्रासिक सुरातच सुश रेवावर डाफरला.

आता मात्र रेवाचे आत्तापर्यंत संभाळुन ठेवलेले पेशंन्स संपले.
डोळ्यातले पाणी सावरतच ती सुशला बोलली," एवढा काय मोठ्ठा गुन्हा केलाय रे मी जो तु इतके खेकसुन बोलतोएस माझ्याशी?"
आठ दिवस बघतेय मी,तु मुद्दाम माझ्याशी बोलणे टाळतोएस.मी जर एवढीच नकोशी झालीय तर सरळ सांगुन टाक ना. मी जाईन कुठेही.तुझे उपकार नकोएत मला."
"तुला तुझ्या आयुष्यात हवी ती नाती परत मिळाली आहेत.त्यामुळे माझी गरज संपलीय ना.मग तसे स्पष्ट बोल ना."
"का मला आणि स्वत:ला त्रास देतोएस?"
"जाईन मी कुठेही. तुला त्रास देवुन तुझ्या आयुष्यात नाही राहणार मी."

रेवाचा भावनिक कडेलोट झाला होता.ती मनाला येईल ते बोलत सुटली होती.
सुशांत मात्र दुर्लक्ष करत खाली मान घालुन जेवत होता.त्याचे दुर्लक्ष करणेही आता रेवाला सहन झाले नाही.
ती चढ्या आवाजातच सुशला म्हणाली, "सुश मी तुझ्याशी बोलतीय."
"एऽऽऽ मी ऑलरेडी खूप थकलोय.मला सुखाने जेवु देणारेस का तु?"
 "घड्याळात किती वाजलेत दिसताएत का तुला सुश?"
"त्यात काय बघायचेय,बारा वाजलेत."
"म्हणजे तुला आता हे ही लक्षात नाही की आता कोणता दिवस सुरू झालाय."
"तुझ्या नसेल लक्षात पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख सुरू झालीय जस्ट.तुला विश करून झोपावे म्हणुन मी तुझ्याकडे वाढायचे निमित्त करून आले.
त्यानिमित्त तरी आपल्यात संवाद घडेल अशी खोटी आशा होती मला.पण मला कळुन चुकलेय की तुझ्या आयुष्यात माझे स्थान शुन्य केलेस तु , मग लग्नाची तारीख तरी का लक्षात ठेवशील तु?"
"असोऽऽ."

"उद्या सकाळी मी ह्या घरातुन बाहेर पडेन.आजची रात्र राहते कारण एवढ्या रात्री मी कुठे जाऊ शकणार नाही."
"सॉरी तुला झालेल्या त्रासाबद्दल."
डोळ्यातील पाणी कसेबसे पुसतच रेवा खोलीत गेली.
 पाठमोऱ्या रेवाकडे किंचित हसुन सुश बघत होता.
विमनस्क अवस्थेतच रेवाने कपाटावरची बॅग खाली ओढली.गरजेचे चार कपडे रडत रडतच बॅगेत कोंबले आणि सकाळ होण्याची वाट पहात बेडवर डोळे मिटुन पडुन राहीली.

सकाळी खूप गडबड,गोंगाट आणि आवाजाने ती जागी झाली.
रात्रीच्या मानसिक शिणवट्याने तिला गाढ झोप लागुन गेली होती.जाग आली तेव्हा बऱ्यापैकी उजाडले होते.बाजुला सुश नव्हता.
तिला कुणाच्या नकळत जायचे होते,म्हणुन  भरून ठेवलेली बॅगही जागेवर दिसत नव्हती.

बॅग सुशने मुद्दामहुन कुठे लपवुन ठेवली की काय ह्या विचाराने पुन्हा तिचा संताप झाला.

काहीशा संतापातच ती बेडवरून तीव्र गतीने उठली.आज कोणतीही पर्वा न करता सुशला सर्वांसमक्ष जाब विचारायच्या इराद्यानेच ती हॉलमधे आली.
पण हॉलमधले दृष्य बघितल्यावर तिचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

तिच्या चेहऱ्यावरचे सर्व रागीट भाव झर्रकन बदलुन त्याची जागा आता आश्चर्य आणि विस्मयाने घेतली होती.
सगळा हॉल माणसांनी भरलेला होता.

काकु, आई, सुश,उन्मेश,सायली हे सर्व हॉल मधे बसलेले दिसत होते.पण त्याबरोबर आणखीनही काही चेहरे दिसत होते ज्याची रेवाने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

तिने स्वत:ला चिमटा काढुन बघितला आपण स्वप्नात तर नाहीये ना.
पण जागेपणीच स्वप्नातले दृष्य डोळ्यासमोर बघतीय ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता.
तिची अशी सगळी भांबावलेली अवस्था  काण्या डोळ्याने निरीक्षण करणाऱ्या सुशने बघितली.तो लगबगीने तिच्या जवळ गेला.
कितीतरी दिवसांनी सुशचा स्पर्श तिला शहारून गेला.ती भांबावल्या नजरेने सुशकडे बघत होती.
त्याने रेवाचा हात धरला आणि तिला हॉलमधे घेवुन येत विचारला,"कसे वाटले सरप्राईज!!"
"Happy wedding Anniversary to my dearest darling wife Rewa.!!!!
Love you a lot my dear.!!!! "

सगळ्यांनीच टाळ्यांच्या गजरात रेवाला शुभेच्छा दिल्या.
रेवाला काहीच समजत नव्हते कसे रिअॅक्ट व्हावे.
सुशवर चिडावे,हसावे की रडावे काहीच कळत नव्हते.संमिश्र भावनांची नुसती गर्दी झाली होती.

ती निस्तब्द एखाद्या पुतळ्यागत सगळ्यांकडे बघुन रडत होती.
सुशने तिला प्रेमाने जवळ घेतली आणि त्या व्यक्तींजवळ घेऊन गेला ज्यांना भेटण्यासाठी रेवा सगळ्यात जास्त आतुर होती.
होय सुशने रेवाच्या आईवडिलांना आज त्याच्या घरी आणले होते.
लग्नाला विरोध म्हणुन सर्व संबंध तोडलेल्या आई वडिलांना रेवा नेहमीच मिस करायची हे सुशला सतत दिसायचे पण त्याने कधी त्याबाबतीत फार विचार केला नव्हता.

पण ज्यावेळी रेवाने त्याच्या नात्यांना प्रसंगी त्याच्याशी वाईटपणा घेवुन पुन्हा एकत्र आणले त्याक्षणी त्याच्या मनात हाच विषय सतत घोळायला लागला.पण हे करायचे कसे हाच यक्षप्रश्न होता.मग उन्मेश बरोबर मस्त प्लॅन करून तिला हे सरप्राईज द्यायचे त्याने ठरवले.हे काम तसे खूपच किचकट होते कारण रेवाचे आई वडील फोन सुद्धा उचलायला तयार नव्हते.बोलणे तर दुरच.पण शेवटी सुशने निग्रह करून त्यांना सतत भेटुन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न चालू ठेवला.अखेरीस त्यांच्या मनातली कटुता घालवुन आपल्याविषयी प्रेम जागृत करण्यात  सुशला यश मिळालेच.
रेवाने खरचच खूप चांगला कर्तबगार,प्रेमळ नवरा शोधला हे त्यांना आता पटले होते.आपण उगीचच फक्त आपल्या धर्माचा नाही म्हणुन त्यांच्याशी चुकीचे वर्तन केले ह्याची बोच त्यांनाही सलत होतीच.
म्हणुनच शेवटी जावयाच्या विनंतीला मान देवुन त्याच्या प्लॅनमधे सामील होत, बरोबर लग्नाच्या वाढदिवशी लेकीला भेटायला बेंगलोरला सुशकडे यायला  ते तयार झाले.

त्यासाठीच तो मुद्दामहुन तिच्याशी तुटकपणे वागत होता.मुद्दाम तिच्या मनात तिरस्कार उत्पन्न होईल असे कृत्य करत होता.

ज्यामुळे रेवाला चुकुनही संशय येवु नये की ह्याच्या डोक्यात काय शिजतेय.
रेवाला क्षणभर सुचेचना की काय बोलावे आई वडिलांबरोबर.
अनिमिष नेत्रांनी ती फक्त त्यांना न्याहळत होती.डोळ्यातुन धारा वहात होत्या.शब्दांची गरजच नव्हती.सगळ्या भावना डोळ्यावाटेच प्रसवत होत्या.आई वडिलांच्याही डोळ्यात फक्त अश्रु होते.आज जवळपास दोन वर्षांनी ते आपल्या लेकीला प्रत्यक्ष बघत होते.

जवळ गेल्यावर मात्र रेवाच्या भावना फुटुन पडल्या आई‌ऽऽऽऽ म्हणत तिने टाहो फोडला. वेगाने गळ्यात पडुन आपल्या भावनांना वाट करून देत होती ती.
हॉलमधे सर्वचजण ते दृष्य बघुन भावुक झाले होते.
काकु,आई सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.

थोडा वेळ गेल्यावर मग सुशांतच्या आईंनीच प्रसंग सावरला.
"रेवा पुस ते डोळे.आवर स्वत:ला.आई बाबा प्रवासातुन आलेत त्यांना काही चहा पाणी विचारशील की फक्त रडुनच पोट भरणारेस त्यांचे?"
गंभीर वातावरण थोडे हलके करण्यासाठीच आई तसे बोलल्या.
रेवाही आता जरा सावरली होती.

परंतु अजुनही ती सुशकडे जळजळीत कटाक्ष टाकत होती.
सुशला खोलीत ये असा इशारा करून ती वेगाने त्यांच्या बेडरूम मधे गेली.
त्याबरोबर सुशकडे बघुन हॉलभर एकच हशा पिकला.कारण आत गेल्यावर पुढे काय होणार हे सगळ्यांच्याच लक्षात आले होते.

सुश खोलीत आला तसा घाईने रेवाने दरवाजाचा बोल्ट लावला.
काही कळायच्या आत रेवाने सुशला उशी हातात जे मिळेल त्याने मारायला सुरवात केली.डोळ्यातुन मोठमोॆठे अासु मोती बनुन टपकत होते दुसरीकडे सुशवर मारा चालु होता.
"काऽऽऽ?का केलेस असे? का इतके कठोर वागलास?"
सुशने प्रेमाने तिचे हात ओढुन तिला आपल्या मिठीत ओढत बोलला,"असे केले नसते तर आज तु मला जे इतके प्रेम दिलेस ते मिळाले असते का?"
"चुप्प बैस,एक अक्षर बोलु नकोस.मला इतके का छळलेस?"
"ते रात्री अपरात्रीचे फोन,गावाला काय गेलास. तिकडेही रात्रभर फोनवर कुणाशीतरी बोलत होतास?कोण होती ती आधी सांग."
"अगं वेडाबाई...तो उन्मेश होता.त्याच्याशी रात्री बोलायचो कारण तो जर्मनीत होता ना.आणि तुला कळु द्यायचे नव्हते ना की मी काय प्लॅन केलाय ते."
"तुला संशय येतोय कळल्यावर मी मुद्दाम केले मग.म्हणजे तु माझ्यावर संशय घेण्यात बिझी राहशील आणि माझा प्लॅन तुला कळणार नाही हाच तर प्लॅन होता."
"मला वाटले तुझ्या आयुष्यात कोणीतरी ..........."
वाक्य पुर्णही न होताच रेवा पुन्हा रडायला लागली.
सुशलाही आता तिचे दु:ख बघवेना.हळुच तिचे डोळु पुसत तो म्हणाला,
"माझ्या रेवडीला सोडुन माझ्या आयुष्यात कुणी यायची हिम्मत तरी करेल का?"
मग हसतच तिची फिरकी घेत म्हणालाल,"किती कजाग आहे माझी बायको माहितीय का?."
"आईऽऽ आईऽऽगं,अजुन दुखतेय गं मारलेल्या जागी."
"चुप्प नौटंकी बदमाश......."

रेवाने जोराने सुशला स्वत:कडे खेचत त्याच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला.
सुशनेही तिच्यापासुन दूर राहण्याचे जे अशक्य दिव्य केले होते त्याची सांगता करण्याची घटिका समीप आली होती.

त्यालाही हा विरह असह्य झाला होता.त्याने तिला प्रेमाने मिठीत ओढले.
दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात विरघळुन गेले.
दोन प्रेमी जीव कित्येक दिवसांचा विरह संपवुन एकमेकांच्या सहवासाची तहान-भूक जगाचे भान विसरून शमवण्यात मग्न झाले.

आज खऱ्या अर्थाने रेवाच्या घराचे सर्व कोन सांधले गेले होते.
सुश -रेवाचा घरकोन आज पुर्ण झाला होता.
नांदा सौख्य भरे।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
                                                            "समाप्त"
घरकोन -60
©राधिका कुलकर्णी.
नमस्कार वाचकहो..आज घरकोन कथेचा शेवट झाला.कशी वाटली कथा हे कमेंट्समधे जरूर कळवा.काही विशेष सुचना असतील तर त्याही सांगा..
तुम्ही माझ्या कथेवर किंबहुना माझ्यावर केलेल्या अलोट प्रेमाने मी भारावुन गेलेय.असेच प्रेम पुढेही ठेवा ही विनंती.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.नावासहीत ही कथा शेअर करायला माझी हरकत नाही.)
धन्यवाद..

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..