Sep 27, 2020
कथामालिका

घरकोन भाग 6

Read Later
घरकोन भाग 6

घरकोन 6
®©राधिका कुलकर्णी.

"रेवाऽऽऽ ए रेवाऽऽ अगं किती उशीर?"
"इतक्या वेळची काय करतीएस किचन मधे?"
"लवकर ये,अॅम वेटींग फॉर यू डिअर.!
भूतकाळातल्या गोड प्रेमळ आठवणीत हरवलेली रेवा सुशांतच्या आवाजाने भानावर आली.
"आलेऽ आलेऽऽ.
झालेचऽआहे,येते."
असे आेरडून सांगतच रेवा दिवे मालवून नेहमीचे डोअर्स चेक करून बेडरूम कडे वळली.
संध्याकाळ पासून वेगवेगळ्या भावनिक उलथा पालथ घडवणाऱ्या इतक्या घटना वेगाने घडून गेल्या होत्या की रात्रीचा मूड पून्हा इतका नॉर्मल असेल असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते.

सुशांतचा मूड बऱ्यापैकी ठिक होता त्यामूळे रेवाही आज जराशी रोमँटीक मूड मधे होती.
सगळी कामे उरकून आंबलेले शरीर फ्रेश फिल यावा म्हणून ती शॉवरबाथ घ्यायला गेली.

सुशांत पून्हा लॅपटॉपवर कसल्याश्या कामात गढून गेला.
मस्त मनसोक्त शॉवर घेवून छानसा परफ्यूम अंगावर हलकेच स्प्रे केला.
सूशांत मागे इटलीला कामानिमित्त गेला तेव्हा खास तिच्यासाठी आणलेला तोच पिंक सॅटीन स्लिव्हलेस हाफ गाऊन रेवाने घातला.

तो गाउन घातलेला सुशांतला खूप आवडायचा.
जेव्हा कधी त्याचा मूड असायचा तो हाच गाऊन घाल असा रेवाला लाडिक आग्रह करायचा.
त्याचा हा वीकनेस आेळखून आज रेवाने मुद्दाम स्वत:हून तोच गाऊन घालून त्याला चीत-पट करायचा पुरता प्लॅन केला होता. 
ड्रेसिंग टेबल समोरच्या आरशात स्वत:च स्वत:ला निरखत होती.
नाजूक,सुंदर,सुबक बांधा,लांब सोनेरी केस,थोडी सावळी पण अतिशय आकर्षक चेहऱ्याची रेवा कुणालाही भुरळ पडावी अशीच होती.

कॉलेज मधे सुशांत सोडून सगळेच तिच्यावर फिदा.
पण तिला नेमका सुशांत आवडायचा.त्याने आपली तारीफ करावी आपल्याला बघावे,कॉम्प्लिमेंट द्यावे कौतूक करावे असे सतत वाटायचे पण व्हायचे नेमके उलट.
इतर कोणी तारीफ केलेली तिला मुळीच आवडायची नाही.
ज्याने पहावे तो बघत नाही अन् नको ती माकडेच उड्या मारतात म्हणून ती खूप चिडायची.
एकदा रेवाने मुद्दाम त्याला चिडवण्या साठी एकदम हॉट ड्रेस घातला.
लाल रंगाचा स्लिव्हलेस शॉर्ट स्कर्ट विथ मॅचिंग इअरींग्स,सँडल्स,लाल लिपस्टीक,मस्त लांबसडक केसांचा पोनी घालून कॉलेेजला आली.
सगळी मुले अर्थातच ह्या रमणीय दृष्यावर आपापल्या कुवती नूसार कमेंट्स करत होती.
सुशांतनेही तिला बघितले पण तो दुर्लक्ष करतच पूढे गेला त्याचवेळी कानावर "क्या आयटम लग रही है बॉस" हे वाक्य त्याच्या कानी पडले.
खूप रक्त खवळले पण चूक मुलांची नव्हतीच हे त्यालाही जाणवत होत.
त्याच पावली सायकल वळवली आणि रेवाजवळ येवून तिला रूमवर ये काम आहे असे सांगून पून्हा हॉस्टेलवर जायला निघाला.

रेवा मनोमन आपला इरादा यशस्वी झाल्याच्या आनंदात रूमवर जायला निघाली.
क्लासेस सुरू होण्याची वेळ जवळ जवळ झालीच होती त्यामूळे रूमवर कोणीच नव्हते हे नक्की.
मग कोणी नसताना मला क्लास बुडवून ह्याने इकडे का बोलावलेय? 
मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की एकांतात बोलवून सुशांतला मला काय सांगायचेय एवढे.

आपल्याच विचारांच्या तंद्रित ती रूमवर कधी पोहोचली तिलाही समजले नाही.
रूम मधे शिरताच सुशांतने दार बंद केले.
तिची ऋदयाची धडधड जास्तच वाढली.
तिला काही कळायच्या आत डोळ्या समोर काजवे चमकावे असे काहीसे झाले.सुशांतने फाडकन तिच्या कानामागे लगावली.
खळकन डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले.
रेवा प्रश्नार्थक नजरेने सुशांतकडे बघत होती.चेहरा रागाने लाल झाला होता. तरीही संयमानेच तिने विचारले..
का मारलेस मला?
काय वाकडे केलेय रे मी तूझे?
त्याचाही चेहरा संतापलेला दिसत होता.
रेवाऽऽ एकदा आणि शेवटचे सांगतोय.
तूझा हितचिंतक समज किंवा काहीही पण मी काय सांगतोय ते नीट कान देवून ऐक.
आपण कॉलेजमधे शिकण्यासाठी येतो तेव्हा चारचौघीं सारखे रहावे.
उगीचच उत्तान भडक कपडे घालून स्वत:चे प्रदर्शन करण्यात कसला आनंद मिळतो गं तूम्हाला?
तू हुशार,अभ्यासू चांगल्या घरची मुलगी आहेस मग आपल्या चारित्र्यावर कोणी शींतोडे उडवतील घाणेरडं  बोलतील असे तू कशी काय वागू शकतेस? 
आणि जर असेच वागणार असशील तर ह्यापूढे आपली मैत्री संपली समज.
मग तूला काय हवे ते वाग.
तूझा मित्र म्हणून मला, मुलांनी तुझ्याविषयी केलेले कमेंट्स एेकवले नाहीत म्हणून हे बोललो.
तुझ्यावर हात उगारला त्याबद्दल सॉरी.माझा हक्क नसताना मी असे केले.अॅम रिअली सॉरी पण माझे म्हणणे पटले असेल तर ह्यापूढे असले कपडे घालून कॉलेजला येणार नाहीस हे प्रॉमिस कर मला आज.

त्याच्या वरच्या प्रेमा खातर तिने हे वचन कायम पाळले.त्या दिवसा नंतर रेवाने कधीही त्याला न आवडेल असे कपडे कॉलेज संपे पर्यंत कधीही घातले नाही.
त्यामुळेच लग्नानंतर सुशांतने स्वत:हून तिच्यासाठी हा स्लिव्हलेस नाईटपीस खरेदी केला होता.
~~•~~•~~•~~•~~•~~
पिंक हाफ गाऊनमधे ती खरोखरच कमालऽऽऽ दिसत होती.
"मायऽऽऽ! मायऽऽ !!मायऽऽ!!!
"किस पर बिजली गिराने का ईरादा है जानेमन"
असे म्हणतच सुशांतने तिच्याकडे बघितले.
पांचटपणा पूरे हं सुश"
"सरक बाजूला मला माझ्या जागेवर झोपू दे"
"इतक्यात कुठे झोपतेस?"
"अजून कितीतरी कामे बाकी आहेत आपली."
चेहरा शक्य तितका निर्विकार ठेवत सुशांत बोलला.

रेवा गालातल्या गालात हसत पण वरवर तसे न भासवता लटक्या रागात,
"उगीच चावटपणा नको करूस हं!!"
आता ह्यात काय चावटपणा केला मी?
"चोर के दाढी मे तिनका"
"तूझ्याच मनात चावट विचार आहेत म्हणून तूला माझे सरळ बोलणेही चावटपणा वाटतोय."
 "ह्यात मज पामराची काय बरं चूक?" 
"होऽऽऽ! खरऽऽऽच?"
"मग सरक तिकडे.
मला झोपू दे.
तू बैस घुबड होवून त्या लॅपटॉपवर,मी चालले."

लटक्या रागातच रेवाने कूस बदलली आणि मनात हसतच सुशांत कधी तिची मनधरणी करतोय ह्याची वाट पहात बसली.
पण तिला जास्त वाट बघावीच लागली नाही.

पिंक सॅटीन गाऊन मधे आेलेत्या केसांनी जेव्हा ती ड्रेसिंग टेबल समोर ऊभी होती तेव्हाच सुशांतची विकेट पडली होती.
तिला चिडवून जेव्हा तो मिठीत ओढायचा तेव्हा त्याला ती जास्त आवडायची.
आजही तेच घडले.
तिची कूस वळताच त्याने झटक्याने तिला आपल्या दिशेने खेचले आणि आपल्या बाहूपाशात सामावून घेतले.
रेवाही ह्याच क्षणाची जणू वाट पहात होती.
त्याच्या उत्कट प्रणयात तिला स्वत:ला झोकून देवून समर्पित होताना स्वर्गीय सुखाची अनुभूती मिळत असे.

त्याच्या मादक स्पर्शानी तीची काया मोहरून जात होती.
अत्तरी रात्रीचे धुंद सुगंधीत क्षण साठवत पून्हा एकदा दोघे परस्परांत विलीन होऊन गेले.
~~~•~~~•~~~•~~~•
सकाळचा रोजचा बझर वाजला तशी रेवाला हलकेच जाग आली.
आज उठावेसेच वाटत नव्हते. सर्वांगात ठसठसणाऱ्या  वेदनाही कालच्या उत्कट प्रणय़ सुखाच्या गोड आठवणींना खुणावत होत्या.
पण तरीही उठणे तर भागच होते.
सुशांतच्या गोड पाशातून स्वत:ला दूर करून किचन कडे जायची रेवाला तिळमात्र इच्छा नव्हती.
ती पून्हा एकदा गाढ झोपलेल्या सुशांतचा चेहरा असाच न्याहाळत बसली.
कित्ती निरागस दिसतोय ना सुश!!!
पण फक्त झोपेतच.
एरवी केवढा छळतो.

पून्हा एकदा आपल्याशीच खुदकन हसत पांघरूण बाजूला सारत काहीशा कंटाळ्यातच ती उठली.

आणि विजेचा झटका लागावा तशी पून्हा ती सुशांतच्या जवळ खेचली गेली.
सुशांतने तिला पून्हा मिठीत ओढले.आपले ओठ रेवाच्या मानेवर टेकवत झोपेतच
डोळे न उघडता तो रेवाला विनवत होता.
कुठे चाललीस ?
थांब ना माझ्याजवळ.
मला हवीएस तू.

"सुशांत तू जागा आहेस?"
"म्हणजे इतक्यावेळ नाटक केलेस ना झोपेचे?"
"तू ना हल्ली फार बदमाश झालाएस."
"चल ऊठ,ऑफिसला जायचेय ना,आवर पटकन."
"मलाही अजून बरीच कामे आहेत सोड मला."
"नाही सोडणार."
"चल एक मॉर्निंग सेशन रिपीट करूया ना रात्रीसारखा."
सुशांतने पून्हा तिच्या भोवतीची आपली पकड घट्ट केली."
रेवालाही त्याला दूर सारून किचनकडे जाणे कमालीचे जीवावर आले होते पण पूढे कामाचा डोंगर तिला खुणावत होता.
सुशचे ऑफीस,त्याचा टिफीन ब्रेकफास्ट सगळेच हाक
मारत होते म्हणून नाईलाजानेच सुशांतला दूर लोटून ती वॉशरूमकडे गेली.
अंगांगावर कालच्या सुशने देवू केलेल्या दागिन्यांच्या खूणांना न्याहाळत 
पून्हा एकदा स्वत:शीच लाजत रेवा किचन कडे गेली.
~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश: 6)
®©राधिका कुलकर्णी.

-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..