Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 54

Read Later
घरकोन भाग 54

घरकोन-54
©राधिका कुलकर्णी.

रींग जात होती पण उन्मेश फोन का उचलत नाहीये?
अतिउत्साहात विसरलीच रेवा की उन्मेश जर्मन टुरवर जाणार होता.
"अरे देवाऽऽ.आता त्याच्याशी संपर्क कसा करायचा?"
रेवाच्या मनात पुन्हा विचारांची गर्दी सुरू झाली.आता एवढा सगळा प्लॅन केलेला हा वेळेवर सापडलाच नाही बोलायला तर मी एकटी कसे काय करणार सगळे?"
चिंतेनी तिचे मन नकळत साशंक होत गेले.
समोरून कोणीतरी हॅलोऽ हॅलोऽऽ करण्याच्या आवाजाने रेवा भानावर आली.
"कोण बोलतेय?"
"तुम्हाला कोण हवेय?"
मि.उन्मेश पंडीत आहेत का?थोडे बोलायचे होते.
"बोलताएत कीऽऽ... बोला मॅडम काय सेवा करू आपली?"
"अरे एऽऽ..मला ओळखले नाहीस का,असा का परक्या सारखे विचारतोएस?"
अगं,मातेऽ तुच माझा आवाज ओळखला नाहीस.
मी बोलतोय तरी तु परक्यासारखे मला मि.उन्मेश शी बोलायचेय म्हणत होतीस.मग मीपण केली मस्करी..काय बरीएस ना? "
उन्मेशनी पुन्हा तिची कळ काढली.
अरे हो रे.मी बरीय.जरा विचारात मग्न होते त्यामुळे तुच बोलतोएस हे कळले नाही."
"बर ते सोड.ऐक ना,एक आनंदाची बातमी द्यायलाच फोन केला."
"तुला वेळ आहे ना बोलायला?"
"हो आहे ना..कसली बातमी?
"काय सुशा तुला घ्यायला नगरला आला की काय?"
छेऽऽरेऽऽ तो कसचा यतोय?"
.पण तो मुद्दा सध्या तितका महत्त्वाचा नाही."
"मी दुसरीच बातमी द्यायला फोन केलाय."
आेह्,मग पटकन सांग ना.."
"अरे आई तयार झाल्याएत माझ्यासोबत बेंगलोरला यायला आणि त्याही आपल्या प्लॅनमधे सामील झाल्याएत म्हणजे मीच त्यांना सामील करून घेतलेय"
"अरे वाह्!! खरचच आनंदाची बातमी आहे की."
"पण मग काका-काकुंचे काय?ते तयार आहेत का यायला?"
"अरे त्यांना अजुन विचारले नाहिये पण आई तयार झाल्यावर तेही तयार होतीलच.आणि मी त्यांना निक्षुन सांगणार आहे की तुम्ही ह्यावेळी माझ्या सोबत आल्या खेरीज मी परतुन बेंगलोरला एकटी जाणार नाहीये.गेले तर तुम्हाला घेऊनच.मग कसे नाही ऐकणार.ऐकावेच लागेल त्यांना, हो की नाहीऽऽ?"
"आणि खरे सांगु, त्यांना तरी कोण आहे आता आमच्या शिवाय मायेचे आणि हक्काचे?
" सख्ख्या रक्ताच्या नात्यांनीच त्यांचा विश्वासघात केला म्हणल्यावर कोण उरलेय आता त्यांचे आपले म्हणायला?"
"खरय तुझे.पण एक सांगु रेवा,सुश खूप लकी आहे त्याला तुझ्यासारखी सगळ्यांवर मनापासुन प्रेम करणारी बायको मिळाली."
"रिअली अॅम प्राऊड ऑफ यु डिअर अँड स्पेशली युवर थॉट ऑफ ब्रिंगींग टुगेदर द स्कॅटर्ड  फॅमिली रिलेशन्स!!"
"खरच कोण करते आजकाल असा विचार? आणि नवऱ्यानेच  नाती झिडकारली म्हणल्यावर तर कुठची सुन असे नाते जोडायचा विचार करेल?"पण तु ते करतीएस.दॅट शोज हाऊ प्युअर युवर हार्ट इज!!
हॅट्स ऑफ डिअर.."
उन्मेश खरच खूप भावुक झाला होता.इकडे रेवाच्याही कडा ओलावल्या होत्या.
त्याक्षणी फक्त एकच विचार मनात येवुन गेला रेवाच्या मनात की जो दुरावा मी भोगतीय माझ्या आपल्या माणसांचा तो कुणाच्या वाट्याला येवु नये.."
"अगं एऽऽ कुठे हरवलीस? रडतेस काय वेडे,आता सगळे छान होणार आहे.आपला प्लॅन "मिशन-मिलाप" सक्सेसफुल होणार बघ.पुस ते डोळे अन् लाग पुढच्या तयारीला.तुला कोणतीही मदत लागली तर लगेच सांग.हा तुझा हनुमंत आहेच मदतीला."
"तु आहेस पाठिशी म्हणुन तर हे दिव्य करायला घेतलेय नाऽऽ.आणि तु मला नेहमीच लकी ठरला आहेस सोऽऽ ह्यावेळी पण सगळे छान मार्गी लागणार.खात्री आहे मला."
"बरं पण रेवा,काका-काकुंचे निघण्या अगोदर इनफॅक्ट तिघांचेही कम्प्लिट मेडिकल चेकअप करून घे.डॉक्टरांना सांग त्यांना कायमचे नेतोय असे आणि त्यांच्याकडुन तिकडच्या डॉक्टर्सचे रेफरन्सेस घे म्हणजे ह्यांना तिकडे काही प्रॉब्लेम झालाच तर तुझी एेनवेळी धावपळ होणार नाही."
"हो,माझ्याही डोक्यात होतेच हे.बरे झाले तुही सांगीतलेस."
"उन्म्याऽ आणखीन एक करशील?"
"कळ्ळल्लंऽऽ..करतो फोन सुशाला.आजच चौकशी करून त्याचा हालहवाल कळवतो तुला.चींता नसावी."
"किती मनकवडा आहेस रे.तुला कसे कळले मला हेच म्हणायचेय ते"
तुला आज ओळखतोय का रेवा."
"काशऽऽ कोई हमे भी इतने करीब से जानतेऽऽ!!"
"बासऽऽ हं लगेच सेंटी डायलॉग नको फाडुस."
"बर बर..इतके करूनही कुणाला आमची कदरच नाही."उन्मेशनी पुन्हा एक सेंटी मारलाच.
"अरे कदर आहे रेऽ.पण आता फोन ठेवते तु मला रात्री कळव काय बोलणे झाले ते.
मी आता काका काकुंशी बोलते आधी.उठलेच असतील ते."
"ओकेऽऽ डिअर..रात्री बोलुच.बायऽऽ"
~~~~~~~~~~~~~~~
संध्याकाळचा चहा करून रेवाने आईंना आवाज दिला.त्यांना काका काकुंच्याच  खोलीत चहाला बोलावले.
काका जागेच होते.काकुही बाजुलाच बसुन कसलेसे पुस्तक वाचन करत होत्या.रेवा चहाचा ट्रे ,काकांसाठी नारळ पाणी घेऊन खोलीत आली.आईही पाठोपाठ आल्या.
चहापाणी उरकताच आईंनीच विषयाला हात घातला.
"ही रेवा बघा काय म्हणतेय!"
"आपल्या सगळ्यांना बेंगलोरला चला म्हणतेय रहायला कायमचे."
आईंनी विषयाची सुरवात तर केली पण त्यानंतर दोन क्षण पुर्ण शांतता झाली खोलीभर.
काकु काकांच्या चेहऱ्याकडे बघत होत्या.काकांचे डोळे मात्र पाण्याने डबडबले होते.बोलता येत नसले तरी ते भावुक झाल्याचे स्वच्छ दिसत होते.काकुंनी हलकेच आपल्या पदराने त्यांचे डोळे टिपले.काय बोलावे त्यांनाही काहीच सुचत नव्हते.
मग रेवानेच शांततेचा भंग करत काकांच्या जवळ जाऊन बसली.त्यांचा हात हातात घेत मायेने विचारले,
"काय मग जायचे ना तुमच्या लाडक्या लेकाकडे.?"
"करू ना तयारी निघायची?"
त्या बरोबर काकांच्या भावना अनावर होऊन ते चित्र विचित्र आवाज काढुन रडायला लागले.बोलायचा प्रयत्न करत होते पण आवाज फुटत नव्हता.असंबद्ध आवाजांची घरघर घशातुन येत होती.
रेवाला कळत होते त्यांना काय वाटतेय.तिने हलकेच त्यांचा हात दाबुन त्यांना शांत व्हायला सांगीतले.आणि तुमचा होकार असेल तर फक्त मान हलवुन सांगा म्हणाली.त्याबरोबर काकांनी मान हलवुन होकार भरला.
आता काकु आणि आईंच्याही डोळ्यात पाणी होते.
सगळे वातावरण अचानक खूप भावुक झाले होते.
काकुंनी हलकेच रेवाला रूममधुन बाहेर यायचा इशारा केला.
रेवानेही मान डोलवली आणि हळुच बाहेर हॉलमधे आली.
रेवा येताच काकुंचा बांध सुटला आणि त्या ओक्साबोक्शी रडायला लागल्या.
रेवाला समजेचना कशी त्यांची समजुत काढावी.ती फक्त त्यांच्या पाठिवरून हात फिरवुन त्यांचे सांत्वन करत राहिली.थोडा बहर ओसरल्यावर त्या सावरल्या आणि बोलायला लागल्या...
"आमचे कुठल्या जन्मीचे पुण्य म्हणुन आम्हाला तुझ्या आणि सुशांत सारखा सुन मुलगा मिळाला.
खूऽऽऽप खूपऽऽऽ वाईट वागले गं हे तुमच्यासोबत.
भावजी गेल्यावर आधाराची खरी गरज होती वहिनींना आणि सुशाला.पण त्यांना त्यांच्याच घरात परकेपणाची वागणुक दिली ग आम्ही.
त्याची फळं तर भोगतोच आहोत आम्ही पण आज ते सगळे विसरून तुम्ही आम्हाला आपलेसे केलेत हे ऋण ह्या जन्मात फिटणार नाही गं पोरी."
काकु पुन्हा रडायला लागल्या.
"काकु शांत व्हा.असे का बोलता परक्या सारखे.आम्ही कोणीच नाहीत का तुमचे?"
असे बोलुन तुम्ही पुन्हा परके करताय आम्हाला."
नाही गं पोरी नाही.बोलु दे.आज तरी बोलु दे.इतके दिवस मनात असुनही कधी बोलायची संधी मिळाली नाही.वहिनींनी आमच्या करता आपल्या मुलाशी दुरावा पत्करला पण आमच्या अडचणीत आमच्या पाठिशी भक्कम पणे ऊभ्या राहिल्या.आणि ज्यांना आपले आपले म्हणत ऊराशी कवटाळले ते आमचे लोक आमच्याच वाईटावर उठले.जर आज तुम्ही लोकांनी मदत केली नसती तर आमच्यावर दारोदार भीकच मागायची वेळ होती.आमचे हाल कुत्र्याने सुद्धा खाल्ले नसते.
खरच तुम्ही सगळेच खूप दयाळु आणि मनाने मोठ्ठे आहात.
मी जरी वय आणि मानाने ह्या घरात मोठी असले ना तरी खरी मोठ्ठी तर तुझी सासुच आहे आणि तु ही तुझ्या सासुची सुन आहेस हे पटवुन दिलेस हो."
तिचीच पुण्याई म्हणुन आज आम्ही इतके सुखाचे दिवस बघतोय."
काकुंना पुन्हा रडु आले.
"काकु शांत व्हा पाहु आधी.हे सगळे बोलायची गरज नाहिये.आम्ही विसरलोय सगळे तुम्हीही विसरा पाहु आता."
"मी लेक आहे ना तुमची,मग आता माझे ऐका.सावरा स्वत:ला.आणि आजपासुन ही परकेपणाची भाषा बंद."
"चला तयारीला लागा बघु.आता आपल्याला खूप कामं आहेत.सगळे मिळुन कामाला लागु.जितके लवकर इकडचे आवरेल तितक्या लवकर आपल्याला बेंगलोरला निघता येईल.
तेव्हा पटापट तयारीला लागुया काय..?मग हसा पाहु आधी.रेवाने काकुंना बऱ्यापैकी ईझ केले.
आता कामाला लागायला लागणार होते.तिघांचे,मेडीकल चेकअप,इथल्या घरासाठी केअर टेकर,इकडुन जाण्यासाठीची सगळी सोय बरीच कामे होती.सुशची मदत मिळाली असती तर काम किती सोप्पे झाले असते.रेवाच्या मनात अचानक विचार येवुन तिने निराशेनेच सुस्कारा सोडला
"असोऽऽ ..हे शिव धनुष्य मी उरावर घेतलेय तर मलाच पेलायला पाहिजे.देव करेल मदत."
रेवाने मनोमन स्वत:लाच ऊभारी दिली आणि कामाच्या यादी करण्यात गुंतुन गेली...........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-54
©®राधिका कुलकर्णी.
नमस्कार मंडळी कसा वाटला हा भाग?कमेंट्समधे नक्की कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासहीत शेअर करायला माझी परवानगी आहे.)
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..