Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 47

Read Later
घरकोन भाग 47

घरकोन-47
©राधिका कुलकर्णी.

किती वेळ होऊन गेला, दुपारचे दोन वाजुन गेले तरीही उन्मेशचा पत्ता नव्हता.दोन तासात सगळे आवरून येतो म्हणुन गेलेला अजुन घरी परतला नव्हता.बर एखादा फोन करेल तर तेही नाही.काय समजायचे आता ह्याला?
कधी येणार हा?
मनातल्या मनात विचारांची पाखरे पुन्हा घिरट्या घालायला लागली.
मन स्वस्थ बसु देईना म्हणुन उगीचच टिव्ही लावुन रेवा कुठलातरी मुलाखत कार्यक्रम पहात बसली.पण त्यातही मन लागेना तसा टिव्ही बंद करून ती उगीचच पुस्तक चाळत बसली.तेवढ्यात डोअरबेल वाजली.विजेचा करंट लागावा तशी ती झटक्याने उठली आणि वेगानेच दार उघडले.
दारात उन्मेशच होता.घामाघुम,थकलेला दिसत होता.
"काय रे किती उशीर?आणि इतका घामाधुम का झालास?"
आत येताच रेवाने प्रश्नांची सरबत्ती केली.
"अगं थांब,थांबऽऽ,थांब"
"किती प्रश्नांचा भडीमार करतेस?"
"बाहेरून दमुन आलेल्या पाहुण्याला काही चहा पाणी विचारशील की फक्त नुसत्या प्रश्नांनीच फटकारणारेस?"
उन्मेशनी पुन्हा रेवाची कळ काढली.
अॅम सोऽऽ सॉरी डिअर,पण काय करू,तु लवकर येशील म्हणुन पटपट मी सगळे काम उरकुन जेवायला वाट पहात थांबले आणि तु साधा एक फोन करून कळवतही नाहीस की उशीर होईल किंवा काय,नविन ठिकाणी आलेला,चींता वाटणारच नाऽऽ.?"
रेवाने पाण्याचा ग्लास देतादेताच सारे काही भडाभडा बोलुन मोकळी झाली.
"अग काम थोडेसेच होते असे वाटले होते निघताना पण ऐनवेळी त्यात नविन अडचणी यायला लागल्या.
ह्या पेपर्स व्हेरीफिकेशन साठीचे डॉक्युमेंट्स सापडत नव्हते त्यांना.आख्खे रेकॉर्डरूम पालथे घातले दोन तास.
शेवटी सापडली फाईल.
सगळा गलथान कारभार दुसरे काय.
पण शेवटी काम झाले." 

"हुश्श करतच बाहेर पडलो तर रिक्षा मिळेना.
मग तसाच चालत थोडा पुढे आलो,एक बस येत होती.त्यात चढलो.दोन स्टॉप उतरून मग रिक्षा करून आलो.
काय ऊन आहे इकडेही!"
"कसाबसा पोहोचलो घरी एकदाचा."
"अरेऽऽ बापरे!पण मग एक फोन करायचास ना मी आले असते ना घ्यायला तुला?"
कशाला एवढी दगदग करून घेतलीस?"
"अग ऑफीसमधे एकाला विचारले तुझा पत्ता दाखवुन की कसे जायचे तर तोच म्हणाला ऑटो किंवा बसची चांगली सोय आहे.म्हणुन विचार केला कशाला तुला त्रास द्यायचा आपणच ट्राय करू, पण कसचे काय..नुसता वैताग!!"
"बर जाऊदे ते सगळे,नीट पोहोचलास ना?"
"आता पटकन फ्रेश होऊन ये मी पानं घेते आपली."
"हो आलोच."
उन्मेश आवरून येईपर्यंत
रेवाने अन्न गरम केले.
ताटे वाढली.दोघेही जेवायला बसले.
पहिला घास पोळी भाजीचा तोंडात घेताच उन्मेश जवळजवळ चित्कारलाच "ओयऽऽ!!! ही कोणती भाजी,कशी केलीस?"
"काय झाले?"
"आवडली नाही का?"
रेवाने घाबरतच विचारले.
"अगं आवडली का काय विचारतेस? वेडा झालोय वेडाऽ ही चव घेऊन?"
"अहाहाऽऽ आज तुमने वही सुनहरे दिनों की याँदे ताजा कर दी."
"ओह् गॉड! किती घाबरले मी पण थँक्स टु गॉड तुला आवडली."
"गॉड नाही गंऽऽ थँक्स टु यु डिअर, मुँह का स्वाद लाने के लिए."

"अरे मी काल पासुन विचार करत होते पण तुझी आवड काही केल्या आठवत नव्हती मग आज सकाळी सुशला विचारले तर त्याने सांगीतले की तुला ही भाजी आवडते मग प्रयत्न केला." 
"अग तुला काय सांगु रेवडे,त्या कॉलेजची मेस म्हणजे नुसते बेचव आणि आळणी जेवण गं!!"
"जाम वैताग यायचा पण ही एकच डाळ घालुन  भाजी तिकडे मला खूप आवडायची आणि तुझा सुशा नाक मुरडायचा त्यामुळे त्या दिवशी माझी चंगळ असायची सुशाची पण भाजी मीच खायचो."
"महिन्यातुन एकदा कधीतरी अचानक असा आनंद मिळुन जायचा."
"पण तुला सांगतो कॉलेज सुटले आणि ती चव फक्त आठवणीतच राहिली."
"आज इतक्या वर्षांनी त्याच चवीची पुन्हा आठवण करून दिलीस."
"थँक्स डार्लिंग,यु आरऽ सचऽ अ स्वीटहार्ट!!!"
"मला सांग कसली भाजी केलीस तु ही?"
अरे सुशला विचारले तर तोंड वाकडे करत एवढेच बोलला की तीची चव कडवट लागते म्हणुन त्याला ती भाजी आवडायची नाही.मग मीच गेस केला की ही मेथीची असेल सो हिंम्मत करून बनवली.
आणि नशिब तुला आवडली.
"रेवा इस बात पे तुमसे एक वादा पक्का.तुम्हारा प्रॉब्लेम सॉल्व्ह करके ही रहुंगा.आज तुमने मेरा दिल खुष कर दिया."
"बासऽ हं!बास झाली तुझी नौटंकी."
"आता जेव मुकाट्याने.मग बाकीचे बोलु निवांत."
"जशी आज्ञा मातेऽऽ."
हसी-मस्करीत दोघांचीही जेवणे उरकली.
पाठीमागची सगळी झाकपाक आवराआवर करत रेवा ड्रॉइगरूम मधे येऊन बसली.
उन्मेशही आधीच तिथे रेवाची वाट पहात बसलेला होता.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि विषय पुन्हा फिरून काकु आणि सुशवर येवुन ठेपला.
पुन्हा एकदा रेवाचे अंतस्थ द्वंद्व सुरू झाले.कसे सांगु आणि काय सांगु?
कुठुन सुरवात करावी हेच समजत नव्हते.
पण अखेरीस उन्मेशला लग्नानंतर घरात घडलेले  सर्व रामायण महाभारत सांगण्यात रेवाला यश आले.

सांगता सांगता मधेच आेलावलेल्या कडा पुसतच रेवा बोलली.,
"तर हे असे सगळे होऊन बसलेय.,तेव्हा पासुन माझी अवस्था त्रिशंकु सारखी झालीय.
जीव खूप तुटतो काकुंसाठी.त्यांची अवस्था तर माझ्याहुनही वाईट.पण त्या मुकाट्याने सहन करताएत काकांच्याकडे बघुन.

काकांच्या अशा अवस्थेत त्यांना आम्ही आधार द्यावा असे खूप वाटते मला पण फोनवर बोलण्या पलिकडे मी काहिही करू शकत नाहीये.
खूप हेल्पलेस व्हायला होते रेऽऽ."
"हम्मऽऽऽ!" 
उन्मेशने ऐकुन एक दीर्घ सुस्कारा सोडला.
"सगळे किती शॉकींग आहे हे."
"सुशा काकुंसाठी किती जीव टाकायचा आणि आज तो इतका कठोरपणे  वागतोय,इट्स रिअली अनबिलिव्हेबल!!"
"हो बघ नाऽ.मलाही सुरवातीला काही दिवस हेच वाटले की हा आईं पासुन किती दिवस दूर राहणार ,राग शांत झाल्यावर स्वत:च बोलेल, पण आमचा सगळ्यांचा हा अंदाज खोटा ठरवला त्याने.
नको त्या इगोला कुरवाळत उगीचच जीवाला त्रास करून घेतोय.
मला त्याची अवस्था बघवत नाही रे."
काय करावे तेही समजत नाही,आता तुच काहीतरी मार्ग सांग मला."
"रेवा मला एक सांग काकांचा कँसर डिटेक्ट झाल्यावर सुशची रिअॅक्शन काय होती?"
"काय असणार?
तो काय म्हणाला माहितीय देवाने त्यांना त्यांच्या कर्मांची शिक्षा दिली...काय बोलणार ह्यावर त्याच्यापुढे."
"ते ठिक आहे पण मग त्यांच्या उपचाराचा
खर्च कोण करतोय सध्या?"
"कोण करणार,आम्हीच करतोय,आय मीन सुशच करतोय."
"मग तु एक काम कर आता पुढचे पैसे तो पाठवताना त्याला म्हण की आतापासुन तु हे पैसे नको पाठवुस त्यांच्यासाठी.त्यांचे काय व्हायचे ते होऊन जाऊ दे."
"अरेऽ काही काय बोलतोस उन्मेश?"
मी असे का बोलु?"
"अग तु फक्त मी सांगतो तसे कर.आणि तु ह्यावरून मस्त भांड त्याच्याशी."
"पण त्याने काय होणार आहे?"
"सुशला तु आता सध्या पाहिलेले नाहिएस.तो तिरमिरीत खरच माझे ऐकला तर काय होईल हा विचार तरी केलाएस का?"
"रेवा डिअर,मी फक्त चार पाच वर्षच लांब आहे सुशापासुन पण कॉलेजमधे जे काही वर्ष मी त्याला ओळखतोय ना त्यावरून मी तुला सांगतो,माझा अंदाज कधीच चुकणार नाही,तु फक्त हे बोलल्यावर तुमच्यात काय काय संवाद होतात तेवढे मला फोन करून सांग.मग मी तुला पुढली स्टेप सांगतो.आत्ता एवढेच खूप आहे."
"बरऽऽ बाबा, तु म्हणतोएस तर करेन मी पण मला भीती वाटतीय खूप.काही विपरीत तर नाही ना घडणार?"
हे बघ रेवा ही तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही विश्वासाची परिक्षा आहे.
मी जर माझ्या मित्राला ओळखण्यात चुकत नसेल तर मला एक्सपेक्टेड रिझल्ट्स येणार ह्यात शंकाच नाही.पण तु म्हणतेस तसेच काही उलट घडलेच तरिही आपण मिळुन हा कठीण पेपर सोडवु आणि ही परिक्षा पास करूनच दाखवु."
"यसऽऽ.आज तुझ्यामुळे मला हजार हत्तींचे बळ मिळाल्याचा फिल येतोय.थँक्स डिअर फॉर थिस सपोर्ट"
"ए उन्म्या ह्या मिशनला नाव देऊयात का रे काहीतरी?"
"तु सांगऽ"
मला सुचत नाहीये.
'भरत-मिलाप' कसे राहील?"

"छेऽ ही माय लेकरांची भेट आहे भावाभावांची नाही."
"हम्मऽ पॉईंट..."
"मग काय?"
"मिशन मिलाप" कसे वाटतेय?"
"वॉव्हऽऽऽ!साऊंड्स गुड यारऽऽ."
चला आजपासुन "मिशन- मिलाप' साठी कामाला लागुया."
"चल देवघरात जाऊन देवाचा आशीर्वाद घेऊ."
दोघेही देवासमोर डोळे मिटुन उभे राहिले.
देवाचे आशीर्वाद आणि योजलेल्या कार्यात यश मागणारे हात नकऴत विधात्यापुढे नतमस्तक झाले होते.
रेवाला मिटलेल्या डोळ्यात आत्ताच विजयपताका फडकताना दिसत होती.
"बस कुछ और देर.......!"
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-47
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतोय की नाही? 
काय वाटते...उन्मेशचा सल्ला खरच वर्क होईल की काही अघटित...??
मिशन-मिलाप सक्सेसफुल होईल????
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..