Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 46

Read Later
घरकोन भाग 46

घरकोन-46
©राधिका कुलकर्णी.

रेवाने सकाळची आवराआवर उरकली,स्वत:साठी मस्त स्ट्राँग कॉफी बनवली आणि गॅलरीत येवुन कॉफीचा सिप घेऊ लागली.आज खूप प्रसन्न सकाळ वाटत होती.
पण मन चिंती ते वैरी न चिंती तसे रेवाच्या विचारांची गर्दी काही संपत नव्हती
उन्मेशचा सल्ला खरच उपयोगी होईल ना?
त्याला घरातल्या बऱ्याच खासगी घडामोडी सांगाव्या लागतील,कितपत योग्य करतोय आपण?
सुशला हे रूचेल की नाही माहित नाही,
पुन्हा एकदा संदेहाची पिशाच्चे नाचायला लागली.पण त्यांना निर्धारपुर्वक दुर हटवत ती आपल्या निश्चयावर कायम झाली की ह्या गुंत्याची गाठ सोडवायची असेल तर उन्मेशचीच मदत होऊ शकेल.आता परीणामांची पर्वा न करता कार्य पुढे न्यायचेच. मनाचा निग्रह पक्का झाला तशी रेवाची मुद्रा निश्चयी दृढ स्मित घेऊनच परत फिरली.
एव्हाना सकाळचे चांगले साडेनऊ होऊन गेले होते.ऊन्ह छान अंगाला टोचत होती.
रेवाचा रोजचा काकुंशी बोलण्याचा रतिब ही झाला होता.सध्यातरी परिस्थिती जैसे थे च होती.काकांमधे फारशी कोणतीही सुधारणा नव्हती आणि फार सिरीयस असेही काही काकु बोलल्या नव्हत्या हे तिच्यासाठी जास्त समाधान देणारे होते.
सुशांतनेही मुंबईहुन पोहोचल्यावर फोन करून तसे कळवले होते.उन्मेशची चौकशी ही करून झाली.म्हणजे दिवसभराचे एक्सपेक्टेड कॉल्स होऊन गेले होते,त्यामुळे आता उन्मेश सोबत गप्पांना हवा तसा निवांत वेळ तिला मिळणार होता.
गेस्टरूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकुन रेवाने डोकावुन बघितले.
उन्मेश सर्व आटोपुन फ्रेश होऊनच बाहेर आला होता.झोप पुर्ण झाल्याने आता तो सकाळपेक्षा फ्रेश दिसत होता.
"हाय,झाली का झोप?"
रेवाने हसतच प्रश्न केला.
"हो,मस्त फ्रेश वाटतेय आता."
"सकाळी तुला सांगतो मला काही सुचत नव्हते,कधी एकदा घरी जाऊन आडवा पडतोय असे झालेले.खूप शीण आला होता पण आता मस्त छान वाटतेय."
"बर मग काय शेड्युल आजचे?"
"ऑफिशियल व्हिजीट म्हणतोएस मग कधी जायचेय?"
"अरेऽऽ बापरेऽ मी विसरूनच गेलो की मला ते कामही आहे नाही का?"
मी असे करतो,एकदा फोनवर बोलुन मिटींग फिक्स करतो आणि ते काम करून टाकतो आधी म्हणजे मग बाकी वेळ आपल्याला मोकळा,काय!"
"मी एक फोन करू ना?"
"अरेऽऽ,विचारतोस काय,कर की."
"बर मला सांग तुला "ब्रेकफास्टला काय करू?"
"तुझे बोलणे होई पर्यंत मी ब्रेकफास्ट तयार ठेवते."
"रेवा जे तुला चांगले बनवायला जमते ते काहीही चालेल.फक्त माझी तब्ब्येत बिघडणार नाही ह्याची काळजी घे."
उन्मेश नेहमीप्रमाणेच मिश्कीलपणे हसतच फोनकडे वळला.
"उन्म्याऽऽ,किती छळणारेस?"
"तुझा मित्र माझ्याच हातचे खातोय गेली दोन वर्ष आणि त्याची तब्ब्येत ठणठणीत आहे आजपर्यंत.अजुन काही प्रुफ हवेय का तुला?"
रेवाही लटक्या रागाने उन्मेशला उत्तर देत होती.
"बर बाई सॉरीऽऽ,बनव पटकन काहीतरी मस्त, मला खूप भूक लागलीय."
मी आलोच फोन करून.
रेवाने पटापट बटाटा पोहे,थोडा गोड शिरा बदाम घालुन केला.आणि चहा सुद्धा तयारच होता थर्मासमधे.
डायनिंग टेबल वर नाष्टा करता करताच उन्मेशने जुजबी चौकशी सुरू केली.
एकंदर घटनाक्रम काय कसा वगैरे.
पण इतक्या घाईगडबडीत रेवाला ह्याबाबतीत काहीच बोलायची ईच्छा नव्हती त्यामुळे तिने तो विषय शिताफीने टाळत गाडी उन्मेशवर वळवली.
"हा विषय तर बोलुच पण आधी मला सांग सायली प्रकरण कसे जुळवुन आणलेस?"
"मातेऽऽ,तुला बोलायला हाच विषय सापडला का आत्ता इतक्या घाईत?बोलुयात की सवडीने."
"बर मग तुला सवड कधी आहे?"
"कधी जायचेय ऑफिसला?"
माझे आत्ताच आमच्या बॉसशी बोलणे झाले ते म्हणाले की अर्ध्यातासात कळवतील म्हणुन."
तोवर आपण गप्पा मारूया.
"तु सांग तु कशी आहेस?"
"कसा चाललाय तुमचा संसार?"
"इट्स ऑल गोईंग गुड यार.वुई आर हॅप्पी, बटऽऽऽ..."
रेवा नकळत त्या बट वर थांबली.पुढे बोलायलाच सुचेना तिला.
रेवा डार्लिंगऽऽ हा 'बट' च फार जीवघेणा असतो आयुष्यात."
"बोल वाक्य पुर्ण कर,मी ऐकतोय."
काय बोलु उन्मेश,तुला सांगु मला एक गोष्ट सतत मनाला सलतेय जी मी आजवर कुणाजवळ बोलु पण शकले नाहीये."
"जसे आमचे लग्न झालेय ना सुशचे काकुंशी संबंध बिघडलेत.म्हणजे मी त्याला कारणीभूत नाही पण तरीही मला सतत असेच वाटते माझाच तर हा पायगुण नाही ना की मी सुशच्या आयुष्यात आले आणि हा अपशकुन घडला.मी स्वत:ला आतल्याआत कोसत राहते रेऽऽ."
सुशसमोर असले काही बोलायची देखिल सोय नाही,तो लगेच सुतावरून स्वर्ग गाठेल आणि उगीचच त्याच्या घरचेच कोणी मला असे बोललेत असा ग्रह करून घेईल.आजकाल त्याचा स्वभाव पण इतका अनप्रेडीक्टेबल झालाय ना की विचारू नकोस.त्यात सेंसिटिव्ह तर तो आहेच,त्यामुळे त्यालाही मनातले सारेच सांगायला मन धजत नाही.
रेवाच्या डोळ्यातुन बोलता बोलता अचानक पाण्याच्या धारा लागल्या.
तिला रडताना पाहुन उऩ्मेशलाही सुचेना तिला कसे सावरावे.
"काम डाऊन रेवाऽऽ!!"
"शांत हो.आणि असले भलतेसलते विचार मनात नको आणुस बरं.असे काही नसते गं."
आणि आता मी आलोय ना मदतीला,नक्कीच आपण काहीतरी तर छान करूच.
"आता डोळे पुस बघु अँड शो मी दॅट मिलियन डॉलर स्माईल ऑन युवर फेस.."
मी ठिक आहे रे.पण बरे झाले तु भेटलास,आज कितीतरी वर्षांनी मनातले बोलायला कोणीतरी हक्काचे माणुस भेटले.
तुला तर माहितच आहे माझ्या माहेरचे आधीपासुनच माझ्या ह्या चॉईसवर नाराज होते,त्यात मी हट्टाने सुशबरोबर लग्न करायचा निर्णय घेतला आणि घर सोडले ते कायमचेच.आज दोन वर्ष झाली पण कोणाशीही संपर्क नाही की संवाद नाही.मी खूप एकटी पडलीय रे.इकडे काकु आहेत पण सुशमुळे त्यांनाही बोला भेटायला बंधन." म्हणुनच वाटते साले माझेच नशिब दळभद्री म्हणुन सगळी नाती दुर झाली कारण नसताना.
पुन्हा एकदा रेवाचा आवाज ऋद्ध झाला,गऴा दाटुन आल्याने कंठातुन शब्द फुटेना.
रेवा,पुन्हा तेच..शांत हो पाहु.तुला काय सांगितले मी आता रडायचे नाही."हम है तो फिर क्या गम्."
"पौछ दो ये आँसु पुष्पा.हमे इनसे सख्त नफरत है।पुस्पा,आय हेट टिअर्स,आय हेट टिअर्स।"
उन्मेश लगेच हातवारे करून राजेशखन्ना स्टाईलमधे अमरप्रेमचा  डायलॉग मारत नाटकीपणा सुरू केला.
त्याची नौटंकी पाहुन अॅज युजवल रेवाला जाम हसायला आले.
"बास ना उन्मेश किती बोअर करणारेस?"
"यु आर व्हेरी बॅड अॅक्टर."हसत हसतच रेवा बोलली.
तु हसलीस ना,मग त्यातच सारे आले.नाहीतर मला अजुन काय काय करायला लागणार हिच भीती वाटत होती."
"थँक गॉड! तुम जल्दी मान गयी"
रेवा पुन्हा हसायला लागली.
"बरे झाले तुझे हे अॅक्टींग टॅलेंट सायलीने बघितले नाही,नाहीतर ती लग्नाआधीच डिव्होर्स फाईल करेल."
"अग्ं तुला माहित नाही,ती माझी अॅक्टींग बघुनच माझ्या प्रेमात पडलीय."
"ऑऽऽ!! हे कसे काय बुआ?!"
"आता ही स्टोरी नंतर पुन्हा कधीतरी."
"आत्ता आधी लगीन ऑफीसचे.."
"ओकेऽऽ बाबा.तु म्हणशील तेव्हा."रेवा चेहऱ्यावर पुन्हा एकदा हास्य फुलले होते.
पुन्हा एकदा वातावरण प्रफुल्लीत प्रसन्न करण्यात उन्मेश यशस्वी झाला होता.
"बर चल मी एकदा बॉसला फोन करतो परत."
"एकदाचे ते काम झाले की मग मी मोकळा.अॅट युवर सर्व्हिस."
रेवाही आता थोडी सावरली होती.मनातले मळभ आश्रुंसोबत वाहुन गेल्यामुळे तिला प्रसन्न आणि हलके हलके मोकळे झाल्यासारखे वाटत होते.
फोन संपुन उन्मेश रेवाकडेच आला.
"रेवा,मला लगेच निघायला लागेल.बॉसने तासानंतरची वेळ सांगीतलीय.
काही फार काम नाहीये,फक्त ही एक फाईल इकडच्या हेडला द्यायची आहे आणि थोड्या टेक्निकल फॉर्मॅलिटीज उरकुन मी दोन-एक तासात मोकळा होईन."
"बर,मी जेवायला वाट पहाते तुझी.तु तोपर्यंत फ्री होशील ना?"
"यसऽऽ डिअर,मी शक्य तितक्या लवकर काम संपवतो आणि येतो.मग मस्त गप्पा मारू."
पटकन आवरून उन्मेश घराबाहेर पडला.
रेवाही त्याच्यासाठी जेवण बनवण्यात किचनमधे व्यस्त झाली.

~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:46)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..