Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 44

Read Later
घरकोन भाग 44

#घरकोन -44
©राधिका कुलकर्णी.

सुश येईपर्यंत सगळे आवरून व्हावे ह्या घाईनेच ती पटापट स्वैपाकाला लागली.
तिचे किचनमधले सर्व काम उरकुन हुश्श म्हणत सोफ्यावर बसतीय तोच सुशच्या गाडीचा हॉर्न वाजला.
सुशच आलाय हे कळताच ती लगबगीने गॅलरीत गेली.
गाडी पार्क करून सुश वर आला.
घाईघाईने बेडरूममधे गेला.
रेवा जेवायला वाढ ग मी आलोच वॉश घेऊन.
त्याची गडबड बघुन रेवाला समजेचना की हा इतकी घाई का करतोय?फ्लाईट तर लेट नाईटचे आहे.आत्ताशी नऊ वाजलेत.अजुन खूप वेळ आहे.
मनातच विचार करता करता ती कामाला लागली.सुशला जेवणात पापड खूप आवडायचा म्हणुन तो आला की ती पापड भाजायची तयारी ठेवुन सॅलड कट करायला घेतले.
सुशने मस्त शॉवर बाथ घऊन फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर आला.
"रेवु जेवायला वाढ गं फार भुक लागलीय आज."
"का रे,दुपारी जेवला नाहीस का?"
अग एक कलिग होता सोबत.त्याला शेअर केला,तो नेमका लंचच्या वेळीच केबीनमधे येऊन बसला मग काय त्याला ऑफर केला डबा तर त्याने पटापट खाऊनच टाकला ग.
आणि दुपार नंतर ही डेव्हलपमेंट झाली.
अचानक राव बोलला की मुंबई ऑफीसला जाऊन तिथल्या न्यु रिक्रुटेड स्टाफला तुम्ही ट्रेनिंग कम डेमो लेक्चरसाठी जा.
आता नाही तर म्हणता येईना,मग काय अचानक सगळेच काम वाढले.तिथल्या लेक्चरसाठी थोडी तयारी..काही आवश्यक डॉक्युमेंट्स लागणार होते ते गोळा केले.सगळा वेळ त्यातच गेला.
कधी एकदा घरी येतो आणि जेवतो असे झाले होते."
"बरं बरंऽऽ तु आधी शांतपणे जेऊन घे मग बाकीचे बोलु."
रेवाने पाने वाढली.पापड भाजायला किचनमधे गेली आणि फोन खणखणला.ती एकदम दचकली.इतक्या उशीरा कुणाचा फोन?एक क्षण काळजात धस्स झाले.
दुसरा विचार येऊन ती जास्त घाबरली."
"हो न होवो उन्मेशचा फोन असेल तर?"
सुशला ह्यातले काहीच माहित नाही अचानकपणे उन्मेशचा फोन ऐकुन सुशने काही नसता विचार केला तर?"
म्हणतात ना "भित्यापाठी ब्रम्हराक्षस" तसे स्वत:च नको इतका विचार करून ती घाबरत होती.
पण तिचीच शंका खरी ठरली जेव्हा सुशने फोन उचलला तेव्हा पलिकडुन जो आवाज आला तो ऐकुन आधी सुश क्षणभर स्तब्ध झाला आणि दुसऱ्या क्षणी "
साल्या उम्या तु आत्ता? "कसा काय ईकडे?"
मग काय करणार बाबा तुम्हा साहेब लोकांना वेळ नाही ऑफीस अवर्समधे फोन उचलायला मग म्हणले घरीच कॉल करूया.निदान घरी तरी भेटशील..
अरे नाही रे.खूप काम वाढलेय प्रमोशन झाल्यापासुन,त्यात यु एस. व्हिजीट आहे नेक्स्ट मंथ त्याची तयारी.
त्यात तु जेव्हा फोन केला तेव्हा त्याच प्रोजेक्ट मधे बिझी होतो."
"बर ते सोड तु सांग,कुठेस,काय चाललेय?"
बास का विसरलास नाऽऽऽ.आपले लास्ट टाईम बोलणे झाले तेव्हा मी सांगीतले होते तुला."
अरे येस,दॅट रिमांईड्स मी तु चेन्नईला आहेस नाऽऽ,मग ये की एकदा जवळच तर आहेस.का निमंत्रण लागते तुला मित्राकडे यायला?"
अरे तेच सांगायला फोन केलाय,मी उद्या येतोय बेंगलोरला.ऑफिशिअल व्हिजीट आहे."
"तु आहेस ना उद्या?"
"अरे्रेऽऽऽ शीटऽ बॅड लक."
"का रे,काय झाले?"
अरे मी ही नेमका उद्याच मुंबईला चाललोय,ही पण ऑफीशिअल व्हजीट आहे."
काय यार तु,आधी नाही का सांगायचेस काहीतरी मॅनेज केले नसते का?"
आता इतक्या कमी वेळेत मी काही करू पण शकत नाही.
पण हरकत नाही मी नसलो तरी रेवा आहे ना.तु घरीच ये सरळ.
रेवा अँड यु एनजॉय द कंपनी."
ठिक आहे,आता तु म्हणतोच आहेस तर येतो घरी."
"बरं जरा रेवा असेल तर तिला दे ना फोन."
"तिलाही कल्पना देतो."
"यस शुअरऽऽ रेवाऽऽऽ उम्याचा फोन आहे गं बोल त्याच्याशी."
रेवा जरा संभ्रमातच फोन उचलली नेमके कसे रिअॅक्ट व्हावे सुशसमोर तेच तिला उमगत नव्हत.
खूप एक्साईटमेंटही दाखवुन चालणार नव्हती आणि खूप कॅज्युअल रिस्पॉन्स पण ऑड वाटला असता.
मग खूप दिवसांनी बोलतोय असा अविर्भाव करतच तिने बोलायला सुरवात केली.
"हे हायऽऽ उन्मेश!!"
"कसा आहेस,काय चाललेय आणि आज कसा काय अचानक फोन?"
"काही नाही तुमची आठवण आली मग भेटायला येतोय उद्या,चालेल ना?"
"चालेल काय धावेल मित्रा,कधी येतोस काय स्केड्युल आहे जरा डिटेल्ड मधे सांग ना."
"उद्या पहाटेची फ्लाईट आहे."
"मी सकाळी सहा पर्यंत लँड होईल.मला फक्त तुमचा पत्ता सांगशील का?"
हो पत्ता तुला सुश सांगेल."
"पण तू घरीच ये डायरेक्ट कुठेही दुसरीकडे लॉजवर वगैरे जायचे नाहिएस हे लक्षात ठेव."
हो ग मातेऽऽ घरीच येणार आहे, आधी अॅड्रेस तर दे."
"एक मिनीट हं, सुशऽऽ त्याला आपला अॅड्रेस सांग ना नीट."
"ए उम्या अॅड्रेसची काय गरज?रेवा येईल की तुला पिकअप करायला.नो वरीज."
अरे मला अॅड्रेस देऊन ठेव. लेट झाले तर मी आधी माझे काम करून मग घरी येईन. "आणि वेळेत आलो लवकर तर मग तसा फोन करून कळवेन मी."
बरं ठिक आहे.
बोलणे संपवुन फोन बंद झाला आणि रेवाने सुटकेचा निश्वास सोडला.
सुश एकीकडे खूप अानंदी होता आणि दुसरीकडे दु:खीही,इतक्या वर्षांनंतर त्याचा जिगरीदोस्त येत होता आणि त्याची भेट होणार नव्हती.
पण रेवा असल्यामुळे त्याला काळजी नव्हती.रेवा त्याचे छान आदरातिथ्य करेल ह्यात काही शंकाच नव्हती.
"रेवाऽऽ तु त्याला कंपनी दे आणि हो,तो काही मदत मागणार नाही तुच त्याला जाऊन घेऊन ये एअरपोर्टवरून."
आेके डिअरऽ मीच जाईन घ्यायला." 
आता तु जेव आधी.सगळे अन्न थंड होऊन गेले बघ.
थांब मी भाजी, आमटी गरम करून आणते.
नको राहुदे.जेवतो मी,फार काही गार नाही झालेय."
"पण खरं सांगु का रेवु माझी भुक पार मिटुन गेलीय. आलो तेव्हा कशी भूक होती पण उम्याचा फोन आला नी पोट त्याच्याशी बोलुनच भरून गेले."
होऽऽ मला समजतेय तु किती खुष झालाएस ते पण आता आधी जेवण पुर्ण कर.नाहीतर फ्लाईटमधे भूक लागेल तुला.तुझा काही नेम नाही कधी कुठे भूक लागेल ह्याचा."
रेवाने मस्करीतच टोमणा मारला.
बरं बरऽऽ कळतेय मला.टोमणे मारायची गरज नाही म्हणलं एवढी.आता लागते एखाद्याला अवेळी भूक त्याला कोण काय करणार?"
"हो रे माझ्या बबड्या..मी गंम्मत करतीय.चल जेव आता.कितीला निघायचेय तुला?मी येऊ का ड्रॉप करायला एअरपोर्टवर?"
"नको,एवढ्या रात्री तु नको येऊस मी जाईन कॅब करून.तु सकाळी उम्याला घ्यायला मात्र नक्की जा."
ओके डिअर.तु आता एकदा तुझे सगळे पॅकींग चेक कर काही विसरले का ते,आणि थोडी रेस्ट घे."
"हो ग,आज खूप धावपळ झाली.अॅक्च्युली आय नीड रेस्ट."
"मी ना एक तासानंतरचा बझर लावुन झोपतो." "प्लिज मला वेळेत उठव नाहीतर माझी फ्लाईट मिस होईल."
"हो मी वेळेत उठवते,तु झोप आता."
घड्याळात दहा वाजले होते.
सुशची दिड वाजताची फ्लाईट होती.त्यामुळे मॅक्सिमम् साडेअकरा ला तरी निघायलाच लागणार होते.
त्यामुळे रेवा टिव्हीवर काहीतरी कार्यक्रम लावुन झोप टाळायचा प्रयत्न करत होती.
सुशच्या घराबाहेर पडण्याची ती वाट पहात होती कारण तिला उन्मेश बरोबर बोलायचे होते जे सुशच्या समोर बोलणे मगाशी तिला जमले नव्हते.
नाही तेव्हा वेळ कुणीकडे निघुन जातो पण आज घड्याळ्याच्या काट्यांनी संप पुकारल्यागत वेळ अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती.
घड्याळाकडे बघता बघता मधेच तिला स्वत:लाच डुलकी आली.पण परत स्वत:ला सावरत जाग करत तिने सुशला बाय करेपर्यंत जाग रहायचे ठरवले.
बघता बघता अकरा वाजले आणि सुशच्या डोक्याजवळचा बझर वाजायला सुरवात झाली.धडपडतच सुश झोपेतुन जागा झाला.डोळ्यावर पाण्याचे सपके मारून स्वत:ला फ्रेश करतच त्याने स्वत:चे सगळे आवरले.तयार होऊन बॅग सावरतच रेवाला बाय म्हणत तो घराबाहेर पडला.
टॅक्सी स्टँड पर्यंत पायी चालत जात तिकडुनच त्याने टॅक्सी केली.
आत्ताशी कुठे रेवाला हुश्श वाटले.
तिने लगबगीने उन्मेशचा नंबर डायल केला.रींग जात होती पण तो फोन उचलत नव्हता.
दोनदा फोन करूनही तिकडुन कुठलाच प्रतिसाद येत नाही हे पाहुन निराशेनेच रेवा बेडरूममधे गेली.तिलाही झोप अनावर झाली होती. बेडवर स्वत:ला अक्षरश:झोकुन देत ती निद्रेच्या आधीन झाली.
~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
#घरकोन -44
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..