Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 41

Read Later
घरकोन भाग 41

घरकोन-41
©राधिका कुलकर्णी.

उन्मेशचा फोन केव्हा येईल ह्याची वाट पहात रेवा हॉल मधेच सोफ्यावर पडल्या पडल्या कसलेसे मॅगॅझिन चाळत होती.
वाचता वाचता झोप लागलीच तर इकडे लवकर कळेल फोन आल्याचे म्हणुन ती तिथेच टाईमपास करत होती.एक तास होऊनही उन्मेशचा परतुन फोन येत नव्हता.रेवाची घालमेल वाढायला लागली.
"काय करू?पुन्हा कॉल करून पाहु का?"
"कदाचित त्याला निरोप मिळालाच नसेल तर.?"
नको-नको त्या शंकांनी रेवाच्या मनात गर्दी करायला सुरवात केली.
कदाचित तो कामात असेल म्हणुन केला नसेल,शक्यता ही पण असु शकते ना,.
रेवा रेवाऽऽ शांत रहा,किती घाई करतीएस?
जरा थांब,येईल त्याचा फोन.....
रेवा स्वत:च स्वत:ला शांत करत समजावत होती.विचार करता करता सकाळ पासुनची धावपळ,दुपारची वेळ ,भरलेले पोट,मग काय पडल्या पडल्या कधी डोळा लागला रेवाला कळलेच नाही.
साधारण संध्याकाळी 4-4:30 ची वेळ अचानक फोन ढायढाय रिंग बडवत कोकलायला लागला.रिंगच्या आवाजाने रेवा खडबडुन जागी झाली.तोवर पर्यंत तिला असेच वाटत होते की आपण जागेच आहोत आणि उन्मेशच्या फोनची वाट पहातोय,पण आपला डाेळा लागला हे तिला जागे झाल्यावर जाणवले.
धडपडत स्वत:ला सावरत ती धावतच फोनपाशी गेली.रिसिव्हर उचलला आणि हॅलो म्हणल्याबरोबर पलिकडून एक परिचित आवाज आला.हो उन्मेशचाच फोन होता.
"हायऽऽ स्विटहार्ट!!"
आज लगेच इतक्या पटकन ह्या पामराची आठवण कशी काय आली?"
"ते मरू दे,आधी सांग इतक्या उशीरा फोन का केलास?"
"मी अर्जटली कॉल करायला सांगीतलेला निरोप मिळाला नाही का तुला.?"
दोन तास झाले तुझी वाट पहातीय."
रेवाने एका दमात सगळा मनावरचा ताण त्याच्यावर तोंडसुख घेत व्यक्त करून मोकळी झाली.
"मायऽ मायऽऽ मायऽऽडार्लिंग! !
"इतना तो हमे हमारी माशुका ने भी नही फटकारा।"
"क्या बात है जानेमन!!"
"कही इस नाचीझ पर दिल तो नही आ गया?"
"स्टॉप इट उन्मेश,तुला सतत कशी रे मस्करी सुचते?"
"काहीतरी महत्वाचे काम असेल म्हणुनच मी कॉल केला असेल इतके तुला समजु नये का?"
"किती उशीर केलास तु?"
रेवाचा आवाज जरासा कापत होता बोलताना.
आवाजातला तो भावनिक कंप उन्मेशने अचुक हेरला.
"ओके डिअर,सॉरी."
"नो मस्करी बासऽऽ."
"बर सांग मला,काय काम आहे,तु इतकी अस्वस्थ का आहेस?"
"घरी सगळे ओके आहे ना?"
"रेवाच्या डोळ्यातुन अश्रु ओघळत होते,गळा ऋद्ध झाला होता त्यामुळे तोंडातुन शब्द फुटत नव्हते."
"रेवाऽऽ तु रडतीएसऽऽ??"
"काय झाले?सगळे ठिक आहे ना गं?"
सुशा बराय ना गं,मला काळजी वाटतीय ग,बोल पटकन काहीतरी."
उन्मेशही आता काळजीत पडला.रेवा अचानक फोन काय करते,उशीर झाला म्हणुन डाफरते काय आणि क्षणात रडते काय,नेमकी भानगड काय काहीच कळायला मार्ग नव्हता.
"रेवा,तु आधी शांत हो."
"डोळे पुस,पुसलेस का?"
"हंऽऽऽआता मला सांग नेमके काय झालेय?"
रेवा आता थोडी सावरली होती.इतके दिवस मनावरचे ओझे कुणावर टाकुन दोन अश्रु सांडायला सुद्धा आपले म्हणावे असे कोणीच नव्हते त्यामुळे उन्मेश समोर येताच तिच्या भावनांचा कडेलोट झाला.
"सॉरीऽऽ उन्मेश!उगीचच चिडले मी तुझ्यावर.
मनातले बोलायला जेव्हा हक्काचे कोणीतरी भेटते ना तेव्हा अचानक त्या हक्कातुन मग असे घडते तसेच काहीसे झाले,खरच सॉरी."
"एऽ तुझ्या सॉरीच्याऽऽ.काय लावलेय गं?"
"एकीकडे आपले म्हणतेस आणि वर पुन्हा ही सॉरीची भाषा कशाला?"
"आधी सॉरी मागे घे आणि पुन्हा हे शब्द बोलल्यास पेनॉल्टी लागेल हं."
"आता बोला मॅडम,,काय बोलायचेय ते."
उन्मेशला कसे जमते हर परिस्थितीत हसवत ठेवायला.?
रेवा त्या तेवढ्या क्षणातही हा विचार करून गेली.
"अगं मातेऽऽकाही बोलणारेस का?"
"मी तुझ्याकरता माझी सगळी कामे टाकुन फोन केलाय गं."
रेवाला पुन्हा हसु फुटले.त्याच्या माते ह्या संबोधनाने तिला पुर्वीचा कॉलेज मधला उन्मेश समोर आल्याचा भास झाला.
तिचे हसणे ऐकुन उन्मेशलाही जरा बरे वाटले.
"हुश्शऽऽ!!"
" एकदाची हसली बुवा,नाहीतर मला तर वाटले आजचा अख्खा दिवस तुला मनवण्यातच जातोय की काय!!
"धन्य आहे बाबा माझ्या मित्राची."
"कॉलेजपासुन प्रेम केले अन् तुला कसे संभाळले देवच जाणे!!"
"उन्म्याऽऽऽ पुन्हा मस्करी?"
"थांब ना जराऽऽ,किती बोलतोस?"
"एऽऽ पुन्हा म्हण ना ते काय म्हणलीस आत्ता.??"
"प्लिज रिपीट कर ना यार,खूप गोडऽऽ वाटले कानाला ऐकायला."
उन्मेश तु इतका फ्लर्ट कधीपासुन झालास रे?"
"कॉलेजमधे कधी बोलायची सुद्धा हिंम्मत केली नाहीस आणि आता डार्लिंग काय ?स्वीटहार्ट काय?"
"तुझे हे बोलणे एैकुन सायलीचा विचार बदलेल बर,संभाळुन रहा."
आता रेवाही जरा मस्करीच्या मुडमधे उन्मेशची फिरकी घ्यायला लागली.
"अगंऽऽऽ काय सांगु तेव्हाही हे सगळे बोलायची हिम्मत केली असती पण काय करणार साल्या सुशाने आधीच तुला गटवली होती नां,मग उगाच मैत्रीत लोचा नको म्हणुन भावनांना आवर घातला."
"पण शप्पथ सांगतो ते #उन्म्या जर का कोणी आपल्याला कॉलेजात असताना हाक मारली असती ना तर आपण तर सोडले नसते तिला."
"साला जरा लेटच झाला तुलाऽऽ.."
उन्मेश फुल मिश्किलीत रेवाची खेचत वातावरण हलकेफुलके करायचा प्रयत्न करत होता.
"उन्मेश तु मार खाशील हं आता,बास ना किती फ्लर्ट करशील."
"ओके,आजचे सेशन इथेच थांबवतो,बोल काय म्हणतेस,इतक्या घाईने फोन का केलास?"
"उन्मेश,मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचेय पण कशी सुरवात करू तेच समजत नाहीये."
"रेवा काय झालेय,काही सिरीयस आहे का?"
"म्हणले तर आहे आणि म्हणले तर नाही सुद्धा."
"म्हणजे?"
"अशी कोड्यात का बोलतेस?"
"नीट स्पष्टपणे मला समजेल अशा भाषेत सांगणार आहेस का?"
"उन्मेश मॅटर तसा खुपच पर्सनल आहे पण तुझ्या खेरिज कोणीही इतके क्लोज नाही की ज्याच्याजवळ मी हे बोलु शकेन."
"रादर मला ह्यात तुझी मदत हवीय,करशील का?"
अॅम ऑलवेज देअर फॉर यु ,पण मॅटर काय अाहे ते तर कळु दे."
"उन्मेश मला वाटते की हे बोलायला आपल्याला भेटायला लागेल प्रत्यक्ष."
"असे फोनवर सगळे सांगणे खूप अवघड आहे."
"होऽऽऽ,भेटु आपण,पण थोडी हिंट तर दे की नेमका विषय काय आहे?"
"अरेऽऽ,आता कसे सांगु, एक प्रॉमिस कर आधी की आता मी तुला जे काही सांगेन ते फक्त आपल्या दोघांमधेच राहील."
"तु ना तर सुशांतला ना ही सायलीला ह्यातले काही कळु देशील,प्रॉमिस मी."
"कारण सुशांतला कल्पना देखील नाहीये की मी तुझ्याशी ह्या विषयावर बोलणार आहे अथवा तुझी काही मदत घेतीय,त्याला चुकुन जरी कळले ना तर तो माझ्याशी कायमचे बोलणे बंद करेल म्हणुन ही सिक्रसी पाळणे खूप गरजेचे आहे."
"हो मातेऽऽ पण मुद्दा काय आहे ते तर कळु दे."
"जी गोष्ट मला माहितच नाही त्यासाठी आधीच प्रॉमिस मागतेस आहेस,  धन्य आहेस तु."
,हो रे,खरच खूप भांबावायला झालेय मला.काय बोलु तेच कळत नाहीये.तुझा विश्वास नाही बसणार कदाचित पण सुशने त्याच्या आईशी सगळे संबंध तोडलेत."
"गेले दोन वर्ष झाले तो आईंशी बोलला नाहीये की त्यांना भेटला नाहीये."
"बापरेऽऽऽ! काय सांगतेसऽऽ?हे कसे शक्य आहे डिअर?आय जस्ट कांट बिलिव्ह."
"बघ तुझाही विश्वास नाही ना बसत,पण हेच सत्य आहे.आणि त्यासाठीच मला तुझी मदत हवीय,मला त्यांना पुन्हा एकत्र पहायचेय रेऽऽ."
रेवाचे डोळे पुन्हा एकदा पाणावले.
तिच्या आवाजातील कंप उन्मेशला स्वच्छ जाणवला.
"ए‌ऽऽ रेवा हे बघ आता पुन्हा रडु नको हं.मला सारख सारख तुझ्याशी फ्लर्ट करायची संधी देऊ नको,पुन्हा सांगतोय डोळे पुस."
"उन्मेशऽऽऽ!!!"रेवा हसुन लाडिकपणे त्याच्या मस्करीवर हसली.
"बर..,पण मला आता हे सांग ह्यात तुला मी काय मदत करू शकणार?"
"तसाही हा विषय तुमचा खूपच खासगी विषय आहे,त्यात सुशाचा स्वभाव तु जाणतेसच,किती मानी आहे,जोवर तो मनावर घेणार नाही त्यांच्यातला अबोला आपण कसा काय दुर करू शकणार?"
"आणि मी तर त्यातुन बाहेरचा माणुस,उद्या काही विपरीत घडले तर माझी त्याची मैत्री कायमची दुरावेल."
"होऽऽऽ तुझे म्हणणे अगदीच चुकीचे नाहिये.पण असे काहिही होणार नाही ह्याची आपण काळजी घेवु ना."
"तुझी साथ मिळाली तर मला नक्की ह्यात यश मिळेल."
"मग काय ठरवलेस?" "करशील माझी मदत?"
उन्मेश जरा पेचातच पडला होता.रेवा खूप स्वच्छ मनाने विचार करत होती पण चुकुन काही फासे उलटे पडलेच तर दोघांनाही आपापली नाती गमवावी लागणार होती.
ह्या दिव्य कुंडात ऊडी घ्यायची की नाही ह्याचाच विचार करत होता उन्मेश."
"अरे कायऽऽ कुठे हरवलास?गप्प का झालास असा?"
अंऽऽ काही नाही गं,एकजण मागेच उभे होते म्हणुन गप्प बसलो."
"आकेऽऽ मग काय ठरवलेस तु?"
"रेवा मला वाटते आपण अजुन एकदा निवांत ह्या विषयावर सविस्तर बोलुया आणि मग ठरवुया काय करता येईल ते."
"तु काळजी करू नकोस सगळे ठिक होईल."
"बर मी ठेऊ का आता फोन.मला तिनदा बॉस कडुन बोलावणे आलेय.आता नाही गेलो ना तर तो मला कायमचा घरी पाठवेल."
"ओके पण मग तु कधी करशील फोन?"
हे बघ,सकाळी नऊ ते संध्याकाळी सात ह्या मधे केव्हाही कर.पण लवकर कर रेऽऽ"
"हो राणी करतो उद्याच, बस्सऽऽऽ?"
"आता जाऊ का माते!!"
रेवा पुन्हा एकदा हास्याच्या फवाऱ्यात डुंबली.
"बर बाबा,जा आताऽऽ,बायऽऽ!!"
"उद्या वाट पाहते रे तुझ्या फोनची.."
फोन कट झाला तरीही किती वेळ रेवा रिसिव्हर हातात धरून तशीच बसुन राहिली.
काय जादु होती माहित नाही पण उन्मेशशी बोलुन मनावरचे कितीतरी ओझे हलके झाल्यासारखे वाटत होते रेवाला.
पहिल्या पासुन जेव्हा जेव्हा सुश आणि रेवा मधे काही अबोल्याचे भांडणाचे प्रसंग उद्भवले तेव्हा तेव्हा ह्याच कृष्ण सख्याने शिष्टाई करून समेट घडवुन आणला होता.
त्यामुळेच त्याच्या मध्यस्थीने हाही तीढा सुटण्याची रेवाला मनोमन खात्रीच पटली होती.

आज कधी नव्हे ते रेवा सुश सोडुन कुण्यातरी इतर पुरषाच्या  विचारात गुंगली होती.
उद्याचा दिवस कधी उजाडतो आणि कधी एकदा उन्मेशचा कॉल येतो असे झाले होते.....
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-41
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
(नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतोय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..