Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 40

Read Later
घरकोन भाग 40

घरकोन-40
©®राधिका कुलकर्णी.

काय करू?उन्मेशची मदत घेऊ का?तसाही उन्मेश एकमेव व्यक्ती आहे ज्याला सुशच्या आयुष्यातील सगळ्याच घटना माहीत आहेत.त्याच्या आयुष्यातील सर्वच संघर्षाचा एकमेव साक्षीदार उन्मेशच होता.
मी बोलु का उन्मेशशी?
पण आता इतका काळ लोटल्यानंतर सुशला आवडेल का उन्मेशची घेतलेली मदत?

आता नाही म्हणले तरी एवढ्या वर्षांत सुशमधेही बरेच बदल घडलेत.उन्मेश आणि त्याच्यात कामाच्या व्यापामुळे का होईना थोडा दुरावा आलाच आहे,त्यामुळे त्याच्या  बरोबर तीच मैत्री जर टिकुन नसेल तर? 
काय करू?
रेवा स्वत:च स्वत:शी संवाद साधत होती.
तिच्या मनात अनेक प्रश्न आणि संभ्रम निर्माण झाले होते.
पण हेही तितकेच खरे होते की कुणाच्या तरी विश्वासु मदती शिवाय रेवा ह्या घरगुती प्रश्नांच्या तिढ्याची गाठ सोडवु शकणार नव्हती.
आणि ह्या क्षणी तरी तिला उन्मेशहुन वेगळा सरस आॅप्शन दिसत नव्हता.

काय होईल फार फार तर?
सुश चिडेल,माझ्याशी बोलणे बंद करेल,
धुसफुसेल पण एकदा का गोष्टी ठिक झाल्या की मग हाच सुश पुन्हा गोडीत येईलच ना.
माझ्यापासुन फार काळ रूसवा धरून तो तरी कुठे राहु शकणार आहे.
पण आता काहीतरी जालिम उपाय केल्या शिवाय भाग नाही.काहीतरी करायला तर हवेच.
आणि उन्मेश नक्कीच काहीतरी शक्कल लढवेल,वेळ पडलीच तर सुशच्या रागालाही सामोरे जाईल हे नक्की.
चला,ठरले तर मग.
आता उन्मेशच्या मदतीने "#ऑपरेशन #मॉम" सुरू करूचयात.
रेवा मनोमन खुष झाली कारण इतक्या दिवस जे करायची इच्छा फक्त तिच्या मनात होती ती आता प्रत्यक्षात आकार घेणार होती.
आई वडीलांपासुन क्षुल्लक इगोपोटी किंवा गैरसमजापोटी दुरावा सहन करण्याचे शल्य काय असते ह्याची पुरेपुर जाणीव होती  रेवाला.त्यामुळे काकु आणि सुश मधला हा दुरावा ती कशी बघु शकणार होती?
त्यातुन मार्ग कसा काढावा ह्याचाच विचार सतत करणारी रेवा आज स्वत:वरच खुष होती.
वाट जरी अंधारी होती रस्ता जरी माहित नव्हता तरीही आता एक मिणमिणता दिवा तिला प्रकाश देवुन मार्गक्रमण करण्यासाठी साथ देईल ही नवी आशा तिच्या मनात उन्मेशच्या रूपाने पल्लवीत झाली होती.

मुख्य अडचण हीच होती की उन्मेशची भेट कशी घ्यायची?सगळेच फोनवर बोलणे शक्य नव्हते.
त्याला इकडे बोलवावे की आपणच तिकडे जावे?पण मी तिकडे जायचे म्हणजे सुशला कळणार,काय करू?उन्मेशलाच इकडे बोलवू का?
पण सुशला कळले तर?
काय करूया?
जे काही करायचे ते सुशच्या अपरोक्ष करायचे म्हणजे काळजी तर घ्यावीच लागणार होती.
पुन्हा एकदा ती विचाराच्या जंजाळात अडकली.कुणाच्याही नात्यांमधे दुरावा आणि नविन गैरसमज न निर्माण होता ही गुथ्थी कशी सोडवावी हाच विचार रेवाला भंडावुन सोडत होता.
पण एका विचारावर मात्र ती ठाम होती ते म्हणजे उन्मेशची मदत घ्यायची आणि त्याला सगळ्या घटना सांगायच्या.
मग त्यानंतर पुढचे पुढे बघु ..
सध्यातरी ह्या एवढ्याच विचारांवर स्थिर झाली होती कारण घाई करून चुकीचे काही पाऊल उचलुन आहे त्या प्रॉब्लेम्समधे तिला अजुन भर घालायची नव्हती.
    ~~~~~~~~~
रेवाने पटापट बाकीची कामे उरकली.कारण उन्मेशशी बोलायला तिला वेळ हवा होता.तसेही तो आत्ता बिझी असणार,त्याला लंचमधे फोन करावा म्हणजे बोलणे होईल.मनातल्या मनात स्वत:शीच बोलता बोलता रेवा घरातली कामे हातावेगळी करत होती.रोजचेच काम पण आज तेच करताना तिला वेगळाच उत्साह जाणवत होता.काहीतरी चांगले घडण्याची ही सुरवात जी तिच्या मनात टकटक करत होती त्यामुळेच की काय रोजचेच काम आज जास्तच वेगाने पुर्ण होताना तिलाही दिसत होते.
काय गंम्मत असते ना,जेव्हा कामाची घाई नसते सगळे रूटीन रटाळ असते तेव्हा नकळत एक मरगळ आणि कंटाळा येतो पण काही विशेष कामानिमित्त वेळेचे नियोजन करायला लागते,कोणीतरी आवडीचे माणुस घरी येणार असते किंवा मग आपल्यालाच कुणालातरी भेटायला किंवा अन्य कारणाने बाहेर जायचे असते,तेच रोजचे रटाळ काम किती पटापट पुर्ण होते नाही!!
विचारांच्या तंद्रीतच रेवाने घरातली आणि बाहेरची सर्व कामे उरकुन दोन वाजेपर्यंत घरी पोहोचली.
दोनच्या आसपास रोज सुश फोन करत असतो,त्याची वाट न पाहता आज रेवानेच त्याला फोन लावला.कारण नंतर तिला कोणाच्याही फोनचा डिस्टर्बन्स नको होता.
"हॅलोऽऽऽ!बोल गं,कसा काय फोन केलास?"
"अरे काही नाही,सहजच.
सकाळी तू घाईत गेलास, नाष्टाही नाही केलास.
आणि रोज तुच फोन करतोस,म्हणुन म्हणले आजआपण करावा,काही चुकले का?"
"अगं,चुक काय,उलट आनंदच झाला.इतकी काळजी कोण करते कुणाची?"
"बर मला सांग तु संध्याकाळी जेवायला घरीच आहेस ना?"
अगं तुला सांगीतले ना आज पार्टी आहे आमच्या स्टाफला बॉस कडून.
आम्हाला फॉरेन डेलिगेट्स कडुन प्रोजेक्ट अप्रुव्हल झाले आणि माझे प्रमोशन..दोन्हीचे सेलिब्रेशन आहे.पुन्हा विसरलीस ना..?"

"मला यायला आज उशीर होईल हं रेवु,तु जेवुन घे,माझी वाट पाहु नको."
ओके,पण मग आत्ता जेवलास की नाही?"
"हो गं थोडेसे लाईट खाल्लेय."
"रात्री पार्टी आहे ना."
"ओके,एन्जॉय द सक्सेस डिअर,लव्ह यु..बायऽऽऽ!"
बाय म्हणतच रेवाने रिसिव्हर बंद केला.
"हुश्शऽऽऽ,महत्वाचे काम झाले.आता सुश काही फोन करणार नाही.
हिच योग्य वेळ आहे उन्मेशशी बोलायला."

रेवाने पटकन हातपाय तोंड धुवुन जेवणही उरकले.म्हणजे आता कोणतीच अडचण उरणार नव्हती बोलताना.

रेवाने उन्मेशचा नंबर डायरीतुन नोट करून डायल केला.
ट्रींगऽट्रींग ट्रींगऽऽट्रींग...ऽऽऽ.
घंटी जात होती.आज नकळत रेवाला थोडीशी थरथर कंप जाणवत होता.
तोच मित्र पण आज बोलताना अंगाला घाम फुटलाय अशी जाणीव होत होती.नकळत कसलेसे दडपण जाणवत होते.
स्वत:ला शक्य तितके नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत ती पलिकडुन फोन उचलण्याची वाट पहात होती.
इतक्यात फोन उचलल्याचा आवाज झाला.
"हॅलोऽऽ कौन?"
फोन कोणीतरी दुसऱ्यानेच उचलल्याचे जाणवले कारण आवाज परका होता.
"कॅन आय स्पिक टु मि.उन्मेश प्लिज??"
"येस,बट ही हॅज गॉन फॉर लंच.
मे आय नो हु इज स्पिकींग? "
"प्लिज कनव्हे हिम दॅट रेवा वॉज कॉलींग हिम अँड टेल हिम टु कॉल बॅक मी,इट्स अरजंट."
"ओके मॅम,थँक्यु!
आय विल कनव्हे युवर मेसेज."
आता त्याचा फोन यायची वाट पहाण्यावाचुन पर्याय ही नव्हता.
मधल्या मिळालेल्या ब्रेकने रेवा थोडीशी स्थिर झाली. मनावर आलेला ताण आता थोडा हलका झाला होता.
त्याचा फोन येई पर्यंत त्याच्याशी काय-काय बोलायचे,कसे बोलायचे,नेमकी सुरवात कशी करायची,ह्याची तिने मनातल्या मनात उजळणी केली.
आता ती थोडी कॉन्फीडंट झाली होती.
त्यामुळेच स्वत:ला मगाचपेक्षा कुल आणि कंटेंटफुल फिल करत होती.
आता फक्त उन्मेशच्या फोनची ती आतुरतेने वाट पहात होती
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-40
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतोय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..