Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 4

Read Later
घरकोन भाग 4

घरकोन-4
®©राधिका कुलकर्णी.

रेवा फक्त सुशांतला टाळायचे म्हणून किचन कडे धावली होती.
पून्हा काहीतरी बोलले जाईल अन् पून्हा वाद कटकट आणि सगळेच वातावरण गढूळ होणार.इन मीन दोन टाळकी घरात त्यातही दोन जणांची तोंडे दोन दिशेला असले काही होवू नये म्हणून फक्त तिची सगळी धडपड चालली होती. मनात रागापेक्षा आताही काळजीच जास्त वेढली होती तीला.

आपल्याच विचारात गढलेल्या रेवाच्या गळ्याभोवती सुशांतच्या हातांचा वेढा कधी पडला तेही तीला कळले नाही.
कोणतीही विरोधी हालचाल न करता ती फक्त त्याच्या हाताच्या वेढ्यात डोळे मिटून शांत ऊभी होती.
"सॉरी ना रेवडी"
सुशांत कानात हळूच बोलला.
आणि हलकेच तीला आपल्या दिशेला वळवले.
ती मान खाली घालून पून्हा तशीच उभी राहिली.
तीचे काहीच न बोलणे सुशांतला जास्तच टोचत होते.
रेवाऽऽऽऽ बोल ना ग.किती हा रूसवा..
हा रूसवा सोड सखे 
पूरे हा बहाणाऽ
सोड नाऽऽ अबोला..
सुशांतने रेवासाठी गाणे गाऊनही एरवी पटकन फुलपाखरागत डोलणारी आज शांत होती..
"रेवूऽऽऽ!!!"
 "चुकलो ग मी."
"खूप घालून पाडून बोललो ना मी मगाशी."
"खरच गं रागाच्या भरात मी तूला नाही नाही ते बोललो 
अॅम सॉरी डार्लिंग.."
"प्लिज बोल ना काहीतरी.." 
आह्ऽऽऽऽ!! 
आई गंऽऽऽ!!!
आऊचऽऽऽ,आई गं पोटात दुखतेय ग रेवा खूप.
प्लिज हेल्प यार"
आत्ता पर्यंत शांत असलेली रेवा सुशांतच्या कळवळण्याच्या आवाजाने सैरभैर झाली.
ए ऽऽऽ काय होतेय तूला..?
पोटात दुखतेय का??
तू सरळ ऊभा रहा बघू.
नाहीतर तू बेडवर जावून ताठ पाय करून जरा पड.
चल बर..
बाहेरचे काही खाल्लेस का?
तीची बडबड सुरू झाली आणि सुशांत जोरजोराने हसायला लागला.
बघ शेवटी माझ्या काळजीने बोललीसच ना..
रेवाला त्याच्या नाटकाचे सत्य कळल्यावर मात्र ती जाम चीडली..
तूला काय वाटते रे सुश.
मी कोण आहे नक्की तुझी.
तू म्हणलास बोल की बोलायचे तू म्हणलास की बोलू नको ,दूर हो नजरे समोरून की मी निमूट पणे दूर व्हायचे.तूला वाटले की मी हसावे की मी हसायचे??
मी नक्की कोण आहे?
फक्त एक कळसूत्री बाहूली आहे का?
तूझ्या तालावर तूझ्या इच्छेने नाचणारी जीवंत बाहूली,असेच ना.
रेवाच्या डोळ्यातून आता मात्र धारा वाहायला लागल्या होत्या. इतक्या वेळ महत्प्रयासाने आडवलेले आश्रुंचे बांध आता मोकळे झाले होते.
"सुश मी तूझ्यावर मनापासून प्रेम केले."
"तुझ्याकरता सगळा माहेरचा गोतावळा लाथाडून त्यांच्या मर्जी विरूद्ध तूझ्याशी लग्न केले."
"तू म्हणलास सध्या काही दिवस मी जॉब करू नये.मी तेही ऐकले."
"माझ्या करीअर,अँम्बिशन्सचा जराही विचार न करता फक्त तुझ्यासाठी गृहिणी बनून राहीले."
"तूझी वाट पहाण्यावाचून कोणताही मार्ग नसतो म्हणून तुझ्यासाठी किचनमधे रोज नवनवीन पदार्थ करायला शीकते."
"हे सगळे फक्त तुझ्यासाठी,  तुझ्या वरच्या प्रेमापोटी स्वीकारले."

"दिवसभर हे घर खायला ऊठते सुश मला पण तरीही मी हे स्वीकारले."
"आणि आज तू काय बोललाएस तूला कल्पना तरी आहे का?"
मी तूला काय समजून घेणार असे बोललास तू.मग सांग आजवर तूला कोणी समजून घेतलेय.??
सुशांत शांतपणे एेकून घेत होता कारण तो खरच चूकला होता हे त्यालाही जाणवत होते.

"रेवा अॅम रीअली सॉरी."
"मला माहितीय मी खूप चूकीचे बोललोय पण मी खरच मुद्दाम नव्हतो बोललो."

"असो ,मी चुकलोय त्याची हवी ती शिक्षा मला दे पण मला ना आत्ता खरच खूप भूक लागलीय गं"
".मी आज कामाच्या गडबडीत दूपारी जेवलोही नाहीये."
आजचा माझा दिवस खूपच वाईट गेला गं
I was really feeling so irritated and disgusted."
 "हे Internal politics यू नो व्हेरी बॅड अँड अॅम द ब्लडी गिनीपीग"
"मला तूला सगळे सविस्तर सांगायचेय पण आत्ता जेवूया का आपण आधी?"
"एऽऽऽ रेव़डी चल ना ग भूक लागलीय मला."
"जेवू घालणारेस का मला?"

तो दूपार पासून उपाशी आहे हे एेकताच रेवाचा राग तात्पूरता का होइना निवळला होता.
तीने स्वैपाकच केला नव्हता पण दूपारचा थोडा आमटी -भात ,पोळी थोडी भाजीही होती.
तीने फ्रीज मधून अन्न बाहेर काढून पटकन गरम केले.
कणीक ही होतीच भीजलेली.
चटकन सुशांतचे पान वाढायला घेतले.

त्याला गरम पोळी करून वाढायच्या तयारीत तीने तवा गॅसवर ठेवला. 

"सुश,तू हातपाय धूवुन ये पटकन मी पान वाढतेय तुझे, ये लवकर."
सुशांत टेबलवर जेवायला  आला पण एकट्याचेच ताट बघून पून्हा विचारले,
"हे काय तूझे ताट कुठेय?
"आपण सोबत बसतोय जेवायला.मी एकटा बसणार नाही हं. चल तूझे ही ताट घे."

"हे बघ तू जेवून घे मग मी बसते.

"नोऽऽ,ते  मुळीच चालणार नाही.
"रात्रीचे जेवण सोबत घ्यायचे काहीही झाले तरी, हा आपणच केलेला नियम तूम्ही मोडताय रेवा मॅडम आज."
"तेव्हा जे असेल ते दोघे मिळून खावूया."
"चल."
"नाही,तू दूपार पासून उपाशी आहेस मी जेवलीय दूपारी तू जेव."
"रेवू  हट्टीपणा नको करूस गं प्लिजऽऽऽ."
"पोटात कावळे ओरडताएत."
"आता मी मरेन हं अन्ना वीना"
सुशांतचा इमोशनल ड्रामा पून्हा सुरू झाला.
ह्यावेळी मात्र रेवाची वीकेट पडलीच सुशांतच्या ड्रामेबाजीपूढे."
त्याच्या पोटात हातातले लाटणे जोरात घुसवत तीने एक  तीरका कटाक्ष टाकला.
"इतके वर्ष मी मेले तूझ्यावर आता तूही भोग की थोड्यावेळ."
"बघू कसा मरतोस मला सोडून??"
आऽऽऽ मेलो मेलो....
सुशांतनी हसून पून्हा एकदा रेवाच्या गळ्यात हात टाकले तीच्या मानेवर हलकेच ओठ टेकवले आणि म्हणाला,"आय लव्ह यू रेवा,!!
"अॅम नथिंग विदाऊट यू"
रेवा पून्हा एकदा सुशांतच्या मिठीत विसावली.
"चल जेवूया आता".
"की सगळा रोमान्स किचन मधेच करायचाय आज?"
मिश्कीलपणे रेवाने गुगली टाकला.
"ये तो सिर्फ ट्रेलर है मेरी जान पिक्चर अभी बाकी है!!!."सुशांतनेही मूडमधे डोळे मारत तीच्या गुगलीवर षटकार काढला.

रेवा लाजेने चूर झाली होतीआता.
तासापूर्वीचे गढूळलेले वातावरण पून्हा एकदा प्रसन्न सुगंधीत झाले होते..
#################
(क्रमश:4)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
(नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..