Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 39

Read Later
घरकोन भाग 39

घरकोन-39
©राधिका कुलकर्णी.

रिंग जात होती पण फोन उचलायला का वेळ लागत होता.काकांची तब्येत तर बरीय ना? रेवाच्या,मनात विचार सुरू झाले इतक्यात कोणीतरी   उचलला फोन.
"हॅलो??कोण बोलतेय?"
काकुंचाच आवाज होता.रेवाला हायसे वाटले.
"आईऽऽ,नमस्कार रेवा बोलतीय.काही कामात आहात का?"
"छे गं.वरच्या खोलीत होते ना,त्यामुळे वेळ लागला."
बोल काय म्हणतेस,कसे आहात तुम्ही?"
"आई इकडे सगळे ओके आहे,तुम्ही कशा आहात,काकांची तब्येत कशीय?"
"मी बरीय,मला काय धाडऽऽ,पण भावजींचीच तब्येत नाजुक आहे.आता तर सतत पडुनच असतात.खाणे पिणे सगळे बेडवरच.बोलणेही बंद झालेय.बोलायला लागले की नुसता घरघर्र आवाज येतो,शब्द कळतच नाहीत.फार वाईट वाटते ग त्यांची अशी अवस्था बघुन."
देवाने काय लिहुन ठेवलेय नशिबात काय माहित."
"तुमचे सांगा,तिकडे कसेय सगळे?"
"आईऽऽ आई ,आई!!! आज मी खूप आनंदी आहे म्हणुन तुम्हाला फोन केला."
"काग बाई?,कसला एवढा आनंद झालाय?काही गोड बातमी आहे की काय तुझी!!"
"बातमी गोडच आहे पण तुम्हाला वाटते तशी नाहीये."
"बर,मग पटकन सांग ना आता."

"अहो आई सुशांतबद्दल मी मध्यंतरी फोनवर बोलले नव्हते का, ऑफीसमधे खूप टेंशन आहे,तो खूप तणावातुन चाललाय असे,तर तो सगळा प्रॉब्लेम संपलाय आता आणि सुशला प्रमोशन मिळालेय,आता ह्या प्रमोशन मुळे त्याला अमेरीकेच्या कंपनीत सहा महिन्यांसाठी जायला मिळणार आहे."
"आहे ना आनंदाची बातमी?"
"हो गं बाई,!खरच खूप छान बातमी दिलीस."
अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो.त्याला माझे आशीर्वाद सांग हो."आणि तुझेही अभिनंदन!!माझ्या मुलाच्या प्रगतीमधे तुझीही साथ आहे ना त्याला.दोघेही सुखात रहा."
"देवासमोर साखर ठेवते थांब."
"आई साखर नंतर ठेवा.अजुन एक गोष्ट सांगायचीय,ती ऐकल्यावर तुम्हाला जास्त आनंद होणार आहे."
"कसली गोष्ट?"
"अहो आई काल एक चमत्कार झाला."
"कसला चमत्कार?"
"तेच सांगतीय ऐका ना,काल ना सुशला एक स्वप्न पडले.तो दचकुन जागा झाला.स्वप्नात तुम्ही दिसलात त्याला.आणि स्वप्नात त्याने बहुतेक तुम्हाला पलंगावर निजलेल्या अवस्थेत बघितले निपचीत पडलेल्या.तुम्ही आवाज देऊनही उठेचनात,तुमची काहीच हालचाल दिसेना तसा तो खूप घाबरला आणि तुम्हाला जोरजोराने हलवुन आवाज देऊन उठवत असतानाच त्याला जाग आली.जागा होताना तो तुमचे नाव घेतच उठला."
"आज कित्येक वर्षांनी त्याच्या तोंडावर तुमचे नाव आले.आणि त्याच्या चेहऱ्यावर तुमच्या विषयीची काळजी स्पष्ट दिसत होती."
"त्याहुन कमाल तर रात्री घडली.रात्री साधारण दोनची वेळ होती.अचानक कसल्यातरी आवाजाने जाग आली आणि बाजुला सुश नाही हे पाहुन मी हळुच उठले आणि हॉलच्या दिशेने कानोसा घेतला तर मी काय बघितले माहितीय?"
"काय पाहिलेस?"
"अहो तुमचा लाडका मुलगा चक्क फोनवर तुमच्याशी बोलत होता."
"होऽऽऽ ????"
"पण मला तर काल  कोणाचाच फोन नाही आला इकडे,,मग तो कुणाशी बोलत होता?"
"अहो आईऽऽ,,तसा डायरेक्ट फोन नाही हो,त्याने फक्त रिसिव्हर उचलला आणि तुमच्याशी बोलल्या सारखे सगळे मनातले बोलत होता.खूप रडत होता फोनवर.तुमची माफी मागत होता."मी खूप चुकीचे वागलो मला माफ करशील का?"असे सगळे बोलत होता."
"आईऽऽऽ??आईऽऽ!!कुठे आहात? एेकताय ना?"
हॅलो आईऽऽ,तुम्ही रडताय का?"
"हॅलोऽऽऽ!!"
"आई प्लिज रडू नका ना, डोळे पुसा पाहु."
"तुमची लेक म्हणता ना मला?"
"मग लेकीचे ऐकणार नाही का?"
आधी शांत व्हा."
"हो,ग पोरी,झाले शांत."
"रडु आले ऐकुन.कधी नाही ते लेकराला आईची आठवण आली हेच खूप आहे."
"लेकरू मनातल्या मनात आठवण काढुन त्रास करून घेतय स्वत:ला."
"माणसानी इतका अहंकार का ठेवावा मनी की इच्छा असुनही कुणाशी बोलता येऊ नये."
"खरय तुमचे आई.पण त्याला कळेल लवकरच."
"ही कालची कृती सकारात्मकतेकडे जाणारे पहिले पाऊलच नाहीये का?"
"आज दोन वर्षांनी मी पहिल्यांदा तुमच्या काळजीने रडताना बघितले सुशला."
"बघा हळुहळु बदल होईलच,आणि एक दिवस नक्कीच तो प्रत्यक्ष तुमच्याशी बोलेल,खात्रीय मला."
"तुझ्या तोंडात साखर पडोआणि असेच घडो बाई."
"भाऊजी सुद्धा फार आठवण काढतात ग त्याची."
" कधीही जवळ बोलायला गेले की वेडे वाकडे तोंड करून बोलायचा प्रयत्न करतात आणि सुशांतचे नाव उच्चारण्याचा प्रयत्न करतात आणि हाताने इशारे करून सांगतात त्याला बोलवुन घे,मला एकदा त्याला बोलायचेय,डोळे भरून बघायचेय,आणि रडायला लागतात.फार जीव तुटतो गं त्यांची तडफड बघुन."
"निदान त्या मरणाऱ्या माणसाची तरी दया येऊन एकदा ये म्हण त्याला."
"त्यांच्या डोळ्यात पश्चा:त्ताप साफ दिसतो ग."
"आतडे पिळवटुन निघते पण काय करणार,नुसते बघण्या पलिकडे त्यांची काही मदत मी करू शकत नाही."
"हो आई,मला समजतेय तुमचे दु:ख,पण लवकरच तो येईल भेटायला."
पण आजची घटना मला तरी त्याच्या बाजुने पॉझिटीव्ह बदल करणारी वाटली म्हणुन मी कधी सकाळ होते अन् तुम्हाला हे सांगते असे झाले होते."
"हो ग पोरीऽऽ,आता तुझ्याकडुनच आस आहे,कधी उगवेल तो दिवस तोपर्यंत मी डोळे नाही मिटले म्हणजे मिळवली."
"आईऽऽऽ,काय हे?असे का बोलता?असे काहिही होणार नाही."आणि माझी आज्जी नेहमी म्हणायची की स्वप्नात कुणी मृत झाले तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते ,त्याअर्थी बघितले तर तुम्ही दिर्घायु आहात.तुम्हाला अजुन आमची मुले बघायची आहेत त्याशिवायच जाणार का?"
"चला हसा बघु आता."
"आणि पुन्हा अशी मरणाची भाषा नाही करायची,मला प्रॉमिस करा?"
"नाहीतर मी कट्टी होईन हं तुमच्याशी,चालेल का?"
"अग हो ग माझी बाय,चुकले.आता नाही बोलणार पुन्हा असे.
खुष?"
"हम्म्! ये हुई ना बात."
बाकी तब्येत ठिक आहे ना तुमची?"औषधे सगळे व्यवस्थित घेताय ना?हयगय करायची नाही आणि कुणालाही काहीही झाले तरी लगेच कळवायचे."
"काळजी घ्या,पथ्यपाणी संभाळा तुमची."
हो ग माझी बाय,किती काळजी करतेस?मी घेईन स्वत:ची काळजी नीट,तुम्ही ही काळजी घ्या एकमेकांची आणि खुशाली कळवत जा अशीच."
"बर चल ठेऊ का आता फोन.?माझी पुजा राहिलीय अजुन."
"हो आई,बोलु पुन्हा."
"बायऽऽ"

आज खूप दिवसांनी काकुंना आनंदी बघुन बरे वाटत होते.मीही देवाजवळ साखर ठेवली आणि सुशांतला सद्बुद्धी दे आणि आई मुलातील दुरावा लवकर संपुष्टात आण ही प्रार्थना केली.
का कुणास ठाऊक आजच सुशला हे स्वप्न पडले आणि आजच उन्मेशचा कित्येक दिवसांनी/ वर्षांने फोन आला ह्याची काही सांगड असेल का?हाच विचार येत होता.कारण माझ्या आणि सुशच्या कित्येक प्रॉब्लेम्स मधे उन्मेशच्या मध्यस्थीनेच समोट घडला होता मग ह्याही वेळी उन्मेशची काही मदत होऊ शकेल??
तसा काही संकेत तर नाहीये ना हा?.
आज्जी नेहमी म्हणायची संकटात ईश्वर मदत करतो पण तो प्रत्यक्ष अवतरत नाही तर आपल्यापैकीच कुणा मानवाची त्यासाठी निवड करतो. म्हणुन माणसातच देव बघावा.
किती खरेय ना हे...
काय करू? बोलु का उन्मेशशी हा विषय?
पण सुशला आवडेल का?कितीही झाले तरी हा आमचा घरघुती मामला आहे,ह्यात परक्याला स्थान नाही,इतकी पर्सनल गोष्ट उन्मेशला शेअर केलेली सुशला नाही आवडली तर?
काय करू.....?
##############
रेवा पुन्हा एकदा विचारांच्या जंजाळात अडकली.पण ह्यावेळी काहीतरी मार्ग काढायचाच ह्यावर ती ठाम होती.
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-39
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..