घरकोन भाग 38

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी...

घरकोन-38
©®राधिका कुलकर्णी.

"रेवाऽऽ,ए रेवाऽऽ उठ ना लवकर.माझी ऑफिसला निघायची वेळ झालीय,उठ ना पटकन."
सुशांत रेवाला जोरजोराने हाका मारून बुटाची लेस बांधता बांधताच उठवत होता.
"अरेऽ बापरेऽऽ!"
"किती वेळ झाला.आज जागच नाही आली लवकर.किती वाजले रे सुश?"
"अगंऽ आज माझी मिटींग आहे मला लवकर जायचेय,काल बोललो नव्हतो का मी,विसरलीस का?"
"Omg!!मी विसरलेच रे."अचानक कसा डोळा लागला काय माहीत.सकाळचा बझर पण ऐकु नाही आला,तु थांब हं मी पटकन ब्रेकफास्ट बनवते."
रेवा बेडवरून धडपडत ऊठली.
तोंडात ब्रश खुपसुन केसांना क्लचनी बांधतच ती किचनकडे धावली.
एकीकडे चहा ठेवत दुसरीकडे फ्रीज उघडुन चटकन काय बनेल ह्याचा आढावा घेत ती फ्रीज पाहु लागली.
ब्रेड सँडविच वॉज बेस्ट ऑप्शन.
तिने पटकन ब्रेडला बटर लावायला घेतलेच होते इतक्यात सुश पुन्हा बोलला,
"रेवु मला फक्त चहा दे ब्रेकफास्ट ला वेळ नाहिये.आणि आज आमच्या ऑफिसमधे पार्टी आहे कंपनीला डिल मिळाले ना म्हणुन."
"अरे होऽऽ, तुला सांगायला विसरलोच काल, रेवुऽऽ मला प्रमोशन मिळालेय काल आमचे प्रोजेक्ट सक्सेसफुल झाले.बाकी डिटेल्स मी नंतर आल्यावर सांगेन."
"सुश, व्हॉट अ ग्रेट न्युज डार्लिंग!!!"
"पण हे तु इतक्या उशीरा सांगतोएस?व्हेरी अनफेअर!"
थोडीशी फुरगटुनच रेवा तक्रार करत होती.
"रेवु आत्ता वेळ नाहीये,आल्यावर तुझा सगळा रूसवा दुर करेन,मी निघु का आता?"
"स्माईल प्लिज."
सुशने रेवाच्या कपाळावर हलकेसे चुंबन करतच तिची समजुत काढली.
रेवाही लगेचच पुन्हा पुर्ववत हसुन सुशला बाय-बाय करत घरात आली.
आज तिला बराच मोकळा वेळ मिळणार होता कारण सुशचा डब्बा बनवायला सुट्टी मिळाली होती,ब्रेड-टोस्ट आणि चहा आरामात घेत ती न्युजपेपर चाळत बसली एवढ्यात फोनची घंटी वाजली.
एवढ्या सकाळी कोणाचा फोन!"
आईंचाच असेल असा विचार करतच रेवा लगबगीने फोनपाशी पोहोचली आणि चटकन रिसिव्हर उचलला.
"हॅलो!"
"हाय स्विटहार्ट!!"
"कोण बोलतेय?"
"अच्छा म्हणजे आता आवाज पण विसरलीस का?"
"हे भगवान!!!"
"कितनी जालिम है ये दुनिया!"
"दोस्त दोस्त ना रहा...."
समोरून हा फिल्मी डायलॉग ऐकल्यावर रेवाच्या डोक्यात लख्खकन प्रकाश पडला.
"कोण उन्मेश?!!?"
"यसऽऽ स्विटी!!"
"अरे गधड्या आहेस कुठे?"
"किती दिवसांनी,कसले वर्षाने फोन केलाएस तु?"
"आज कशी काय आठवण आली रे आमची.?"
"अच्छा!!"
"हे बरय.,उल्टा चोर कोतवाल को डांटे तसेच आहे हे."
तुम्ही दोघे लैला-मजनु कॉलेज सुटल्यावर आम्हाला पार विसरून गेलात.तुझा तो स्टुडियस नवरा,त्याने तर कॉलेज संपुन जसा जॉब लागला तसा सगळ्या मित्रांना पार विसरूनच गेलाय."
"आता काय बुवा मोठ्या पदावर साहेब झालाय ना तो मग गरीब मित्रांना कशाला लक्षात ठेवेल?"
उन्मेश चान्स मिळाला की फुल्ल टु सुरू झाला.
रेवा नुसती पोट धरून हसतच होती.
"उन्मेश माझे पोट दुखतेय हसुन,बस कर ना फिल्मी ड्रामा."
"तु जराही नाही बदललास हं."
"सिरियसली आज कितीतरी दिवसांनी इतकी मनमुराद हसलेय मी."
"थँक्स डिअर."
"बर सांग काय विशेष?"
"कसा काय केलास फोन?"
"काय करतोएस,कुठे आहेस?"
"व्हॉट अबाऊट लाईफ?"
"अगं होऽऽ होऽऽ,टेक अ ब्रेक यार,किती प्रश्न?"
"ओके सॉरी!आय वॉज लिल बीट एक्सायटेड.."
"बर मग सांग आता?"
"अग मी चेन्नईला आहे सध्या."
"एक न्युज द्यायला फोन केला होता."
"वेट वेट वेटऽऽ,लेट मी गेस.,आर यु गेटींग मॅरीड??"
"यस डार्लिग! यु आर अॅबसल्युटली राईट!"
"आेह माय गॉड!!!"
"डॅम गुड!!"
"काँग्रॅट्स यार.,सो हॅप्पी!!"
"बट हु ईज द लकी गर्ल?"
"रेवा प्लिज गेस वन नेम."
"ओ एम जी!!"
"डोन्ट टेल मी.!"
"यु मिन,आय नो हर?"
"यसऽऽऽ."
"आय कान्ट गेस यार सॉरी.."
"लवकर सांग ना कोण?" "मला राहवत नाहीये आता."
"बर एेक,तिचे नाव सायली."
"काय सायली?
यु मिन सायली दातेऽऽ दॅट गर्ल विथ अॅटिट्युड हं?"
"आर यु सिरियस मॅन?"
"वेट वेट वेट,!"
"मिन्स कॉलेजमधे तुमची पण बॅटींग चालु होती तर."
"थांग पत्ता लागु दिला नाहीत रे तुम्ही."
"कसला छुपा रूस्तम निघालास यार."
"तु समोर असतास ना आत्ता तर आम्ही दोघांनी तुला येथेच्छ बडवले असते."लांब आहेस म्हणुन वाचलास तु."
"अग एऽऽ बाई!,जरा आवर तो कल्पनाविस्तार.."
"मला बोलु देशील की स्वत:च सगळे ठरवुन मोकळे होशील?"
"ओके सांग..मी एेकतीय."
"अग कॉलेज संपल्यावर मी पण जॉब ऑफर स्विकारली."
मला मुंबईला पहिला जॉब मिळाला.नंतर कामा संदर्भात एका ट्रेनिंग साठी मी इंदोरला गेलो होतो तिथे अचानक फस्ट डे आपली सायली दिसली."
"ट्रेनिंग बॅचमधे अचानक ओळखीचा चेहरा बघुन आम्ही दोघेही खुपच खुष झालो."
"तुला सांगतो रेवाऽ,त्या पाच दिवसाच्या ट्रेनिंगमधे मला सायली जितकी कळली ना तितकी आपल्या अख्ख्या चार वर्षांच्या कॉलेज इयर्स मधेही नव्हती कळली."
"कसली खडुस वागायची ना ती.आणि स्पेशली मी सुशांतचा मित्र म्हणुन मला तर ती जवळही फटकु देत नव्हती."
"काय रायव्हलरी होती दोघांत काय माहीत पण मला ती कधीच आवडली नाही कॉलेजमधे असताना."फारच घमंडी वाटायची."
पण मग हळुहळु गप्पा फोन शेअरींग वाढत गेले आणि मग ती जशी समजतो त्याहुन खूप वेगळी आहे हेही जाणवले,मी तसे बोसुनही दाखवले एकदा तिला."त्यावर ती फक्त हसली आणि एवढेच बोलली कुछ लोग देर से ही समझ आते है।"
आणि मग नकळत कधी एकमेकांना आवडायला लागलो कळलेच नाही."
"नंतर मग दोघांनीही एम बी ए केले."
"आणि आता मी चेन्नईला आहे आणि ती मुंबईतच आहे."
"लवकरच आम्ही लग्नाच्या बेडीत अडकायचे ठरवले आहे."
"हुश्श!!!"
"व्हेरी इंटरेस्टींग स्टोरी यार."
"चला अखेर माझी सवत आता माझ्या मार्गातुन दुर होणार."
"अरे,कायऽ हे!!"
"बाय द वे ती कधीच सुशांतच्या मागे नव्हती बरं का?"
"हा फक्त तुझा समज होता."
"बाई बाईऽऽ!!"
"अजुन लग्न पण नाही झाले तर आत्तापासुन तिची बाजु सावरायला लागलास की."
"बस क्या यार.?"
"एक झटके मे पार्टी बदल दी.,इससे बुरा और क्या हो सकता है।"
"ए नौटंकी,बास ना आता."
"मेलेल्याला किती मारणारेस??"
"जस्ट किडींग यार!!"
"बट रिअली हॅप्पी फॉर यु."
"पण आता पार्टी हवी हं!!"
"बोल कधी येतेस? आत्ता देतो पार्टी."
"हो रे तुझी पार्टी तर घेणारच."
"सोडतो की काय तुला,पण आधी तु ये ना बेंगलोरला."
"नेक्स्ट वीक मी जर्मनीला जातोय एका कॉन्फरन्स मीट साठी तिकडुन आल्यावर प्लॅन करतो."
"बाकी कसे चाललेय"
"काकु कशा आहेत?"
"सगळे ओके आहेत.तु ये ना मग खूप बोलायचेय तुझ्याशी निवांत ये."
"ओके डिअर."
"आणि आमच्या परममित्राला सांगा आम्ही फोन केला तर उचलत जा म्हणाव.जेव्हा बघावे तेव्हा हा कॉन्फरन्सरूम मधेच असतो.त्याला सांग आम्ही पण कामं करतो.रिकामटेकडे नाही आहोत,उगाच गप्पा हाणायला फोन नाही करत."
"अरे हो,बरे झाले तु आठवण दिलीस."
"एक गुड न्युज आहे."
"ऑ!!"
"काँग्रॅट्स डिअर!!"
"म्हणजे मी लवकरच मामा आणि काका दोन्हीही बनणार तर."
"ए चुप्प रे,तसे काही नाहिये."
गुड न्युज ही आहे की सुशचे प्रमोशन झालेय.मलाही आज सकाळीच ही न्युज कळली."
"अँड यु आर द फस्ट पर्सन टु शेअर विथ."
"त्याला गेले वर्षभर खूप वर्कलोड होते."
" त्यात मागले काही आठवडे तर तो इतका स्ट्रेस्ड होता ना की विचारू नकोस."
"ब्लडी ऑफीस पॉलिटीक्स यु नो ना."
"त्यामुळे तो नसतानाच नेमके तु कॉल्स केले असणार आणि मे बी अटेंडंटनी इनफॉर्म नसेल केले कॉल येऊन गेल्याचे.त्यामुळेच त्याने कॉलबॅक केला नसेल."
"व्वा!!"
"किती छान नवऱ्याची बाजु सावरतेस ग?"
"आता तु खरी गृहिणी शोभतेस."
"पतीच्या हर चुकांवर बेमालुम पांघरूण घालणारी आदर्श नारी..टाळ्या!!"
"उन्मेश तसे नाहीये रे.मी खर तेच सांगतीय.ट्रस्ट मी." 
"अग,लक्षात ठेव सुशांत वेडेवाकडे वागला की मीच तुला सावरायचो."
"तुमच्या प्रत्येक भांडणात मीच समेट घडवुन आणलाय तरीही ते उपकार विसरून तु आज मित्राची बाजु घ्यायची सोडुन नवऱ्याची बाजु घेतेस?"
"घोर कलियुग!"
"घोर कलियुग.!!"
उन्मेशच्या नेहमीच्या हरहुन्नरी स्टाईलने त्याने पुन्हा एकदा बकबक सुरू केली.
माझी तर हसुन हसुन मुरकुंडी वळली होती.
"उऩ्मेश,किती हसवशील!"
"बस ना आता."
पोट दुखायला लागले माझे."
"तु थोडाही नाही बदललास रे!"
"पण खरच किती मस्त दिवस होते ना कॉलेजचे.!"
"आता जवाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली माणुस इतका दबलाय की हसायचे पण विसरून गेलाय."
"मॅडम,जब भी हसने का मन करे इस बंदे को याद करे।"
"ये आपको सस्ती,सुंदर आैर टिकाऊ हँसी की बारिष से रूबरू कराएगा।
"सस्ती,सुंदर टिकाऊ हँसी की बारिश।टिंगटाँग..!!"
"बस बस बस..आता मी मरेन उन्मेश.!!.थँक्स फॉर सच अ वंडरफुल टॉक."
आज कितीतरी दिवसांनी मी ईतकी हसलेय,जस्ट बिकॉज ऑफ य़ु डिअर."
"किती वेळ झाला बोलतोय आपण."
"तुला काम नाही का आज?"
"आत्ता कसा रे कॉल केलास?"
"हो गऽऽ,मी ऑफीसमधेच आहे पण आज सिस्टम डाऊऩमुळे  माझे सगळे काम अडकलेय म्हणुन वाटले मित्राशी बोलावे."
"सुशाला फोन केला तर साला उचललाच नाही मग तुमचा घरचा नंबर तरी ट्राय करू म्हणुन लावला आणि तु लकीली उचललास."
"पण आता सिस्टम रिस्टोअर झालेय,सो बॅक टु वर्क."
चल मस्त वाटले बोलुन, जातो आता जरा कामाचे बघतो."
"या.थँक्स,बाय.!"
"पुन्हा कॉल कर रे."
"हो बाय"
"अँड कनव्हे माय हार्टीएस्ट विशेष टु युवर डेव्हील हजबण्ड!!"
"यस,ओके,बाय."

बाय बाय करतच फोन ठेवला आणि काय झाले माहीत नाही अचानक इतके फ्रेश फिल व्हायला लागले की कालपर्यंतच्या अनेक घटनांमुळे मनावर जे मळभ दाटले होते ते क्षणार्धात नाहीसे झाले.
उन्मेशच्या एका कॉलने मला क्षणार्धात संजीवनी मिळाली होती.
मी खरच खूप आनंदात होते.
कितीतरी वेळ कॉलेजच्या रम्य आठवणीतच रमुन गेले.

खरच जीवनात कितीही प्रॉब्लेम्स असोत संकटे असोत,जर व्हिटॅमिन एफ.,चा पुरवठा असेल ना चांगला तर मग सगळे त्रास अचानक गायब होतात आणि इतकी पॉझिटीव्हीटी मिळते ना की जगातला कुठलाच डॉक्टर इतक्या पटकन अशी रिकव्हरी करू शकत नाही.खरच आज मला तरी उन्मेशमुळे दोस्त आणि दोस्तीचे महत्त्व पुन्हा एकदा पटले होते.
ह्या सगळ्यात आईंशी बोलायचे राहुनच गेले.त्यांनाही सुश नसतानाच बोलायला हवे.
ट्रिंग ट्रिंग..ट्रिंग ट्रिंग..पलिकडे फोनची घंटी वाजत होती.....
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-38
©®राधिका कुलकर्णी. 
नमस्कार मंडळी,.कथेमधे आज पुन्हा उन्मेशची एन्ट्री झालीय.तो रेवाची कशी मदत करेल हे तुम्हाला पहायला आवडेल का??आपल्या प्रतिक्रीया जरूर कळवा.

🎭 Series Post

View all