Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 35

Read Later
घरकोन भाग 35

घरकोन 35
©राधिका कुलकर्णी.

"आईऽऽऽ आईऽऽऽ..!!रेवाऽऽऽ."
सुशांतच्या जोरजोरात हाका ऐकुन रेवा धावतच बेडरूममधे गेली.
"काय झाले सुशऽ?"
"इतका का घाबरलास,आणि आईंना का हाका मारत होतास,काही स्वप्न वगैरे तर नाही ना पाहीलेस झोपेत?"
रेवाने सुशच्या कपाळावर स्पर्श करतच प्रश्न विचारायला सुरवात केली.सुशांतचा संपुर्ण चेहरा घामाने थबथबला होता.
चेहराही भांबावलेला होता.त्यात काळजी आणि भिती स्पष्ट दिसत होती.
त्याचे रेवाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते.कसल्यातरी विचारात डुंबलेला दिसत होता.जणु कसली तरी भिती सतावत होती त्याला.
तो काहीच बोलत नाही बघुन रेवाने पुन्हा जरा हलवुन त्याला त्याच्या तंद्रीतुन जागे करायचा प्रयत्न केला.
"अरे काय झालेय सुश तुला,तु असा शुन्यात नजर लावुन का बसलाएस?"
"काय झालेय तुला अचानक?"
"काही तरी तर बोल ना डिअर,का जीव टांगणीला लावतोएस माझा?
एऽऽबोल ना रे पिल्लु,काही वाईट स्वप्न पाहिलेस का?असा ओरडत का उठलास?"
सुशचा चेहरा आपल्या दोन्ही हातात धरून त्याचा चेहरा पुसत रेवा काकुळतीने चौकशी करत होती.
काही न बोलताच सुश आवेगाने रेवाच्या कुशीत शिरून रडायला लागला.रेवाला काहीच समजेना अचानक ह्याला असे काय झाले.
"अरे रडतोएस का असा?"
"रेवाऽऽआत्ता फक्त पंधरा मिनीट डोळा लागला आणि खूप वाईट स्वप्न पडले गं."
"काय पडले स्वप्न?"
नाही सांगता येत नीटसे पण आई दिसली गं स्वप्नात,पलंगावर झोपलेली दिसली.मी असाच कुठुनतरी बाहेरहून आलो आणि आईला उठवले तर ती उठेचना झोपेतुन."
"आईऽऽ आईऽऽ अशा हाका मारत तिला उठवत होतो स्वप्नात आणि जाग आली तेव्हा तु समोर होतीस.
पुन्हा एकदा सुशांतचा चेहरा रडवेला झाला होता.
सुश खूप स्ट्रेस असला ना की अशी विचित्र स्वप्न पडतात.जास्त विचार करू नकोस.ऊठ फ्रेश हो,चल कुठेतरी बाहेर जाऊया म्हणजे तुला बरे वाटेल." 
"नाही गं रेवू मला खूप अस्वस्थ वाटतेय.
माहित नाही का पण काळजी वाटतेय आईची.
तिची तब्ब्येत तर.......?पुढचे वाक्यही सुश पुर्ण करू शकला नाही आणि पुन्हा डोळे भरून आले त्याचे.
रेवाला आज कित्येक दिवसांनी तोच सुश पहायला मिळत होता जो लग्नाआधी आईची काळजी करताना तिने पाहिला होता.
हिच ती संधी होती ज्याची वाट गेले कित्येक महिने रेवा पहात होती.ह्या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला रेवाने..
"तुऽऽ बोलतो आहेस हे सुश?आश्चर्य आहे..!!"
"तुला कधीपासुन आईची काळजी वाटायला लागली रे?"
"तु स्वत:च सगळे नात्यांचे धागे तोडुन इथवर आलाएस ना,मग आता कशाला काळजी करतोस त्यांची??"
तु आईंशी न बोलण्याची प्रतिज्ञा घेतलीस ना?मग आता काय संबंध आपला त्यांच्याशी?"
तु आणि मी,आपला राजा राणीचा संसार आहे,तु इतक्या ऊंच ऊंच यशाच्या शिखरावर पोहोचतो आहेस पैसा,बँक बँलंस,गाडी बंगला हवी ती सर्व सुखाची साधने आहेत उपभोगायला,मनासारखे प्रेम करणारी मी,तुझी बायको आहे तुझ्या सोबत मग आता ह्या म्हाताऱ्यांची लुडबुड कशाला हवीय आपल्यात,सांग ना सांग??"
रेवा फार पोटतिडकीने कधीपासुन साचवलेली मनातली भडास ओकत होती.
"रेवा मला टोमणे देतीएस का?" 
"अरे वाऽऽ!! तुला कळतेय मी टोमणे मारतीय हे?"
"ग्रेट न्युज फॉर मी!
"आय मिन इतके दिवस मी कितीदा बरेच काही बोलले असेन पण तुला ते समजतच नव्हते,इनफॅक्ट तुझ्या काना पर्यंतही पोहेचत नव्हते,मग मीही माझा नाद सोडुन तु ज्या नावेत बसुन प्रवास करायला सुरवात केलीस त्याच नावेत सवार होऊन निघाले तुझ्या सोबत तु नेशील तिकडे.चुक बरोबरचा विचार न करता गांधारी बनुन राहतीय तुझ्या आयुष्यात."

"कारण लग्नात वचन दिलेय ना नवऱ्याची अखंड हर परिस्थितीत साथ देईन,तेच करतीय आताही.
तु सांगितलेस नाती तोड, तोडली.
तु म्हणालास नाही भेटायचे कुणाला ,नाही भेटले गेली दोन वर्ष.
नाही करायची कुणाची काळजी,सोडली काळजी.
सगळ्यांविषयी विचार करणे सोडले ना मी?आता इतके करूनही तु मलाच म्हणतोस की मी टोमणे मारतीय.
"जस्ट स्टॉप ईट रेवाऽऽ!"
मी वागलो त्याला काही कारणे होती जी तुलाही माहिती आहेत.तरीही तु मलाच दोषी धरतीएस, आणि मला गिल्ट दितीएस,...काऽऽ??"
मी प्रेम करत नाही का आईवर?
तुलाही माहितीय मी किती प्रेम केलेय पण माझ्यापेक्षा तिला आम्हाला त्रास देणाऱ्या लोकांबद्दल जर जास्त प्रेम असेल तर मग ठिक आहे ना,तिने तिचा चॉईस केला मग मी तिला मुक्त केले माझ्यावर प्रेम करण्यापासुन तर काय चुकले माझे?"
मी हे तिच्याच आनंदासाठी केलेय.आणि तु मलाच गुन्हेगार का मानतीएस?"सुशांत थरथरत होता बोलताना.
"तुला वाटतेय ना तु बरोबर वागतोएस,वागला आहेस मग का वाईट वाटुन घेतो आहेस?"
"माझे काय मी तर मुर्खच आहे तुझ्या लेखी.मी अशीच असंबद्ध बरळत असते.माझ्याकडे नको लक्ष देवुस.वेडी म्हण आणि दे सोडुन."
रेवाचा एक एक शब्द सुशांतला तीरासारखे टोचुन घायाळ करत होता.
पण तो काहीच बोलु शकत नव्हता.तिच्या बोलण्यावर त्याच्याकडे कुठलेच समर्पक उत्तर नव्हते.मन मात्र जख्मी झाले होते वेदनेने.
आज इतका आनंदाचा दिवस असुनही तो आनंद आज तो सेलिब्रेट करू शकला नव्हता.रेवालाही त्याच्या सक्सेसबद्दल शेअर करू शकला नव्हता.
"आई का आली असेल स्वप्नात आज इतक्या दिवसांनी? 
"कदाचित मीच माझा आनंद आईला शेअर करू शकत नाहीये म्हणुन का हे स्वप्न पडले.
हि काही दैवी सुचना तर नाही ना?
खरच का रेवा म्हणतीय तसा मी एककल्ली झालोय खूप?"
"काय करू...?"
सुशांत मनातल्या मनात स्वत:शीच संवाद साधत होता. 
इतके घालुन पाडुन बोलुनही सुश पुन्हा आपल्याच तंद्रीत गेलेला पाहुन रेवाचे विचारचक्रही वेगाने फिरू लागले.
काहीच रिअॅक्ट न होण्याइतक्या ह्याच्या भावना बोथट झाल्यात का?
का ह्याला आईंच्या भावनाच समजत नाहीये?का त्यांची बाजु समजत नाहीये ह्याला? 
कधी ह्याला उमगणार की हा खोट्या इगोपोटी आईंची घुसमट समजत नाहीये."

रेवाऽऽ,माझा घसा कोरडा पडलाय जरा पाणी आणतेस?
रेवा पाणी घेऊन आली.पाणी देतानाच तिने ठरवले होते काय बोलायचे,
"सुश एक सांगु,ऐकशील माझे??"
"गोष्टी इतक्याही ताणु नकोस की परिस्थिती हाताबाहेर जाईल.
आणि मग ठरवुनही तु काहीच करू शकणार नाही."
वेळ राहता स्वत:च्या इगोला सावर आणि आईंशी बोल."
"रेवाऽऽ मला शिकवु नकोस काय करायचे ते,
मी ठरवेन."
"तु जा आत्ता.मला थोडे एकटे राहु दे."

सुशांतच्या डोळ्यावरची ही आततायी पट्टी कधी दूर होणार?
असा विचार करतच रेवा डोळे पुसत रूमच्या बाहेर पडली.

देवासमोर नंदादीप शांत तेवत होता.
रेवा डोळे मिटुन हात जोडुन मुकपणे ऊभी होती.
काळजी,भय,चिंता,आशा एकाचवेळी सर्व भावभावना जोडलेल्या हाताभोवती परमेश्वराकडे साकडे घालत होत्या.
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन 35
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..