Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 34

Read Later
घरकोन भाग 34

घरकोन-34
©राधिका कुलकर्णी.

वॉशरूममधे फ्रेश होतानाही रेवाच्या डोक्यात हाच विचार घोळत होता की सुशांत आत्ता नक्की कशा मन:स्थितीत असेल.उगीच चिडचिडीचे प्रसंग नकोत.तो वैतागला की उगीचच नको नको ते बोलतो.मग माझाही मुड खराब होतो.
मनातल्या मनात सुशांतला कसे हँडल करायचे ह्याची तयारी करतच रेवा बाहेर आली.सुशांत तोपर्यंत वर येेऊन सोफ्यावर बसला होता.खूप थकल्यासारखा दिसत होता.मान मागे टाकुन डोळे मिटूनच सोफ्यावर पडला होता.
मन शांत असल्यासारखे वरवर वाटत तर होते पण हा फक्त दिखावा आहे की ह्याने खरचच सर्व गोष्टींना लाईटली घेतलेय हे रेवाला समजत नव्हते.
तिने पटकन चहा टोस्ट टेबलवर ठेवले आणि सुशला चहासाठी बोलावले.तोही पटकन टेबलवर आला.
"रेवा काही खायला आहे का गं,खूप भूक लागलीय?"
"चिवडा केलाय काल,देऊ का थोडा?"
"तुला आवडत नाही म्हणुन दिला नव्हता आधी."
"दे थोडा."
तिने पटकन डिशमधे थोडा चिवडा सर्व्ह केला आणि त्याच्या समोर येऊन बसली.
मग त्याचा अंदाज घेत न रहावुन रेवानेच सुशांतला विचारले,"मगऽऽ कसा होता आजचा दिवस?काय काय घडले? 
दुपार नंतर तुझा काहीच कॉल नाही.मी खूप अस्वस्थ होते.
तु आल्यावर खूप चिडलेला असशील म्हणुन थोडी घाबरलेही होते.
बोलु की नको असा विचार करत होते पण तु काहीच बोलेनास म्हणुन विचारलेच शेवटी.
त्यावर सुशही अर्धवट हसला.
"रेवा मी काय राक्षस आहे का मला घाबरायला?"
"हे असे बोलुन बोलुनच तु मला बदनाम करतीएस हं."
त्याचा हा मस्करीचा मुड बघुन तर रेवा चक्रावुनच गेली.नेमके काय घडलेय ह्याची ताकास तुर लागु देत नव्हता सुश.
त्यामुळे रेवा जास्तच चकीत झाली होती.

दुपारच्या फोनवरून तर लक्षणं सगळीच सुशच्या विरोधी जाताना वाटत असुनही हा आज इतका शांत,संयमीत कसा ह्याचेच रेवाला आश्चर्य वाटत होते.
शेवटी न राहवुन तिने विचारलेच," सुश आता सांगणारेस का नीट,नेमके काय झालेय ते?"
माझी उत्सुकता शिगेला पोहोचलीय,अजुन जास्त ताणु नकोस नां प्लिज."
रेवा काकुळतीला आली होती आता.
सुशने पुन्हा एकदा हलकेच स्मित करत म्हणाला," अगं मला खाऊ तर दे शांततेने.किती प्रश्न विचारून हैराण करतीएस."
"सकाऴपासुन नीट जेवलो पण नाहीये मी."
दिवसभर घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा राबतोय पण कोणी साधे जेवायचेही विचारले नाही मला."
"बरं बर तु आधी खाऊन घे नंतर बोलु आपण."
रेवाला त्याचा सुर चिडका होतोय असे वाटल्याने तिने लगेच माघार घेतली.
पण सुश खरेतर चिडलेला आहे असा अविर्भाव करत होता.त्याला रेवाला सरप्राईज द्यायचे होते पण ते ह्यावेळी जरा वेगळ्या स्टाईलने.ह्यावेळी त्याने खुप शांत संयमी भूमिका घेऊन तिला काय घडलेय ते सांगायचे ठरवले होते.
मनातल्या मनात तो इतका उत्साही झाला होता की आत्ता रेवाला कडेवर उचलुन घरभर गोल फिरून आपले सलेक्शन झाल्याचे सांगावे असे वाटत होते पण आता हे असे सांगितल्यावर आनंदाने रेवाच आपल्याला हवे ते सगळे करेल आणि तेच त्याला हवे होते.
म्हणुनच तो अॅक्टींग करत होता.
रेवाच्या मनात मात्र सुशला कसे सावरायचे हाच विचार चाललेला होता.
तिच्या विचारांची प्रतिक्रीया तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होती सुशला आणि त्याला मनातल्या मनात तिची दया येत होती बिचारी मला कसे संभाळायचे ह्याचा किती विचार करतेय.किती प्रेम करते ही माझ्यावर.
मी करतो का तिच्यासाठी इतके?
कदाचित नाही.पण आता नक्की करेन..
दोघेही समोरासमोर बसुनही आपापल्याच  विचारांत गर्क होते.
"रेवा तू पण घे ना चहा."
हंऽऽ..रेवा अचानक त्याच्या बोलण्याने विचारांमधुन बाहेर आली.
अरे मी दोघांसाठीच केला होता पण वॉशरूम मधुन येईपर्यंत तो आटुन गेला मग पुन्हा व्हायला वेळ लागेल म्हणुन तुलाच दिला बनलेला चहा.
"OH.. How sweet my love!!" 
चल दोघे ह्यात एकत्रच पिऊ."
इश्श्यऽऽऽ काहीतरीच हं तुझे.
आज खूपच रोमांस सुचतोय,तु बराएस ना सुशऽऽ?
आज ना मला तुझे काही समजतच नाहीये.
मधेच ऋषीमुनीं सारखा धीरोदात्त गंभीर वागतोस, मधेच लहान मुल होतोस भूक लागलीय म्हणत आणि आता लगेच रोमँटीक प्रियकर.
काय खाल्लेस रे बाहेर.?रेवानेही त्याची मस्करी करत हलकेच चहाचा एक घोट घेतला.
"रेवा तुझ्याशी खूप काही बोलायचेय पण मनाची तयारी करतोय म्हणुन मुड लाईट करायचा प्रयत्न करतोय असे बोलुन.
"काय बोलणारेस,सांग ना लवकर डिअर,मी केव्हाची वाट बघतेय.तुच बोलणे टाळतोएस."
टाळत नाहीये डार्लिंग,तुझ्या/माझ्या  मनाची तयारी करतोय."
"कसली तयारी,काय सांगायचेय?"
हो हो,सांगतो.जरावेळ थांब.हा रोमँटीक टी सेशन तर होऊ दे.डोळा मारत सुश रेवाला हसतच बोलत होता.
रेवाची आज पुरती भबेरी उडाली होती.हा असा का वागतोय आज?
ह्याला नेमके सांगायचेय काय, ते चांगले आहे की वाईट तेच तिला कळत नव्हते.
शेवटी एकदाचा चहा संपला आणि आता रेवा मागेच लागली सांग म्हणुन.
"रेवाऽऽ मी ना खूप थकलो आहे खरेतर,चहा घेऊनही सुस्ती जात नाहीये, मी थोडावेळ एक डुलकी काढून मग तुझ्याशी बोलू का?"
रेवा वैतागली होती "आता.कारण सुश आज सतत टाळाटाळ करून कारणे काढुन सांगायचे पोस्टपोन्ड करत होता.
"सुश तुला काय हवे ते कर.आता मी तुला मी पुन्हा विचारणार नाही."
"तुला इच्छा असेल तर सांग नाहीतर नाही सांगीतलेस तरी चालेल."
मी जातेय आता.
थोडीशी चरफडतच रेवा तिकडुन गेली.
सुशला खरचच रेस्टची गरज होती.तो बेडवर जाऊन पडला.सगळ्या 
घटनाच आज इतक्या वेगाने आणि अनपेक्षितरित्या घडत गेल्या की एखाद्या नाटकात  सगळे हेवेदावे दुर होऊन सरतेशेवटी शेवट गोड व्हावा तसे काहीसे आज सुशच्या बाबतीत घडले होते.
त्याची खरी काळजी वेगळीच होती.
प्रोजेक्टच्या प्लॅनिंग अँड एक्सिक्युशन कमिटीचा हेड म्हणुन त्याला सहा महिन्यांकरता युएस. ला जावे लागणार होते तेही एकटे.
कसे राहणार रेवा शिवाय आपण,इतक्या वर्षांपासुन सतत तिच्या असण्याची जी सवय लागलीय ती कशी सुटणार.?
त्यामुळे प्रोजेक्ट सलेक्शन होऊनही,प्रमोशन मिळुनही त्याचा म्हणावा तसा आनंद त्याला होत नव्हता.
ऑफकोर्स इट वॉज ग्रेट अपॉर्च्युनिटी टु प्रुव्ह वन्स् अॅबिलीटी अँड टॅलेंट आणि ते त्याने प्रुव्ह पण केले होते फक्त रेवाचा विरह सहन करणे हेच त्याला जास्त क्लेशदायक वाटत होते.
पण किमान आज तरी  त्याच्यासाठी हा मोमेंट  सेलिब्रेट करण्याचा आणि तोही त्याच्या प्रिय व्यक्ती रेवा बरोबर खूप छान सेलिब्रेट करण्याचा होता.पण नेमके काय करावे?
त्याची प्लॅनिंग करता करताच सुशला झोप लागली..
सेलिब्रेशन वॉज यट टु बी अवेटेड ....
प्रतिक्षा तर करायलाच हवी नां.....
~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-34
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन कथा आवडते की नाही?आता कथेचे दुसरे पर्व सुरू झालेय.ज्यांनी आधीचे भाग नीट वाचलेत त्यांना कळेल की सुशांतचा आपल्या आईवर आणि काकांवर का राग आहे.त्याने आईशी का अबोला धरलाय.काही रिव्ह्युज मधे वाचक विचारत आहेत की सुशांतचा काकांवर आणि आईवर का राग आहे.तर त्यासाठी कथेचे सुरवातीचे भाग मिस न करता काळजीपुर्वक वाचा.कथा खूप मोठी आहे.मलाही सगळे भाग रोज वाचावे लागतात लिखाण करण्याआधी.तुमचे प्रतिसाद वाचताना खूप आनंद होतोय की इतके लोक रोज कथेच्या भागाची वाट पहातात. संगळ्यांचे खूप खूप आभार..
तुमच्या प्रतिक्रीया कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..