Sep 25, 2020
कथामालिका

घरकोन भाग 30

Read Later
घरकोन भाग 30

घरकोन-30
©राधिका कुलकर्णी.

रात्रीची जेवणे उरकुन रेवा काकुंच्या खोलीत गेली.खोलीला लागुनच छोटीशी गॅलरी होती.ती तिकडेच उभी राहुन काहीतरी विचार करत होती.मनातल्या मनात सुशांतचा खूप राग येत होता.त्याने इतके ताणेपर्यंत चेष्टा करणे तिला मुळीच अपेक्षित नव्हते.आता ह्याचीही तशीच जिरवायची पण कसे हे तिला काही केल्या सुचत नव्हते.
तेवढ्यात पाठीमागे कसलीशी चाहूल लागली.कोणीतरी बाजूला येऊन हलकेच उभे होते.तिने बघितले तेव्हा सुशांतच आला होता तिच्याकडे.
तिच्या बाजूला शांत उभा होता.तिही बोलत नाहीये बघुन सुशांतला कळुन चुकले की ही शांतता नक्कीच काहीतरी वादळ घेऊन येणार.तरीही बोलण्याचा प्रयत्न करत त्याने सुरवात केली.
"रेवाऽऽ सरप्राईज कसे वाटले?"
रेवानेही मनोमन ठरवलेच होते की त्याला त्याच्या मस्करीचे चोख उत्तर द्यायचेच म्हणुन काही न समजल्यासारखे दाखवत विचारले," कसले सरप्राईज?"
"अगऽऽ आपल्या बद्दलचे.."
"आपल्या बद्दल काय?"
"हेच की आईचा होकार मिळाला ना! !आता आपल्याला कोणतीच अडचण नाही ना उरली"
"तूझी थोडीशी मस्करी केली पण तूला स्वीट सरप्राईज मिळाले ना शेवटी!!"
"सुशांत एक अडचण आहे."
"आता कसली अडचण?"
"आता मलाच वेळ हवाय हे नाते स्विकारायला,हिच अडचण."
"म्हणजे?मी समजलो नाही.काय ते स्पष्ट बोल."
सुशांतला आता मात्र काळजी वाटायला लागली.
"काल पर्यंत माझ्याबरोबर नाते जुळावे म्हणुन धडपडणारी रेवा आज सर्व काही सुरळीत असताना आता कोणता विचार करतीय!!
"रेवाऽऽ प्लिज,अॅम सॉरी, मी मस्करी केली पण आता असे काही बोलुन रंगाचा बेरंग नको ना करूस?"
"मी करतेय रंगाचा बेरंग?"
"मी बॅग भरून घरी निघायची वेळ आली तरीही तू मला खरे सांगितले नाहीस आणि मी रंगाचा बेरंग करतेय का?"
पण हे आता अतीच होतेय आणि ह्याला कारणीभूत पण मी स्वत:च आहे हे ही मला माहितीय कारण मी जरा जास्तच प्रेम केले ना तुझ्यावर,तू कसेही वागलास तरी शेवटी तूला माफच करत आले.त्यामुळेच तु मला सतत गृहीत धरत आलाएस.
आजही माझी मस्करी केल्यावर,खरे समजल्यावर मी लगेच आनंदाने सगळे विसरून तुझ्या गळ्यात पडेन असाच विचार तू केलास आणि म्हणुनच माझी इतकी क्रुर चेष्टा करायची हिंम्मत केलीस."
त्यामुळेच मला आता माझी निवड योग्य की अयोग्य ह्यावर पुनर्विचार करायला थोडा वेळ हवाय."
कारण पुढे आयुष्यभर माझ्याबाबतीत सर्व निर्णय मला गृहित धरून घेणारा व्यक्ती माझा लाईफ पार्टनर म्हणुन मला चालेल का हे मला स्वत:लाच तपासुन बघायचेय.
"अग काय बोलतीएस काय तू? तुझे तूला तरी समजतेय का?"
सुशांत आता मनातुन खरोखर घाबरला होता.
मी खूप विचार करून बोलतीय सुशांत.
बरेच झाले तू माझी अशी थट्टा केलीस त्यामुळे मला तुझा खरा स्वभाव दिसला."
"प्रेम बिम बोलायला ठिक आहे पण प्रत्यक्षात संसार करताना जर असेच प्रसंग वारंवार घडले तर मग मलाही सहन करणे अवघडच जाईल त्यामुळे सगळा विचार अगोदरच केलेला बरा नाही का?" 
आणि विचार करूनच सहचारी निवडायचा तर मग आपल्या कॉलेजचा मिरचंदानी काय वाईट होता.गेले चार वर्ष तो माझ्या मागे आहे तूलाही माहित होते.
दरवर्षी 14 फेब्रु.ला तो मला लाल,पिवळा आणि पांढरा असे तिनही गुलाब समोर धरून विश करतो.दरवर्षी मी त्यातला पिवळाच गुलाब स्विकारते हे त्यालाही माहित आहे तरीही तो त्याची जिद्द सोडत नाही.दरवर्षी तिनही रंगाचे गुलाब ऑफर करतो.
एकदा मी हसुन बोललेही त्याला,"जब तुम्हे पता है की मै सिर्फ यलो रोझ ही चुझ करती हुँ,फिर भी तुम हर बार तिन रंग के गुलाब लेके क्यु आते हो मेरे पास?"
तेव्हा त्याने काय उत्तर दिले माहितीय!
तो म्हणाला,मै जानता हुँ की तुम मुझे प्यार नही करती हो लेकीन ना जाने किसी दिन अगर तुम्हारा मन बदल जाए आैर तुम मेरा स्विकार करो उसी आँस मे मै कोशीश करते रहता हुँ।"
आता वाटतेय की त्यालाच होकार दिला तर तो बदल्यात किती प्रेम देईल.आयुष्यभर मला खुष तर ठेवेलच पण अशी जीवघेणी मस्करी तर नाही करणार ना माझ्यासोबत.
उलट मला गृहीत न धरता माझा हर एक शब्द झेलायला तयार राहील."
"खरच हा विचार मी आधी का नाही केला?"
थँक्स सुशांत तुझ्यामुळे मी आज स्वत:चा विचार करू शकले.
निदान त्यासाठी तरी मी तूला माफ नक्कीच करू शकते की तुझ्यामुळे मी माझ्यासाठी काय योग्य अन् काय अयोग्य हा विचार करायला प्रवृत्त झाले.खरच मनापासुन आभार हं तुझे."
रेवा त्याकडे न बघताच सगळे बोलत होती.तसतसा सुशांतचा धीर सुटत चालला होता.
तरीही हे खरे नाहीये हे पटवण्याकरता तो पुन्हा बोलला,"पण मग जर तूला हे लग्न मान्यच नव्हते तर तू आणलेली साडी का नेसली?आणि आईचे ऐकुन आज इकडे का थांबलीस?"
सुशांतने तिला चांगलेच कात्रीत पकडले होते.ही गोष्ट आपण कसे विसरलो  हे तिलाही जरासे आश्चर्य वाटले.पण मग लगेच मनातले विचार सावरत तिने सुशांतला उत्तर दिले," साडीचे काय एवढे,काकुंचे मन राखायचे म्हणुन नेसले फक्त पण उद्या जाताना मी ती साडी काकुंना परत करून जाणार आहे.
आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अजुन माझ्या घरच्यांना मी आपल्याबद्दल काहीच सांगितलेले नाहीये सोऽ त्याचाही मला फायदाच होईल.मिरचंदानी नाव ऐकुन आईवडील खुष होतील.त्यांना त्यांच्यासारखाच बिझीनेस करणाऱ्या खानदानातच माझे लग्न करायचे होते.त्यामुळे त्याची फॅमिली हिस्ट्री ऐकुन मला लग्नाला सहज परवानगी देतील बाबा.
तुझ्याशी लग्नाला असेही ते परवानगी देतील की नाही ही भीती होतीच पण बरे झाले मी वेळीच सावरले.
तुझे मानावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत सुशांत.कोणत्या शब्दात तुझे आभार मानु खरच समजत नाहीये."
"थँक्स सुशऽऽ, थँक्यु व्हेरी मच फॉर हेल्पिंग मी टु टेक द राईट डिसिझन."
आता रेडवेली व्हायची पाळी सुशांतवर आली होती.हे काय होत्याचे नव्हते होऊन बसले.
कुठुन दुर्बुद्धी सुचली आणि ही मस्करी करायची आयडीया डोक्यात आली कुणास ठाऊक.
आता रेवाने जर खरच हाच निर्णय घेतला तर माझे काय होणार?"
मी नाही जगू शकत रेवा शिवाय.पण आता काय करू म्हणजे ही हिचा निर्णय बदलेल? "
सुशांतला काहिच समजत नव्हते.
तेवढ्यात रेवाच बोलली'"आज खूप मेंटल फटिग झालाय.मला झोपेची खूप गरज आहे.चल मी पडते आता,आणि हो उद्या मी पहाटेच निघेन."
तू सोडायला नको येऊस फक्त तूला कल्पना असावी म्हणुन सांगतीय.मी सकाळीच जाईन माझी मी.
"बायऽऽ,गुड नाईट डिअर."
गुड नाईट करून रेवा आपल्या बेडवर जाऊन झोपली देखील.
सुशांत तिच्या ह्या नविन रूपाकडे आश्चर्यजनक नजरेने बघत होता.
रेवाचे आपल्यावर इतके प्रेम असताना ती असा निर्णय कसा काय घेऊ शकते हेच कोडे काही केल्या सुशांतला उलगडत नव्हते.आता ही तिसरी वेळ होती जेव्हा रेवा त्याच्यापासुन त्याच्याच वागणुकीमुळे दूर चालली होती.ह्याआधी कशाबशा गोष्टी सावरल्या होत्या पण ह्यावेळी रेवा जितक्या संयमाने शांतपणे बोलत होती त्यावरून तरी ती जे बोलतीय ते खरेच असेल असेच वाटत होते.
आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणे ह्या म्हणीचा अर्थ त्याला आज नीट कळत होता.
रेवाऽऽप्लिज,असा आतताई विचार नको गं करूस.मला तु हवीएस.माझे खरच खूप प्रेम आहे ग तुझ्यावर.मी खरच तुला खूप सुखात ठेवेन,ह्यापुढे खरच कानाला खडा,पुन्हा तुझी मस्करी कधीच नाही करणार प्रॉमिस,पण प्लिज असा विचार नको ना करूस!!"
सुशांत आता गयावया करत होता पण रेवावर तीळमात्र फरक पडला नव्हता.
"एऽऽ इकडे फुलांची दुकाने कुठे आहेत रे?"
"हो स्टँडवर आहेत,पण तूला काय करायची आहेत फुलं घेऊन? "
अरे उद्या गेल्या गेल्या मी स्वत:च मिरचंदानीला प्रपोझ करणार लाल गुलाब देऊन.
मी स्वत: त्याला प्रपोज केल्यावर त्याला किती आनंद होईल हो ना रेऽऽ?
आय वाँट टु सी दॅट स्वीट सरप्राईजींग स्माईल ऑन हिज फेस.!!"
निदान त्याला माझ्याकडून सुखद धक्का तरी मिळेल.तुझ्यासारखे नाही जे प्रेम करतात त्यांचीच चेष्टा...असो..मला आता तुला बोलायचा काहीच अधिकार नाही.तेव्हा उद्यापासुन आपले मार्ग निराळे..
"बट नाईस टु मिट यु. यु टॉट मी अ लॉट विच आय विल ऑलवेज रिमेंम्बर थ्रू आऊट माय लाईफ."
तसेही माझी आज्जी मला नेहमी एक सांगायची की नेहमी आयुष्याचा जोडीदार तो व्यक्ती निवडावा जो तुमच्यावर प्रेम करतो,ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता तो नाही कारण आपण ज्याच्यावर मनापासुन प्रेम करतो तोच आपल्याला वेळ आली की सोडुन जायच्या गोष्टी करतो.
रेवाचे प्रत्येक वाक्य बाणासारखे सुशांतला घायाळ करत होते.
तो काही न बोलता खाली गेला आणि आईजवळ जाऊन खिन्न चेहऱ्याने ऊभा राहिला.
आईला कळत नव्हते की आता हा का पुन्हा दु:खी?
आता तर सगळे नीट झाले,मग काय झाले?

आईच्या मनात विचार चालू असतानाच सुशांतने आईच्या मांडीवर डोके टेकवत आपल्या वेदनेला वाट करून दिली.
गरम कढत आश्रुंचे होणारे स्पर्श जाणवुन आईने विचारलेच काय झाले म्हणुन पण आज सुशांत स्वत:च्याच कर्तुतिने काहीही सांगायला असमर्थ झाला होता.
उद्याचा दिवस काय घेऊन येणार ह्याचीच वाट पहाणे बाकी उरले होते आता.....
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन-30
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही? हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..