Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 28

Read Later
घरकोन भाग 28

घरकोन-28
®©राधिका कुलकर्णी.

बराचवेळ झाला तरी समोरच्या रूम मधुन कोणीच बाहेर येताना दिसत नव्हते.
एवढी कसली गहन चर्चा चालली असेल?
विषय माझ्याशीही निगडीत आहेच मग मला का कोणी त्यांच्या संभाषणात सहभागी करून घेत नाहीॆएत?
विचारांनी डोक्यात कापूस पिंजायला सुरवात केली.
तेवढ्यात अचानक समोरचे दार उघडण्याचा आवाज झाला.रेवाने लोटलेल्या दाराला किंचीत फट करून त्यातुन किलकील्या डोळ्यांनी बघितले तेव्हा काकू खोलीतुन बाहेर येऊन जिन्याकडे वळताना दिसल्या.काकुंचा चेहरा अतिशय निर्विकार दिसत होता.ना दु:ख ना आनंद.त्यामुळे नेमके त्यांना काय वाटले असेल ऐकुन ह्याचा अंदाज लागत नव्हता.सुशांतचे नक्की काकुंशी बोलणे झालेय की नाही ही पण शंका येत होती.
रेवाच्या विचारांचे जहाज हेलकावत असतानाच खोलीतून सुशांत बाहेर पडताना दिसला.तिने ताबडतोब पुन्हा बिछान्यावर पळतच झोपेचे नाटक करत पडून राहिली.
सुशांत तिच्याच खोलीत दारावर हलकीशी टकटक्  करत दार लोटलेले पाहून ढकलून आत आला.रेवा बेडवर झोपलेली पाहून तिला उठवावे की नंतर बोलावे असा विचार करत तो दोन मिनीट तसाच तिथे उभा राहिला.तेवढ्यात रेवाने कुस वळवली.तिची हालचाल झालेली पाहून त्याने रेवाला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला.रेवाही त्याने हाक मारताच डोळे चोळत उठण्याचा अविर्भाव केला.
"काय रे?"
"का बोलावलेस?"
मुद्दामच निरागसतेचा आव आणत ती सुशांत काय सांगतो हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करत होती.
सुशांतही निर्विकार दिसत होता.कोणताही आनंद किंवा दु:ख कोणतेच भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते. रेवा त्यामुळेच धास्तावली होती परंतु पुर्ण ऐकुन घेतल्या खेरीज कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहचायचे नाही हे ठरवुनच ती सुशांत काय सांगतोय हे ऐकण्यासाठी उत्सुक होती.
"झोप छान लागली की तूला?"
सुशांत सुरवात करण्यासाठी म्हणुन बोलला.
होऽऽ रे..कित्येक दिवसांनी असे घरचे जेवण जेवले.
काकुंच्या हातचे इतके चविष्ट जेवण अन् त्यात त्यांनी आग्रह करकरून जेवायला घातले मग गुंगी येणारच ना?
कधी पडले न् डोळा लागला कळलेच नाही."
"बरऽऽ पण तू काय ठरवलेस मग?"
कधी बोलणारेस काकुंशी?"
रेवाने त्याला बोलायला आढेवेढे घेताना बघुन डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला.
"अगं,आत्ताच आईशी बोलुनच येतोय मी तुझ्याकडे."
कसे बोलू,काय सांगु काहीच समजत नाहीये  म्हणुन उभा होतो.
आता मात्र मनातुन रेवाही घाबरली.
म्हणजे?मला समजेल असे बोल ना सुशऽ?
"काय बोलल्या काकू?"
"तुझ्या चेहऱ्यावर तणाव का दिसतोय एवढा?"
"प्लिज सुश जे काही असेल ते साफ साफ सांग."
"मुळीच आढेवेढे घेऊ नकोस."
"सत्य काय असेल ते ऐकायची पुर्ण तयारी केलीय मी मनाची,सो यु डोण्ट वरी अबाऊट मी."
"प्लिजऽऽ स्पिक अप सुशऽऽ."
रेवा सुशांतला बोलते करण्यासाठी धाडधाड बोलत सुटली.
"होऽऽ होऽ हो.
"जरा धीर धर."
"इतकी पॅनिक आणि हायपर का होतीएस?मी सांगतोय ना,जरा शांत हो."
रेवालाही जाणवले नकळत आपण उगीचच ओव्हर रिअॅक्ट होताेय.
आता बेडवरून ती उठुन बसल.
"बरऽऽ बोल आता,मी ऐकतेय."
"काय बोलू तेच समजत नाही."
आईला सगळे सांगीतले.
तिनेही सगळे शांततेने ऐकुन घेतले.
तुझ्या घरच्यांना माहितीय का विचारले.
मी नाही माहित असे सांगीतल्यावर ती अजुनच नाराज वाटली."
"तसे बोलली नाही काही पण चेहऱ्यावरून तसेच वाटत होते."
"मगऽऽ पुढे?"
रेवाने पुन्हा प्रश्न केला.ती सगळे सविस्तररित्या ऐकायला उत्सुक झाली होती.
जरी कटु असले तरी सत्य जाणणे तिच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते.
"आता पुढे काय शिल्लक राहीलेय सांगायला."
ती हेच म्हणाली की अजुन तुमचे शिक्षण पुर्ण नाही,तुम्हाला नौकऱ्या नाहीत आणि लग्नाच्या गोष्टी कशा करता आहात?ह्या सगळ्याला खूप आयुष्य पडलेय. त्याआधी तुमचे करीयर तर घडवा,वगैरे ,वगैरे.
"मग तु काय म्हणलास?"
"तु सांगीतले नाहीस का की आपण सगळे करीयर सेट झाल्यावरच लग्न करणार आहोत."
"अगंऽऽ सांगीतले नाऽ!
"पण तरीही आई काहीच बोलायला तयार नाहीये."
"बरऽऽ ते सगळे जाऊदे पण त्यांना मी तरी पसंत आहे की नाही?"
"त्याबद्दल तरी काकू काहीतरी बोलल्या असतील ना?"
रेवा अधीर होऊन विचारत होती.
त्यावर मान खाली घालून सुशांत पुन्हा बोलायला लागला
,"तूला कोण नावे ठेवणार?"
"तुझ्यात नाव ठेवण्यासारखे काहीच नाही मग त्या परक्याच्या मुलीला मी कशाला नाव ठेऊ,'असे आई म्हणाली."

"म्हणजेऽऽ? ह्याचा अर्थ मला समजत नाहीये?"
रेवा खरच खूप संभ्रमात पडली होती.
एकीकडे काकू तिला नावही ठेवत नव्हत्या आणि दुसरीकडे होकारही देत नव्हत्या.म्हणजे नेमके त्यांच्या मनात आहे तरी काय हेच रेवाला समजेनासे झाले होते.
आपल्याच विचारात रेवा मशगुल झाली होती.
"अगऽ ए कुठे हरवलीस?"
सुशांतने तिला तिच्याच विचारातुन जागे केले.
"हंऽऽ,काही नाही तू बोल ना.तु उत्तर नाही दिलेस?"
"काकुंना मी तुझी बायको, त्यांची सुन म्हणुन पसंत आहे की नाही?"
"अगं,तेच नाऽऽ!
त्यावर स्पष्ट असे ती काहीच बोलली नाही.
सरऴ निघुन गेली गं खाली."
"मग आता काय करायचे रे आपण?"
"माझी तर काकुंशी नजरानजर करायची ही हिम्मत नाहीये आता."
"बघ सुश,मी तूला सांगत होते की इतक्यात ह्या विषयावर आपण नको बोलुया,पण तू माझे ऐकले नाहीस.आता उगीचच डोक्याला नविन टेंशन.परिक्षा पण व्हायचीय अजून.
तू ना खूप घाई केलीस सुश."
"डोण्ट वरी डार्लिंग.मी पुन्हा बोलेन तिच्याशी आणि तिची परवानगी मिळवेनच.तू नको काळजी करूस."
रेवाला आता अस्वस्थ वाटायला लागले होते.कधी कोणत्याही क्षणी डोळ्यातून धारा वहायला लागतील अशा कडा भरून आल्या होत्या.
मग न रहावून रेवाने एक प्रश्न केला.
"सुश मला सांग जर काकू तयारच नाही झाल्या तर?"
"तर काय?"
"प्रयत्न करत राहणार मी."
"पण आईच्या संम्मत्तीशिवाय मी कोणतेही पाऊल उचलणार नाही."
"तिने माझ्यासाठी खूप कष्ट सोसलेत.आता तिला ह्या वयात मी दु:खी नाही पाहू शकणार."
"पण मग जर काकू नाहीच म्हणल्या तर तू मला सोडून...... ......?"
पुढचे वाक्यही पुर्ण करण्याची तिची हिंम्मत झाली नाही त्याआधीच डोळ्यातुन पाण्याच्या धारा वहायला लागल्या.तिला नीटपणे बोलताही येत नव्हते.गळ्यातले शब्द गळ्यातच अडकुन बसले होते.ती फक्त रडत होती.
सुशांतला ही तिची अवस्था बघवत नव्हती पण त्याचा नाईलाज झाला होता.तिला कोणतीही खोटी आशा लावून तिचे मन कुरवाळायचे नव्हते त्याला.
रेवाने मग काहीतरी ठरवले आणि पटकन डोळ्यातले पाणी पुसले आणि सुशांतला एक शेवटचा प्रश्न विचारला जो तिला विचारायचे धाडसच होत नव्हते पण न विचारता राहणेही शक्य नव्हते कारण त्याचे जे उत्तर तिला तिचे मन देत होते तेच सुशांतनेही दिले तर ती जास्त खचणार होती पण शेवटी आयुष्य हे स्वप्नांवर नाही ना जगता येत.
सत्य कितीही कठोर असले तरी जीवनात सत्याचा सामना करावाच लागतो.
त्यामुळेच मनाची पुर्ण तयारी करत तिने प्रश्न विचारायचे ठरवले.
"सुश मला सांग,मग जर काकुंनी कोणा दुसऱ्या मुलीची निवड केलीच तर तू काय करणारेस?"
"मला खरच नाही माहित आत्ता की मी काय करेन,पण मी आईला दुखवून कोणताच निर्णय घेणार नाही हे मात्र खरे."
"जर हेच तुझे उत्तर असेल तर मग ह्या क्षणापासून आपण आपले मार्ग बदलू सुशांत."
"मला तूला बळजबरी करून तुझ्या नात्यांना तोडून माझ्याशी नाते जोडण्याची सक्ती नाही करायचीय.पण म्हणुन मी ह्यापूढे तुझ्या सोबतही राहू शकणार नाही.आपले मार्ग खरच वेगळे आहेत आणि आपण आपापल्या मार्गानेच गेलेले बरे."
"आता इथे थांबण्यात कोणताच पॉईंट नाहीये.सो मी निघते लगेच."
रेवाने डोळे पुसले.आपली बॅग उचलली आणि खाली जायला निघाली.
सुशांतने तिला अडवण्यासाठी तिचा हात पकडला.
"आत्ता इतक्या उशीरा कशी निघणार एकटीच?"
आजची रात्र थांब आणि उद्या पहाटे निघ ना."
"आता नको अडवुस मला."
"मी सुरतहून एकटी इकडे आले इतक्या लांब आणि आता मुंबई पर्यंत जाणे फार अवघड आहे का माझ्यासाठी?"
तू माझी काळजी नको करूस सुशांत,आय विल मॅनेेज मायसेल्फ."
एक मिनीट थांब रेवा,
आईला भेटून जा.नाहीतर तिला वाईट वाटेल.
"हो काकुंना नमस्कार करूनच निघणार आहे.त्या मलाही माझ्या आईसारख्याच आहेत.मला नात्यांचा आदर करता येतो."
"आणखीन एक रेवाऽ,आईने मला तूला आत्ताच काही बोलू नको असे सांगितले होते तरीही न राहवून मी सगळे सांगितलेय,सो प्लिज आईला कळू नको देऊस की मी तूला सांगितलेय.प्लिज एवढे करशील माझ्यासाठी?"
सुशांत विनंती करत होता.
तिने मानेनेच होकार दिला आणि जायला निघाली.सुशांतने हलकेच तिला जवळ घेतले पण तिने स्वत:ला त्याच्यापासुन दूर करतच खाली उतरली.
संध्याकाळ होत आलेली.
काकू किचनमधे चहा करत होत्या बहुतेक.
तिने धीर करूनच काकुंना आवाज दिला.
शक्य तेवढा स्वत:च्या भावनांवर कंट्रोल करतच ती किचनमधे गेली.
काकुंनी तिला बघताच प्रसन्न स्माईल देत हसुनच म्हणाल्या,"अगोबाईऽऽ उठलीस का तूऽ..!"
"बरेच झाले,मी चहा करून आता बोलवतच होते तूला.ये चहा घेऊ."
काकू काहीच न झाल्यासारखे इतके मोकळेपणाने कसे काय बोलू शकतात ह्याचेच रेवाला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
तिला खरेतर एक क्षणही तिकडे थांबायची इच्छा नव्हती पण सुशांतला वरती बोलुन आली होती की काकुंना कळु देणार नाही म्हणुनच ती स्वत:ला सावरतच काकुंनी दिलेला चहा घ्यायला तयार झाली.
सुशांतही खाली आला.तिघेही डायनिंग टेबलवर एकत्र बसून चहा घेत होते.काकू नॉर्मलच बोलत होत्या.पण सुशांत मात्र शांतशांतच होता.तिरक्या नजरेने रेवाकडेच बघत होता.
रेवाला जाणवत होते की तिरक्या डोळ्यांनी सुश तिलाच न्याहाळतोय पण ती जाणीवपुर्वक तिकडे दुर्लक्ष करत होती.
चहा संपवून ती निघणारच एवढ्यात काकू म्हणल्या,"रेवा जा बरं बाळ,संध्याकाळ झालीय देवघरात दिवा लाव बघू जरा."
रेवाला काहीच समजत नव्हते,हे काय चाललेय सगळे?"
"मी का ऐकतीय सगळे?"
सुशांतकडे एक कटाक्ष टाकत तिने प्रश्नार्थक नजर फिरवली.
त्यानेही डोळ्यांनीच गयावया करत आई सांगतेय तर ऐक अशी डोळ्यांनीच विनवणी केली.
मुळातच रेवा इतकी कठोर नव्हती की त्याच्या आईशी उद्दामपणे वागेल म्हणुन काकुंचे जाताजाता एक काम ऐकुन जाऊ.कदाचित देवाचीही हिच इच्छा असेल की ह्या देवघरात मीच अखंड सांजवात करावी म्हणुनच काकुंना ही बुद्धी झाली नसेल कशावरून!!
मनातल्या मनात विचार करतच तिने देवघरात दिवा लावला.देवाला नमस्कार केला.काकुंपाशी आली आणि काकुंचा निरोप घ्यावा म्हणुन नमस्कारासाठी काकुंच्या पायाला स्पर्श केला.
काकुंनीही आशीर्वादाचा हात अलगद डोक्यावर ठेवला.
"काकू निघते मी आता."
"आत्ता कुठे निघतेस एवढ्या उशीरा,उद्या जा की?
"नाही काकू,निघते आता.मी सामान पण नाही आणलेय जास्त आणि भरपूर गाड्या असतात.मी पोहोचले की कळवेन लगेच." 
नका करू काळजी."
"बरं मग थांब जरा."
काकुंनी रेवाला तिथेच ताटकळत ठेवत सुशांतला आतल्या खोलीत बोलवून घेतले.
पाचेक मिनटात सुशांत काकुंसह बाहेर आला.
काकू पुन्हा म्हणाल्या,"जरा जाण्या अगोदर सुशांत बरोबर मार्केटला जाऊन येतेस का पोरी."
"कशासाठी काकू?
मला उशीर होईल हो."
अगंऽऽ फार लांब नाहीये,जवळच जायचेय गाडीवर जा दोघे."
"सुशांत,काकांची गाडी घेऊन जा म्हणजे वेळेत याल."
"निघा बघु पटकन."
काकुंनी जवळजवळ गोड ताकीद देतच दोघांना बाहेर पिटाळले.
रेवाला कशाचाच अर्थबोध होत नव्हता.
का मला काकू जाण्यापासून अडवताएत?
का इतके प्रेमाचे नाटक करताएत?
एकीकडे मी त्यांना सुन म्हणुन पसंत नाहीये,मग मी निघालीय तर मुद्दामहून मला आणि सुशांतला एकत्र का पाठवत आहेत??
सगळेच अनाकलनीय न सुटणारे कोडेच वाटत होते.
जितके सुशांत पासून दूर जायचा प्रयत्न करते तितके तितके काहीतरी प्रसंगाने पुन्हा पुन्हा त्यांना एकत्र आणायचे प्रसंग घडत होते.
नियतीने का असा छळवाद मांडला?
का अशी चेष्टा चालवलीय हेच समजत नव्हते.
रेवा निमुटपणे सुशांतच्या मागे मागे घराबाहेर पडली.
जे होईल ते आपले प्रारब्ध नशिबाचे भोग आहेत.
जर इतके प्रेम करूनही सुशांत एका क्षणात ते विसरू शकत असेल तर आपण का नाही?
परमेश्वराला हाच धडा  शिकवायचा नसेल कशावरून की जे मिळणार नाही त्याच्या मागे धावत राहण्यापेक्षा अशा मोहातून स्वत:ला लवकरात लवकर दूर करून योग्य मार्गाने पुढे जा.
जे आपले आहे ते आपल्यापासुन कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.
आणि वेळेआधी आणि नशिबापेक्षा जास्त कुणालाच काहीच मिळत नाही.
मग होऊ दे जे नियतीच्या मनात असेल ते.
मीही तयार आहे नियतीचा निर्णय स्विकारायला.
विचारांच्या गर्दीत दोघेही मार्केटमधे पोहोचले.
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:-28)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..