Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 25

Read Later
घरकोन भाग 25

घरकोन -25
®©राधिका कुलकर्णी.

संध्याकाळ होत आली होती.शेवटचे लेक्चर संपत आले तसतसे रेवाच्या ऋदयाची धडधड वाढत चालली होती.नकळतच मनावर एक ताण जाणवत होता.कितीतरी दिवसांनी आज ती सुशांतचा प्रत्यक्ष सामना करणार होती.
नाही म्हणले तरी गृपनी काम करताना कुठल्यातरी एका प्रसंगी बोलण्याची वेळ येणारच, तेव्हा कसे सामोरे जाऊ त्यावेळी.रेवाची नुसत्या विचारांनीच घालमेल वाढायला लागली.हाताला उगीचच अनामिक कंप सुटल्यासारखे वाटत होते.
जे काही घडत होते ते सगळेच विचित्र होते.
इकडे उन्मेशलाही थोडा तणाव  जाणवत होता की नेमके कसे ह्यांना एकत्रीत रूमवर पाठवू.
लेक्चर्स संपले आणि सगळे क्लासरूम बाहेर पडले.
रेवाने आधीच ठरल्याप्रमाणे पार्कींगला जाऊन गाडी घेऊन लायब्ररीजवळ दोघांची वाट पहात थांबली.
उन्मेशनेच तसे सांगितले होते.
उन्मेशने काहीतरी विचार करत सुशांतला रूमवर पाठवून दिले.
प्रोजेक्टच्या सर्व असाइनमेंट्सची फाईल तयार ठेवायला त्याला सांगितले.
सुशांतला मुळीच कल्पना नव्हती की रेवाही आज त्यांच्यासोबत रूमवर असणार आहे.ठरल्याप्रमाणे तो एकटाच रूमवर पोहोचला.
त्यानंतर उन्मेश रेवाकडे आला आणि तिलाही तू पुढे हो,मी आणि सुशांत लायब्ररीतून बुक्स इश्यु करून रूमवर पोहोचतो असे खोटे सांगुन तिलाही रूमवर पिटाळले.
आता सुशांत आणि उन्मेश सोबतच आहेत कळल्यावर रेवा थोडी रिलॅक्स झाली.
मनावरचा ताण थोडा कमी झाला.
ती गाडीवरून सरळ मेन रोडने हॉस्टेलगेटवर पोहोचली.हॉस्टेलला लायब्ररी कडून पाठीमागून वळसा घालून एक शॉर्टकट होता.सहसा हॉस्टेलची मुले ह्याच रस्त्याचा वापर करत पण टुव्हीलर्सना यायला दुसरा रोड कँम्पस कडून होता तो जरा लांबून असल्याने रेवाला थोडा उशीरच झाला रूमवर पोहोचायला.
ती पोहोचली तेव्हा,थोडे फ्रेश होऊन कामाला लागू असा विचार करून सुशांत वॉशरूमला गेला होता त्यामुळे आता
रूममधे कोणीच नव्हते.
तीने आपल्या सर्व नोट्स एकदा रिकलेक्ट करून ठेवल्या.काही डेटा नोटेशन्स आणि फिगर्स राहील्या होत्या,ते सगळे तरी सुरू करूया असा मनोमन विचार करत ती नोट्स मधे डोके घालुन बसली.
अचानक दरवाजा ढकलल्याचा आवाज झाला.उन्मेशच असेल म्हणुन सहज मागे वळुन बघितले तर सुशांत दरवाजा बंद करताना पाठमोरा दिसला.
भितीने रेवाची गाळणच उडाली.हा अचानक इकडे कसा उगवला!!असा विचार करतच ती एकदम खुर्चीवरून उठुन ऊभी राहिली.
हातपायात कंप होत असल्याची नकळत तिला जाणीव झाली.
सुशांतला अचानक तिला रूमवर बघुनही तसाच आश्चर्याचा धक्का बसला.
त्याच्या एकीकडे आनंद आणि दुसरीकडे आश्चर्य अशा संमिश्र प्रतिक्रीया उमटत होत्या.
काही कळायच्या आत रेवाने आपल्या पुस्तक वह्या पेपर्सचा पसारा गोळा केला,सॅकमधे जवळपास कोंबला आणि तिकडून निघायला लागली.
सुशांतला जाणवत होते की हिला थोपवले नाहीतर आजही आपल्याला रेवाशी बोलायची आयती आलेली संधी निसटून जाईल हातातून.
तिने निघण्यासाठी दाराकडे धाव घेतली तसा सुशांतने तिचा हात धरला आणि तिला थांबवायचा प्रयत्न केला.
"प्लिज रेवा थांब ना.जाऊ नकोस अशी न बोलता."
सुशांतचा नकळत अचानकपणे झालेल्या स्पर्शाने तिच्या सबंध शरीरातुन एक वीजेचा झटका  लागावा तसे काहीसे झाले.
ती खूप संतापली होती.तिचा हात धरलेला तिला अजीबात आवडले नव्हते.प्रचंड तिरस्काराने तिने त्याच्या हाताला झटका देऊन आपला हात सोडवुन घेतला आणि रागानेच त्याच्यावर नजर रोखली.
तु माझा हात धरायची हिम्मतच कशी केलीस?
समजतोस काय रे तू स्वत:ला?
आणि मला कोण समजतोस,तुझी नौकर आहे का मी?"
"तु म्हणलास की थांबायचे,तू म्हणलास की दूर जायचे."
रेवा रागाने अजुनही थरथरत होती.
तिचा हा अवतार बघुन सुशांतही मिनीटभर घाबरला पण तरीही सर्व बळ एकवटून तो पुन्हा म्हणाला.
रेवा मला माहितीय मी तुझा गुन्हेगार आहे,तूला माझ्याशी बोलायचे नाहीये पण फक्त एकदाच माझे म्हणणे ऐकुन घे.मग तूला जे योग्य वाटेल तो निर्णय घे.मी काहीही म्हणणार नाही.
"हे बघ योगायोगाने का होइना आपली भेट झालीय ना इकडे तर प्लिज माझे बोलणे ऐकुन जा."
आता रेवाचे डोके अजुनच भडकले.
"योगायोग?"
" कसला योगायोग?"
"तुच प्लॅन करून उन्मेशला सांगुन हा सगळा योग घडवून आणलाय हे न समजण्याइतकी मी मुर्ख वाटले का तूला?"
सुशांतला काहीच कळत नव्हते की रेवा काय बोलतीय.
त्यामुळे तोही थोडा वरच्या आवाजात पण संयम राखुन बोलला,
"हे बघ रेवा,मी कुठलाही प्लॅन वगैरे काही केलेला नाहीये.तूला भेटुन बोलण्याची इच्छा आहे,होती हेही खरय पण त्यासाठी असले प्लॅनिंग वगैरे करणाऱ्यातला मी नाहीये.विश्वास असेल तर ठेव."
रेवाचा संताप इतका अनावर झाला होता की ती काहीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.
आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकू हाच विचार तिच्या मनात घोळत होता.
"सुशांत,माझी एक अक्षरही बोलायची इच्छा उरलेली नाहीये."
" फक्त आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटतेय की तू जे काही वागलाएस त्याचे समर्थन करायला अजुनही तुझ्याकडे काही शिल्लक आहे?
काय सांगणारेस.?"
"जे सांगाबोलायचे होते ते तर तू आधीच तुझ्या कृतीतून व्यक्त करून झालेय मग आता अजुन काय उरलेय बोलाण्याजोगे?"
गेले चार वर्ष मी ज्या सुशांतला ओळखत होते तो तू नाहीच आहेस.
सायली बोलली तेच खरेय,तूला फक्त तुझ्या गरजा पुर्ण करण्यापुरती कोणाचीतरी गरज होती आणि ती मुर्ख मी सापडले तूला.
मी मनापासुन तूला आपले समजले.तुझे प्रॉब्लेम मी आपले समजून वाट्टेल ते करून त्यातून तूला सोडवण्याची धडपड केली.
मी श्रीमंत बापाची लाडावलेली पोरगी असे सतत टोमणे मारायचास ना तू?
पण तिच श्रीमंत बापाची पोर तिच्या पॉकेटमनीतून तूला मदत होईल म्हणुन स्वत:चे पैसे तुझ्याकरता जपून ठेवायची.
तूझ्या मेसचे बिलही त्याच पैशातून भरायची.
असोऽऽऽ.
जे मी केले ते मी तुझ्यावरच्या प्रेमापोटी केले त्यामुळे त्याचा पाढा नाही वाचत आत्ता इकडे कारण "तसे करायला मी कुठे सांगीतले होते तूला?"
असे तू सहज बोलून नामानिराळा होशील,म्हणुन त्याची वाच्यता नाही करणार पण मी जे काही केले त्याबदल्यात  कधी काही अपेक्षा केली तुझ्याकडून ,सांग ना?"
निरपेक्ष भावनेने तुझी मदत करत राहीले पण त्याचे तू मला काय फळ दिलेस तर....... ....
रेवा अजुनही रागाने थरथरत होती.
सुशांतला एक शब्दही बोलू न देता तीच्या तोंडाचा पट्टा चालुच होता.
धाडधाड बंदुकीतून गोळ्या सुटाव्यात तशी ती सुशांतवर आपले वाऽगबाण सोडत होती.
सुशांतला सुचत नव्हते की हिला कसे शांत करावे.
सुशांतने कसलाही विचार न करता रेवाला घट्ट मिठी मारली.आपल्या हातांनी तिला पुर्णपणे बंदीस्त केले.रेवा त्याच्या हाताच्या विळख्यातून सुटण्याचा असहाय प्रयत्न करत होती.पण त्याच्या बळकट हातांच्या विळख्यातुन स्वत:ला सोडवणे तिला अशक्य होत होते.
दोन मिनीटानी ती शांत झाली पण डोळ्यातुन संततधार अश्रु वहायला लागले.ती रडतच मटकन खाली बसली.हातांनी आपला चेहरा झाकुन ती खूप वेळ रडत राहीली.
सुशांत हलकेच तिच्या जवळ गेला,आपल्या दोन हातांत 
रेवाचा चेहरा धरला आणि हनुवटीने  वर करतच तिला म्हणाला,रेवा माझ्याकडे बघ.
रेवाने मान उंचावुन त्याच्याकडे बघितले.
तिचे अश्रु काही केल्या थांबत नव्हते.
पुन्हा पुन्हा तेच प्रसंग डोळ्यासमोर नाचून तिला आठवण करून देत होते.
"काऽऽऽ? का केलेस असे?" 
"काय कमी राहीली होती रे माझ्या प्रेमात म्हणुन मला अशी वागणुक दिलीस?"
"तुझ्यासाठी तू म्हणला असतास ना तर तुझी हवी ती सेवा केली असती रे.अगदी रूमची झाडपुस पण केली असती मी, पण एकदा प्रेमाने आपुलकीने सांगुन तर बघायचे होतेस."
"पण फक्त सायली समोर मला कमी दाखवण्यासाठी असे वागायची काय गरज होती तूला?"
पुन्हा तिचे आश्रुंचे बांध अनावर झाले,गळा ऋद्ध झाला बोलता बोलता.
जणू शब्दच खुंटले होते.
सुशांतला समजत नव्हते की नेमकी कशी समजूत काढू हिची.
क्षणार्धात त्याने आपले ओठ  रेवाच्या ओठांवर टेकवले आणि तिच्या ओठांचे हलकेसे चुंबन घेतले.ह्याक्षणी तिच्या रागाला रोखण्याचा हा एकच पर्याय त्याला समोर दिसत होता त्यामुळे परीणामांची पर्वा न करता त्याने रेवाला घट्ट आलिंगन देत तिच्या कानात ते स्वर्गीय तीन अक्षरे कुजबुजला.
"आय लव्ह यु रेवाऽऽ."
"प्लिज मला माफ कर.मी खूप चुकलो तूला समजून घेण्यात आय अॅग्री,पण मी खरच तुझ्याशिवाय जगु शकत नाही गं."
"प्लिज शांत हो."

तिला काहीच समजत नव्हते की जे काय घडतेय ते काय घडतेय!
आपण स्वप्न बघतोय की हे सत्य आहे!
आणि मी हे का ऐकुन घेतीय.?
विचार करता करता ती थोडी शांत झाली.
आता थोडी भानावर येत तिने स्वत:ला सुशांत पासुन दूर करतच बोलली ,"सोड मला."
"मी सोडतो पण प्लिज मला एकदा बोलायची संधी दे?"
"काय बोलायचेय?"
"रेवा इथे बैस आधी."
"पाणी पी."
"रडून रडून चेहरा बघ किती काळवंडलाय."
"पुस ते डोळे."
रेवाने सुशांतने दिलेल्या पाण्याच्या बाटलीतले थोडे पाणी चेहऱ्यावर एक हलकासा हात फिरवुन उरलेले सगळे पाणी घटाघटा एका दमात संपवले.
ओरडून बोलण्याने तिचा गळा सुकला होता पण आता ती थोडी शांत झाली होती.
सुशांतने मग बोलायला सुरवात केली.
"रेवा,तूला खोटे वाटेल पण गेल्या कित्येक रात्री मी जागुन काढल्या आहेत."
जायच्या दिवशी तू भेटायला आली नाहीस तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती की तू नाराज तर नाहीएस ना माझ्यावर पण मग जेव्हा नगरच्या दहा/बारा दिवसाच्या वास्तव्यात तू एकदाही माझी चौकशी केली नाहीस की  फोन केला नाहीस तेव्हा उरलीसुरली खात्री पण पटली.

"माझी खूप इच्छा होती की तुझ्याशी बोलावे पण तुझ्या घरमालकांचा नंबरच नव्हता,इतर कुणालाही माहीत नव्हता म्हणुन गप्प राहीलो."
"इकडे आल्या दिवसापासुन बोलायचा प्रयत्न करतोय पण तू इतकी चिडली होतीस की सगळे संबंधच तोडून टाकलेस माझ्याशी, मग मी माझी बाजू मांडणार तरी  कशी?"
"पण देवाचीच इच्छा होती की मला बोलायला मिळावे म्हणुन कदाचित अचानकपणे आज तू इकडे आलीस,त्याचवेळी त्याला मधेच तोडत रेवा पुन्हा बोलली,
"मी इकडे स्वत:हुन आलेली नाहीये,मला उन्मेशने प्रोजेक्टबद्दल चर्चा करण्यासाठी इकडे बोलावले होते."
"आणि त्यानेच हे नाटक करून तूला इकडे पाठवलेय."
"मला सगळा प्लॅन कळलाय तुमचा.पण ठिक आहे तूला एकदा बोलायची संधी दिली नाही असा आरोप नको करायला कोणी म्हणुन ऐकुन घेतेय."
"आता पटापट बोल मी ऐकतीय."
"रेवाऽऽ,तेच सांगतोय ऐक तरी."
"तुला आठवतोय का तो दिवस, कॉलेजमधे परीक्षा चालू होती आणि मी तूला एक प्रश्न विचारला होता.?
"तु मागचे उकरून नको काढुस हं आता."रेवा रागानेच बोलली.
"मला बरेच काही आठवतेय पण तू ते सोयीस्कररित्या विसरलासच ना?"
"तू मुद्द्याचे बोल मला उशीर होतोय."शक्य तितक्या कठोरपणे रेवा बोलत होती.
"ओकेऽ ओके.."
मी तूला विचारले होते की काल रात्री मी तुझ्या कानात एक गोष्ट बोललो होतो ते तूला आठवतेय का,तर तू असा अविर्भाव केलास की तूला काहीच आठवत नाहीये.मग मी ही ठरवले की तुझे माझ्यावर प्रेम आहे का हे शोधुन काढायचे.पण कसे ते समजत नव्हते.मग मी हॉस्पीटल मधे अॅडमिट असताना आईसाठी म्हणुन सायली रोज भेटायला यायला लागली.मग माझ्या डोक्यात ह्या कल्पनेने जन्म घेतला.तूला जळवण्या करता मुद्दामहून मी सायली बरोबर जवळीक साधण्याचे नाटक केले.तेव्हा तुझा पडलेला उदास चेहरा मला दिसत होता पण मला वाटत होते की असे काहीतरी व्हावे की तू पेटून माझ्याशी भांडायला उठावे किंवा मला जाब विचारावास.म्हणुन तूझा सायली समोर मुद्दामहुन अपमान केला.मला वाटले होते तू चिडून संतापून मला वाट्टेल तसे बोलशील मग मी हळुच तुला जवळ घेऊन माझ्या प्रेमाची  कबुली देइन ज्याची तू माझ्याकडून ऐकाण्याची आतुरतेने वाट पहात होतीस.
पण माझ्या दुर्दैवाने तू चिडलीही नाहीस की भांडली ही नाहीस,तू तर मला कायमचे तुझ्या आयुष्यातुन वजाच करून टाकले.
आता सुशांतचे डोळेही ओलावले होते बोलता बोलता.
रेवा मी माझ्या आयुष्यात माझ्या आईनंतर जर कुणावर प्रेम केले असेल तर ती व्यक्ती तु आहेस.तू मला माझ्यासोबत आयुष्यभराकरता हवीएस.
मी वागलो तो माझा मार्ग कदाचित चुकला असेल पण माझ्या त्यामागच्या भावना खूप सच्च्या होत्या गं.
तुझ्या बाजुने तुही बरोबरच आहेस.
मी चुकलोय हेही मला कबुल आहे आणि त्याची तू म्हणशील ती शिक्षा भोगायलाही मी तयार आहे.
"माझे बोलुन झालेय रेवा."
"थ‌ँकयु व्हेरी मचऽ! तू माझे सगळे शांतपणे ऐकुन घेतलेस."
"आता तू तुझा निर्णय घ्यायला मोकळी आहेस."
"फक्त तुझा जो काही निर्णय असेल तो तू मला आत्ता इकडेच ऐकवून जा."
दोन मिनीट पुर्ण रूममधे शांतता पसरली.
कोणीच कुणाशी काहीच बोलत नव्हते.
रेवाने आपली सॅक उचलली.काही वस्तु राहील्या तर नाही ना हे चेक केले आणि निर्विकार चेहऱ्याने रूम बाहेर जायला निघाली.
सुशांत खूप अस्वस्थ झाला होता.
रेवा काहीही न बोलता तिकडून जायला निघाली होती आणि आता तिला थांबवायचे काही कारणही उरले नव्हते.
ती काहीतरी तर बोलेल म्हणुन तो वाट पहात होता पण ती न बोलताच बाहेर पडली.दार लोटून घेऊन ती गेलीय ही खात्री पटल्यावर मात्र सुशांतचा स्वत:वरचा ताबा सुटला आणि आपल्या बेडवर अंग टाकुन तो रडायला लागला.
रेवा आपल्या आयुष्यातुन कायमची दूर होतीय हा धक्का पचवणे त्याला सहनच होत नव्हते.तो तसाच अश्रुंना वाट देत पडून राहीला.दारावर अचानक पुन्हा टकटक झाली.
उन्मेश आला असेल समजून त्याने डोळे पुसुन झोपायचे नाटक केले.
तेवढ्यात कानाशी कुजबुज ऐकु आली,
"नाटक काय फक्त तुलाच करता येते का?"
"मलाही करता येते बर का!!"
आश्चर्याने त्याने कुस वळवुन बघितले आणि रेवाला जवळ बघुन त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.त्याने आनंदात रडवेल्या चेहऱ्यानेच रेवाला पुन्हा मिठी मारली.दोघेही रडत होते.फक्त ह्यावेळचे आश्रु आनंदाश्रु होते.
दोघेही बराचवेळ एकमेकांना बिलगून तसेच बसुन राहूले.
रेवाने मग हलकेच त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली,"खूप उशीर झालाय मला घरी सोडायला येतोस?"
अजुनही जे काही घडतेय ते सत्य आहे का ह्यावर सुशांतचा विश्वास बसत नव्हता.
एखादी जादु घडावी आणि क्षणार्धात सगळे एका सुंदर स्वप्नागत बदलुन जावे तसे काहीसे वाटत होते.
आपल्याच विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत सुशांतने स्वत:लाच चिमटा काढुन बघितला.खरच घडतेय ते खरे आहे ह्याची खात्री पटताच लगेच भानावर येऊन तो उठला.
झटकन बेडवरून उठुन कपडे ठिक करतच तो तिला सोडायला सोबत निघाला.
सुशांत गाडी चालवत होता आणि रेवा त्याला बिलगुन गाडीवर पाठीमागच्या सीटवर समाधानाने मान टाकुन त्याच्या अाश्वासक स्पर्शाचा आनंद घेत होती.
त्या स्पर्शात समाधान,प्रेम,आपुलकी, माया सगळे सगळे पुन्हा परत मिळाल्याचा आनंद स्वच्छ दिसत होता.
वाऱ्याने हवेत रूळणाऱ्या रेवाच्या केसांचा मानेवर होणारा मोहक स्पर्श सुशांतलाही सुखावत होता.
हा क्षण,ही रात्र इथेच थिजून जावी असेच दोघांनाही वाटत होते.
सगळे मळभ दूर होऊन रेवा-सुशांतचे नाते सोनेरी किनारीने सजले होते.
रात्रीचे आकाश चांदण्यांनी न्हाऊन निघाले होते.
त्या चांदणी प्रकाशात सुशांत-रेवाही पुन:श्च एकरूप झाले होते.
सगळे वातावरण आज खूप दिवसांनी सुगंधी सुगंधी झाले होते.
प्रेमाचा पारिजात पुन्हा बहरला होता
~~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश: 25)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..