Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 20

Read Later
घरकोन भाग 20

घरकोन -20
®©राधिका कुलकर्णी.

कालचा पुर्णवेळ आराम आणि औषधांचा एकत्रित परीणाम म्हणुन आज रेवाला बरे वाटत होते.
तापही उतरला होता आणि डोके दुखणे गरगरणे,अशक्तपणा सारख्या सर्व तक्रारी दूर झाल्या होत्या.
त्यामुळे रोजच्या वेळेत सगळे आवरून ती कॉलेजला निघाली.
कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापासुनच प्रत्येक जागोजागी असलेल्या तिच्या आणि सुशांतच्या आठवणींच्या खूणा तिला दिसायला लागल्या.
अगोदर ह्याच आठवणी मनोमन गुलाब फुलवत असत पण आज मात्र त्यातले काटे काळजाला घायाळ करत होते, रक्तबंबाळ करत होते.
माणसाच्या मनाला कटू आठवणी विसरायला एखादे बटण दिले असते तर किती बरे झाले असते ना?
मनाची कुतरओढ तरी थांबली असती.
कुणाबद्दल राग,लोभ,द्वेश अशा कुठल्याच भावना जागृतच झाल्या नसत्या तर हे जग जगायला किती सुंदर झाले असते ना अजून?
पण इंग्रजीत कुठेसे वाचलेले एक वाक्य आठवले
"Broken is beautiful and sometimes its better than new.
Wound is the place where light enters you.
So more or less all are broken and enlighten And so shd be treasured."

किती खरे होते ना हे.
कुठेतरी काहीतरी तुटते,माणसाला वेदना होते तेव्हाच माणुस घडायची प्रक्रीया सुरू होते.
प्रेमभंग होतो तेव्हा प्रेमात वहावत जायचे नाही तर अजून मनाने खंबीर बनायचे ही शिकवण मिळते.माणुस पारखायला शिकतो आपण.दु:ख नसते,वेदना नसती तर मनुष्याला खऱ्या जगाची ओळख तरी कशी पटली असती.
चुकांमधुनच माणुस शिकतो आणि घडतोही म्हणुनच तर देवानी जगात दु:खाची निर्मिती केली नसेल ना?
कटू आठवणीतून आपण आपल्या बुद्धीला विचारांना अजून जास्त परीपक्व करायला शिकतो.
स्वत:च स्वत:ला योग्यायोग्यतेच्या तराजूत जोखायला शिकतो. एखाद्या कटू प्रसंगातून गुजरल्या शिवाय आपल्या भोवतीचे जग किती फसवे आहे,माणसे कशी मृगजळ आहेत हा साक्षात्कार कधीच घडला नसता नाही का!!!
देवा तू जे काही केलेस ते बरेच केलेस आणि जे काही घडलेय ते माझ्या भल्यासाठीच घडले आहे.
आता मी ह्या गोष्टींचा विचार निगेटीव्ह नाहीतर पॉझीटीव्हलीच करणार.
थँक्यू देवा तू मला वेळेत सावरलेस.
मला योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी दिलीस.
कायम असाच माझ्या पाठिशी रहा.
मला आता तुझ्या आधाराची फार गरज आहे देवा.

आपल्या मनाशी स्वगत करता करता कधी ती वर्गापर्यंत पोहोचली तिचे तिलाच कळले नाही.पण आता मात्र ती खूप सावरल्यागत वाटत होती.
वर्गातली सुशांतची नेहमीची जागा रीकामी बघून दोन क्षण तिला वाईट वाटले पण पून्हा स्वत:ला स्थिर करत ती आपल्या डेस्क वर जाऊन बसली.
पुर्ण वर्गात तिला सायली कुठेच दिसली नाही.
सरांनी वर्गात प्रवेश केला होता त्यामुळे ह्या गोष्टीचा 
फारसा विचार न करता तिने लक्ष सरांवर केंद्रीत केले.
दोन तिन दिवसांपासुनच्या सर्व असाईनमेंट्स कमप्लिट करायच्या राहील्या होत्या तेही काम होतेच.
क्लास अवर्स नंतर ती लगेच लायब्ररीत गेली.लायब्ररीत नोट्स काढण्यासाठीचा तिचा आणि सुशचा ठरलेला टेबल असायचा.तिकडे जाताच पून्हा तिच्या आठवणींनी डोक वर काढलं.कसेबसे स्वत:ला सावरत तीने टेबल बदलून असाईनमेंट्स कमप्लिशनच्या कामात स्वत:ला गुंतवुन घेतले.
गेले दोन दिवस झाले तरी सायलीचा कॉलेजमधे पत्ताच नव्हता.
आता मात्र ही गोष्ट तिला प्रामुख्याने खटकली की सुशांत गेला तेव्हापासून ही पण गायब आहे म्हणजे दोघे एकत्रच नसतील ना गेले नगरला?
नाहीतरी तिचे आईवडीलही नगरलाच असतात,काय सांगावे गेलीही असेल.

हा विचार डोक्यात आला आणि पुन्हा रेवाची घालमेल सुरू झाली.
जोपर्यंत सत्य जाणून घेणार नाही तोपर्यंत तिला स्वस्थता लाभणारच नव्हती.

सायलीची रूममेट योगायोगाने समोरून येत होती.
हिला नक्की माहित असणार असा विचार करत औपचारिक स्माईल देऊन तिला विश करून
बोलता बोलता रेवाने सहजच तिला विचारले,
"काय ग,कालपासून सायली दिसत नाहीये?"
"बरे नाहीये का तिला?"
त्यावर मैत्रिणीने तेच सांगीतले जे रेवाच्या डोक्यात मगापासून घोळत होते.

खरेतर सायलीचे वडील नगरला डिस्ट्रिक्ट जज्ज होते.
त्यामुळे सायलीने रीक्वेस्ट करून त्यांना कार अरेंज करायला सांगीतली होती.त्यांच्या ओळखीमुळेच इतक्या कमी वेळेत कारची सोय होऊ शकली होती.
आता तिच्या वडिलांच्याच मदतीने जायची सोय झाली म्हणुन  घरापर्यंत सोबत आहे तर जाऊन यावे म्हणुन तिही नगरला गेली असे मैत्रिणीच्या वृत्तकथनातून समजले.

एकुण काय तर सायली आणि सुशांत एकत्र होते हा रेवाचा अंदाज तंतोतंत बरोबर निघाला होता त्यामुळे मन पुन्हा जरासे नाराज आणि खट्टू झाले होते.
सगळ्या गोष्टी ठरवून कोणीतरी डाव साधत असल्यागत घडत होत्या.

मन कितीही घट्ट करायचे म्हणले तरीही राहून राहून त्याच्या सोबत घालवलेले कित्येक हळुवार क्षण तिला हे सत्य पचवू देण्यात असमर्थ बनवत होते.

डोळ्यात अश्रुंनी केलेली दाटीवाटी बळजबरीनेच पापण्यांच्या गजाआड थोपवत रेवा स्वत:ला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.

दिवसामागून दिवस जात होते.
हळुहळू त्याच्या नसण्याचीही तिला सवय व्हायला लागली होती.
तो कॉलेजमधे अनुपस्थित होता हे तिच्यासाठी वरदानच होते कारण त्याच्या नसणाऱ्या काळात तिला त्याला आपल्या आयुष्यातून हळुहळू कमी करण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी दिलेला ग्रेस पिरीयडच आहे असे ती समजत होती.

तो समोर असता तर इतके स्थितप्रज्ञ वागणे कदाचित तिला जमले नसते आणि आपल्या मनाच्या कमकुवत पणाची तिला स्वत:लाच किव आली असती.
अशा वेळी जर वेळीच सावरले नाहीतर मनुष्य नैराश्येचा खोल दरीत स्वत:च स्वत:ला ढकलून देतो तसे काहीसे रेवाचेही घडले असते.

त्यामुळे सुशांतचे नसणे म्हणजे "Blessings in disguise"
असेच काहीसे रेवाला वाटत होते.

आता थोडीशी सावरत गोष्टींना जसे आहे तसे अॅक्सेप्ट करून पूढे चालायचे इतपत तरी रेवाने मनाची तयारी केली होती.

हे सगळे आत्ता सुशांत समोर नव्हता म्हणुन तिला सोप्प वाटत होत तरीही भविष्यात तो पुन्हा समोर आल्यावर ती इतकेच स्थितप्रज्ञ वागू शकेल का ह्यावर मात्र तिचे मन अजुनही  साशंकच होते.
हिच खरी परीक्षेची घडी होती.
भविष्यात काय वाढुन ठेवलेय हे दोघांनाही कुठे माहीत होते.

अपेक्षित घटना न घडणे आणि अनपेक्षित घटना अचानक सामोरी येणे ह्या खेळालाच तर जीवन म्हणतात ना...!

पडतील त्या फाशांप्रमाणे जीवनाच्या सारीपाटावर डाव खेळत जायचा एवढेच तर नियतीने दोघांच्या पानात वाढुन ठेवले होते. 

आता नियतीने मांडलेला हा डाव कसा रंगतोय हेच बघणे बाकी होते......
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -20
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन कथा आवडतेय की नाही?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..