Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 16

Read Later
घरकोन भाग 16

घरकोन-16
©राधिका कुलकर्णी.

सकाळी रेवा रोजच्यापेक्षा लवकरच सगळे आटोपुन कॉलेज करता निघाली, जाताना वाटेवरच हॉस्पीटलला सुशांतला भेटुन पूढे जायचे असे ठरवुनच बाहेर पडली.
सकाळी साडेसात आठ ची साधारण वेळ.
रेवा रूमवर पोहोचली.तेव्हा नर्स आणि डॉक्टर राऊंडवर आले होते.त्याच्या डाएट आणि इतर मेडिसिन्स बद्दल काकुंना समजावून सांगत होते.अजून किमान दोन दिवस तरी त्याला हॉस्पीटल मधेच रहावे लागणार होते.
पण सगळ्यात आश्चर्याची बाब ही होती की एवढ्या सकाळीच सायलीही तिकडे आलेली होती.काकुंच्या बाजूलाच उभे राहुन डॉक्टरांच्या सर्व इनस्ट्रक्शन्स काकुंना पून्हा समजावून सांगत होती.
मी निरोप न देताच ही इकडे कशी काय पोहोचली हेच मला कोडे पडले होते.
डॉक्टर तिथुन बाहेर गेल्यावर आम्ही एकमेकींना औपचारिक हाय/हॅलो केले.
मग मीच न राहवून विचारले," अगऽऽ इतक्या सकाळी इकडे कशी तू?"
त्यावर सायली काही बोलणार इतक्यात काकुच बोलल्या,"अग,काल रात्री सुशांतचे हॉस्टेलचे मित्र आले होते ना मी त्यांना सांगितले होते.त्यांनीच तिला कळवला माझा निरोप.म्हणुन सकाळी सकाळीच आली ती.
अग तूला माहित नसेल पण ही आणि सुशांत लहानपणा पासुन एकाच शाळेत शिकलेत.
मला माहित होते की ती पण इकडेच सुशांतच्याच कॉलेजमधे शिकतीय म्हणुन सहज भेटायला बोलावे म्हणुन बोलावले ग."
मी शांतपणे ऐकुन घेतले कारण मला तसा सायलीचा काहीच प्रॉब्लेम नव्हताच.आम्ही तशा चांगल्या मैत्रिणीही होतो पण ती नेहमी जेव्हा केव्हा संधी मिळायची माझ्या सुशांतच्या मैत्री बद्दल एकच बोलायची, " फार आरोगण्ट आहे हं तो,संभाळून रहा त्याच्यापासुन.त्याला फार गुर्मी आहे त्याच्या हुषारीची.स्वत:ला जरा जास्तच शहाणा समजतो.तो फक्त तूला त्याच्या अडचणीत वापरून घेतोय.तू सावध रहा.
मी तर त्याच्या वाऱ्याला फिरकत नाही बघतेस ना तू.इति सायली.
सायली असे का बोलायची ते माहीत नाही पण दोघांमधे सतत एक शीतयुद्ध चालू असायचे.
सायली दाते म्हणजे जरा शिष्ठ प्रकरण.
नावाप्रमाणे दिसायला जरी नाजूक ,सुंदर असली तरी स्वभाव अगदी नावा रूपाच्या विपरीत होता.
अभ्यासात ती ही हुशारच होती.दोघेही शाळेत असताना हुशारच होते.दरवर्षी वर्गात पहिला नंबर दोघांचा ठरलेला.
पण जसे आठवीत आले क्लास रिशेफलींगमधे हुशार मुलांची एक बॅच केली त्यात दोघेही एकाच वर्गात आले.
सुशांतच्या वर्गात हिची एन्ट्री तर झाली पण त्यानंतर ती कधीच पहिला नंबर मिळवू शकली नाही म्हणुन तिचा सतत सुशांतवर राग असायचा.त्याला कसे खाली पाडून आपण जास्त मार्क्स मिळवू ह्या रस्सीखेच मधे ती स्वत:च स्वत:ला रेसच्या घोड्यासारखी दामटायची पण कितीही प्रयत्न करूनही ती दुसऱ्याच नंबरवर असायची.
फक्त एकदाच असे झाले की दहावीचे महत्त्वाचे वर्ष म्हणुन सुशांतने सर्व इतर विविध गुणदर्शन स्पर्धांमधे नाव दिले नव्हते.तीने मात्र भाग घेतला.आता हा नाही म्हणजे सर्व वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत हिचाच नंबर येणार हे कनफर्म होते.
पण सरांना जेव्हा कळले की सुशांतने भाग नाही घतलाय ते तडक घरी येवून त्याच्या वडिलांसमोर रागावले.
मग नाईलाजाने त्याने भाग घेऊन एका रात्रीत वादविवाद विषयावर मुद्दे काढून दुसऱ्या दिवशी स्पर्धेत भाग घेतला.फक्त एका रात्रीच्या तयारीतही त्याचा दुसरा क्रमांक आला.
अर्थातच सायलीचा पहिला नंबर आला.
पण त्याला हिणवण्या करता ती मद्दाम त्याच्या घरी जावून त्याला पेढे देवून म्हणाली बघ माझा पहिला नंबर आलाय आणि मी तूला हरवलेय.
हा किस्सा असाच सहज विषय निघाला कधीतरी तेव्हा सुशांतनेच सांगितलेला मला आठवत होता.
सायलीही मधेच कधी कधी शाळेत मी त्याला स्पर्धेत नेहमी हरवायचे असे सांगुन आपल्या हुशारीचा तोरा मिरवायची.
हेच कारण होते की तिने पुढे प्रत्येक वेळी त्याच कॉलेजला अॅडमिशन घेतली जिथे-जिथे सुशांतने घेतली.
बारावीत दोघेही थोड्याफार मार्कांच्या फरकानेच मागेपूढे होते.
सुशांतने तेव्हाही कॉलेजमधे टॉप केले आणि इकडेही दरवर्षी तोच टॉप करत होता.तिची सुशांतला हरवायची मनिषा अजुनही अपुर्णच राहीली होती म्हणुनच ती त्याच्यावर सतत जेलस असायची फक्त पूर्वी बालीशपणाने वागायची ते इथे वागत नव्हती एवढाच काय तो फरक.खरेतर ती सुशांत बद्दल तो तिच्या हुशारीवर जळतो असे सांगायची पण सत्य हे होते की सायलीच सुशांतच्या प्रत्येक गोष्टीवर विनाकारण जळजळ करायची.त्याच्या मनात कधीच कुणाबद्दल कुठलाही आकस नव्हता.
पण ही मात्र संधी मिळाली की त्याच्याबद्दल वाईट बोलणे मुळीच सोडत नव्हती.
तर ह्या अशा सगळ्या पार्श्वभूमीकडे पाहता तिचे ईकडे इतक्या सकाळी भेटायला येणे ह्यात नक्कीच काहीतरी छूपा अजेंडा असण्याची मला दाट शंका येत होती.
सध्यातरी कोणत्याही निष्कर्षा पर्यंत पोहचणे खुपच घाईचे झाले असते म्हणुन मी माझ्या विचारांना तात्पुरती मुठमाती दिली.
सुशांतला सध्यातरी बेडवरच सर्व क्रिया कराव्या लागत होत्या. त्याला सक्तीचा आरामच होता.जास्त काही बोलण्यासारखी वेळ ही नव्हती आणि तशी संधीही मिळणे शक्य नव्हते.
मी आपली दुर बसुनच सगळे पहात होते.सायली काकुंशी जास्तच प्रेमाने बोलत होती जणू ती आणि सुशांत किती चांगले मित्र आहेत असेच भासवत होती.
काल मीच आणलेले सफरचंद काकुंना कापून खायला घालून काकुंना इम्प्रेस करू पहात होती.
तेवढ्यात नर्सने सुशांत करता लिक्वीड ज्युस आणला.
काकू त्याला तो देण्यासाठी उठतच होत्या की तीने काकुंना अडवले," तुम्ही बसा काकू,मी देते त्याला.
तूम्ही फळ खा."
ती लगेच उठली.
सुशांतचा बेड जरा वर सरकवून त्याला चमच्याने ज्युस पाजवला.
सुशांत एका डोळ्यातून तिरपा कटाक्ष टाकत माझ्याकडे बघतच निमुटपणे तिच्या हाताने ज्युस पित होता.मला काय होतेय हे समजत नव्हते पण फार वेळ ते दृश्य बघणेही मला सहन होणारे नव्हते.
उगीच आपली चीडचीड होण्यापेक्षा इकडून निघालेलेच बरे असा विचार करतच मी काकुंना सांगुन निघाले.
"अग थांब ना,तू आणि सायली सोबतच जा."
काकू बोलल्या.
पण त्यावर सायली लगेच बोलली,"काकू मी थोड्यावेळ थांबेन अजून."
"तूम्ही एकट्या आहात ना.मी थांबते.तिला जाऊदे."
आता ह्यावर काही बोलण्या सारखे उरलेच नव्हते.
मी न बोलताच तिकडून पाय काढता घेतला.
डोकं प्रचंड गरगरत होते.
काहीच समजत नव्हते की नेमके आपल्या आसपास काय घडतेय आणि का?
लोक इतके डिप्लोमॅटीकली कसे काय वागू शकतात.?
जी सायली सुशांतला नावे ठेवायची एक संधी सोडत नाही ती आज एकदम फिल्मी गरीब गाईसारखी इतकी परोपकारी कशी काय वागतेय हे न उलगडणारे कोडेच होते माझ्यासाठी.
का ह्या संधीचा फायदा घेऊन सुशांतच्या मनात आपल्याविषयी सॉफ्ट कॉर्नर निर्माण करण्याचा तिचा डाव होता देवच जाणे.
कारण सुशांत जितका हुशार होता ते पाहता शेमडं पोरगही सांगू शकत होते की त्याचे फ्युचर किती ब्राईट असणार आहे.
त्यामुळे ह्यानिमित्ताने त्याच्या मनात स्वत:विषयी जागा निर्माण करून हळुहळू काकुंच्या भोळ्या स्वभावाला जिंकुन त्याच्या आयुष्यात प्रवेश करायचा तर तिचा डाव नव्हता ना!!
आता मात्र ह्या विचारांनी नकळत मी थोडी हादरले.

आपल्या सुशांतच्या जीवनातली जागा कोणी घेऊ पहातोय ह्या नुसत्या विचारांनी तीला थरथरायला झाले.
आज कॉलेजला जाऊच नये असे वाटत होते पण सुशचे कॉलेज बुडतेय म्हणजे त्याला नोट्स मिळाव्यात म्हणुन तरी लायब्ररीत जाणे तिला भागच होते.
नाईलाजानेच ती कॉलेजला पोहोचली.
लायब्ररीच्या शांत वातावरणात मन एकाग्र करण्याचा असफल प्रयत्न करत नोट्स काढायला सुरवात केली.
संध्याकाळी जाताना आजचा सगळा कॉलेज वृत्तांत सुशला सांगायचा हा विचार करतच तीने पुस्तकात डोके खुपसले.
~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:-16)
©राधिका कुलकर्णी.

~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:16)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही??
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..