Sep 22, 2020
कथामालिका

घरकोन भाग 14

Read Later
घरकोन भाग 14

घरकोन-14
©राधिका कुलकर्णी.

तो दिवस होता आणि आजचा दिवस,अख्खे कॉलेज संपायला आले पण ह्याने पुन्हा म्हणुन त्या विषयावर काही चर्चा केली असेल किंवा इतकी महत्त्वाची गोष्ट मी ऐकलीच नाही ह्या गोष्टीची तडफड,तगमग,घालमेल काहीच त्याच्या कडून व्यक्त होत नव्हते.
पुरूष खरच कसे इतके निर्दयी कठोर वागू शकतात ह्याचेच आश्चर्य वाटत होते सुशला बघून.तो खरचच भावनाशुन्य आहे की भावनाच नसल्याचे नाटक करतोय हे ही समजत नव्हते.
बर मीही स्वत:हून विचारू शकत नव्हते की तू त्यादिवशी काय बोलला ते सांग.कारण नाटक मीच केले होते ना ऐकले नसल्याचे.
खूप चीडचीड आणि स्वत:चाच राग करत होते.मार्ग काही केल्या सुचत नव्हता काय करू म्हणजे हा व्यक्त होईल.
शेवटी नियतीच्या मनात आहे तरी काय?खरचच का सुशांतला ह्या नात्याची जवाबदारी नकोय म्हणून तोही काहीच न बोलणे पसंत करतोय?काहीच समजत नव्हते.
परीक्षा संपल्यावर तो घरी जायला निघाला.आईला भेटण्यासाठी खूपच आतुर होता.
सगळेच जण सुट्ट्या साठी आपापल्या घरी गेले.मी ही गेले.
घरी गेले तरी मनापासुन घरी असण्याचा आनंदही घेऊ शकत नव्हते.माझे असुन नसणे आज्जीला मात्र जाणवले.
रात्री घरी असले की मी आज्जी सोबतच झोपायचे.आज्जी हळुवार हातांनी केसात तेल लावायची.
तिचा हात म्हणजे मऊ रेशीम स्पर्श.
पण ह्यावेळी मी मात्र तिच्या स्पर्शानेही सुखावत नव्हते.मी सुशांतला मिस करत होते पण कुणाला बोलूही शकत नव्हते.तिकडे तो माझी आठवण करत असेल का की आईच्या सहवासात मला विसरला असेल?अनेक प्रश्न मनात छळत होते.आज्जी अचानक एक वाक्य बोलली आणि मी चमकले.
"बेटा कभीकभी गैरजरूरी सोचना सेहत के लिए जादा हानीकारक होता है."
"जो जैसा है उसे उसी हाल पर छोडकर आगे बढने मे ही समझदारी होती है बेटा."
"चल अब सोचना बंद कर और दिमाख को आराम दे."
ती काय बोलली,का बोलली आणि कोणत्या संदर्भात बोलली हे मला कळले नाही पण माझे मन मात्र तिला वाचता येतेय हे पाहून मी जास्त दचकले.
माझे धर्माबाहेरचे प्रेम घरचे,विशेषत: आज्जीला स्वीकार्य होईल का?
तीनेच जर आधार दिला नाही तर घरात माझी बाजू कोण घेईल?
आणि सगळ्यात महत्त्वाची बाब तर अजुन अनिश्चितच होती.ज्या व्यक्तीबद्दल मी एवढा विचार करतेय तो ह्यापैकी काहीतरी विचार करतोय की नाही?की फक्त एक जिवलग मैत्रिण इथपर्यंतच आमच्या नात्याची दोर बांधलीय परमेश्वराने.
डोळे बंद होते तरी मेंदू विचार करायचा थांबत नव्हता.
कधी एकदा सुट्ट्या संपून  कॉलेजला परततेय असे झालेले.घरी आल्यापासुन सगळा संपर्क बंदच झाला होता.सुशांतच्या घरी लँडफोन होता तरीही फोन तोच उचलेल की कोणी अजून ह्या भीतीने फोनही करायची हिम्मत होत नव्हती.
पत्र लिहीण्याचा तर प्रश्नच नव्हता.
मी एकटीच उदास चेहऱ्याने खिडकीत बसलेली बघुन आज्जी जवळ आली.
बेटा चल मेरे साथ पास ही के मंदिर लेके जाओगी?
मुझसे अकेले जाना अब नही होता.
मी निमुटपणे आज्जीला मंदिरात घेऊन गेले.
दर्शन घेतले आणि एका झाडाच्या भोवती पारावर दोघीही टेकलो.मी शांतच होते.
आज्जीने लगेच एक प्रश्न केला ज्यामुळे मी पुरती हादरले.
बेटाऽऽऽ,कौन है वो, उसका नाम तो बता?
आता माझी भीतीने पुरती गाळण उडाली होती.
काय बोलावे,आज्जीला खरच सगळे बोलावे का ह्यावर मनात द्वंद्व सुरू झाले.
मी काहीच बोलत नाही पाहून आज्जीने पुन्हा विचारले.
मै कुछ पुंछ रही हुँ बेटा जवाब दो.
मैने तुम्हे भगवान के घर इसिलिए लाया है की तुम मुझे सिर्फ सच ही बताओ.
आता माझा माझ्यावर ताबा राहीला नव्हता.मी आज्जीच्या कुशीत शिरून रडायला लागले.
थोडावेळ गेला रडून थोडी शांत झाल्यावर आज्जीला सुशांत बद्दल  सगळे खरे-खरे सांगुन टाकले.
हेही सांगितले की ह्या सर्व भावना सध्यातरी फक्त एकतर्फीच आहेत त्याने ह्या प्रेमाची अजुनही कोणतीच कबुली दिलेली नाहीये.
आज्जीने सर्व शांतपणे ऐकुन घेतले आणि जी वाक्ये बोलली त्यामुळे मी खूप स्थिर झाले नंतर.

आज्जी हेच बोलली की जोपर्यंत सत्य काय आहे कळत नाही तोवर संयम राखणे हाच उत्तम उपाय असतो.
"अगर सचमे उसके दिल मे कुछ है तो वो वक्त आनेपर सब बता देगा, तबतक थोडा धैर्य रखो."
"जल्दबाजी मे लिए गये फैसले अक्सर गलत नतीजे पर ही पहोचते है।"
"सब्र का फल हमेशा मिठा ही होता है।"

"इसलिए थोडा सब्र करो बेटा,यु उदास रहोगी तो घर मे सब को पता चल जाएगा."
"फिर तुम्हे तो पता है तुम्हारे माँ-बाप क्या करेंगे?"
"इसलिए जबतक यहाँ हो खुश रहो मेरी बच्ची।"
आज्जी च्या धीर देण्याने मीही खूप सावरले.निदान आज्जी तरी माझ्या ह्या निर्णयात पुढे कदाचित माझ्या बाजुने उभी राहील ही आशा निर्माण झाल्याने मी त्यातल्या त्यात सुखावले होते.
म्हणता म्हणता सुट्टी संपली आणि पून्हा सगळेच कॉलेजला आले.
सुशांतही भेटला.
आईची तब्येत आता बरी होती त्यामुळे सुश खूप आनंदी दिसत होता.
मी आता आज्जीच्या सांगण्यानुसार डोक्यातुन सर्व विषय़ बाजूला ठेवून सध्यातरी फक्त अभ्यास आणि आम्ही फक्त चांगले मित्र इतकाच विचार ठेऊन वागायचे ठरवले होते.
तसेही त्याच्या मनात काय आहे हे कळेपर्यंत माझ्या भावनांना काय किंमत होती??
दिवस असेच पुढे सरकत होते.
नेहमी प्रमाणे कॉलेजमधे सुश दिसला नाही म्हणुन त्याच्या एका रूममेटला मी चौकशी केली तेव्हा कळले की रात्री अचानक त्याच्या पोटात पुन्हा दुखायला लागले म्हणून त्याला इथल्याच एका हॉस्पीटल मधे अॅडमिट केलेय.
त्याच्या घरूनही कोणीतरी येतेय मग बहुतेक इकडेच ऑपरेशन होईल.
बापरेऽऽऽ! मला तर काहीच माहीच नाही.
"चलतोस का आपण भेटुन येवू त्याला?"
"अग,मी रात्रभर सोबतच होतो.आत्ताच आलोय कॉलेजला."
"मी आता संध्याकाळी जाईऩ‍."
"बर मग पटकन नाव सांग ना मीच जाऊन येते हस्पीटलला."
"श्रीसाई हॉस्पीटल" मार्केट जवळचे.तिथेच अॅडमीट आहे.
रूम नंबर काय?
"काल तर जागा नव्हती म्हणुन जनरल वॉर्डमधेच ठेवून घेतले होते.,आता सकाळी रूम अॅलॉट करतील."
तिच्या मनात प्रचंड कालवाकालव होत होती.त्याच्याजवळ आत्ता कोणीच नव्हते आणि मला हे माहीतही नाही.
तीने घाईतच युटर्न घेत गाडी मार्केटकडे वळवली.जाताना त्याला  फळं खरेदी करून ती वेगाने हॉस्पीटलकडे निघाली.
ती पोहोचली तेव्हा नुकतेच त्याचे काका आणि आई तिकडे येवून पोहोचले होते.
काकांनी बाकीच्या फॉर्मॅलिटीज कम्प्लिट केल्या.
सध्या त्याला सलाईन मधुन पेनकीलर दिले असावे.थोडा ग्लानीतच वाटत होता.मला बघुन त्याच्या चेहऱ्यावर एक आळखीचेे स्मित झळकले.
त्याची आई काळजीयुक्त चेहऱ्याने त्याच्या बाजूला बसली होती.
मला बघुन त्यांना कोणीतरी आपल्या मुलाच्या आेळखीतले आहे ह्या नजरेने जरा हायसे वाटले.
नविन अनोळखी गावात कोणीच ओळखीचे नाही अशा ठिकाणी आता गरज पडली तर कुणाला बोलायचे ही सगळी काळजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

मग मीच आेळख करून दिली त्याची कॉलेजातली मैत्रीण म्हणुन.थोड्यावेळ गप्पा मारल्यावर त्या जराशा मोकळ्या झाल्या आणि मग स्वत:हुन बोलायला लागल्या.
मलाही मनातून खूपच छान वाटत होते.
हॉस्पीटलच्या बेडवर पडल्या पडल्या आम्ही गप्पा मारतोय,आईपण माझ्याशी गप्पांमधे रमल्या आहेत हे सुशांत टिपत होता.
डॉक्टरांनी सर्व आवश्यक मेडीकल टेस्ट्स करून संध्याकाळी ऑपरेशनची वेळ ठरवली.
एव्हाना त्यांना स्पेशल रूम अॅलॉट झाली होती त्यामुळे काकू आता रुम मधे त्याच्या सोबत राहू शकणार होत्या.
तरीही त्या मला निघताना पुन्हा ये ग पोरी,नाहीतर मला फार एकट एकट वाटेल,ये वेळ मिळाला की असे अधिकृत भेटायला येण्याचा परवानाच देत होत्या जणू.
मग थोडावेळ बसून मी तडक कॉलेजला गेले.

ह्यावेळी मात्र मनावरून एक ताण कमी झाला होता.
आईच्या भेटीने नात्यांची नवी विण विणली जात होती.आता ही एकातएक गुंफलेली नात्यांची विण कोणत्या नवीन नात्याला आकार देऊ पहात होती हेच बघणे बाकी होते.
सब्र का ये इम्तेहान सच मे बहोत ही रोमांचक मोड ले रहा था।
~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:- 14)
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग?घरकोन आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

Circle Image

Radhika Kulkarni

Writer

I am Radhika Kulkarni. Am BSc MA BEd. Previously was a teacher but now homemaker. I have hobby of reading and writing. Listening music is my hobby . I like to make friends..I have written so many poems stories in marathi and some poems in Hindi also ...please read my stories and follow the blog..