घरची गरीबी म्हटलं की डोळ्यासमोर झोपडी येते.पण तस नाही झोपडीत राहणारेच गरीब असतात अस नाही.मध्यवगीय कुटुंबातही गरीबी असते माझं माहेर पण मध्यवगीय कुटुंब आई भांडे कामाला जायची वडिल फक्त नावाला होते.
घराच लक्ष्य हे आईलाच ठेवायला लागत.माझी आई अडाणी होती तीला खुप इच्छा होती आम्हाला शिकवायची.भांडे काम करून आईने आम्हाला शाळेत टाकले तेव्हा तर शाळेत फी भरायला पण पैसे नव्हते.
आईने मँडमला सगळी परिस्थिती सांगितली मग मँडमने पण मोठया मनाने आम्हाला शाळेत घेतले.मी आणि ताई शाळेत जाऊ लागलो. शाळा म्हटल कि खर्च येतोच. शाळेत आम्ही हुशार होतो.पण सगळ्या गोष्टींना काटकसर करावी लागायची.
मी आणि माझी ताई एकाच पेन्सिलचे दोन तुकडे करून विभागून घ्यायचो. हिवाळ्यात शाळेत असताना जेव्हा बुट घालायचे असायचे तेव्हा पण आम्ही दोघी ते मिळून वापरायचं.वेणी बांधायला लागणारी रेबिन सुद्धा आम्ही मिळुन वापरल्या आहेत. पुढे ताई आठवीपर्यंत शिकली आणि तिचा साखरपुडा झाला. तिच्या प्रत्येक वस्तू नंतर मला भेटल्या. परंतु मिळुन वापरायच्या सवयीने पुढे त्या गोष्टी मी एकटीने वापरल्याच नाहित. पुढे वर्षाने ताई लग्न करून सासरी गेली.
काही वर्षांत आमची आर्थिक परिस्थिती सुधारली पण माझी आणि ताईची काटकसरीची सवय मात्र अजूनही कायम आहे. मी हट्ट करून कॉलेज मध्ये गेले आणि जेमतेम चार वर्षे पूर्ण केली शेवटचा वर्ष राहिला. त्याच वेळी माझेही लग्न झाले.
अजुनही आम्ही आमच्या गत आठवणी आमच्या पोरांना सांगत असतो. तेही ती गोष्ट मनापासून ऐकून घेतात. आईने खुप मेहनत करुन आम्हाला शिकवले म्हणून मी आज हा लेख लिहु शकले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा