घरटं भाग 6

Story Of
ईरा जलद कथा मालिका
कथेचं नाव_ घरटं
भाग _6

सासर्याचे ऐकून लक्ष्याने आपली जमीन सासर्याच्या घश्यात घातली आणि त्याची गुंडगिरी करायला शहरात निघून गेला. सोबत बायको मालती ही होतीच त्यामुळे मुंबईत सासर्याने एक प्लॅट घेऊन दिला त्या घराची रक्कम तो गावाकडची लक्ष्याच्या मालमत्तेची विक्री करून भरणार होता.
रामाच्या लहान मुलाने आपले शिक्षण पूर्ण करून तिथल्याच गोऱ्या मुलीशी संसार थाटला हे त्याने पांडू च्या कानावर घातले होते पांडूला त्याचा इतका विलक्षण राग आला होता की तो जर समोर असता तर त्याला फोडून काढले असते त्याच्यामुळे कर्जात त्याची जमीन गेली.घरावर सुद्धा बँकेने वॉरंट काढले पण घराचा एक वासा किती कष्टाने उभा केला होता आई बाबांनी आई तर नाही पणं बाबां असताना त्याच्या डोळ्यादेखत घराचा वासा पाडायचा पांडूच्या जीवावर आलं होत.
पांडूची आवस्था शेवंतीला पाहवत नव्हती तिने आपल्या अंगावरचे सगळे दागदागिने आपल्या आईचे काही दागिने जे तिच्या बाबाने तिला दिलं होत घरी ती एकटीच मुलगी असल्याने बाबाच्या इस्टेस्टीची तीच तर खरी वारसदार होती. त्यामुळे तिच्या बाबांनी तिच्या नावावर सगळ केलं होत …पांडू आणि शेवंतीने जवळ साठवलेली सगळी पुंजी घरासाठी ओतली.. आणि एकदाचे घर आपल्या ताब्यात घेतलं.कारण त्या घरासाठी मायबापाचा घामाचा एक एक थेंब म्हणजेच त्यांच्यासाठी हिरा होता…
आई बापाचं कष्ट पांडूने जवळून पाहिलं होत.म्हणून तर घरच्या वाटण्या होताना त्याच्या डोळ्यात पाणी होत.जे बाकी दोन्ही भावाच्या डोळ्यात काहीच दिसले नव्हते…अचानक रामाची तब्बेत बिघडली दवाखाने झाले सगळे जे जे उपाय होते ते सारे केले पणं व्यर्थ…
अखेरच्या क्षणी त्याला डोळ्यासमोर त्याची अर्धांगिनी दिसत होती…
"म्हाळसा…मी येतोय ग…"एकेक शब्द सावकाश तोंडातल्या तोंडात तो पुटपुटत होता.
"म्हाळसा…आपल घर….त्या…त्या…पो…रा.. नी
आप…ल्या…पो.. ट च्या पो.. रां.. नी…घा…न…व.. ट
टा क लं..ग..ल ई ..या…छ प…रा साठी…दि..नरा..त रा..ब..ली..स..हे…आ प लं..घ..र. ट आ..ज का.. य.. म ..च तू.. ट..ल…"येवढं बोलतानाही त्याला चांगलीच धाप लागली होती…शेवंती त्याला चमच्याने पाणी पाजत होती…अन् पांडू…त्याचे पाय चेपत होता.
अखेर जोराची कळ आली आणि त्याची प्राणज्योत मावळली कायमचीच…!

(आई बाप कष्टाने घरटं बांधतात त्या घरट्याचा जो प्रामाणिक पने सांभाळ करतो…त्याला जीवापाड जपतो तोच आई बापाचा खरा खुरा श्रावण बाळ…!)

समाप्त….
©® सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all