Login

घरटं भाग 5

Story Of
ईरा जलद कथा मालिका
कथेचे नाव _घरटं
भाग _5

दिवसेंदवस लक्ष्याची बायको मालती शेवंतीला खूपच त्रास देऊ लागली.एक दिवस पांडू जरा लवकरच शेतावरून घरी आला होता त्याच वेळी शेवंतीला मालती काही बाही टोमणे मारत होती आणि शेवंती रडत ते सहन करत होती. हे बघून पांडू च डोकं सटकले आपली बायको दिवसभर घरात राबराबते आणि ही काहीही काम न करता नुसते टोमणे मारते याचा पांडूला खूपच राग आला.
अश्यातच दोघा भावाभावात हाणामारी झाली आणि दोघांनी ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या वादात बिचारा रामा मुकाट्याने गप्प बसायचा म्हाळसा गेल्यापासून बिचारा खूप थकलेला तो त्यातच आजारी पडायचा म्हाळसा गेल्यापासून एक दिवस घरात शांती नव्हती.रोज मालती कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्ष्याच कान भरवून त्याला वाद घालायला लावायची पांडू खरेतर नाईलाजाने गप्प बसत असे.पणं लक्ष्या मात्र आपल्या सासर्याच ऐकून घरी वादाची ठिणगी पेटवत असे. लहान भाऊ अजुन शिकत असल्याने दोघात वाटणी होऊ शकत नव्हती गावातील पुढाऱ्यांनी तसा निर्णय दिला.एकदा तर कहरच झाला शेवंतीला दिवस गेले होते.आणि याच दरम्यान पांडू काही कामानिमित्त तालुक्याला गेला होता. मालतीने कसलेसे औषध तिच्या जेवणात टाकले आणि तीच बाळ गेलं.बिचारी रडून रडून बेजार झाली. मुल गेल्याने मालतीला इतका आनंद झाला होता की ती शेवंतीच दुःख न मानता पूर्वी पेक्षा जास्तच टोमणे देऊ लागली.आणि बिचारी शेवंती आसवांनी डबडबल्या डोळ्यांनी ते पचवू लागली.
असेच दिवसामागून दिवस जाऊ लागले रामाच्या लहान मुलाने परदेशी जाण्याचा हट्ट धरला.पणं जवळ पैसा नव्हता. रामाने शेतावर कर्ज काढून त्याला परदेशी पाठवायचा निर्णय घेतला.पणं लक्ष्याने याला कडकडीत विरोध केला. आम्हाला वाटणी करून दया त्याच्या हिश्यावर कर्ज काढून दया असा जणू चंगच बांधला.
रामाकडे आता कोणताच पर्याय नव्हता.मुलाला परदेशी पाठवायला गाठीला पुरेसा पैसा देखील नव्हता आता मात्र वाटणी करून देण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता.लहान मुलाने देखील आपण आपल्या वाटणीवर कर्ज काढून परदेशी जाईन आणि तिथं नोकरी करून मग आपले शेत घर कर्जमुक्त करेल अस सांगितल.त्यामुळे तिन्ही मुलाच्या वाटण्या झाल्या.एका घरात तीन चुली पेटल्या. रामाने मोठ्या मुलाकडे राहणे पसंत केलं.तर छोटा मुलगा आपल्या इस्टेटीवर कर्ज काढून परदेशी निघून गेला.

क्रमशः..
©® सविता पाटील रेडेकर
नेसरी

🎭 Series Post

View all