Jan 23, 2022
स्पर्धा

घरंदाज 2 (मराठी कथा:Marathi story)

Read Later
घरंदाज 2 (मराठी कथा:Marathi story)

आपण मागील भागात पाहिले की, अभि फक्त प्रियाकडे पाहत होता.. नंतर कॉलेजमध्ये त्या दोघांचा एका प्रोजेक्टसाठी ग्रुप बनवला होता.. प्रोजेक्टचे पॉईंटस् काढल्यावर एकमेकांना दाखवायचे होते.. पण प्रिया कॉलेजला आली नव्हती म्हणून तिच्या मैत्रिणीकडून तिचा नंबर घेऊन अभिने प्रियाला फोन केला.. पण तिने फोन उचलला नाही.. आता पुढे..

अभि वर्गात जाऊन बसला.. दोन लेक्चर झाले तरी प्रियाचा काही फोन आला नाही.. अभि थोडा नाराज झाला.. इतक्यात अभिचा फोन वाजला म्हणून त्याने खिशातून फोन काढून बघितला.. तर प्रियाचा फोन होता ते पाहून एकदम आनंदाने ओरडला.. आपण वर्गात आहोत याचेही त्याला भान राहिले नव्हते.. तो एकदम ओरडला.. सरांनी त्याला वर्गात उभा रहायला सांगितले..

"काय झाले?" सर

"काही नाही सर.. थोडं पोटात दुखत आहे.. मी बाहेर जाऊ का?" अभि

"बरं, ठीक आहे जा तुम्ही.." सर

अभि बाहेर जाऊन कॉल घेतो.. "हॅलो, कोण बोलतंय?" प्रिया

"हॅलो, मी अभि.." अभि

"बोल ना.. आणि तुझ्याकडे माझा नंबर कसा आला?" प्रिया

"तुझ्या मैत्रिणींकडून घेतला.." अभि

"बरं, बोल काय काम होतं?" प्रिया

"ते प्रोजेक्टचे पॉईंट्स दाखवायचे होते ना.. म्हणून तुला फोन केला होता.. कारण तू आज कॉलेजला आली नाहीस ना म्हणून.." अभि

"अरे हो.. आज घरी पाहुणे आले होते.. त्यामुळे मी कॉलेजला येऊ शकले नाही.." प्रिया

हे ऐकून अभिला एकदम धक्काच बसला.. तिला काही स्थळ बघायला वगैरे सुरू केली की काय? असे तो मनात म्हणाला.. "बरं ठीक आहे.. मग प्रोजेक्टचं कसं करायचं?." अभि

"हो ते करावं तर लागणारच.. आपण आज संध्याकाळी कॉफीशॉपमध्ये भेटुया काय?" प्रिया

"हो चालेल.." अभि एकदम खूश झाला.. आज पहिल्यांदा कुठेतरी बाहेर भेटणार? म्हणून त्याला खूप आनंद झाला.. त्या आनंदाच्या भरातच तो कॉलेज चुकवून घरी गेला.. घरी जाऊन मस्त फ्रेश होऊन संध्याकाळी कॉफीशॉपमध्ये प्रियाशी काय काय बोलायचे? याच विचारात तो गुंग होता.. संध्याकाळ झाली.. प्रियाने त्याला कॉफी शॉपचा पत्ता आणि किती वाजता भेटायचे याचा मेसेज केला होता.. बरोबर त्या टाइमिंगच्या आधी अभि जाऊन कॉफी शॉपमध्ये पोहोचला आणि प्रियाची वाट पाहू लागला.. प्रिया अजून आली नव्हती.. तिने दिलेली वेळ होऊन गेली तरी अजून प्रिया आली नाही.. प्रिया येईल की नाही.. वाटेत काही अडचण तर आली नसेल ना की, पाहुणे अजून गेले नसतील असे अनेक विचार अभिच्या मनात येऊन गेले..

इतक्यात समोरून पिंक कलरचा पंजाबी ड्रेस घालून येताना प्रिया दिसली.. त्या ड्रेसमध्ये प्रिया खूप सुंदर दिसत होती.. तिने कानामध्ये झुमके घातले होते आणि केसांना एक छोटीसी पिंक कलरची क्लचर लावली होती.. ती सिम्पल पण सुंदर दिसत होती.. अभि तर तिच्याकडेच पाहतच बसला.. प्रिया त्याच्या समोरच्या खुर्चीवर येऊन बसली.. तरी पण हा तिच्याकडे एकटक पाहतच होता.. प्रियाला काही समजेना..

"तुला येऊन खूप वेळ झाला का? सॉरी मला थोडा उशीर झाला.." प्रिया

"नाही नाही.. आत्ताच पाच मिनिटं झाली मी येऊन.." अभि

"मग प्रोजेक्ट विषयी बोलायचं का?" प्रिया

"आधी काॅफी तर ऑर्डर करू.. मग काय प्रोजेक्टचं आहेच बोलायला?" अभि

"बर ठीक आहे.." प्रिया हसतच म्हणाली

मग अभिने काॅफी ऑर्डर केली.. तोपर्यंत प्रियाने पॉईंट्स बघून घेतले..

दोघेही प्रोजेक्टबद्दल बोलत बसले.. प्रोजेक्टचे पाॅईंट काढून झाले.. मग कॉफी घेऊन दोघेही कॉफीशॉप म्हणून बाहेर पडले.. अभि प्रियाला मी तुला सोडायला येऊ का? म्हणून विचारतो.. प्रिया नको म्हणाली "माझी मी जाईन.."

"जाता जाता मी तुला सोडेन.. त्यात काय एवढं?" अभि

"अरे नको.. माझी मी रिक्षाने जाईन.. तू जा.." प्रिया

मग अभिने प्रियासाठी रिक्षा मागवली.. प्रिया रिक्षातून आणि अभि त्याच्या बाइकवरून दोघेही आपापल्या घरी निघून गेले.. अभिला रात्री झोपच येत नव्हती.. त्याला रात्री प्रियाच समोर दिसत होती.. आता काय करावे? म्हणून त्याने सहज गुड नाईट म्हणून प्रियाला मेसेज टाकला आणि फोन बाजूला ठेवला.. इतक्यात मॅसेजची ट्युन वाजली.. कोणाचा मेसेज असेल? म्हणून अभिने फोन बघितला.. तर प्रियाचा मेसेज होता.. गुड नाईटचा.. तो मेसेज बघून अभिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तो त्या स्वप्न पहातच झोपी गेला..

सकाळी उठल्यावर त्याने फोन घेतला आणि गुड मॉर्निंग म्हणून प्रियाला मेसेज केला आणि तो नेहमीप्रमाणे त्याचे आवरायला गेला.. आज कॉलेजमध्ये त्यांच्या प्रोजेक्ट विषयी थोडक्यात माहिती सांगायची होती.. म्हणजे आत्तापर्यंत काय काम केले? याची माहिती द्यायची होती.. म्हणून त्याला लवकर काॅलेजला जायचे होते.. पण नेमके आजच त्याला कॉलेजला जायला थोडा उशीर झाला.. नेहमीप्रमाणे कट्ट्यावर न बसता तो डायरेक्ट वर्गातच जाऊन बसला.. कारण तो कॉलेजमध्ये जाईपर्यंत बेल झाली होती..

कॉलेजमध्ये त्यांनी प्रोजेक्ट विषयी काय काय माहिती गोळा केली? ते सांगितले आणि आता फायनली त्यांनी प्रोजेक्ट बनवायला सुरूवात केली..

हळूहळू त्यांचा प्रोजेक्ट पुढे पुढे जात होता.. प्रोजेक्ट करता करता त्यांचे बरेचसे बोलणे होई आणि आता तर काय? नंबर मिळालाय म्हटल्यावर फोनवर मेसेज, चॅटिंग, फोन कॉल्स सगळं काही सुरु झालं.. प्रोजेक्ट जसे करत गेले तस तशी त्यांची मैत्री देखील वाढत गेली आणि त्या मैत्रीचे प्रेमात कधी रुपांतर झाले हे त्यांचे त्यांना देखील कळले नाही.. सुरुवातीपासूनच त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की कोणी तिसऱ्याने काही येऊन सांगितले तरी त्यांचा त्यावर विश्वास बसणार नाही.. इतकी त्यांची मैत्री घट्ट झाली होती.. प्रेम ही होते पण फक्त मनातच.. एकमेकांना कधी त्यांनी बोलून दाखवले देखील नाही..

शेवटी प्रोजेक्टची फायनल डेट आली.. त्या दिवशी प्रोजेक्ट सबमिट करायचा होता.. त्यांचे बरेचसे काम झाले होते.. आता फक्त सजेशन आणि फीडबॅक इतकंच बाकी होतं.. त्यामुळे या दोघांनाही काहीच टेन्शन नव्हते.. प्रोजेक्ट पूर्ण टाईप करून झाला.. प्रिंट आउट काढून झाले.. आता प्रोजेक्ट बायडिंगसाठी दिले.. एकदा का प्रोजेक्ट बायडिंग करून झाला आणि सबमिट केला म्हणजे झालं...

एकदा का प्रोजेक्ट सबमिट केला की प्रिया माझ्यासोबत वेळ घालवणार नाही आणि माझ्याशी बोलेल की नाही हे देखील माहित नाही.. प्रोजेक्टच्या निमित्ताने का होईना? आम्ही बाहेर भेटायचो, बोलायचो.. पण आता प्रोजेक्ट सबमिशननंतर ती फक्त कॉलेजमध्येच मला भेटणार.. म्हणून अभिला खूप वाईट वाटू लागले.. त्याआधी आपण तिला प्रपोज करावे असे त्याच्या मनात येऊ लागले..

आता फायनल प्रोजेक्ट सबमिट देखील झाला.. अभिला खूप वाईट वाटू लागले.. कारण प्रोजेक्ट संपला की तिच्याशी बोलता येणार नाही.. बोललो तरी ती आधीसारखी बोलेल की नाही काय माहित? म्हणून त्याने प्रियाला एक छोटीशी पार्टी द्यायचे ठरवले आणि त्याने प्रियाला फोन केला.. "हॅलो प्रिया, आपण आज संध्याकाळी बाहेर जाऊया का?" अभि

"काही विशेष आहे का?" प्रिया

"विशेष असं काही नाही ग.. आपला प्रोजेक्ट आत्ताच व्यवस्थित पूर्ण झालाय.. आता यानंतर परिक्षा झाली की सुट्या लागणार.. मग भेटता येणार नाही म्हणून आत्ताच जाऊ या म्हणतोय.. तुला काही अडचण असेल तर नंतर बघू.." अभी

"अरे, अडचण काही नाही.. चालेल मला.. भेटू आपण.." प्रिया

"नक्की ना.." अभि

"हो नक्कीच.." प्रिया

अभि संध्याकाळी प्रियाला बाहेर बोलावून नेऊन तिला प्रपोज करायच्या तयारीला लागला.. तिच्याशी कसे बोलायचे? विषय कसा सुरु करायचा? आणि प्रपोज कसे करायचे? या तो तयारीला लागला होता.. कोणता ड्रेस घालायचा? पासून ते तिथे जाताना बुके घेऊ की फुलं याचा तो विचार करत बसला आणि त्याच विचारात त्याचा सगळा दिवस निघून गेला..

तो इतकी सगळी तयारी करत असला तरी देखील त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती की, प्रिया हो म्हणेल की नाही.. जर तिचा नकार असेल तर आमची मैत्री सुद्धा मी गमावून बसेन.. पण जर होकार असेल तर बेस्टच आहे.. नकार मिळेल म्हणून तिला प्रपोज केले नाही तर पुढे पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.. म्हणून विचारायलाच हवे.. बघू काय होते ते? असे म्हणून अभि तयारीला लागला..

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..