Login

घटस्फोट;सुरवात प्रेमाची-25

Gh
नीर तिथे उठत, "शीखी मॅडम.. समिधाचे कोणीच रिलेटिव्ह नाही.. ती तिच्या आई-वडिलांना एकुलती एक होती... आणि तिच्या लग्ना अगोदर म्हणजे तीन वर्षांपूर्वीच त्यांचा एक्सीडेंट मध्ये मृत्यू झाला.."
एसीपी विश्वास- तर आपल्याला त्याच्या एक्स-हजबंडला ही बाब कळवायला पाहिजे, कसा ही असो, त्याला तिच्याबद्दल थोडं का होईना काळजी तर असेलच ना.... शेवटी नवरा आहे तो."

शीखी क्षणभरासाठी नीरला बघते; तिला कालची घटना आठवते, "काल ती हतबलपणे नीरसमोर तिला हे लग्न करायचं नाही.. हे म्हणत होती आणि नीर नेही तिच्या मनासारखाच केलं.

कावेरी उठत, सर तुम्ही बरोबर बोलताय... ऍटलिस्ट माणुसकी म्हणून का होईना तो तिच्याशी परत एकदा संपर्क करायचा प्रयत्न करेल...

रश्मी- सर प्रॅक्टिकली विचार केला तर त्याला खरंच माणुसकी असती किंवा तिच्याबद्दल थोडी जरी काळजी असती... तर त्याने तिला घटस्फोट दिला असता...?
नाही सर....सर, जे नातं तूटत ते नातं... परत कधीच जोडू शकत नाही आणि ते नवरा बायको परत कधी एकत्र होऊच शकत नाही...

रश्मी प्रॅक्टिकल बोलत होती;पण त्यामुळे का कोणास ठाऊक नीर आणि शीखी दोघेही दुखावले गेले...

नीर क्षणभरासाठी शीखीला बघतो;नेमकी शीखीची ही नीरवर नजर जाते..

एसीपी विश्वास- ओके रश्मी! तर आपण हातावर हात धरून बसायचं?

रश्मी- सर, मी हे सुद्धा नाही म्हणत, सर आपण समाजाचे भाग आहोत.. समाजाप्रती आपली जबाबदारी आहे.. त्यामुळे आपण स्वतःहून.. तिला योग्य ती ट्रीटमेंट दिली तर जमेल ना?"
एसीपी विश्वास- ठीक आहे.. मी त्यासाठी सोशल वर्कर सोबत कॉन्टॅक्ट करेल.
पण आपल्या टार्गेटचं काय... कोणाला काही कळालं का, यादरम्यान समीधाच्या आसपास कोणी अनोळखी व्यक्ती येत आहे का?
शीखी- सर, अनोळखी व्यक्ती येण्यासाठी समिधा बाहेर तरी पडायला हवी.. ती गेल्या महिनाभरापासून घराच्या बाहेर पडली सुद्धा नाही.. तेवढी ती मेड येते आणि ती सुद्धा आठ दिवसाला... आणि ती तिचे काम करून निघून जाते.

सेशन चालू होतं.. इतक्यात एसीपी विश्वासला त्यांच्या ऑफिसरचा कॉल येतो , हॅलो...हा बोला... काय.. कधी.. अच्छा.. सिटी पोलीस स्टेशन करतात...ओके ठीक आहे... पण ती नेमकी सुसाईड आहे का, मर्डर... काय सुसाईडच आहे.. मला ताबडतोब तिथे सगळे रिपोर्ट हवे...

एसीपी विश्वास फोनवर बोलत होते, सगळे ऑफिसर एकमेकांना बघतात त्यानंतर  एसीपी विश्वास कॉल ठेवताच,

इन्स्पेक्टर शर्मा- सर, कोणाबद्दलची ही बॅड न्यूज आहे?
एसीपी विश्वास- इन्स्पेक्टर शर्मा, आपल्याला समिधापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यास उशीर झाला... तिने काल रात्रीच सुसाईड केली...

शीखी गहिवरून उठत," काय सर, समिधाने सुसाईड केली?....


अचानकपणे तिच्या गालावरती अश्रू वघळले.
नीरला माहीत होतं का त्याची शीखी भावनिक आहे, तो," विश्वास सर,, जे झालं ते वाईट झालं; आपण यामध्ये काहीच करू शकत नाही...

एसीपी विश्वास- युवर राईट ऑफिसर! आपण समिधाच्या आत्मिक शांततेसाठी दोन मिनिटांचा मौन पाळूया,
सगळे तिला आत्मिक शांतता लाभावी यासाठी मौन पाळतात....

थोड्यावेळाने एसीपी विश्वास- आजच सेशन इथेच संपवू, संध्याकाळच्या सेशनला परत जमुया...कारण त्या कीलरची पुढची टार्गेट कोण आहे आणि त्या सिरीयल किलर चा मागोवा, आपल्याकडे हेच मेन टार्गेट आहे...

सर्व ऑफिसर कामासाठी निघून जातात, त्यानंतर शीखी सुद्धा तिच्या कामासाठी आली.. पण तिचं मनच लागत नव्हतं...त्यात समिधा सोबत ती प्रत्यक्ष बोलली,
त्यामुळे तिची मानसिक अवस्था माहित असूनही ती तिच्यासाठी काही करू शकली नाही... याची तिला मनात खंत होती.

त्यामुळे शीखी तीन वाजताच तिच्या रूम मध्ये आली. ती खाली कॉल करत, "माझ्यासाठी एक कप कॉफी हवी आहे."
शीखीच मन कशातच लागत नव्हतं. त्यामुळे ती रात्री जेवणासाठी ही आली नव्हती.

रात्री विराज ओरडत होता, "तो इन्स्पेक्टर शर्माला कॉल करत, "सर, एक तर तुमच्या ऑफिसर वेळेअवेळी काहीही मागवतात....त्यानंतर आम्ही केलेल्या स्वयंपाक तसाच राहतो... त्या शीखी मॅडम... नाही असं दोन-तीन वेळेस झालं...

नीर विराजचे बोलणं ऐकतो, त्यानंतर तो त्याच्या रूममध्ये येतो.. त्याला माहित होतं,  कोणी सुसाईड केलं अथवा कोणाची अन एक्सेप्टेड डेथ झाली तर शीखी भावना विवष होते.

इकडे शीखीला एकट्यातही करमत नव्हतं...आता तिला त्या एकटेपणाची भीती वाटत होती... त्यामुळे ती फिरवण्यासाठी बाहेर निघते.
नेमकं नीर हे सगळं बघतो.. नीरच प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं शीखीच्या काळजीपोटी
तोही ड्रेस चढवून तिच्या मागे मागे येतो.

हॉलमध्ये असलेल्या विराज हे सगळं बघत होता.. तो नकारार्थी मान हलवत
"शीखी, तू किती हुशार आहेस ना, नीरला परत स्वतःत कसं गुंतवावं याची चांगलीच शिकवण घेऊन आलीस...पण मी तूझा मनसुबा कधीच पूर्ण होऊ देणार नाही "

शीखी थंडगार वाऱ्यात चालत होती, त्यानंतर ती मागे वळून बघत, तिला तिच्या सोबत कोणतरी आहे याची चाहूल लागली... त्यामुळे ती मागे वळून बघते नंतर परत पावले समोर टाकत  जात होते...

ती एका झाडाच्या शेजारी आली, तिथे उभे राहून ती बोटाने झाडाच्या खोडी सोबत हरकत करत होती, ती मागे वळून बघत,"प्लीज नीर, मला माहित आहे हा तूच आहेस.."
नीर दुसऱ्या झाडाच्या बाजूने तिच्यासमोर येत," काय मूर्खपणा आहे हा.. रात्री बारा साडेबाराला पिंपळाच्या झाडाखाली कोणी येता का?"

नीर बघतो का शीखीचे डोळे पाणावले.. तो तिचा हात पकडत तिला मिठीत घेतो..
शीखी सुद्धा काय होतं हे न समजता त्याच्या मिठीत रडत होती,
शीखी- नीर...मी तिच्यासाठी काहीच करू शकले नाही, मला फार गील्टी वाटतय....

नीर- शीखी, तिचा हा आजार तिला गेल्या दोन वर्षापासून होता, नेमकं तिच्या शेवटच्या दिवशी तिची आणि तुझी भेट झाली आणि मला खात्री आहे, इंटरव्यू करताना... तू नक्की तिला बोलायचा, समजून सांगायचा प्रयत्न केला असशील...

शीखी- "मी खरच तिला माझ्या परीने समजवायचा प्रयत्न करत होते, पण मी ऑब्जर करत होते का, तिच कशातच लक्ष नव्हतं.. ना माझ्या बोलण्यात, ना माझ्या प्रश्नात.. तुला माहित आहे, नीर... मी तिला प्रश्न विचारायच्या अगोदरच ती बोलत होती...ती स्वत: काय बोलत होती हे तिचं तिला सुद्धा भान नव्हतं फक्त एवढं कळत होतं का, ती तिच्या मनात जे येत होतं, ते बोलत होती.....

नीर - ती तिची शेवटची इच्छा होती, तिला माणसांची गरज होती, तिला तिच्या मनातल्या वेदना कोणालातरी बोलून दाखवायचा होत्या... देवाने तिला तीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुला साधन म्हणून पाठवलं...
उलट विचार कर तिने तिच्या मनातल्या भावना तुला बोलवून दाखवल्या त्यामुळे मेल्यानंतर तरी तिच्या आत्म्याला शांतता भेटेल..
शीखी- मला तिच्या बोलण्यावरून एवढेच कळत होतं का, ती या डिवोर्स मुळे खूप खचली,
असं का होतं नीर, आपण ज्यावर प्रेम करतो... त्याच्यापासूनच आपल्याला का दूर राहावं लागतं, वाद एवढा मोठा का होतो का प्रेमासारख्या सुंदर नाजूक भावनेला तो समुळ नष्ट करतो?

नीर-" प्लीज, शीखी, मला माहित आहे...का तू खूप हळवी आहेस, तू तिच्या सुसाईडचा एवढ मनाला लावू नकोस.... जे झालं ते अगदी अकल्पित होतं. आपण या फिल्डमध्ये आहोत, तर आपल्याला असल्या घटनांना सामोरे जावंच लागणार आहे....
शीखी- नीर, मला अजूनही कोणी सुसाईड केलं ना, तेवढाच त्रास होतो...
त्यामुळे सुसाईडचे केस मध्ये मी शक्यतो अडकतच नाही.

नीर - अडकू ही नको, समिधाच्या अवतीभोवतीच जे काही काम मिळालं, ते मला सांग...मी स्वतः ते काम करेल; पण तू या गोष्टीपासून स्वतःला अव्हॉइड कर.

शीखी होकारार्थी मान हलवत होती...
आज त्या थंडगार वाऱ्यात नीर शीखीला समजावत होता... आणि प्रेमाच्या छोट्याशा अंकुराने आणि इगो नावाच्या मोठ्या वटवृक्षाला समुळ नष्ट करण्यासाठी जन्म घेतला....