गहरी चाल भाग -१

एक रहस्य कथा

कथेचे नाव - गहरी चाल

विषय- रहस्य कथा

फेरी - राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा

©®चंद्रकांत घाटाळ

पालघर जिल्हा


आजपर्यंत आपण अनेक शूरवीरांच्या-विरांगणाच्या कथा ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी जीवाचे बलिदान दिले व इतिहासात अजरामर झाले. आज मी तुम्हांला अश्याच एका विरांगणाची कहाणी सांगणार आहे, जिने आपल्या बुद्धिकौशल्य व अद्भुत पराक्रमाने तिच्या मातृभूमीला विजयी केले. तीची कथा ऐकून आपल्यालाही तिचा अभिमान वाटेल. चला तर मग तिच्या रहस्यमय व अद्भुत पराक्रम गाथेला सुरुवात करु.


ही आधुनिक काळातील कथा आहे. जिथे बोन आणि पूलोन नावाचे दोन देश आहेत. हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर विरोधी. यात पूलोन देश हा विस्ताराने अतिशय मोठा आणि तिथे बोगी या एकाच धर्माची लोकवस्ती होती. हा देश धर्मवेडा म्हणून प्रसिद्धीस आला. जगात सगळ्या देशांमध्ये बोगी धर्माचा प्रसार व्हावा आणि सगळ्या लोकांनी बोगी धर्म स्वीकारावा यासाठी पूलोन देश नेहमी प्रयत्नशील असे.

पूलोन देशाच्या तुलनेत बोन देश विस्ताराने फारच लहान आणि या देशात सर्वच धर्माची लोकं रहात. त्यात बोगी लोकांचीही संख्या लक्षणीय आणि त्यात बहुतेक लोकं देशप्रेमी होती. मात्र काही लोकं पैसा व बोगी धर्मासाठी आपल्याच बोन देशाशी गद्दारी करत. पूलोन देश अश्या लोकांचा चांगलाच वापर करून घेई.

या दोन देशांचा इतिहास म्हणजे हे दोन्ही देश आधी एकत्र होते तेव्हा या देशाचे नाव पूबोन असे होते. मात्र धार्मिक तिड्यामुळे पूबोन देशाचे विभाजन झाले. त्यातुन पूलोन व बोन हे नवे देश तयार झाले. विभाजन झाल्यापासून हे देश एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. आत्तापर्यंत या देशांमध्ये तीन वेळा युद्ध झाली; मात्र बोन देश लहान असून निकराने लढला व आपला पराभव होऊ दिला नाही.


या दोन देशांमध्ये युद्धाचे कारण धार्मिक असले तरी मुख्य कारण वेगळेच होते ते म्हणजे विभागणीच्या वेळेस बोन देशाला मिळालेली चूकक आणि मोलीन ही दोन सुंदर आणि उपयोगी समुद्रीबेटे. या बेटांवर पूलोन देशाची नजर होती. त्यांना ती समुद्रीबेट लष्करीतळ उभारायला हवी होती. आपली समुद्रीबेटे वाचवण्यासाठी बोन देशाने आंतराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल केली होती पण त्यावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला होता. बोन देश काहीही झालं तरी दोन बेटे द्यायला तयार नव्हता, कारण त्या बेटांच महत्त्व त्यांना माहिती होतं.

पूलोन देश विस्ताराने तर मोठा होताच त्याचबरोबर विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यातही फार फार प्रगत होता. आजपर्यंत त्याने चंद्राचा अर्ध्याहून अधिक भाग कब्ज्यात केला होता. तिथे अनेक खाणी उभारून खनिज संपत्ती पृथ्वीवर आणली जाई. त्याचबरोबर मंगळ व गुरूचा उपग्रह युरोपावरदेखील पुलोनी वस्ती करून खनिज संपत्ती गोळा करत.

पूलोन देश आपल्या धर्मप्रसारासाठी व ती सुंदर बेट मिळवण्यासाठी अनेक आतंकी हल्ले बोन देशावर करी. त्यात अनेक निरपराध नागरिक मारले जात. बोन देशाला पूर्ण कल्पना असे की हे हल्ले पूलोन देश करतोय, पण पूलोन देश तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतका पुढे होता की, एकही पुरावा मागे ठेवत नसे. त्यामुळे बोन देशाचा नाईलाज होई. पूलोन देश आतंकी हल्ल्यासाठी प्रत्येकवेळेस नवनवीन शकला लढवी. बऱ्याचवेळा तर बोन देशातील बोगी धर्मीय लोकांचा पैसा किंवा इतर आमिषे देऊन उपयोग करीत.

या सगळ्याचा टप्प्या टप्प्याने विचार करत डॉ. करमोडा नेहमीप्रमाणे आपल्या प्रयोगशाळेत रीसर्च करत होते. आज त्यांच्या चेहऱ्यावर बरीचशी नाराजी दिसत होती. याचे कारण म्हणजे काल त्यांच्या बोन देशावर झालेला भ्याड आतंकी हल्ला. ज्यात ५२८ निरपराध लोकं मारली गेली. हा हल्ला पूलोन देशानेच केला आहे हे माहीत असूनही त्यांचा देश पुराव्याअभावी काहीच करु शकत नव्हता याचे त्यांना खूपच वाईट वाटत होते.

प्रयोगशाळेत रीसर्च करत असताना डॉ. करमोडा यांचा फोन वाजला. सरक्षणमंत्री लाईनवर होते. त्यांनी तातडीची मीटिंग लावली होती. त्यासाठी डॉ. करमोडा यांना बोलवले होते कारण डॉ. करमोडा हे बोन देशातील आघाडीच्या शास्त्रज्ञांपैकी एक होतेच त्याचबरोबर सुरक्षा समितीचे प्रमुख सल्लागार होते. निरोप मिळताच डॉक्टर संरक्षणमंत्रीच्या कार्यालयाकडे निघाले.

सरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात सभेसाठी देशाचे अध्यक्ष, लष्करप्रमुख व पोलीसप्रमुख अशी निवडक लोकं बोलावली होती.

सभेला सुरुवात झाली. विषय कालच्या आतंकवादी हल्ल्याचा आणि यापुढे हे हल्ले कसे रोखायचे? हाच होता. "आपण वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर आपल्या स्वातंत्र्यावर गदा येऊ शकते." असे संरक्षणमंत्री सुरुवातीलाच म्हणाले. यावर उपस्थित मान्यवरांनी आपआपल्या परीने उपाय सुचवले. डॉ. करमोडा मात्र शांतच होते. त्यामुळे अध्यक्षांनी त्यांचे मत विचारले. तेव्हा डॉ. करमोडा म्हणाले; "अध्यक्ष मोहोदय पूलोन देश आपल्या पेक्षा विस्ताराने, तंत्रज्ञानाने तसेच आर्थिक बाबतीत फार पुढे आहे. आपण कोणतीही योजना आखली तर त्यांची गुप्तचर यंत्रणा हाणून पाडते. कारण पूलोन देशात एका पेक्षा एक असे हुशार वैज्ञानिक आहेत. तेव्हा आपण काहीतरी अभिनव आणि अद्भुत अशी योजना तयार करु जेणेकरून पूलोन देशाला धडा शिकवता येईल. माझं एक महत्वाचे संशोधन अंतिम टप्यात आहे. काहीच परीक्षणे बाकी आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत ती पूर्ण होतील आणि मला आशा आहे की, या संशोधनाचा फायदा नक्कीच आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी होईल. त्यांच्या बोलण्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या व त्यांच्या संशोधनाला शुभेच्छा दिल्या.


तसंतर डॉ. करमोडा यांच्या संशोधनावर सगळ्यांचा विश्वास होता कारण आजपर्यंत असे अनेक शोध त्यांनी लावले होते ज्याचा फायदा देशाच्या सुरक्षेसाठी झाला होता. आत्ताच काही दिवसांपूर्वी जो पूंग्ग नावाचा उपग्रह सोडला होता त्याचे संपूर्ण डिझाइन डॉ. करमोडा यांनी केले होते. ज्या उपग्रहाद्वारे पूलोन देशाच्या अनेक गुप्त हालचाली समजायला मदत होत होती. आत्तापर्यंत त्यांनी अनेक अंतराळ मोहिमात प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग घेतला होता. खासकरून धूमकेतू हा त्यांच्या अभ्यासाचा आवडीचा विषय होता. त्यांनी अनेक धूमकेतूचा अभ्यास केला होता. आपल्या देशातील अंतराळविरांकडून त्यांनी धूमकेतूतील अनेक पदार्थांचे नमुने मागवून त्यांवर डॉ. करमोडा यांचे संशोधन सुरु होते.


क्रमशः...

चंद्रकांत घाटाळ

(पालघर टिम )

कथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


©®चन्द्रकान्त घाटाळ
पालघर जिल्हाकथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


©®चन्द्रकान्त घाटाळ
पालघर जिल्हाकथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


©®चन्द्रकान्त घाटाळ
पालघर जिल्हाकथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


©®चन्द्रकान्त घाटाळ
पालघर जिल्हाकथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


©®चन्द्रकान्त घाटाळ
पालघर जिल्हाकथेचे नाव:- गहरी चाल
विषय:- रहस्य कथा
फेरी:-राज्यस्तरीय कथमालिका स्पर्धा


©®चन्द्रकान्त घाटाळ
पालघर जिल्हा