Nov 23, 2020
मनोरंजन

गौरी आणि खजिना (भाग-९)

Read Later
गौरी आणि खजिना (भाग-९)

      गौरी बोलणाऱ्या झाडांच्या रस्त्यापर्यंत येते. आजूबाजूला बघून ती त्या जंगलात प्रवेश करते. थोडं अंतर पुढे गेल्यावर एक झाड तिला पकडून ठेवत! आणि बोलतं; "इथून कोणी पुढे जाऊ शकत नाही आणि विशेषतः माणसं तर नाहीच नाही! तू इथे पारदर्शक फुलाच्या शोधात आली आहेस हे मला माहित आहे. इथून जर तुला पुढे जायचं असेल तर माझ्या तीन प्रश्नांची तुला उत्तरं द्यावी लागतील, जर तू चुकीचं उत्तर दिलंस तर मी तुला एका चेटकिणीच्या गुहेत फेकून देईन मग तुझं वाचणं अशक्यच!..... झाड पहिला प्रश्न विचारतं; असं काय आहे जे आंधळा पण बघू शकतो?" गौरी उत्तर देते, अंधार! आता झाड पुढचा प्रश्न विचारतं, "अशी कोणती जागा आहे जिथे गरीब आणि श्रीमंत दोघांना कटोरा घेऊन उभं राहावं लागतं?" गौरी उत्तर देते, पाणीपुरीचं दुकान! झाड गौरीला म्हणतं "तशी तू हुशार दिसतेस, बघू आता तू तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतेस कि चेटकिणीच्या गुहेत जातेस........ झाड प्रश्न विचारतं; एकदा एका घरात घरमालकीण रुपाली चा खून होतो, भर पावसात पोलीस घटनास्थळी येतात आणि तीन संशयितांची चौकशी सुरु होते; 

१. ऋत्विक (रुपाली चा नवरा):- मी तर कामाला गेलो होतो मला खुनाबद्दल काही माहित नाही आणि मी माझ्याच बायकोचा खून का करेन? 

२. माळी:- मी बागेत झाडांना पाणी घालत होतो.

३. कामवाली:- मी घराच्या वरच्या मजल्यावर साफसफाई करत होते मला नाही माहित हे कधी झालं. 

            आता सांग गौरी यात कोण आहे खुनी? पोलिसांनी कोणाला पकडलं असेल?" गौरी लगेच सांगते; माळी! कारण भर पावसात तो झाडांना पाणी का देईल? तो खोटं बोलतोय त्यानेच खून केलाय.... गौरीने सगळी बरोबर उत्तरं दिल्यावर झाड तिला सोडून देतं. गौरी चालत चालत पुढे येते आणि समोरच तिला पारदर्शक फुल दिसतं. अगदी डोळ्यांना दिपवून टाकेल असं ते चमकत रूप, सूर्यप्रकाशामुळे अजूनच उभारून येत होतं. पूर्ण झाडंच त्या फुलांनी बहरलं होत पण यातलं एकच फुल खरं आहे आणि बाकी सगळी फुलं डोळ्यांचा धोका.... गौरी नीट सगळी फुलं बघते त्यातल्या फक्त एकाच फुलाला वेगळी चमक आणि नितळ पाण्यासारखी पारदर्शकता होती आणि हे गौरीच्या नजरेतून सुटत नाही. ती ते फुल तोडते आणि नकाशावर ठेवते तसं नकाशातून प्रकाश निघतो, ते फुल नकाशात सामावत आणि नकाशा बदलतो..... 

         पुढचा टप्पा असतो काळ्या पानांचं फुल! इथे जाण्याचा रस्ता जात असतो एका विराण आणि नेहमी अंधार असणाऱ्या भागातून.... इथे फक्त भर दुपारी जेव्हा सूर्य डोक्यावर आला असतो तेव्हाच दोन मिनिटांसाठी थोडा उजेड येतो....  त्या मुळे काळ्या पानांचं फुल शोधणं इथे खूप अवघड होणार आहे..... 

       तुम्हाला काय वाटतंय.... गौरीला हे फुल मिळेल?..... कारण या वेळी तिला फार कमी वेळ मिळणार आहे फुल ओळखायला..... तुमचं मत comment करून नक्की सांगा....

Circle Image

Pratiksha Majgaonkar

Student

I like reading stories and poems... Also like to writting ... I have my small side business of handcraft. I make moti (pearl) toran, rangoli, paper earrings, cotton bags, artificial jewellery etc.