Oct 28, 2020
मनोरंजन

गौरी आणि खजिना (भाग-१)

Read Later
गौरी आणि खजिना (भाग-१)

     आज राज्यात सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. शौर्यपूर राज्य आज वेगळ्याच दिमाखात दिसत होतं. गौरी राज्यात पोहोचली आणि सगळा जल्लोष पहात होती. पण आपली अल्कापुरी ला राहणारी गौरी इथे आलीच कशी??? ...
     तर झालं असं होतं की, आज सकाळी गौरीला घराच्या दारात एक box मिळालं ज्यात एक चिठ्ठी आणि एक कागदाचा तुकडा होता. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, " या कागदाच्या तुकड्यावर एक नकाशा आहे जो तुला एका खजिन्या पर्यंत घेऊन जाईल, पण हा पूर्ण नकाशा नाहीये... तुला याचे वेग-वेगळे तुकडे शोधून जोडावे लागतील..... मग खजिना तुझाच. त्या कागदावर नकाशा तेव्हाच दिसायला लागेल जेव्हा तू शौर्यपूर राज्यात जाऊन तिथल्या जादुई नदीचं पाणी यावर शिंपडशील...."
        गौरी आता सगळा समारंभ पाहात होती. आज राजाचा वाढदिवस होता त्याचीच सगळी तयारी चालू होती. राजाचं दिमाखात आगमन झालं; प्रजेत उत्साहाचं वातावरण होतं. सगळ्यांनी राजाला शुभेच्छा दिल्या, आता राजा प्रजेच्या मागण्यांनुसार त्यांना प्रजेला दान देणार होता. कोणी नवीन कपडे तर कुणी धन  तर कुणी गुरे मागितली. आता शेवटी आपली गौरी बाकी होती राजाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " तू तर माझ्या राज्यातली दिसत नाहीस, तरीपण तू तुला काय हवं ते मागू शकतेस आज माझा वाढदिवस आहे मी कुणाला निराश करत नाही." त्यावर गौरी म्हणाली, "होय महाराज! मी अल्कापुरी ला राहते आणि जादुई नदीच्या शोधात इथपर्यंत आलीये, तरी आपण मला जादुई नदी पर्यंत जाण्याचा मार्ग सांगाल का?"
      
     तुम्हाला काय वाटतं राजा गौरीला मार्ग सांगेल? Comment मध्ये नक्की सांगा...
आणि हा पहिला भाग कसा वाटला हे सुद्धा सांग. आता गौरी ला जादुई नदीचं पाणी मिळेल कि नाही हे आपण पुढच्या भागात पाहूया...

Circle Image

Pratiksha Majgaonkar

Student

I like reading stories and poems... Also like to writting ... I have my small side business of handcraft. I make moti (pearl) toran, rangoli, paper earrings, cotton bags, artificial jewellery etc.