गौराई माझी लाडाची लाडाची ग

गौराई माझी लाडाची लाडाची ग

गोष्ट छोटी डोंगराएवढी


     गौराई माझी लाडाची लाडाची ग


गौराईला सवाष्ण म्हणून गेलेल्या प्रियाने गौराईला मागण मागितल .

" तु माहेरी मोठ्या कुटुंबात आली


तस मलाही मोठ कुटुंब दे. "

"मलाही रमायच मोठ्या कुटुंबात ,गोतावळ्यात ".


प्रियाने मनातच " तथास्तु " म्हटल
प्रियाने गहू, साडी , नारळ अशी छान गौराईची ओटी भरली , मनोभावे नमस्कार केला.

गौराई बरोबर छान साग्रसंगीत पाहुणचार केला आणि घरी आली.

सहजच फेसबुक बघत असतांना प्रियाला ईरावरच्या कथेचा एक भाग दिसला, खुप सुंदर असा तो भाग होता .ती पुर्ण कथा तीने वाचली . असा सुरु झाला ईरावर वाचनाचा कधी न थांबणारा प्रवास. या प्रवासात नकळत प्रिया कथेच्या लेखक , लेखिका ,वाचक वर्गाशी जोडली गेली.

कवितांच्या स्पर्धेत प्रियालाही लिहावस वाटल , तीने एक - दोनदा कविता लिहून पाठवल्या .

प्रियाला लिहावस वाटत होत पण ….
कस लिहायच …हे काही समजेना .

तेव्हा एक ग्रुप तिला दिसला " वाचकांडून लेखनाकडे " त्या ग्रुपला प्रिया जाँइन झाली .कस लिहायच याच थोड - थोड मार्गदर्शन प्रियाला मिळाल .

प्रिया लिहण्याचा प्रयत्न करत होती पण काय लिहाव हे काही सुचत नव्हत .

एका रात्री स्वप्नात प्रियाला " गौराई " दिसली .
गौराई प्रियाशी बोलायला लागली होती .

गौराई : " तु मला माझ्या सारख मोठ कुटुंब मागितल होत , बघ तुला ईराच्या सारख छान मोठ कुटुंब दिल आहे .त्यात छान वाचत रहा ,लिहत रहा. "

प्रिया : पण मला न काय लिहू तेच समजत नाही .

गौराई : "आनंद , वैचारिक ,कधी दुःखातुन बाहेर पडण , एखाद्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण ,तुझ्या मनातल्या कल्पना अस सुंदर लिहत रहा ."

सकाळी प्रिया उठली आणि तिला रात्रीच सुंदर स्वप्न आठवत होत .तीला खूप आनंद झाला होता .

गौराई जवळ सहज म्हणून मागितलेल मागण गौराईने ईरा कुटुंबाच्या रूपाने प्रियाला दिले होते .

प्रिया आज गाण गुणगुणत होती.

" गौराई माझी लाडाची लाडाची ग
ईरा माझी आवडीची आवडीची ग "