गाठोडे

In life we learn something or the other from the people we come across . someone is always teaching us a lesson ... Amongst those lessons the frisy is ' learning '.

मातीचा घडा

नमस्कार ईरा वासियों ...
काही चुकल तर नक्कीच सांगा !
त्यातून मी चांगला धडा घेईन म्हणजेच घडेन ...!
फार सुंदर विषय निवडलाय मी आज ...!
पुर्ण लिखाण वाचल्यावरच कमेंट द्या ...!
" एखाद्याला घडायला पुरेसा वेळ नको का द्यायला ? "
का नाही ...? द्यायलाच हवा ....!
आईच्या पोटातच शिकून कुणीही बाहेर पडत नाही ,
शरीर नऊ महीने घेतं बाळ घडवायसाठी ....
तर , जगात आल्यावर त्याची आई त्याला / तिला घडविते ,
जसा कुंभार आपल्या हाताने चाकावर मातीचा गोळा ठेऊन वेगवेगळ्या आकाराचे घडे घडवतो ...
तसेच सर्वप्रथम आई वडील आपल्या मुलांना घडवतात !
ही आपल्या जीवनातील पहीली पायरी असते घडण्याची , आपण आईवडीलांच्या मता प्रमाणे घडत असतो ,
पण त्यानंतर जसे आपण घरातून बाहेर पडतो ती दुसरी पायरी घडण्याची , आपली शाळा आपले गुरुजन ... आपल्याला घडवायचा प्रयत्न करतात ... त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण ही तिसरी पायरी आपल्या घडण्याची ... इथे आपल्याला ठोस दिशा मिळते ... विचार परिपक्कतेकडे वळतात ,
आपली आवड निवड काय ते कळत ...
काय करायला पाहीजे ते कळत ...
म्हणजेच आपण घडत असतो ...!
चवथी पायरी महाविद्यालया बाहेर पडल्यावर ,
डिग्री घेतल्यावर ... जेव्हा ऊन्हाच्या झळा लागतात कानाला ... वेगवेगळ्या कंपनीचे रिजेक्शन ... नोकरीसाठी कार्यालयाच्या येरझारा ... पायपीट ... तिर्‍हाईताचे टोमणे ... बोलणे ... आपल्याला सैरभैर करतात ... त्यातच आपल्या मेहनतीचं चीज होत ...
कुठे तरी आपण नोकरी व्यवसायात गुंततो ...
म्हणजेच घडत असतो ...!
पाचवी पायरी नोकरी , सरकारी असो वा खाजगी असो ... कार्यालयीन कामकाज ... वरिष्ठ आणि कनिष्ठांचा अनुभव आपल्याला घडवत असतो ...!
सहावी पायरी म्हणजे लग्नाचा बाजार ... हा बाजार पुन्हा एकदा तुम्हाला परिक्षेला बसवतो ... जो/जी मेरिट येईल ती / तो बाजी मारतो म्हणजे तिला / त्याला लाॅटरी लागते म्हणजेच हा बाजार ही तुम्हाला घडवतो ...!
सातवी पायरी खरी 20/20ची ... तुम्ही संसारात सिक्स / फोर मारायलाच पाहीजे ... नाहीतर बायको /आई वडील/नवरा /सासू सासर्‍यांच्या नजरेत तुमची विकेट पडली म्हणूनच समजा ...!
सातवी पायरी तुम्हाला लेकुरवाळे करते ... मग पुन्हा सुरु होतो आटापीटा घडण्याचा ... घडवण्याचा !
मुलांसमोर तुम्ही स्वतःला सुपर मॅन / सुपरवुमन बनून त्यांच्या पुढे प्रस्तुत व्हायचा प्रयत्न करता ... म्हणजेच तुम्ही स्वतःला घडवत असता ...!
आठवी पायरी कानामागून आलेले पिलं ... तुम्ही त्यांना घडवायच्या आधी ते ... तुम्ही कुठे घडायचे राहून गेले ...
हे सांगून तुम्हाला घडायला मदत करतात ...!
नववी पायरी तुमची सेवानिवृत्ती ... तुमच्या अनुभवाचा आठवणींचा घडा भरुन ... घरात हळूहळू पुन्हा रिता होत जातो ... म्हणजेच तुम्ही घडायला पुन्हा तयार असता ...! त्यानंतर दहावी पायरी तुमच्या जीवनात येणारी नवी /नवा आगंतूक सून / जावई तुम्हाला रिसायकलबीन मधे टाकून घडवीत असतात ... म्हणजेच तुम्ही आताही घडत असता ...! अकरावी पायरी ... तुम्हाला चरम आनंदाच्या शिखरावर चढवतात ... पुन्हा तुमच ह्रदय धडधडायला लागतं ... आनंदाच्या अथांग सागरात तुम्ही बुडून जाता ... म्हणजेच आपल्या नातवंडान सवे पुन्हा एकदा घडत असता ...!
तर असे आहे ... मी आता परिपक्क झालो ... झाले घडून सारे ... आता , बाकी काही नाही ! असे समजू नका .
{ हुश्श .... तुम्हाला श्वास घ्यायला मधे मी एकही फुलस्टाॅप दिला नाही ....! }
ओ .. बाई .... लय झाल ना माय ... किती आन काय काय घडवतं व माय ... दमफुस्स करुन टाकल त्या तर सार्‍याले ... आधीच त्या करोनान लोकायले बेजार केल ... पाठवत का वर ... तुया इरादा त तसाच दिसत हाय ... इथ कोनी का अस घडत असत येका दमात ... का कुंभाराचा घडा हाय का काय मातीचा ... टाकला चाकावर ... धा मिन्टात तयार ... सार आयुक्क्ष जा लागत माय घडन्यात मानुस हाये मानुस ... येळ तं द्या लागन ना त्याले ... घडा साटी ....!
' मायबाई माझं अंर्तरमन ' ... लाडकी फटाकडी ... सुरसुरी सारखी फुरफुरलीचं ... कानात ....!
हो आली आहे घरात रुळायला वेळ द्या ....
समजून घ्यायला आपल्या मनातले .. वेळ द्या ....
नाती गोती कळायला मला वेळ द्या ....
माझ्या मनात घर बसायला वेळ द्या ....
वरील घडण्याच्या सर्व घटना ह्या नैसर्गिक आहेत ....!
पण नैसर्गिक रित्या घडू देणार , ते मानव प्राणी कसले ....!
आपल्या जवळच्या प्रत्येक व्यक्तिला घडण्यासाठी वेळ द्या ....!
तो आजच तुमच्या मताप्रमाणे घडला पाहीजे ....
असा आततायीपणा करणे चुकीचे आहे ....!
तो जेव्हा अनुभव घेईल तेव्हाच तो घडेल ....!
बघा काही व्यक्ती अश्या असतात ... ज्यांना तुम्ही किती ही समजावून सांगितलेत ... तरी त्यांना त्यांचे बरे वाईट आणि भले कशात आहे ... हे कळत नाही ... मग तुमच्या आग्रहाने कलहा खेरीज दुसर काही ही होणार नाही ....!
ह्याचा अर्थ आईवडीलांनी घडवू नये असा होतो का ....?
नकळत्या वयात आपण मुलांना घडवतच असतो ...
पण जेव्हा तो /ती विचार करण्यालायक होतात तेव्हा आपण आपले विचार त्यांच्या गळी उतरविणे म्हणजे घडविणे नाही ... तर त्याला जबरदस्ती म्हणतात ... आणि जबरदस्तीने कुणीही घडत नाही ....!
आपल्या जवळ जे अनुभवाचे गाठोडे आहे त्याचा लाभ सगळ्यांना द्यावा ... होऊ शकतं त्यातून कुणी घडेल ....!
चोर , गुंडे , मवाली , मेसेंजर मधे अश्लील फोटो टाकणारे ... बलात्कारी , खुनी , फसवणारे , अपहार , काळा बाजारी करणारे ... ह्यांना आईवडीलांनी घडविले का ....?
अस्स म्हणायचं आहे का तुला ....?
नाही गं माय फटाकडी ... ही मंडळी घरातून बाहेर पडल्यावर कुणाच्या संगतीत राहणे पसंत करतात ... त्यावर अवलंबुन आहेत ह्या गोष्टी ... तिथे आईवडील घडवित नाही ... त्यांच त्यांनाच घडाव लागत ....!
माझ लिखाण ... साहित्यिक समुहांमुळे समृद्धीकडे वाटचाल करत आहे ... आणि ह्या संवादामुळे अधिक समृद्ध होत आहे ... म्हणजे मी घडत आहे ....!
मनस्ताप करुन घेऊन गोळ्या वाढवून घेतल्या पेक्षा ... थोडा संयम ठेवुन ... काळावर सोपवूया ऊर्वरीत जीवन ... म्हणजे अजूनही घडण्याची क्रिया सुरुच आहे ....!

संगीता अनंत थोरात
05/09/2021