गाठ प्रेमाची ही कधी न सुटणारी

गाठ प्रेमाची ही कधी न सुटणारी...
तुझ्या वरच्या प्रेमासाठी
शब्दांची सांगड घालत आहे,
समज याला प्रेम कविता
मनातल्या भावना व्यक्त करत आहे,

सख्या तुझी प्रित
माझ्या जगण्याचा अर्थ आहे,
तुजविण जगण्याची कल्पना
जगणे माझे व्यर्थ आहे,

सगळ्यांपेक्षा वेगळं माझं प्रेम
फक्त आणि फक्त तुच आहेस,
आणि जगात सर्वात सुंदर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे,

तुझ्या आठवणींत झुरणारी,
आपण असलो जरी दूर कुठे तरी,
तुझीच सदैव वाट पाहणारी
माझ्या स्वप्नांत फक्त तुझाच वास आहे,


आपली प्रेम कहाणी ही
कधी न संपणारी,
भांडणे किती ही होवोत
गाठ प्रेमाची ही कधी न सुटणारी...