गत जन्मी ची खुण सापडे... ३

आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा ????

दुपारी गुरू माँ नी सुमंत ला ध्यान कक्षात एकांतात साधना वेष धारण करून यायला सांगितले, त्याप्रमाणे सुमंत गेला. आत जावून बघतो तर तिथे दोन पाट मांडले होते. ते आकाराने भरीव, मोठे व नक्षीदार होते. ते खुप जून्या काळातील असावे असे वाटत होते. समोरच्या बाजूला दोन मोठ्या समयांमधे मंद ज्योती तेवत होत्या. इतरही पुरेसे अनेक साहित्य होते पण ते जरा दुर यज्ञकुंडाजवळ रचून ठेवले होते. तेवढ्यात गुरू माँ आल्या व म्हणाल्या
"सुमंत तुझ्या घरी फोन करून कळव की तुला यायला किमान १५ दिवस तरी लागतील. मी थांबवून घेतले आहे सांग बाकी काही सांगू नकोस. आणि हो, तुझ्या कार्यालयात रजे साठी मेल करावा लागतो की काँल  केला तर चालेल? सुमंत आज गुरू माँ च वेगळंच रूप पहात होता. त्यांच्या चालण्यात, वागण्यात आणि बोलण्यातून एक वेगळी सकारात्मक उर्जा जाणवत होती.

गुरू माँ:- अरे सुमंत मी तुझ्याशी बोलते आहे ना?

सुमंत:- अ... हो... मी घरी आणी अॉफीस मध्ये कळवतो म्हणून त्यांनी दोन्ही कडे फोन केले. बॉस थोडे चिडले पण नंतर ठीक आहे म्हणाले, तसा सुमंत पुन्हा ध्यान कक्षात आला.
        
आता गुरू माँ नी त्याला एका पाटावर बसायला सांगितले व समोरच्या पाटावर त्या स्वतः बसल्या. बाहेर सगळ्यांना सुचना देण्यात आल्या की आतुन जोपर्यंत काही सुचना दिल्या जात नाही तोपर्यंत काहीही झालं तरी दार उघडायचे नाही. तुम्ही तुमचे नित्य कर्म सुरू ठेवा. त्या प्रमाणे बाहेरील सर्व जण ध्यान कक्षाचे दार बंद करून आपआपल्या कामात व्यस्त झाले. गुरू माँ नी सुमंत ला साधनेच्या वेळी घडलेली हकीकत विचारली. सुमंतने सगळे जसे च्या तसे सांगितले.

गुरू माँ:- सुमंत इथून पुढे १५ दिवस तुला निरनिराळ्या दिव्यातून जावे लागणार आहे. ते शाररीक, आर्थिक किंवा भावनिक असेल हे मी नाही सांगू शकणार पण तुला स्वतः ला हर प्रकारे तयार करावे लागेल हे नक्की. आता मी तुला एक खडा व मंत्र देते, तू तो खडा तुझ्या उजव्या मुठीत ठेवून मुठ छातीवर ठेवायची आणि मंत्र म्हणायचा.
      
तसं खडा व मंत्र घेऊन सुमंत ने जपाला सुरूवात केली. साधारण अर्धा तास झाला असेल जप सुरु करून तसं सुमंत ला अंग गरम होत असल्याचं जाणवलं. हळूहळू त्याचा मेंदू शिथिल होत आहे असे वाटत असतांनाच काही चित्र डोळ्यासमोर दिसू लागले आणि तो त्याच्या गत जन्माच्या स्मृतीत हरवला.......

क्रमशः