गर्ल्स हॉस्टेल... भाग - दुसरा...

सोनाली ला डिन मॅडम सक्त ताकीद देते

भाग -2


तितक्यात अनामिकाला डिन मॅडमचा फोन येतो.


डिन मॅडम फोनवर , " अनामिका तू आताच्या आता माझ्या कॅबिनमध्ये ये. "

डिन मॅडमचा आवाज सकाळी सकाळी चढलेला होता.


अनामिका उत्तरं देते , " हो मॅडम आली मी. "

अनामिका फोन ठेवते तितक्यात रिया तिला विचारते.


रिया, " काय गं, काय झालं ? "


अनामिका, " हिटलर खूप चिडलेली दिसतेय. बोलावलं आहे मला. "


रिया, " ह्म्म्म काल च्या प्रकरणावरून असेल. काल लेट आलीस ना म्हणून असेल. "


अनामिका, " हो गं मला ही हेच वाटतं. त्याशिवाय हिटलर थोडी ना बोलवणार. "

असं बोलून अनामिका डिन ला भेटायला तिच्या कॅबिनमध्ये जाते.


डिन, " या अनामिका मॅडम, बसा खुर्ची मध्ये. "

डिन खुर्ची कडे हात दाखवत बोलते. ती खूप चिडलेली असते.


अनामिका, " अहो मॅडम सॉरी कालच्या गोष्टीसाठी. "


डिन, " वाह तुला कळली का तुझी चूक ? "

मॅडम चा आवाज चढलेला होता.


अनामिका, " हो मॅडम मी पुन्हा उशिरा नाही येणार. "

अनामिका डिन मॅडमला समजावत बोलते.


डिन, " कसं आहे ना अनामिका, हे हॉस्टेल आहे घर नाही. आणि ह्या हॉस्टेल चे काही नियम आहेत.\" आवो जाओ घर तुम्हारा \" असं नाही इथे. कळालं. "

डिन मॅडम तिला सक्त ताकीद देत बोलते.

"नाही तरं मला तुझ्या घरी ही गोष्ट सांगावी लागेल."


अनामिका, "बरं मी जाऊ मॅडम. अभ्यास आहे ना कॉलेजचा."


डिन, " अरे वाह अभ्यास असतो तुला ? "


अनामिका, "म्हणजे ?"


डिन, "काही नाही जा तू. आणि पुढच्या वेळेस आठवण ठेव. "

अनामिका मॅडम च्या कॅबिन मधून निघते. तितक्यात तिचा फोन वाजतो.

फोनवर सायलीचा कॉल असतो.


सायली फोनवर, " हेय गर्ल्स आहेस कुठे, कॉलेज नाही गेलीस ? "

सायली समोरून विचारते.


अनामिका समोरून बोलते, " नाही गं आज सुट्टी, मुड नाही माझा. आणि त्यात ह्या हिटलर ने डोकं खराब केलं आहे. "


सायली, " ओह्ह हिटलर सकाळी सकाळी तडकली वाटतं. "


अनामिका, " हो गं, ते सोड येतेस कधी ? "


सायली, " हे काय दुपारच्या गाडीने. पोहचेन संध्याकाळ पर्यँत. "


अनामिका, " ओके या मग, वेलकम टु द हॉस्टेल. "


सायली, " येस येस, खूप मिस केलं तुम्हा तिघीना. बरं चल भेटू लवकरच. "

असं बोलून सायली कॉल कट करते.


अनामिका रूममध्ये येते.

रिया, " काय गं काय बोलली हिटलर ? "

रिया तिला विचारते.


अनामिका, " काही बोलणार, सक्त ताकीद दिली आहे मला. पुन्हा असं होता कामा नये. हिटलर कुठची.."


रिया, " अच्छा, वाटलेलच मला. "


अनामिका " हुश्श, बरं सायलीचा कॉल आलेला. निघाली ती, येईल संध्याकाळ पर्यंत. "

असं बोलून अनामिका तिच्या बेडवर पडते.


रिया, " ओके मग मी आज ऑफिसला सुट्टी घेते. "


अनामिका, " गुड आयडिया, आणि पार्टी करूया. काय बोलते ? "


रिया, " ओके नो प्रॉब्लेम. मी सोनियाला कॉल करून सांगते आजचा प्लॅन. "


अनामिका, " हो नक्की, बरं मी जरा माझी एक दोन कामे आहेत ती आटपून येते. "


रिया, "हो जा जा. मी सुद्धा माझं उरकून घेते. "


अनामिका फ्रेश होऊन बाहेर निघून जाते. 


संध्याकाळ होते. रूमची बेल वाजते. रिया दार उघडते दारात सायली असते.

रिया, " सायली... मेरी जान...!" असं बोलून रिया सायलीला घट्ट मिठी मारते.


सायली, " हो हो... आली आहे आता मी. यार मी खूप मिस केलं तुम्हा सगळ्यांना.. "


रिया सुद्धा खूश होऊन बोलते, " आम्ही सुद्धा..!"


सायली आत येते, " हुश्श... बरं वाटलं यार.. "

आणि जाऊन ती बेड वर पडते.


रिया, " सायली आज रात्री मस्त पार्टी करायचा विचार आहे !"


सायली पार्टीचं नाव ऐकून टूनकन उठून बसते.

सायली, " खरचं की काय ! चला खूप दिवसांनी घसा ओला होणार.. "


रिया, " हो तरं अनामिका तरं पार्टीच्या दुनियेत आत्ताच गेली. "

,सायली " अरे हो की, ती आहे तरी कुठे ? मला सांगितलं आज कॉलेज जाणार नाही आहे करून. मग गेली तरी कुठे ? "


रिया, " सुट्टी असली तरी तिचे पाय एका जागी थांबतील तरं नशीब.."

,

सायली ,"म्हणून तरं विचारलं तुला...!"

आणि सायली फ्रेश व्हायला वॉशरूम मध्ये जाते.


रिया, " बरं मी सोनिया आणि अनामिकाला कॉल करून सांगते तू आली आहेस करून. "

बाहेरून आवाज देत रिया बोलते.


तितक्यात डिन मॅडम चा कॉल येतो. सोनाली कॉल उचलते.


डिन मॅडम फोनवर, " हॅल्लो, कोण बोलतंय.. रिया, की अनामिका..? "


सायली फोनवर उत्तरं देते, " हॅल्लो मॅडम, मी सोनाली बोलतेय.. आली आहे मी..!"


डिन मॅडम, " तेच मला विचारायचं होतं, तू दुपारी येणार होती ना...? मग इतका उशीर का झाला ....?"


सायली बोलते, " मॅडम मी संध्याकाळ पर्यँत येणार होती. "


डिन मॅडम जरा भडकूनच बोलतात, " तुम्ही मुली ना सांगतात एक, आणि करतात एक... उशीर होणार होता तरं तसं मला फोन करून सांगायचं होतं.!"


सायली बोलते, " सॉरी मॅडम चुकलं माझं... "

सायली मॅडमची माफी मागत बोलते.


डिन बोलते, " मी तुला हे शेवटचं बजावत आहे. पुन्हा असं झालं तरं मला पुढील कारवाई करावी लागेल... "

चिडून डिन मॅडम कॉल कट करतात.


सायली बोलते, " आयला काय हिटलर आहे....? "


रिया तिला बोलते, " चिडली असेल ना? शेवटी सक्त ताकीद दिली असेल तुला... "


सायली रिया चं बोलणं ऐकून आश्चर्यमध्ये पडते, " हो गं, बरोबर बोललीस.!"


रिया हसते, " अनामिकाला सुद्धा हेच म्हणाली ती.."


..... क्रमश...




🎭 Series Post

View all