गरिबीचे निर्मुलन

गरिबीचे निर्मुलन
शिर्षक- गळचेपी*

करण्या गरिबीचे निर्मुलन
धरली शिक्षणाची कास.
भ्रष्टाचाराने गुदमरलाय
इथे शिक्षणाचाच श्वास..

महागाईच्या भस्मासुराचा
आगळाच आहे धुमाकुळ.
सांगा कसे काढावे खोडून
दारिद्र्यात रुतलेले मुळ..

शिक्षणाच्या बाजाराने आज
चढलाय जोर बेरोजगारीला.
गरिबाच्या गरिबीत अधिक
उधान आलेय उपासमारीला..

वाटतं आतून पोटतिडकीनं
करावं गरिबीचं निर्मुलन.
पण लाचखोरीच्या या दुनियेत
इमानदारीचंच होतंय हनन..

खितपत पडलेत गरिबीत
भोळेभाबडे सान-थोर.
सावकाराच्या सावकारीला
कुठला आलाय त्याचा घोर..

काबाडकष्ट करणा-याला
राबावं लागतं गुरासारखं.
गरिबी निर्मुलनाच्या धडपडीला
गळचेपीनं दाबतात चोरासारखं.

स्वातंत्र्योत्तर काळातही नाही
स्वातंत्र्य मनासारखं जगण्याचं.
कसं करायचं मग पुर्ण
ध्येय गरिबीच्या निर्मुलनाचं..
----------------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®