. . . गर तुम साथ हो! (भाग -४)

An inspiring lovestory.



राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कॅटेगरी- प्रेमकथा (प्रेरणादायी)
संघ - ईरा संभाजीनगर
जिल्हा - औरंगाबाद /संभाजीनगर

कथेचे शीर्षक - . . . गर तुम साथ हो!
(भाग -४)


लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी


दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाण्यापूर्वी सतीश खूप घुटमळत होता.
रमाताई सारं पाहत होत्या. त्याला काही आज अाशू दिसली नाही.

ऑफिसातही तो आज उखडल्यागतच राहिला.
कामात मनच रमेना ,सारखा तिचा कालचा केविलवाणा, निरपराध, निरागस चेहरा आठवला.

समोर ती भरल्या डोळ्यांनी बोलताना दिसत होती.
प्रकाशने खांद्यावर हात ठेवला," सचिन इज समथिंग राँग?"

"नो नथिंग यार! जरासं डोकं दुखतंय."

" बस मग! चला चहा घेऊ उठ." दिवस असाच काढला.

ऑफिसातून परतताना कितीतरी वस्तू तो तिच्यासाठी पाहत होता पण एकही वस्तू अशी दिसली नाही ज्यामुळे तिचा राग वितळेल.

तो तसाच घरी आला. आल्यावर तिच्या दारासमोर थोडा वेळ थांबला
तीनवेळा हॉर्न वाजवला.
"काय चाललंय काकू ?"

"काही नाहीरे आता चहा झाला. ये ना. चहा घेतोस का? "

" नाही नाही नको , आत्ताच आलोय ऑफिसातून. आई आहे की गेली मंदिरात?"

" हो त्या मंदिरातच गेल्यात. तुझं ताट वाढून ठेवलय म्हणाल्या.ही घे घराची चावी."

" हो का. बरं. आणि आशु दिसत नाही आज ?"

तो घुटमळला होता.

"घरी नाहीय गेलीय मैत्रिणीकडे. का रे काही काम होतं का ?"

"नाही काकू , अगदी सहजच विचारलं."
त्याने नाराजीने काढता पाय घेतला .

आतून खिडकीच्या फटीतून पाहणार्‍या आशूच्या चेहऱ्यावर विजयी भाव उमटले.
पण मनात काहीतरी तुटलं ,त्याला दुखावताना.

तिनेच आईला सांगितलं होतं की मी प्रश्नपत्रिका सोडवते आहे , कुणी आलं तर मी नाहीये म्हणून सांग.

सध्या सूड उगवण्याची वेळ आशूची होती.
त्याचा तो प्रसंग व अभिनय ती विसरली होती.

तिने त्याला मनात माफ केलं होतं पण समोर मात्र नाही.
तिची किंमत त्याला कळावी म्हणून तर हे तरसवणं चाललं होतं.

दोन दिवस असंच झालं. ती मुळी त्याला दिसलीच नाही.
घरी एकट्यात असताना तर त्याला तिची खूप उणीव भासायची आणि तो स्वत च स्वत वर चिडायचा ,चरफाडायचा.

ती जणु त्याचा एक भाग बनली होती , तिच्याशिवाय तो जगू शकत नाही ही जाणीव त्याला झाली होती.

तो नीट जेवलाही नाही .

रमाताईंना सारं कळत होतं पण आज यातून काहीतरी मार्ग काढायचा असं त्यांनी ठरवलं.

तिसर्‍या दिवशी त्या आशूकडे आल्या .

" अाशूची आईऽ. . आशू घरी आहे का?"

"हो आहे ना ! का हो ?" त्यांनी विचारलं .

"हो आहे का, मग थोडावेळ पाठवता का तिला? काम होतं."

" हो का. आशु जा गं काकू बोलवतात ."

अाशू सरळ घरात गेली. " काय हो काकू?"

" काय गं सूनबाई ? काय चाललंय ? तुझ्या भरोशावर मी त्याला मोकळं सोडलं तर तू तर अशी छळतेस काय माझ्या लेकाला ?"

"काकू ,मी ते ? काही नाही."

" त्याला पाहिलंस का दोन दिवसांत ? किती खंगलाय . भडभड बोलत नाही, सांगत नाही. जसा आहे तसा आहे तो, आता त्याला तुलाच सांभाळायचं आहे. माहित आहे का ? दोन रात्रीपासून जागतोय , जेवत नाहीय , कुणाशी धड बोलत नाही. आता पुरे झालं! त्याला माफ कर."

" असं काय काकू ? अहो मी त्याला माफ केलंय. उगीचच दोन दिवस मी त्याची मजा घेत होते पण तो इतका मनाला लावून घेईल असं वाटलं नव्हतं. कुठे आहे तो आता?"

आता मात्र आशू स्वतःवरच चिडली.

" त्याच्या खोलीत असेल, आशू त्याच्या खोलीचा अवतार पहा जरा. मला अावरूही दिलं नाही त्याने . जा , तू "

अाशू बिचकतच आत खोलित आली. डोकावून पाहिलं . तो दिवाणवर शांत झोपलेला होता, गाढ!
सगळ्या खोलीत पसारा पडला होता.

तिने सगळं आवरून ठेवलं.
धुतलेले कपडे घडी करून ठेवलं .
इस्त्रीचे कपडे अलमारीत ठेवले.
मळलेले ड्रेस नेऊन बाथरूममध्ये ठेवले.
रूम झाडून घेतली.

फक्त टीपॉय आवरायचा होता त्याच्यावर खूप कागदंं पडलेली होती , इतस्ततः पांगलेली!

पेन तसाच उघडा होता .

तिने हलके च एक कागद घेतला मजकूर वाचून ती गलबलली.

"माझी अाशु ,तुला गंमत म्हणून दुखवणं मला परवडलं नाही .त्यात तुझी कुठेही चूक नाही. मी खरंच नालायक, बदमाश आहे, तू म्हणतेस ना बदमाश नालायक तसाच पण एक संधी दे ना आता चूक सुधारण्याची !"

दुसरा कागद उचलला, इंग्लिशमध्ये लिहिलेलं होतं " आय अॅम सॉरी डियर ! प्लीज फर्गिव्ह मी! आय कान्ट लिव विदाउट यू फॉर सिंगल आर. आय आम सॉरी सॉरी सॉरी " इन्फिनाइटचं चिन्ह होतं

तिसरा कागद ,
"आशुराणी, तुझ्याशिवाय माझं कोण आहे , मला समजून घेणारं? असं करु नकोस. मला तीळ तीळ मारू नकोस. अाशु, आज मला तुझी किंमत कळतीय. तू माझी सर्वस्व आहेस , सर्वस्व!

चौथ कागद ,
"आशू क्षमा करशील ना मला ?"
आता मात्र तिला पुढचं वाचलं गेलं नाही. कितीतरी कागद होत।
तिने सगळे गोळा केले आणि त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या .
ते फाडतानाही तिच्या डोळे भरून आले होते.

सचिन शांत झोपलेला होता. त्याचा चेहरा झोपेतही उदास वाटत होता.
खूप निरागस दिसत होता तो झोपेत.

त्याने चेहऱ्यावर हात घेतला होता. ती वाकली व
त्याच्या हातावर तिने हळूच ओठ टेकले .

त्याचे केस कुरवाळावे असे वाटत होते पण तो उठेल म्हणून तिने मोह आवरला.

ती जाण्यासाठी वळली तोच मागून आवाज आला ," आय एम सॉरी ना आशू !"

तिच्या स्पर्शाने तो जागा झाला होता.

तिला पाहताच तो खुलला, ती परत वळली आणि त्यांच्या ओठावर तिने हात ठेवला.

"सचिन, आता काहीच बोलायचे नाही. आणि हा विषय संपला, आता याक्षणी ! ठीक !"

"थँक्यू डिअर! थँक्यू सो मच !" अाशू तुझा हात दे ना इकडे .

तिचा हात हातात घेऊन किती वेळ तो दसबत होता मग त्याने तिचे हात डोळ्यांना लावले व मग त्याच्या अोठांना .
"अाशू , तू माझी आहेस , फक्त माझी बरं का!"

" हो बरोबर आणि तू?" चेहर्‍यांवरचे प्रश्नचिन्ह खूपच साशंक.

" अर्थात मी ही फक्त तुझा!"

दोघे एकमेकांकडे एकटक पाहत होते, इतक्यात रमाबाई खाकरल्या आणि आत आल्या.

" झाले का दूर , रुसवे फुगवे? हे घ्या शरबत आणि आता उपोषण सोडा सचिनराव!"

यावर तिघेही मोठय़ांदा हसले.

क्रमशः

©® स्वाती बालूरकर, सखी
दिनांक ०९.०९ .२०२२

🎭 Series Post

View all