. . . गर तुम साथ हो! (भाग -६) अंतिम भाग

An inspiring lovestory


. राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कॅटेगरी- प्रेमकथा (प्रेरणादायी)
संघ - ईरा संभाजीनगर
जिल्हा - औरंगाबाद /संभाजीनगर

कथेचे शीर्षक - . . . गर तुम साथ हो!
(भाग -६) अंतिम भाग 


लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी


एक दिवस सुंदरसा ड्रेस घालून सचिनला भेटावं म्हणून अाशू बाहेर निघाली. तर त्याच्या दारासमोर तो उभा असलेला दिसला.

तिची आई तासाभरापूर्वी म्हणाली, की सचिनच्या घरी कुणीतरी आले आहे. त्यांनी तिच्या आईलाच त्यांचं घर विचारलं होतं.

अश्विनने दुर्लक्ष केलं.

सुट्टीचा दिवस होता . सचिन छान हसून गप्पा मारत होता एका वयस्कर माणसाशी आणि त्या गृहस्थापलीकडे एक खूप सुंदर आणि मॉड मुलगी उभी होती.
ती मनात चरफडली.
एरव्ही याचं तोंड मुलींसमोर उघडत नाही, अगदी वर्ग मैत्रिणींसमोर सुद्धा नाही आणि आज ?

ती मुलगी जाण्याची वाट पहात आशु दारात बसली .
काकू देखील त्या गृहस्थाला पोहचवायला येताना दिसल्या . ते गृहस्थ आणि काका पुढे सचिन आणि ती मुलगी मागून चालले होते.

न राहवून अश्विनीने खाली पाहिलं.

ती दोघं त्यांच्या घरासमोर आली.

" शुकशुक "

अश्विनीने पाहिलंच नाही.

" अाशू इकडे ये न जरा !" सचिन म्हणाला .

"हां काय आहे ?" समोर आली.

" तर आशू ही सुहिता आणि सुहिता ही आशु आय मीन अश्विनी !"

अश्विनी व तिच हॅलो हाय झालं

"ओके मी निघते बाय अश्विनी येते , सचिन बाय "


सचिन किती वेळ तिला पाठमोरं पाहत होता आणि आशु सचिनला.

" खूप मस्त मुलगी आहे, एकदम फ्रँक आणि बोल्ड." सचिन तिकडेच पाहत बोलला .

"अहो महाशय ! विसरा आता! हां मग काय विचार आहे?"

" कशाबद्दल ?"

"तेच सुहिता बद्दल व वातावरणाबद्दल?"

" सु ऽ हि ऽ ता ! गुड नेम , गुड गर्ल ! पाहू या काय होतंय, बाबांच्या मनावर आहे. ते हो म्हणाले तर तर. . हो!"

"काय ? पण ही होती कोण रे! ते तर तू सांगितलंच नाहीस. कोण आहे? कुठे राहते? काय करते? तुला कुठे भेटली? कितीवेळा भेटली? आणि का भेटली ?"


" ए क्वेश्चन बँक! चूप! एकावेळी एकच. महत्त्वाचं इतकं की ते सद् गृहस्थ म्हणजे माझे परमपूज्य बॉस आणि ही सुहिता त्यांचं कन्यारत्न!"

" तुझ्याकडे कशाला आले होते?"
" बाबांनी बोलावलं असेल नाहीतर आणखी एक त्यांचा मला प्रमोशन देण्याचा विचार आहे."

"वा ह गुड!"

" गुड काय? ते प्रमोशन तुला महागात पडेल. सुहिता सहित प्रमोशन असेल ते. हां बाईसाहेब वरपक्षाच्या घरी आले होते, कुटुंबीय पाहायला."

" हे रे काय फूट !आणि मी?"
ती केविलवाणी झाली .

"मी काय करू आशू , नाईलाज आहे! तगडा हुंडा देतील. बाबांना तर तेच पाहिजे ,वरचा मजला बांधायचाय ना शिवाय मला प्रमोशन दिले तर पगार वाढेल. तू मला म्हणालीस ना त्या दिवशी नवीन स्कूटर घे. ते स्कूटरही देतीलच. बाबानी हो म्हटल्यावर कुणाचं काही नाही चालत तुला माहीत आहे."
त्याने ओठांचा चंबू केला.

"चल !गंमत करू नकोस. तुझी नेहमीची सवय ." अाशू म्हणाली.

"अ गं नाही मी सीरियसली बोलतोय. आमच्या साहेबांचा तोच विचार आहे. एकुलती एक मुलगी आहे . शिवाय मी त्यांचा आवडता एम्प्लॉई. वातावरणाने जर वेगळंच वळण घेतलं मग ती देखील काहीच करू शकणार नाही." त्याने मान खाली घातली .

"सचिन ते असू दे ! मी तुझ्या हिमतीवर माझ्या आईला उलटून बोलले. काकूंना खूप मान देते इतकंच काय शेजारी बऱ्याच जणांना आपलं बोलणं मैत्री आवडत नाही पण केवळ एका विचाराने, एका विचाराने मी त्यांच्यासमोरून ताठ मानेने जाते कि मी माझं प्रेम पूर्णं यशस्वी करून दाखवीन. . . मग मी ? जाऊ दे !"

"अाशू थांब ना!" सचिन पाहत राहिला, ती निघाली व घरात गेली.

पुन्हा एक संकट त्यांच्या प्रेमावर घाला घालू पहात होतं. ती हतबल होती पण तिने ठरवलं की वेळ पडल्यास ती हिमतीने वडिलांसमोर तोंड उघडेल .

त्यानंतर सुहिता बऱ्याचदा घरी आली . ती आल्यावर आशूशी बोलल्याशिवाय जायची नाही.

सुरुवातीला अाशू थोडी फुरंगटून आकसून बोलायची पण नंतर दोघींची चांगली गट्टी जमली .

छानपैकी गप्पा व्हायच्या.

एक दिवस सुहिता आली. रमाताईंना भेटून अाशू कडे आली.

" हे आशू सचिन नाहियेका घरी. येथे आंटी एकट्याच आहेत घरी"

" हो गं तो गेलाय त्याच्या मावशीकडे . उदयाच येईल तो. तू बस ना."

"आशु तो नाहीये तर तुला करमत नसेल ना! "

" काय झालं न करमायला ? मला काही फरक पडत नाही. काकूंशी माझी चांगली मैत्री आहे, त्या आहेत ना ." आशूच्या मनात एक आढी पडली होती.

" राहू दे, तू मला बनवू नकोस"

"असं काय म् म्हणतेस सुहिता ? खरच!" आशू म्हणाली .


"मी इतकंच म्हणाले की लाडकी वहिनी लाडू केव्हा खाऊ घालणार आहात?" ती मिश्किल हसली .

"ओ माय गॉड!" तू मला वहिनी केलंस ?"

"आशू कपाळाला हात मारू नकोस आणि लाजरा चेहरा लपवू नकोस मला सगळं माहीत आहे."

" सगळंळ काय ?

" काहीच नाही का ? अाशू गैरसमजात राहू नकोस. मला सचिनने दुसर्‍या भेटीतच तुमच्याबद्दल सांगितलं होतं. खरं सांगते त्यांच्यासाठी तू मला खूप आवडलीस ,वहिनी म्हणून . त्या दिवशी तुला पाहून केवढा आनंद झाला . सचिन माझा चांगला मित्र आहे। मला माहीत आहे, तो तुझ्यावर जिवापाड प्रेम करतो. लाजलीस ना , तू त्याला अशी खूप आवडतेस. तो नेहमी सांगतो मला, तुझ्यासाठी बऱ्याच वस्तू घेत राहतो नेहमी. ए वहिनी कुठे हरवलीस ?"

आता मात्र आशू चक्क सुहिताच्या गळ्यातच पडली. तिला घट्ट बिलगून कितीतरी वेळ वेड्यासारखी हसत राहिली ,लाजत राहिली .
तिच्या मनावरचे केवढं दडपण गेलं होतं .

सुहिता मात्र सारं कळून न कळण्यासारखी आवक होती .
*******

काही महिन्यांनी घरातली कट कट व स्थळांची चर्चा ऐकून एक दिवस आशू रमाताईंकडे अाली.

" काकू माझी परीक्षा दोन तीन महिनेच राहिली आणि आईबाबांचे हल्ली रोज वाद चालतात, माझ्या लग्नावरून .आईला मी सचिनशी बोललेलं आवडत नाही. बाबा तर पूर्वी माझं ऐकायचे , मोकळं सोडायचे. पण आता आईच्या कटकटीचे तर त्यांनी चक्क स्थळ शोधायला सुरवात केली आहे. "
रमाताई आश्चर्याने उद्गारल्या, " आशू , इतकं सगळं झालं ,तू मला काहीच बोलली नाहीस. आईचे खूप बोलणी खाल्ली असशील. नजर चुकवून इकडे येत असती। मी समजू शकत. मला या सगळ्या गोष्टींची कल्पना नव्हती मला वाटलं तुझ्या घरूनही परवानगी असे. जाऊ दे तू भिऊ नकोस, माझ्यावर विश्वास आहे ना ! मी सगळ ठीक करीन राजा . सूनबाई तूच माझी सून होशील घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे . मी आता काय करते बघच. तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे ! डिस्टिक्शन मिळवायचय ना!"

आशू त्यांना मायेनं बिलगली.


*********

दुसर्‍या दिवशी आशूच्या आईचा अंदाज घेण्यासाठी रमाताईं सहज बोलायला आल्या. त्यांचा आशूबद्दल नाराजीचा सूर ऐकून त्यांनी मनात काही ठरवलं व सचिनच्या बाबांशी चर्चा केली.

संध्याकाळी सचिन प्रमोशनचे पेढे घेवून आला व बाबांना दिले. देवाजवळ ठेवल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे रमाताईना बोलावले. दोघे आशूकडे आले. आशूचे बाबाही घरी आलेले होते मग काय इकडच्या तिकडच्या गप्पा चहापाणी झालं आणि सचिनच्या वडिलांनी विषय काढला अगोदर पेढे दिले ,प्रमोशनची बातमी दिली
व म्हणाले, "आता एक बातमी आणि एक पेढा तर तुमच्याकडून हवा आहे. "

आशूचे बाबा आश्चर्याने म्हणाले," कशाबद्दल ?"

रमताई म्हणाल्या ," पेढे काय मागताय लाडू मागा ! आशूच्या लग्नाचे!"

"लग्न कुठे ठरलं पण, अजून शोधतोच आहोत." आई म्हणाली.

"हो का ? अश्विनीचं लग्न नाही ठरलं ना . बरं मग आता ठरेल ना!" बाबा म्हणाले.
सचिन दारातून सगळं ऐकत होता व आशू स्वयंपाकघरातून.

"असं म्हणताय . . मग ठरू देत पण अजून कुठे काहीच नाही!" आई म्हणाल्या.

"घ्या मग . आत्ता ठरलं, या क्षणी! आमचा मुलगा सचिन याच्यासाठी आम्ही तुमच्या आशुचा हात मागतोय.हो म्हणा व तोंड गोड करा ."

"अरे वा खरं की काय?"

"अहो आम्ही तिला इतके वर्ष सूनबाई म्हणूनच मानलं आहे . सून किंवा लेक समजून तिच्याशी वागत होतो. तुमची हरकत नसेल तर तुमची आशू आम्हाला सून म्हणून हवी आहे !" रमाताई आनंदाने म्हणाल्या व सचिनचे बाबा म्हणाले , " आम्हाला हुंड्याचीही अपेक्षा नाही . "

आशूच्या वडिलांचे डोळे आनंदाने भरून आले.

" अहो आम्हाला आणखी काय हवंय इतकं प्रेम करणारी माणसं, इतका सालस जावई . पण आशूच्या मनात काय आहे पहावे लागेल." असे बोलताच आशू पळतच आली व रमाताईंना बिलगली.

"काकू माझा होकार आहे! मला सचिनशीच लग्न करायचंच अन तुमचीच सून व्हायचंय!"
तिच्या या निरागस प्रतिक्रिये वर सगळेच हसले व ती लाजेने चूर झाली.
सचिनच्या बाबांनी दारातल्या त्याला विचारलं , " काय रे बाबा , तुला पसंत आहे ना आशू की आहे दुसरी कुणी?" आताच सांग !"
"आई तुला माहित आहे ना गं सगळं !"
असं म्हणून सचिनही लाजून बाहेर गेला व त्याच्या मागे आशूही त्यांच्या घरी गेली.
मंडळी ईकडे बोलणी करीत राहीली व प्रेमी जोडपं सचिनच्या खोलीत एकमेकांच्या मिठीत देवाला धन्यवाद देत होतं.
"साथ देशील ना आशू?"
"कायम सचिन, तू सोबत असेल तर जगाशी पण लढेन मी!"

शुभं भवतु.

समाप्त

लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी

🎭 Series Post

View all