. . . गर तुम साथ हो! (भाग -५)

An inspiring lovestory.


राज्यस्तरीय करंडक कथामालिका
कॅटेगरी- प्रेमकथा (प्रेरणादायी)
संघ - ईरा संभाजीनगर
जिल्हा - औरंगाबाद /संभाजीनगर

कथेचे शीर्षक - . . . गर तुम साथ हो!
(भाग -५)


लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी

घरातलं वातावरण निवळलं.

पुन्हा सारं पूर्ववत चाललं. यादरम्यान आशूची आई मात्र नेहमी चिडायची.

त्या दोघांचं काहीतरी सूत आहे एवढं त्या मनाशी बाळगून होत्या, पण म्हणायला काहीच कारण नव्हतं . तरीही नेहमी त्या दोघांनी बोलणं, त्यांना खपायचं नाही.

अश्विनीच्या इतर मित्रांचा त्यांना कधीच राग यायचा नाही पण ती सचिनच्या घरी गेली की त्यांचा जीव खालीवर व्हायचा.
बऱ्याच वेळा तो ऑफिसातून परतल्यावर दोघे बाहेरच बोलत उभे असायचे.
एकदा आशूची आई तिला रागावली ,"शोभतं का गं हे नेहमी बाहेर उभारून बोलणं? खिदळणं? थोडं जगाचं भान ठेवावं ?"
"आई काय झालं गं बोलले तर?"

" आता काय झालं माझं कपाळ ?तुझ्यापुढे तर हात जोडले. सगळेजण पाहतात कॉलनीत, नाही नाही ते बोलतात .कशाला बदनामी करायच। पण काही अडले का ,मी म्हणते लोकांना संशय घ्यायला काय वेळ लागतो. म्हणून सारखे तुला मी बोलत असत।"

" घेऊ दे संशय! काय फरक पडतोय ? बोलतील आणि पुन्हा शांत बसतील. मी त्याच्याशी बोलणार बोलणे काही चोरी नाही."
" अरे रामा पांडुरंगा! तू दिवसेंदिवस उद्धट होत चालली आहेस आशू त्याच्यासाठी मला उलटून बोलतेस. तुझे बाबा आले ना आज तर सांगणारच आहे. आपण आपलं जपून असावं एवढंच कळतं मला. आजकालच्या पोराचं काय भरोसा ? पोरींना अन् तिच्या आई बापांना सर्व निभवावं लागतं. आम्हाला समाजात राहायचंय म्हटलं ."

"काहीतरीच काय तुझं आई. सगळ्यांना भिऊन जगावं की नाही? बरं तुझं खरं ! यापुढे त्याच्याशी बाहेर नाही बोलणार ,घरात बोलावून बोलेल मग तर चालेल?"

" ठीक आहे का हे पण काय अडलं आहे इतकं बोलायचं , शांत रहायचं ना मग चारचौघींसारखं ?"

" आई तू सुरुवातीला अडवलं नाहीस. चार पाच वर्षांपासून आमची मैत्री आहे आणि मला आवडतं त्याच्याशी बोलायला."
बस, वाद वाढू नये म्हणून तिची आई पुढचं काही बोलली नाही पण त्यांच्या डोक्यात प्रकाश पडायला वेळ लागला नाही.

सचिनच्या बागेतल्या सगळ्या फुलांवर अाशूचा हक्क अगदी लिहून दिल्यागत. तिच्या आईला तेही आवडायचं नाही.
त्यांनी सारखच आशूच्या वडिलांच्या मागे टुमणं लावलं .
"अहो झालं ना आता परीक्षा झाली की तुम्ही ना आशूसाठी स्थळ पाहायला लागा बाई!"

" काय घाई आहे. पुढचं वर्षं शेवटचं।तेवढं झालं की पाहुयात."

"झालं आता काय कमी थोराड आहे का ती. हल्ली मलाच अक्कल शिकवते. हल्ली तर खूप उद्धट झालीय. मी काय म्हणते आता पाहायला सुरू केलं तर पुढच्या वर्षीपर्यंत जुळेल, तुम्ही पुढच्यावर्षी सुरु कराल तर आणखीन एक वर्ष लागेल."

" अगं मग वेळेवरच चांगलं स्थळ पाहू आणि पटकन उरकून टाकू. बरं आपली आशू काही इतकी डावी नाही ,काळजी करायला . कुणी एक नजरेत पसंत करेल. शिकलेली आहे ,समजदार आहे . तू उगाचच चिंता करतेस."

" हे पहा या पोरीची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीत. एखाद्या दिवशी ती आपल्याला गुंगारा देईल. ती बाहेर असली की माझा जीव सतत टांगणीला असतो."

" काहीही काय बोलतेस गं तू ? माझा विश्वास आहे आशू वर . ती असं काही करणार नाही. विश्वास ठेव हे वय असं असतं, थोडं मोकळं अल्लड, तू नाहक संशय घेऊ नकोस."

" हो णं मीच वे डी ना !" आणि मग हळूच त्यांनी सचिनबद्दलचा संभाषण ऐकवलं.

" अगदी बरोबर आहे , इथे आपण राहायला आल्यापासून दोघांची मैत्री आहे. सचिन पण सुसंस्कृत मुलगा आहे. शिवाय रमाबाई केवढा जीव लावतात तिला ! हक्काने वावरते त्यांच्या घरात! तिथे रुळलीय ती. जिथे प्रेम मिळतं तिथे जातात गं मुलं . ती अगदीच योग्य करते यापुढे तिला कसलंही बंधन या बाबतीत घालू नका."

कितीतरी वेळ आशू ची आई बडबडत राहिली.
एकटीच आशूचे वडील निघुन गेल्यावरही.

आशू चे वडील आईशी कडक वागायचे पण आपल्या मुलीवरही त्यांचं खूप प्रेम होतं. तिच्याशी मात्र ते हळवे राहायचे .


एक दिवस सचिन आणि आशूने पिक्चरला जाण्याचा प्रोग्राम बनविला
कुणालाही थांगपत्ता नाही.
त्या काळी असं मुला मुलींनी एकत्र सिनेमाला जाणं म्हणजे खूप मोठं धारिष्ट्यच !

"आई आम्ही सगळ्या मैत्रिणी उद्या पिक्चरला जातोय , दुपारी, मला जायचं आहे बस्स!"

सायंकाळी ती सचिनला म्हणाली तू काहीतरी काम काढून निघ मी पलीकडच्या नवरंग हॉटेलपर्यंत जाईन, मग तू मागून ये आपण बरोबरच जाऊ.

ठरल्याप्रमाणे ती गेली, मागून दहा मिनिटांनी हा पण नव्या मोपेडवर गेला. दोघांनी पिक्चर पाहिला. छान वेळ घालवल।

परतताना निर्जन रस्त्याने येत होते

" आता उतर तू , मला मोपेड शिकायची आहे.

आशु म्हणाली.

त्यानेच तिला लुना शिकवली होती.

आता त्याच्याकडे नवीन मोपेड होती . कॉलेजातून येताना बऱ्याच वेळा तो तिला घेऊन यायचा पण घरापासून लांब अंतरावर उतरवायचा.

दोघांच्या बाहेरही भेटी होत राहिल्या.
परकेपणा किंवा दिखाऊपणा दोघांत कधीच नव्हता.

तिची परीक्षा संपत आली ती अभ्यासत रमली. परीक्षेत गुंतली. तिला पहिलं येण्याचं वेड! त्यात अभ्यासाचा नाद . एकेक पेपर जाऊ लागल।

रोज सचिन एक गुलाबाचं फूल द्यायचा, बेस्ट लक म्हणून !

परीक्षा संपल्या, डोक्यावरचा भार गेला.

जवळ जवळ दोन महिने सुट्ट्या होत्या.

चुलत मावस बहीण भावांचा धिंगाणा. सगळे इथे आले काही दिवस.
मग दिवस दिवस रमाताईंकडे जायचा.

कधी कधी सुट्टीच्या दिवशी आशू, सचिन त्याचे आईवडील यांचा जोरदार कॅरम किंवा चंपुल खेळण्यात दिवस मजेत जायचा.

आमरस पोळीचे जेवण, सुस्ती, बागकाम आणि झोप, अश्या सुट्टया .

सचिनबरोबर तिने आणि निशाने कैकदा सायंकाळी आइस्क्रीमची पार्टी म्हणजे दिवाळीच केली होती.
सगळ्यांच्या मताने व्हिसीआर आणून दोन्ही कुटुंबीयांनी एकत्र पिक्चर पाहणं, फराळ अंगतपंगत धूम चालत राहिली.

सचिनच्या नात्यातल्या भाऊ बहिणींनी आणि मित्र मैत्रिणींनी तिला हळूच अाशूवहिनी , अश्विनी वहिनी चिडवायला सुरुवात केली होती .

आतापर्यंत सचिनसदी ज्या हक्काने वागत आली त्याचा अर्थ हाच होता पण त्या नात्याची जाणीव कुणी इतरांनी करून दिली की मात्र ती लाजून चूर व्हायची.

सुट्ट्यांमुळे ते आणखीनच जवळ आले.

तिच्या आईची काळजी मात्र दिवसेंदिवस वाढत होती.
दोघं नेहमी एकत्र सण साजरे करायचे , हे भावनांचे जपणं आता नेहमीचं झालं होतं.

क्रमशः

लेखिका ©® स्वाती बालूरकर, सखी

********

🎭 Series Post

View all