गप्पा..... Anytime

Its abt women's nature of making friends♥️

कॉफी तर एक कारण होतं, थोडा वेळ एकत्र घालवण्यासाठी !!!

मी कॉफी येते गं कॉफी ठेव, असं बोलून मैत्रिणीकडे गेले.....तिनेही उत्साहाने ये ये केलं..... खूप महिन्यांनी भेटणार म्हणून दोघीही खुश झालो..... खरं म्हणजे फोनवर, लॉबी मधे थोड्याफार गप्पा होत होत्या मधे मधे, पण दोघीनांही समाधान नाही ????.नुसतं एकमेकींना बघूनही कधी कधी बरं वाटतं.. आज तर खूप गप्पा, थोडं gossip, थोडं शॉपिंग,  बरंच काही.....

या काही वेळाच्या गप्पा आम्हाला किती positivity देऊन गेल्या, खूप उत्साह आणि आनंद !!!!

किती आवश्यक आहेत या गप्पा आपल्या रोजच्या routine मधे.... whtsapp वर, फोन वर मारलेल्या गप्पा नक्कीच आपल्याला फ्रेश करतात. पण प्रत्यक्ष भेटून मारलेल्या गप्पा..... अहाहा दुसरं सुख नाही. ❣️

प्रत्येक वेळेस भेटल्यावर आपण अगदी gossip करतो असं नसतं उलट कधी कधी आपल्याला स्वतः बद्दल काहितरी सांगायचं असतं... तिचा अनुभव ऐकायचा असतो. खूप असतं आमच्याकडे तर बोलायला.... वेळ तर नेहमीच कमी पडतो आम्हाला.... ????

आपण मैत्रिणी हसता हसता, आपली दुःखही सांगतो आणि मोकळ्या होतो.... प्रत्येकीच्या मनातला कोपरा न कोपरा  स्वच्छ होतो म्हणून तर मैत्रिणीची एक खास जागा असते आपल्या मनात..... ध्रुव ताऱ्यासारखी !!अढळ ❣️!!

साड्या, movies, पुस्तकं, पाककृती अशा अगणित विषयांवर आम्ही बोलू शकतो.वेळ कसा निघून जातो कळतही नाही आणि कळूही द्यायचं नसतं आम्हाला ते... हा वेळ आमचा असतो.... फक्त आम्हा मैत्रिणींचा... आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने तो enjoy करतो.

शेवटी निघायची वेळ येते, आपल्या आपल्या घरातील जबाबदाऱ्या दिसत असतात. आता उभ्याने गप्पा मारायची वेळ ????????....मग आम्ही उभं राहून परत एक तास.... आता शेवट सगळ्या भेटू, lunch करू, breakfast करू या विषयावर.... परत भेटायची आमची तयारी सुरु..... की लगेच मेनू पण ready ????.सगळं कसं पटापट कारण घाई असते नं  आता निघायची ????????

तरिही जातोच अर्धा तास... उभ्या उभ्या.... बाप रे  आता तर  निघायलाच हवं गं... स्वयंपाक पण करायला हवा.... ????

अशा मैत्रिणी आम्ही.... पण खरंच एकदा भेटलो नं की मन कसं अगदी हलकं होतं... काहीही बोला.... कसंही वागा....समोरची मैत्रीण तशीच हवी पण.... आपल्या कुटातली