गणपती बाप्पा मोरया

गणपती बाप्पा मोरया

आज अनंत चतुर्दशी

आपल्या सर्वांच्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्याचा दिवस.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसात घरोघरी अगदी जल्लोषाचे वातावरण.


खरंतर तो कुठेच जात नाही इथेच असतो...

प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ...

अनादी, अनंत, आणि असीम अशा काळावर अधिराज्य 

गाजविणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार.

गणेश, महादेव ही तत्व आहेत सृष्टीतली.....

विसर्जन तर माणसांच्या विचारांचं असतं....

आपल्यासारख्या.....

तत्व चिरंतन असतात!!!

वाचता वाचता वेचलेल्या आणि मनात भरलेल्या या ओळी 

खरोखरच बरच काही शिकवून जातात.

हे अष्टविनायका, लंबोदरा, गजानना अशा अनेक नावांनी 

परिचित, 14 विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती, बुद्धीची 

देवता असलेल्या आम्हा सर्वांच्या लाडक्या गणराया आम्हा सर्वांना

माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याची सद्बुद्धी दे.


निरोप देतो देवा आम्हा आज्ञा असावी....

चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी...


गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.

अनंत चतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.