गंगुबाई ! पार्ट 1

.


शाळेच्या गेटसमोर एक रिक्षा थांबली. त्यातून लगेच एक मुलगा छत्री उघडून उभा राहिला आणि मग रिक्षातून गंगुबाई " क " वर्गवाली बाहेर आली. तिने पांढरेशुभ्र स्वेटर आणि काळे गॉगल घातले होते. ती धीमी पावले टाकत पुढे जाऊ लागली. वॉचमन ,  शाळेतले शिक्षक , विद्यार्थी सर्वजण तिला नमस्कार करू लागले. मग ठरल्याप्रमाणे ती कॅन्टीनमध्ये आली. तिथे एक शिक्षिका आणि एक रडत असलेली विद्यार्थीनी तिचीच वाट बघत होत्या.

" सलाम गंगुबाई , ही माधवी. "अ " वर्गात होती. गुणांनुसार आता " क " वर्गात शिफ्ट व्हायला पाहिजे तर ऐकत नाही. " ती शिक्षिका म्हणाली.

" तुम्ही जा. मी समजवते. दोन मिसळपाव. " गंगुबाई म्हणाली.

शिक्षिका निघून गेली. स्टाफ खोलीत दोन मिसळपाव घेऊन आला.

***

" मिसळपाव खाणार ?" गंगुबाईने विचारले.

" नाही नको. " माधवी रडत म्हणाली.

" क वर्गात कशी आलीस ?" गंगुबाईने मिसळपाव खात माधवीला विचारले.

" माझा बॉयफ्रेंड " क " वर्गात होता. त्याच्यासाठी मी मुद्दाम नापास झाले आणि त्याच्या वडिलांनी शाळाच बदलली. " माधवी रडत म्हणाली.

गंगुबाई जोरजोरात हसली.

" माझी कथा ऐकशील ?" गंगुबाई म्हणाली.

" हम्म. " माधवी म्हणाली.

मग गंगुबाई आपली कथा सांगू लागली.

***

झूमे रे गोरी घूमे रे गोरी
चली कहाँ चोरी चोरी
हवा से है बंधी डोरी रे
शर्म छोड़ी थोड़ी थोड़ी
नैनों की ये बोले जोड़ी
बेशर्मी करने दे रे

गरबा चालू असताना गंगाने रमणिकच्या पायाला ठेचले. तो किंचाळला.

" गंगा , तुला कितीदा सांगितले गरबा खेळताना नको पायावर पाय ठेवू. " रमणिक म्हणाला.

" अरे चुकून लागते. " गंगा म्हणाली.

" बरं ऐक ना. " क " वर्गात कधी शिफ्ट होणारे ?" रमणिकने विचारले.

" नाही. बाबांना खूप वाईट वाटेल. बाबा नेहमी म्हणतात अ म्हणजे अच्छे , ब म्हणजे बच्चे आणि क म्हणजे कच्चे. " गंगा म्हणाली.

" अग क म्हणजे कलाकार पण असत. तुझे स्वप्न होते ना गॅदरिंगमधल्या नाटकात मुख्य भूमिका करायचे. मी मॅडमला बोललोय. " अ " वर्गातल्या मुलांना गॅदरिंगमध्ये भाग तरी घेऊ देतात का? नुसते अभ्यास अभ्यास. एकदा तू स्टार बनलीस ना शाळेची तर तुझे बाबा काही बोलणार नाहीत. " रमणिक म्हणाला.

" ठिके. कसे शिफ्ट व्हायचे ?" गंगा म्हणाली.

" या पेपर्सवर साइन कर. " रमणिक म्हणाला.

गंगाने साइन केले.

दुसऱ्या दिवशी रमणिक " क " वर्गाच्या दारापर्यंत गंगाला सोडायला आला.

" रमणिक , मला खूप भीती वाटत आहे. इथले मुले बघ ना ऑफ लेक्चरमध्ये अभ्यास न करता विमान उडवताय. " गंगा घाबरून म्हणाली.

" अग , तू त्या रिकाम्या बेंचवर बस. मी मॅडमला बोलावून आणतो. " रमणिक म्हणाला.

रमणिक निघून गेला. तो पुन्हा कधीच आला नाही. थोड्यावेळाने मॅडम आल्या.

" आज आपल्या वर्गात एक नवीन विद्यार्थीनी आली आहे. गंगा. " मॅडम म्हणाल्या.

" मॅडम , रमणिक कुठे आहे ? आणि मला गॅदरिंगमध्ये मुख्य नायिकेची भूमिका भेटेल ना ?" गंगाने विचारले.

सर्वजण हसले.

" बाळा , रमणिक "अ " वर्गात तुझ्याजागी शिफ्ट झालाय. आणि यावर्षी प्रिन्सिपलची आई वारल्यामुळे गॅदरिंग होणार नाही. " मॅडम म्हणाल्या.

" मॅडम , मला परत अ वर्गात जायचे आहे. " गंगा म्हणाली.

" क वर्गातले मूळ विद्यार्थी अ वर्गात जाऊ शकतात. पण अ वर्गातून क वर्गात एकदा आले की परत जाऊ शकत नाही. " मॅडम म्हणाल्या.

गंगावर संकटांचे डोंगर कोसळले. ती खूप रडली. खूप विरोध केला पण व्यर्थ. शेवटी गंगाला " क " वर्गातच रहावे लागले.

🎭 Series Post

View all