गंगुबाई ! पार्ट 3

.


रेश्माबाईला खडू खाण्याची खूप आवड होती. " क " वर्गातल्या सर्वच विद्यार्थ्यांना तिच्यासाठी खडू चोरून आणावे लागत. एकेदिवशी रेश्माबाई खडू खात असतानाच चक्कर येऊन पडली. डॉक्टरांनी तिच्या पोटात जंतू झाल्याचे सांगितले. आता रेश्माबाईचे ऑपरेशन होणार होते. गंगू वर्गात आली.

" कशी आहे रेश्माबाईची तब्येत ?" एकीने विचारले.

" खडू खाऊन खाऊन पोटात जंतू झालेत. सहा महिने तर ती शाळेत येणार नाही. आता " क " वर्गाचा कुणी मॉनिटर नसेल. आपणच आपली जबाबदारी घ्यायची. " गंगू म्हणाली.

" नाही. तू आमची मॉनिटर बन. " एकजण म्हणाली.

बाकीच्यांनीही हीच मागणी केली. शेवटी गंगुबाई " क" वर्गाची मॉनिटर झाली.

***

तेव्हा ऑफ पिरेड होता. एक मुलगा " क " वर्गात आला.

" मी मंतनू. गंगुबाईसाठी मॉनिटरचा खास युनिफॉर्म शिवून घ्यायचा होता. " मंतनू म्हणाला.

" असले कसले नाव आहे मंतनू ? चिमणीने टट्टी केली अस वाटतय. " गंगुबाई म्हणाली.

सर्वजण हसले.

" तुमचे माप घ्यायचे होते. तुम्हाला पांढराच रंगाचे कपडे हवे ना ?" मंतनूने विचारले.

" कोणता पांढरा आहे तुमच्याकडे ? पनीरसारखा की अंड्यासारखा ? भातासारखा की ताकासारखा पांढरा ? खोबऱ्यासारखा की टिशूपेपरसारखा ?" गंगुबाईने विचारले.

" चार्जरसारखा पांढरा. " मंतनू म्हणाला.

हळूहळू दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मंतनू रोज शाळेत यायचा आणि गंगुबाईसोबत बदामसत्ती खेळत बसायचा. एकदिवस गणिताच्या सरांनी दोघांना पकडले.

" गंगू , स्टँड अप. खिडकीतून कोणासोबत पत्ते खेळत आहेस ?" सरांनी विचारले.

" सर , तुम्ही प्रोबालिटी शिकवताय ना तर मंतनू मला प्रॅक्टिकल शिकवतोय. " गंगुबाई म्हणाली.

सर्वजण हसले.

***

नंतर शाळेत "स्टुडंट प्रेसिडेंट " या पदासाठी निवडणूका घोषित झाल्या. गंगुबाईही निवडणूकीला उभी राहिली. प्रतिस्पर्धी होती रझियाबाई. रझियाबाईने खूप बोलावले तरी गंगुबाई तिला भेटायला गेली नाही. एकेदिवशी कॅन्टीनमध्ये गंगुबाई मिसळपाव खात होती. तेवढ्यात तिथे रझियाबाई आली. तरीही गंगुबाई मिसळपाव खाण्यातच मग्न होती. रझियाबाईने मग कोल्डड्रिंक हातात घेतले आणि मिसळमध्ये ते ओतले.

" हे बघ गंगुबाई , प्रेसिडेंट पदाचा नाद सोडून दे. प्रेसिडेंट तर मीच बनणार. रझियाबाई. " रझियाबाई म्हणाली.

इतके बोलून रझियाबाई निघून गेली.

***

नंतर रझियाबाईने दुपारी तीन वाजता शाळेच्या असेंम्बली हॉलमध्ये स्वतःचे स्पीच ठेवले होते. सर्वाना बोलवण्यात आले. गंगुबाईने नेमक्या त्याच वेळी कॅन्टीनमध्ये मोफत आईस्क्रीम वाटले. मोफत आईस्क्रीम भेटताय म्हणून सर्वांनी कॅन्टीनमध्ये गर्दी केली. रझियाबाईच्या भाषणाला कुणीच हजर राहिले नाही. सर्व सीट्स , पूर्ण हॉल रिकामा होता. रझिया प्रचंड चिडली. तेवढ्यात गंगुबाईने हॉलमध्ये प्रवेश केला.

" अरेरे इतके बॅनर्स , पोस्टर्स , वॉर क्राय याचा काहीच फायदा झाला नाही ? अखिल भारतीय भुकेले संघटनेचे सदस्य असतात शाळेचे विद्यार्थी. त्यांना फ्रिची आईस्क्रीम दिली ना तर ते गर्दी करतात. याला म्हणतात भूक सायकोलॉजी. तुला नाही कळणार. नाव रझिया असले म्हणून कुणी सुलतान बनत नाही. प्रेसिडेंट पदाचा नाद सोडून दे रझिया. " गंगुबाई काळे गॉगल घालत म्हणाली.

रझियाच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

***

" ये गंगुबाई , कसा चाललाय प्रचार ?" करीम म्हणाला.

" चांगला चाललाय भाई. थोडी मदत हवी होती. " गंगुबाई म्हणाली.

" कसली मदत ? बहीण आहेस तू माझी. जे हवे ते माग. "

" पर्वा गणिताचा पेपर आहे. जर " क " विद्यार्थ्यांच्या हाती आधीच पेपर पडला तर ते सर्व पास होतील. माझ्या कानावर आले की तुम्ही पेपर लीक करू शकतात. "

" नाही नाही. बहिणीला परीक्षेआधीच पेपर देऊन मी तिचे करियर बिघडवू शकत नाही. हवं तर मी तुला गणित शिकवतो. " करीम म्हणाला.

" गोष्ट फक्त एकाच गंगूची नाही भाई. त्या साठ विद्यार्थ्यांची आहे ज्यांना गणितातले " ग " देखील येत नाही. ट्रीग्नोमेट्रीचे पुस्तक उघडलं तर त्यांना उलट्या येतात. अल्जेब्रा थोडं सोपं जातं पण शेवटचं उत्तर शोधेपर्यंत कधी घंटा वाजते कळतच नाही. पायथागोरस तर रोज पलंगाच्या पायथ्याशी येऊन झोपतो अशी स्वप्ने पडताय त्यांना. गणिताने करीयर अडवून ठेवलंय भाई. "

" ठिके. हा घे पेपर. पण जपून बर. " करीम म्हणाला.

***

रझियाने आपला फासा टाकला. गणिताच्या पेपरदिवशी गंगुबाईच्या चिठ्ठ्या देसाईसरांनी पकडल्या. देसाईसर गंगुबाईला प्रिन्सिपलकडे घेऊन जाऊ लागले.

" आता तुझा खेळ संपला. कश्याला रझियाविरुद्ध उभी राहिली ? मी पाचशे रुपये आणि एक प्लेट मिसळपाव घेऊन चिटिंग करू देत होतो ना. रझियाने मला दोन प्लेट मिसळपावची ऑफर दिलीय. आता प्रिन्सिपल तुला सस्पेन्ड करतील आणि प्रेसिडेंटपद तर दूरच शाळेत पण नाही राहणार तू. " देसाईसर म्हणाले.

" थांबा देसाई सर. तुम्ही माझ्या चिठ्ठ्या प्रिन्सिपल सरांसमोर टाका मग मीही तुमच्या चिठ्ठ्या टाकते. " गंगुबाई ऐटीत म्हणाली.

" माझ्या कसल्या चिठ्ठ्या ?" देसाई सरांना घाम फुटला.

" गणित शिकवतात ना तुम्ही ? मग भूगोलाच्या जाधवमॅडमला कविता लिहून का पाठवतात ? प्रिन्सिपलला सांगू भूगोल आणि गणितात काय केमिस्ट्री चालू आहे ते ?" गंगुबाई म्हणाली.

" गंगू , तू बस ना जागेवर. पेपर दे. या चिठ्ठ्या मी फेकून देतो. " देसाई सर म्हणाले.

" गणिताचे शिक्षक आहात तर शिक्षकच रहा. रझियाचे चमचे नका बनू सर. कारण जिंकणार तर मीच. गंगुबाई क वर्गवाली. " गंगुबाई म्हणाली.

***

सुरेखा आज एकटीच वर्गात बसून रडत होती. तेव्हड्यात तिथे गंगुबाई आपल्या मैत्रीणीसोबत आली.

" का ग सुरेखा ? भोकाड का पसरला आहेस ? गणितात तर सर्वाना आऊट ऑफ मार्क्स द्यायला लावलेत मी त्या देसाई सरांना. " गंगुबाई म्हणाली.

" प्रेमाचे गणित नाही जमले मला गंगुबाई. "अ " वर्गातल्या मुलाने मला रिजेक्ट केलं. मला पण बॉयफ्रेंड हवा. " सुरेखा रडू लागली.

" क वर्गातल्या मुलींच्या नशिबी प्रेम नसत पोरी. " एकजण म्हणाली.

***

" काय ? मी सुरेखासोबत रिलेशनमध्ये जाऊ ?" मंतनू चिडला.

" हे बघ , मला क वर्गातल्या मुलीही रिलेशनमध्ये जाऊ शकतात हे सिद्ध करायचे आहे. निवडणूकीत फायदा होईल. " गंगुबाई म्हणाली.

" आपण आहोत की रिलेशनमध्ये ?"

" हे बघ. निवडणूका जवळ येत आहेत. आपण ब्रेकअप करू. माझी स्वप्ने मोठी आहेत. निब्बी बनून नाही राहायचं मला. सुरेखाचा बाप मोठा फॅशन डिझायनर आहे. उद्या तुही मंतनू मल्होत्रा बनशील. पत्ते तर आपण ऑनलाइन जंगली रम्मीवरही खेळू शकतो. " गंगुबाई डोळे पुसत म्हणाली.

हे ऐकून मंतनू स्वप्नात हरवला आणि तो सुरेखासोबत रिलेशनमध्ये गेला.

***

" बघ. मंतनूने लगेच ब्रेकअप केलं. आयुष्यात जस कांजण्या एकदा तरी होतातच ना तस निब्बा निब्बीची फेज पण एकदा तरी येतेच. वाटते प्रियकरच जग आहे. पण प्रेमाचे भूत उतरले की वास्तव कळते. आणि खऱ्या जगात फक्त पैसा महत्वाचा. करीयर महत्वाचे. " गंगुबाई म्हणाली.

" पण मला क वर्गात नाही जायचे. " माधवी म्हणाली.

" बर एक काम कर. हे मिसळ आणि हे कोरडा पाव. कोरडा पाव खाल्ला की तुला अ वर्गात टाकेल. नुसती मिसळ खाल्ली की तुला क वर्गात टाकेल आणि दोन्ही खाल्लं की ब वर्गात टाकेल. " गंगुबाई म्हणाली.

माधवीने नुसता पाव खाल्ला. गंगुबाई बाहेर आली.

" मॅडम , हिला अ वर्गात टाका. " गंगुबाई म्हणाली.

" पण गंगुबाई ?"

" तुमच्या टेबलावर पैसे ठेवलेले दिसतील. उद्या ही माधवी अ वर्गात दिसली पाहिजे. "

***

गंगुबाईने निवडणूक जिंकली. कॅन्टीनमध्ये सर्वजण जमले होते.

" आज सर्वाना माझ्याकडून मिसळपावची पार्टी. रझियासाठी 2 प्लेट पार्सल पाठवून द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा. कुणीच ढ नसते. सर्वजण कश्या न कश्यात हुशार असते. कुणाला गणित तर कुणाला चित्रकला कुणाला खेळ तर कुणाला डान्स. पालक शिक्षक प्रिन्सिपल स्टाफ कुणालाच घाबरायचं नाही. स्वाभिमानाने जगायचं. स्वतःला कमी समजायचं नाही. शाळेचं जीवन एकदाच येत जीवनात. मनसोक्तपणे जगायचं. " गंगुबाई म्हणाली.

सर्वांनी टाळ्या वाजवल्या. सर्वकाही सुरळीत चालू होते. पण...

🎭 Series Post

View all