गंधबावरे 68
"श्रेया, मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. बोलू का?" मयूर दबकतच म्हणाला.
"श्रेया, मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. बोलू का?" मयूर दबकतच म्हणाला.
"अरे, बोल ना; त्यात एवढे विचारण्यासारखे काय आहे. तू स्पष्ट जरी बोललास तरी मी काही म्हणणार नाही; कारण आधीच तू मला इतकी मदत केली आहेस त्याचे खूप उपकार आहेत." श्रेया म्हणाली.
"तू उपकाराची भाषा बोलणार असशील तर मी आत्ताच निघून जाईन. उपकार वगैरे गेले खड्ड्यात. या मैत्रीमध्ये नो सॉरी नो थँक्यू हा नियम असतो तुला माहीत नाही का? म्हणे उपकार केलेस." मयूर तोंड वाकडे करतच म्हणाला.
"बरं बाबा, उपकाराची भाषा मी बोलणार नाही. झालं खूश. बोल तुला काय बोलायचे आहे ते?" श्रेया म्हणाली.
"बघ हं. म्हणजे तुला जे काही वाटते ते स्पष्ट बोल; पण माझ्या कानाखाली आवाज वगैरे काढू नकोस आणि चप्पल वगैरे तर अजिबातच मारू नकोस." मयूर घाबरतच म्हणाला.
"अरे, मी कशाला चप्पल वगैरे काढू आणि तुला मी कशाला मारेन? तुझं आपलं काहीतरी असतंय." श्रेया हसतच म्हणाली.
"हसतेस काय? माझा प्रश्न ऐकल्यावर तू असेच करणार आहेस. मला माहित आहे." मयूर नाराजीच्या सुरात म्हणाला.
"नाही रे, बोल पटकन तुला काय बोलायचे आहे ते?" श्रेया म्हणाली.
"काही नाही." मयूर म्हणाला.
"काही बोलायचं नाही का? बरं मग मी निघू का?" श्रेया म्हणाली.
"अगं ये. थांब थांब बोलायचं आहे मला." मयूर लगेच म्हणाला.
"अरे, मग बोल ना! काय मुहूर्त काढून देऊ?" श्रेया वैतागून म्हणाली.
"हे बघ श्रेया, जेव्हा पहिल्यांदा तू मला भेटलीस तेव्हाच तू माझ्या मनात घर करून गेलीस. तुझ्याशी बोलायचं म्हणून खूप ठरवलं पण मला काही बोलता आले नाही. शेवटी तुझ्याकडे पाहताना आपण कधी बोलू लागलो हे मला समजले नाही आणि बोलता बोलता तुझ्याशी कधी मैत्री झाली हे तर कळलेच नाही. जेव्हा तू माझ्याकडे मदत मागायला आलीस तेव्हाच मला खूप भारी वाटलं होतं. तुला माझी गरज आहे हे मला जाणवले होते. बरं ती गरज, मी तुला केलेली मदत हे सगळे विसरून जा. आता या वेळेला मी मयूर, तुझ्यासमोर बसलेलो आहे आणि आता तुला हा प्रश्न विचारत आहे की, तू मला अशीच आयुष्यभर साथ देशील का? तू आयुष्यभर माझ्या सोबत राहशील का? मला तुला आयुष्यभर मदत करायला आवडेल. श्रेया, माझ्याशी लग्न करशील का?" मयूर म्हणाला.
"हे बघ मयूर, मी सध्या तरी या गोष्टीचा विचार केला नाही. तू खरंच खूप चांगला मुलगा आहेस. मला तुझ्याबद्दल काहीही आढेवेढे घ्यायचे नाहीत; पण सॉरी. तू उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. मी सध्या तरी या गोष्टीचा अजिबात विचार केला नाही." श्रेया म्हणाली.
"श्रेया, मला तुझे उत्तर हो किंवा नाही मध्ये हवं आहे. उगीच आढेवेढे घेत बसू नकोस." मयूर म्हणाला.
"मयूर, तू गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ तू खूप चांगला मुलगा आहेस. तुला कोणीही पसंत करेल." श्रेया मयूरला समजावत म्हणाली.
"हो किंवा नाही" मयूर पुन्हा म्हणाला.
"सॉरी मयूर, मी आत्ताच या गोष्टीचा विचार केला नाही." श्रेया पुन्हा म्हणाली.
"फक्त हो किंवा नाही." मयूर आवाज चढवून म्हणाला.
"आत्ता तरी नाही." श्रेया म्हणाली.
"ठीक आहे." असे म्हणून मयूर तिथून जाऊ लागला; तेव्हा श्रेयाला कसेतरीच वाटू लागले. तिच्या मनात खूप अपराधापणाची भावना आली.
"मयूर, ऐक ना." असे म्हणून श्रेया त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली; पण मयूर काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हता.
**************************
दोन वर्षानंतर....
मयूर डायमंड कॉफी शॉपमध्ये गेला होता. तिथे एका खुर्चीत बसून तो मोबाईल पाहत होता. त्यानंतर त्याने एक कोल्ड कॉफी ऑर्डर केली आणि तो पुन्हा मोबाईलमध्ये तोंड खूप बसला. तिथे त्याच्या श्रेयाच्या भेटीतील आठवणींना उजाळा आला होता.
"हॅलो मिस्टर" या आवाजाने त्याने मोबाईल मधून डोके वर केले. त्याने पाहिले तर समोर एक सावळ्या रंगाची तरुणी त्याच्यासमोर येऊन उभा राहिली होती. त्याने तिच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला. त्याला ही कोण आहे हे लक्षातच आले नाही. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. 'कोण आहे ही? माझ्याकडे हीचे काय काम असेल? मी तरी हिला ओळखत नाही; ही मला कशी ओळखते? दोन वर्षांनी मी या शहरात आलो आहे आणि ही मुलगी मला चक्क ओळखते! काय संबंध आहे?' मयूर मनातच बडबडला.
"मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." ती मुलगी म्हणाली.
"आपण एकमेकांना ओळखतो का? माझ्या माहितीनुसार मी तरी तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय! मी अपरिचित व्यक्तीसोबत कधीच बोलत नाही." मयूर असे म्हणत पुन्हा मोबाईल पाहू लागला.
"हॅलो, मी अनुश्री. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे." अनुश्री असे म्हणताच मयूरच्या मनामध्ये पाल चुकचुकली.
"ठीक आहे. इथे तुम्ही बसू शकता. बसून काय ते बोलूयात का?" असे मयूर म्हणतात अनु समोरच्या खुर्चीत बसली.
"तुमचे लग्न झाले आहे का?" अनु म्हणाली.
"नाही. का? तुम्हाला माझ्याशी लग्न करायचे आहे का?" मयूरने प्रति प्रश्न टाकला.
"काय! मग मला सांगा तुम्ही श्रेयाला ओळखता?" अनु पुन्हा म्हणाली.
"हो. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तुम्ही देखील श्रेयाची मैत्रीण आहात ना?" मयूर म्हणाला.
"हो. खूप चांगली मैत्रीण आहे; पण काही गैरसमज आमच्यात झाले आहेत ते दूर करायचे आहेत. पण तिची काहीच भेट होत नाहीये. ती कुठे आहे हे तुम्हाला माहित आहे का? म्हणजे पुण्यात आहे हे माहित आहे; पण पुण्यामध्ये नेमके कुठे राहते याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?" मयूर म्हणाला.
"कोणता गैरसमज झाला आहे आणि तुम्हाला नक्की काय दूर करायचे आहे?" मयूर प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.
"खूप मोठा गैरसमज झाला आहे. म्हणजे आम्हाला तसे भासवण्यात आले असेल असा माझा संशय होता आणि तो आता खरा ठरत आहे. खरंतर मिहिरने मला तुमचा आणि तिचा फोटो दाखवला होता. एक नव्हे तर चार-पाच फोटो दाखवले होते; त्यामध्ये असे दिसत होते की तुमच्या दोघांचे अफेअर आहे पण इथे तर तुमचे लग्न झाले नाही असे तुम्ही म्हणत आहात याचा अर्थ मी काय समजावा? त्या फोटोमध्ये नक्कीच तुम्ही होता. त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही माझ्या मनातून गेला नाही. ती व्यक्ती तुम्हीच होता. जे काही असेल ते प्लीज मला स्पष्ट सांगा." अनु म्हणाली.
"आता त्या गोष्टीचा काहीच उपयोग नाही. तसेही तुमचे लग्न झाले आहे ना? मग तुम्हाला या गोष्टी कशासाठी हव्या आहेत? श्रेया तिच्या आयुष्यात सुखी आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहा ना. पुन्हा तिला तुमच्या आयुष्यात आणून वादळ कशाला ओढवून घेताय. तुमचा संसार सुखाचा सुरू आहे तो करा ना." मयूर समजावत म्हणाला.
"आमचा संसार सुरू झाला नाही तर तो सुखाचा कसा होईल? मला जे काही आहे ते सत्य जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला जे काही माहित आहे ते स्पष्ट शब्दात सांगा." अनु म्हणाली.
"संसार सुरू झाला नाही म्हणजे? तुमच्या दोघांचे लग्न तर होणार होते ना? श्रेयाने तर तसे सांगितले होते." मयूर आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
"ते सगळे तुम्हाला मी नंतर सांगेन; पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या." अनु म्हणाली.
"कोणत्या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर हवे आहे?" मयूर म्हणाला.
"श्रेया कुठे आहे? तिचा काही काॅन्टॅक्ट वगैरे आहे का? तिने नंबरही बदलला आहे; त्यामुळे काहीच माहित नाही. प्लीज, तुम्ही सांगाल का?" अनु म्हणाली.
"दोन महिने झाले तिच्याशी काहीच संपर्क नाही. आधी आम्ही भेटायचो; पण अचानक काय झाले काय माहित? दोन महिने झाले तिचा काहीच संपर्क नाही." मयूर म्हणाला.
पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा