गंधबावरे 15

एक आगळीवेगळी प्रेमकथा


आता सगळे मिहिर आणि अनुच्या घरचे लग्नाच्या तयारीला लागले होते. मिहिरच्या बाबांनाही डिस्चार्ज मिळाला होता. त्यांची तब्येत आधीपेक्षा सुधारली होती. दोघांच्याही घरचे सगळे आनंदात होते. या दोघांच्या लग्नाची तयारी अगदी जोरात चालू होती. मिहिरच्या बाबांच्या इच्छेनुसार अगदी जवळची तारीख ठरवण्यात आली होती. लवकरात लवकर या दोघांचे लग्न व्हावे अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार अगदी जवळचीच म्हणजे त्याच महिन्यातील तारीख त्यांनी फिक्स केली होती.

एके दिवशी मिहिरने अनुला भेटण्यास बोलावले त्याप्रमाणे अनुदेखील अगदी नटून थटून त्याला भेटण्यास गेली होती. जरी ते खोटं लग्न करणार असले तरीही अनुच्या मनामध्ये मिहिरचे स्थान एक नवरा म्हणूनच होते. अनुला मिहिर आधीपासूनच आवडत होता आणि या खोट्या लग्नामुळे का होईना एका वर्षासाठी तो नवरा होणार यातच तिचा आनंद होत. ती त्याला इम्प्रेस करण्यासाठी अगदी व्यवस्थित आवरून आली होती पण ती कितीही नटली थटली तरीसुद्धा तिच्या सावळ्या रंगाने ती खुलून दिसत नव्हती. तिने कितीही मेकअप केला तरीही तिचा सावळा रंग दिसून येत होता त्यामुळे ती कधीच मिहिरच्या मनात भरणार नव्हती. मिहिरने बोलावलेल्या ठिकाणी अनु अगदी वेळेत गेली होती. तो चिडेल याची एकही संधी त्याला मिळू नये असा प्रयत्न ती करत होती.

"हाय, तू मला इथे कशासाठी बोलावलं आहेस? काही काम होतं का?" अनु म्हणाली.

"हो. खूप महत्त्वाचं काम होतं. आता जे काही चालू आहे त्याविषयी मला थोडी चर्चा करायची होती म्हणून मी तुला बोलावलं आहे. एकदा का लग्न झालं की या सगळ्या गोष्टी पाठीमागे राहून जातील आणि मग पुढे सगळे काही अवघड होऊन बसेल म्हणून मी तुला इथे बोलावलं आहे." मिहिर म्हणाला.

"अच्छा. मग असे कोणते महत्त्वाचे काम आहे?" अनुला काही समजत नव्हते.

"हा घे कागद आणि याच्यावर सही कर." मिहिर म्हणाला तशी प्रश्नार्थक नजरेने अनु त्याच्याकडे पाहू लागले.

"असे काय पाहत आहेस? मला कधी पाहिली नाहीस का? माझ्या चेहऱ्यावर नाही या कागदावर सही कर म्हणून म्हटले आहे." मिहिर म्हणाला.

"तुझ्या चेहऱ्यावर सही करायला लागला मला काय वेड लागलं आहे का? कागदावरच सही करायचे आहे हे मला माहित आहे पण कशासाठी मी सही करायची हे तू मला सांगितले नाहीस त्यामुळे मी तुझ्याकडे पाहत आहे." अनुदेखील थोडीशी तणतणतच म्हणाली.

"ते एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना त्यासाठी सही हवी आहे. नाहीतर वर्ष झाल्यानंतर तू म्हणशील की असे कुठे कॉन्ट्रॅक्ट होते का? असे कॉन्ट्रॅक्ट नव्हते आणि मग सोडून जायला तयार होणार नाहीस यासाठी आहे ते." मिहिर म्हणाला.

"मी इतकी मूर्ख नाही की तुझ्याबरोबर आयुष्यभर संसार करायला. मी एकदा शब्द दिला की तो तंतोतंत पाळते कधीच माघार घेत नाही आणि स्वार्थासाठी तर मुळीच वागत नाही. नाहीतर तुझ्यासाठी एक वर्ष कॉन्ट्रॅक्ट करायला मला वेड लागलं नसतं." अनुच्या तोंडातून चुकून तुझ्यासाठी असे गेले आणि तो शब्द मिहिरला भावला. तो एक तिच्याकडेच पाहू लागला.

"माझ्याकडे काय बघतोयस. इथे सांग कुठे सही करायची आहे? मी लगेच करायला तयार आहे." असे अनु म्हणताच मिहिरने कुठे सही करायचे ते दाखवले त्याप्रमाणे अनु कॉन्ट्रॅक्टवर सही करत होती.

"तुला सही करता येते ना? की अंगठा उठलायला इंक देऊ." मिहिर गंमतीने म्हणाला.

"मी इतकी अडाणी वाटले का? तुझ्या ऑफिसमध्ये महिनाभर तरी मी काम केले आहे. तुझ्यापेक्षा कदाचित मला थोडं जास्तच येतंय. पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लीट केले शिवाय माझा बायोडेटा तू तुझ्या या चष्म्यातून पाहिला आहेस आणि एवढी मोठी मस्करी करत आहेस." अनु चिडून म्हणाली.

"ठिक आहे. आता लग्न झाल्यानंतर मर्यादेत राहायचं. उगीच आई-बाबा म्हणतात किंवा तुझ्या घरचे म्हणतात म्हणून जास्त जवळीक साधायचे नाही. शिवाय मला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करायचे नाही. मी माझ्या मनात येईल तसेच वागणार तू मला अडवायचे नाही. तुला तो अधिकार कोणीच दिला नाही. हे लग्न म्हणजे एक नाटक आहे हे तू अजिबात विसरायचं नाही आणि माझ्यात मुळीच गुंतायचे नाही कारण एक वर्षानंतर आपण दोघे वेगळे होणार आहोत. याचे भान नेहमी ठेवायचे आणि एक वर्षानंतर तूच काहीतरी कारण काढून माझ्याशी भांडून माझ्या आयुष्यातून निघून जायचे. नाहीतर ऐनवेळी घोळ करशील." मिहिर अनुला बजावत होता.

"तेवढी मी मूर्ख नाही. मला सगळं काही समजते आणि सगळं काही माहित आहे. तू पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी मला सांगत जाऊ नकोस. तुझ्याशी जवळीक साधण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. मी माझी मोकळी आहे शिवाय तुला सुद्धा या अटी लागू पडतात. तू मला अजिबात अडवायचे नाही. मला कोणत्याही बंधनात अडकवायचे नाही. मी फक्त काका आणि काकूंसाठी त्या घरात येत आहे. तुझा आणि माझा काहीच संबंध नाही हे तू सुद्धा लक्षात ठेव. नाहीतर ऐनवेळी बायको समजून माझ्यावर बंधने घालत बसशील तर ते मी खपवून घेणार नाही." अनुनेही मिहिरला बजावले.

"ठीक आहे. आता सही कर म्हणजे मी जायला मोकळा." असे मिहिर म्हणताच अनुने त्याच्यावर सही केली.

"थँक्यू. चल आता कुठेतरी कॉफी प्यायला जाऊ नाहीतर तू आणि म्हणशील की फक्त सही करायला बोलावलं, काम झालं की लगेच गेला." मिहिर म्हणाला.

"उपकार करणार असलास तर मला काही नको." अनु म्हणाली.

"उपकार कसले; तू एवढी मला मदत करत आहेस शिवाय मलाही कॉफी प्यायची आहे म्हणून माझ्यासोबत येशील का? असे विचारत आहे." मिहिर म्हणाला.

"असे असेल तर ठीक आहे मी येते." असे म्हणून दोघेजण कॉफी शॉपमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले. कॉफी पितानाही दोघांमध्ये थोडसं वाजलच.

\"कधी पहावे तेव्हा हा मला ओरडतच असतो. एकही संधी सोडत नाही. मी किती काटेकोरपणे वागण्याचा प्रयत्न करत असते पण हा कशातूनही एखादी चूक काढतो आणि मला बोलतो, टोमणे मारतो. आता यांच्यासोबत एक वर्ष कसे काढायचे? तेव्हा किती मान अपमान होतात काय माहित? देवा रे देवा, माझे कसे होणार? हा नवरा नाही पण एक मित्र म्हणून तरी माझ्या आयुष्यात मला हवा आहे, पण याच्याकडून तसे काही होईल असे वाटत नाही. बघू आता सहवासाने तरी हा किमान माझा मित्र बनेल की नाही." अनु मनातच विचार करू लागली.

"हॅलो मॅडम, कुठे हरवलात?" मिहिर म्हणाला.

"अं.. कुठे नाही. काय झालं?" अनु म्हणाली.

"काही नाही. जाऊया काय आता." मिहिर म्हणाला.

"कुठे?" अनु म्हणाली.

"आपापल्या घरी. मी पिकनिकसाठी विचारत नाही." मिहिर म्हणाला.

"हं." अनु म्हणाली आणि दोघेही आपापल्या घरी गेले.

यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all