गंधबावरे 10

एक आगळीवेगळी प्रेमकथा


मिहिर त्याच्या बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे गेल्यानंतर त्याने सगळी प्रोसेस पूर्ण केली आणि बाबांना ऍडमिट करून घेतले. त्यांना सौम्य अटॅक आला होता. डॉक्टरांनी त्यांची सगळी प्रोसेस सुरू केली होती. त्यांना सलाईन लावण्यात आले होते सगळी ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू होती. इकडे मिहिर आणि त्याची आई टेन्शनमध्ये होते. अनुलादेखील खूप टेन्शन आले होते. हे सगळे तिच्यामुळेच घडले असे तिला सारखे वाटत होते. अपराधीपणाची भावना करून ती एका बाजूला शांत बसली होती. बऱ्याच वेळाने मिहीरच्या आईला थोडासा धीर द्यावा या उद्देशाने ती त्यांच्याजवळ गेली.

"काकू, तुम्ही शांत रहा. काही टेन्शन घेऊ नका. काका अगदी व्यवस्थित होतील. त्यांना काही होणार नाही." अनु म्हणाली.

"त्यांना कधीच कोणताच त्रास नव्हता आणि असे अचानक ते कसे काय चक्कर येऊन पडले? मला तर खूप भीती वाटत आहे. हे सगळे अचानक कसे काय घडले?" असे म्हणून मिहिरची आई रडू लागली.

"काकू, तुम्ही रडू नका. सारे काही व्यवस्थित होईल." अनु म्हणाली.

"आता मिहिरचे आणि तुझे लग्न झाल्यावरच सगळं व्यवस्थित होणार. त्याशिवाय काही व्यवस्थित होईल असे मला वाटत नाही. काल पहिल्यांदा मिहिरने यांना उलट उत्तर दिले. याआधी यांचा शब्द कधीच न ओलांडलेला मिहिर काल त्याला काय झाले काय माहित. काल त्याचा हा असा राग मी पहिल्यांदाच पाहिला आणि त्याच्या बाबांनी देखील पहिल्यांदाच पाहिला असल्यामुळे राग अनावर होऊन ते चक्कर येऊन पडले असावेत." मिहिरची आई म्हणाली.

"काकू, काकांना काही होणार नाही आणि आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे माझी खात्री आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका." अनु म्हणाली. मिहिरच्या आईला समजावून सांगितल्यानंतर अनु थोडीशी बाजूला गेली आणि एकांतात विचार करू लागली.

\"खरंतर हे सगळे माझ्यामुळे झाले आहे. मी जर या सर्वांना सांगितले असते की मिहिरचे आणि श्रेयाचे एकमेकांवर प्रेम आहे. मिहिरला श्रेया आवडते तर काका कदाचित समजून घेतले असते आणि त्या दोघांचे लग्न झाले असते. मी शांत राहिले त्यामुळे हे सगळे घडले आहे. आता काका शुद्धीवर आल्यानंतर त्यांना सारे काही खरे खरे सांगते म्हणजे मी या सर्वातून मोकळी होईन. मला मिहिर आवडतो पण मी माझ्या स्वार्थासाठी एखाद्याच्या जीवाशी खेळू शकत नाही. शिवाय श्रेया माझी बहीण आणि मैत्रीण देखील आहे. तिच्या सुखातच माझे सुख अशी भावना मला ठेवायला हवी. स्वार्थासाठी मी कोणत्याही पातळीवर जायला नको.\" असा विचार करत ती उभी असतानाच तिकडून मिहिर आला.

"झालं का मॅडम तुमच्या मनासारखं. तुला हेच हवं होतं ना? बाबांसमोर बोलायला काय झालं होतं? तुला तर सर्व काही माहीत असताना तू शांत का राहिलीस? माझे श्रेयावर प्रेम आहे हे तू का सांगितले नाहीस?" मिहिर अनुवर ओरडतच म्हणाला.

"तू सुद्धा सांगू शकला असतास ना? एकतर तू तुझ्या बाबांसोबत भांडला आहेस. तुझ्यामुळे सारे काही घडले आहे आणि वर मला दोषी ठरवत आहेस? मान्य आहे सारे काही माहीत असून मी काही बोलले नाही पण तू तरी बोलायला हवा होतास. तू जर काकांना सारे काही खरे खरे सांगितले असतेस तर मी सुद्धा तुझ्या मागुन री ओढली असती ना. अरे तू त्यांचा मुलगा आहेस तू बोलला नाहीस मी तर परकीच असे म्हणून शांत राहिले." अनु म्हणाली.

"मी चुकलो. बाबांना सारे काही सांगायला हवे होतो पण आता अशी परिस्थिती ओढवली आहे की मी काही करू शकत नाही." मिहिर म्हणाला.

"आता काकांना शुद्धीवर आल्यानंतर मीच त्यांना सारे काही खरे खरे सांगणार आहे म्हणजे मी या सगळ्यातून मोकळी होईन. आधीच माझा जीव घुटमळ आहे. सारे काही माहीत असून मी शांत झाले म्हणून आतल्या आत माझा जीव पोखरत आहे. आता काका शुद्धीवर आले की मी त्यांना सारे काही सांगेन आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईन." अनु म्हणाली.

"अजिबात नाही. डॉक्टरांनी त्यांना काही सहन होणार नाही असे बोलायचे नाही, शिवाय काही पथ्य पाणी सांगितले आहे. त्यांच्या हृदयावर ताण पडले इतके दुःख त्यांना द्यायचे नाही शिवाय त्यांना जास्त त्रास द्यावयाचा नाही असे सांगितले आहे त्यामुळे त्यांची काळजी आता मलाच घ्यायची आहे. मी सारे काही त्यांना नंतर सांगेन पण आता ते जे काही म्हणत आहेत ते आपल्याला ऐकावे लागणार आहे." मिहिर म्हणाला.

"म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचे आहे? मला काहीच समजले नाही. जे काही बोलायचे आहे ते स्पष्ट बोल." अनु म्हणाली.

"म्हणजे आता त्यांच्या मनानुसार आपण दोघे लग्न करू आणि ते बरे झाल्यानंतर त्यांना सारे काही सांगून आपण वेगळे होऊ. मग मी श्रेयशी लग्न करेन." मिहिर म्हणाला.

"तुझं डोकं फिरलय का? लग्न म्हणजे तुला खेळ वाटला का? जो तुला माझ्याशी खेळायचा आहे. माझे आयुष्य काही रस्त्यावर पडले नाही. मला मुळात तुझ्याशी लग्न करायचेच नाही. मी माझी समर्थ आहे. मला असे काही करण्याची मुळीच गरज नाही. तुमचे आयुष्य आहे तुमचे तुम्ही पाहून घ्या. माझ्या वडिलांना कसे समजवायचे ते माझे मी समजावेन." असे म्हणून अनु जाऊ लागली.

"तू एवढी स्वार्थी असशील असे मला अजिबात वाटले नव्हते. आतापर्यंत तुला मी जेवढे ओळखतो त्यावरून तरी तुझा स्वभाव असा वाटला नव्हता. पण मी पहिल्यांदा कोणाची तरी पारख करण्यास चुकलो आहे. नक्कीच तू एक स्वार्थी आहेस. नेहमी स्वतःचा विचार करणारी, दुसऱ्याचा विचार अजिबात करायचा नाही." मिहिर म्हणाला.

"तुला जे काही समजायचे आहे ते तू समज पण मी अशा प्रकारच्या लग्नाला कधीच तयार होणार नाही. घरच्यांना फसवून आपल्याला काय मिळणार आहे. जे काही आहे ते त्यांना सारे काही सांगू. ते आपल्याला नक्कीच समजून घेतील. थोडे रागावतील, रुसतील पण ते नक्कीच समजून घेतील याची मला खात्री आहे. असे खोटेनाटे नाटक करत बसण्यापेक्षा जे खरे आहे, सत्य आहे ते त्यांच्यासमोर मांडू. मग जे काही होईल त्याला सामोरे जाऊ." अनु म्हणाली.

"मला काही हौस नाही तुझ्याशी लग्न करायची पण माझ्या बाबांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, शिवाय त्यांनी तुलाच माझ्यासाठी पसंत केले आहे म्हणून मला हे करावे लागत आहे. नाहीतर श्रेयाला घेऊन तेव्हाच मी पळून जाऊन लग्न केले असते पण बाबांच्या मनाविरुद्ध जाण्याची सध्यातरी माझी मनःस्थिती नाही. मला त्यांच्या मनानुसार थोडे दिवस का होईना वागावेच लागणार आहे आणि यामध्ये तू माझी साथ देणार आहेस. मगाशी त्यांच्याशी बोलताना तू जशी शांत बसली होतीस तसेच आताही शांत बसायचे आहे. जे काही बोलायचे ते मी एकटा बोलणार. तुझ्या मगासच्या मौनाचे उत्तर आता मी देणार आहे. तेव्हा जर तू बोलली असतीस तर हा प्रसंग माझ्यावर ओढवला नसता. आता जे काही होईल ते तुला निमुटपणे सहन करावेच लागणार आहे." मिहिर म्हणाला.

"तुझी एवढी का जबरदस्ती? माझे आयुष्य स्वतंत्र आहे, तुझे आयुष्य स्वतंत्र आहे. तुझ्या आयुष्यातील निर्णय तुझे तू घेऊ शकतोस. तुझे निर्णय तू माझ्यावर लादू शकत नाहीस." अनु जवळ जवळ त्याच्यावर ओरडलीच.

अनु मिहिरशी लग्न करायला तयार होईल का? अर्थात थोड्या कालावधीसाठी.. हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all