गंध मातीचा

Gandha maticha

*शिर्षक-गंध मातीतला*

सिमेंटच्या जंगलातून निघून
चला खेड्याकडे जाऊया
आत्मीयता आणि प्रेमाच्या
गावात जाऊन फिरु या

संवाद आणि विश्वासाचा 
 पारावरती भरतो तिथे मेळा
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
होतात  तिथे सर्व गोळा

नदी, डोंगर ,नद्या नाले
सोबत चिंचा,बोरी,करवंदे
निसर्गाचा आस्वाद घेण्या
स्वागत करण्या‌ उभे बंदे

वेशीवरती गाव सारा जमतो
होई प्रत्येक सण साजरा
चुलीवरच्या भाकरीसंगे
खमंग झुणका,खर्डा न्यारा 

आजी, आजोबांच्या सहवासात राहून
प्रेमाची पखरण होते
खरखरीत हातांनी चेहऱ्यावर
कौतुकाचा हात फिरते

मोकळा श्वास घेण्यासाठी
चला खेड्याकडे जाऊया
लाल, काळ्या मातीमध्ये
मिळून मिसळून राहूया

*सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर औरंगाबाद*